हस्तकला या विषयात मला पहिल्यापासूनच आंबटी, कडी, तुरटी, तिखटी होती. थोडक्यात, अजिबात गोडी नव्हती. पण का उगाच सणासुदीच्या (किंवा कुठल्याही) दिवसांत पोस्टची सुरुवात नकारार्थी करा म्हणून हे आपलं उगाच. तर हस्तकला (याला आता क्राफ्टिंग म्हणतात म्हणे) म्हणजे काही करता आलं नाही तरी चालेल असं वाटण्याचा किंवा "मला हे असलं काही करता येत नाही" असं अभिमानाने सांगण्याचा विषय असं मला पूर्वी उगाचंच वाटत असे. मग शाळेतल्या/बिल्डिंगमधल्या मित्रांच्या मदतीने कापाकापी, चिकटवा-चिकटवी करत बाईंनी सांगितल्याच्या सदृश काहीतरी वस्तू बनवून लज्जारक्षणाचं काम पार पाडलं जाई. हे असं कित्येक वर्षं सुरळीतपणे चालू होतं. पण ज्याला आपण (मी) चिरकुट काम समजतो त्याला जाम, जबरी, जबरदस्त, कैच्याकै, भारी ग्ल्यामर आहे तस्मात् आपण किती नॉन-ग्ल्यामरस आहोत याचा साक्षात्कार मला अचानक एका वर्षी झाला.
माझ्या एका जवळच्या मित्राकडे गणपती असत पण माझा त्यातला रोल फक्त गणपतीचं दर्शन घेणे, जोरजोरात आरत्या म्हणणे, प्रसाद खाणे आणि "व्वा, छान" म्हणत मखराचं कौतुक करणे येथवरच सीमित असे. मखराचं काम सर्वस्वी काका लोकांकडे होतं. पण अचानक माझ्या मित्राच्या दादा लोकांना "आता आपण मोठे झालो आहोत, आपण आपल्याला हवं तसं मस्त डिझाईनचं मखर बनवू" असा माज किंवा काका लोकांना "चला भाऊ, बस झालं हे मखर प्रकरण आता. आताशा झेपत नाही. आता कार्ट्यांनाच कामाला लावलं पाहिजे" असा साक्षात्कार (साक्षात्कार, साक्षात्कार फार होतंय. दुसरा चांगला (पण समानार्थी पाहिजे हां) शब्द माहित्ये का कोणाला?) झाला असावा. नक्की कोणाला काय झाला हे (निदान माझ्यासाठी तरी) गुलदस्त्यातच होतं पण अचानक त्यावर्षी यंग ब्रिगेड ... शी शी... गणपतीचं वर्णन आणि 'ब्रिगेड' नको.. टीम टीम.. हां हे बरं आहे... तर अचानक त्यावर्षी यंग टीमने मखर करायचं असा फतवा निघाला (च्यायला, ब्रिगेड काय, फतवा काय. पेपर वाचणं पूर्ण बंद केलं पाहिजे.) आणि आम्हा मित्रमैत्रिणींच्या जोरावर (!) त्यांनी एकदम चकाचक मखर बनवायचं ठरवलं. चर्चांच्या अनेक फेर्या घडत, सूचनांच्या असंख्य फैरी झडत अखेरीस मखर म्हणून सिंहासन करायचं फायनल झालं आणि सगळे कामाला लागले. वर्षानुवर्ष आपले शाळेतले हस्तकलेचे प्रयोग आपण रोजंदारीवर असल्यासारखे इतरांच्या दयेवर आणि उपकारावर चालतात हा तपशील साळसूदपणे विसरून मीही टीमबरोबर कामाला लागलो. पण 'सारी सोंगं आणता आली तरी कलेचं सोंग आणता येत नाही' असं माझ्यासारख्याच कोण्या दीनवाण्या कला-कफल्लकाने म्हणून ठेवलं असल्याप्रमाणे सुरुवातीच्याच काही प्रसंगांतून माझं सोंग लवकरच उघडं पडलं.
१.
म्होरक्या : अरे हे सोनेरी कागदाचे असे तुकडे कोणी केलेत?
म्या : मी
म्हो : चौकोनी तुकडे करायला सांगितले होते ना?
म्या : चौकोनीच आहेत ना हे.
म्होरक्या : बरं !! विन्या, याने केलेल्या तुकड्यांचे चौकोनी तुकडे कर फटाफट.
२.
म्हो : सिंहासनामागच्या पडद्याला बांधायची फुलं कोणत्या रंगाची करायची?
मेंदू क्र १ : लाल
मेंदू क्र २ : पिवळा
मेंदी क्र. ३ : अबोली
म्या : काळा
म्हो आणि सगळे मेंदे : ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या
उपरोल्लेखित आणि अनुल्लेखित २ (३,४,५,६.....) प्रसंगांनंतर कलाकुसर, सजावट, डेकोरेशन, रंगरंगोटी या विषयांत आपण जगाच्या (निदान आपल्या मित्रांच्या तरी) किमान ५० वर्षं मागे आहोत या शाश्वत सत्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद (!!) घेत स्वतःहूनच माझी बदली मखर टीमच्या ......
म्हो : कोण कोण काय काय करणार आहे फटाफट बोला
दु १ : मी सिंहासनावरचे 'लोड' करतो
दु २ : मी वरची छत्री करतो
दी १ : मी मागची फुलं करते
म्या : मी मॅगी करतो
स्वतःहूनच माझी बदली मखर टीमच्या 'खानपान' विभागात करून घेतली. अर्थात मॅगी करण्यात माझा हात कोणी धरू शकत नसल्याने (अगदी शब्दशःही. कारण मखर सोडून कोण येईल मॅगी करायला?) आणि मॅगी करणं माझ्या डाव्या हाताचा मळ असल्याने मखर करता करता समोर येणार्या गरमागरम मॅगीला स्मरून सगळ्यांनी माझ्या त्या निर्णयाचं स्वागतच केलं. अशा तर्हेने वर्ष-दोन वर्षं आनंदात गेली. पण तोवर दादा गँगचा उत्साह गंडल्यामुळे मखराची सारी सूत्रं माझ्या मित्राच्या हातात आली आणि मला स्वतःवर नसेल एवढ्या त्याला माझ्याबद्दल वाटत असलेल्या कॉन्फीडन्सपायी पुन्हा एकदा मखर टीमच्या खानपान विभागातून माझी बदली मुख्य विभागात केली गेली. पण त्याही वर्षी असेच अकलेचे आणि कागदांचे तारे तोडले गेल्याने आणि मॅगी आणि कॉफी (हो एकदा कॉफीही केली होती ते सांगायचं राहिलंच मगाशी) करायचा कंटाळा आल्याने मी "मखर करण्याच्या (करणार्यांच्या) अतीव उत्साहात आणि गोंगाटातही शांत झोप कशी घ्यावी" याचं प्रात्यक्षिक दाखवणार्या 'निद्राग्रहण' विभागाचा एकमेव आजीव सभासद झालो. पण त्या गोंगाट, आरडाओरडा, बडबड, मस्करी या सगळ्यांत 'निद्राग्रहण' विभागाचा बघता बघता 'निद्रानाश' विभाग झाला आणि पुनःश्च हरिओम म्हणत मी पुन्हा एकदा आपला 'दर्शन, आरती, प्रसाद आणि मखराचं कौतुक' इतपत सीमित असलेला रोल इमानेतबारे पार पाडायला लागलो.
------
"यंदा गणपतीचं दर्शन घ्यायला मिळणार नाही. काय बाई तरी यांची ही अमेरिका :(" राजमाता राणीमातेला वदत्या झाल्या.
"हो ना. खरंच करमणार नाही यंदा" राणीमाता
"कशाला काळजी करताय? आपला छान छोटा गणपती आहे की घरात." राणीसाहेब
"मग घरातल्या याच छोट्या गणपतीच्या निमित्ताने आपण यावर्षी गणपती घरी आणूया... काय?" इति स्वयमेव एकमेव.
बघता बघता हा माझा प्रस्ताव दोन्हीकडच्या आईबाबांनी आणि प्रत्यक्ष राणीसाहेबांनी अत्यानंदाने उचलून धरला आणि च्यामारिकेत बाप्पा आणायचा बेत पक्का झाला. मखर, प्रसाद, आमंत्रणं वगैरेंच्या तयारीची लगबग सुरु झाली. पूर्वानुभवामुळे आणि माझ्या आजवरच्या (अ)यशस्वी रेकॉर्डमुळे मखराच्या चर्चेत मी अर्थातच पाणी (वाचा कॉफी, मॅगी) आणण्यापुरताच असणार हे सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. आणि बरोब्बर अशा वेळी मी पहिला षटकार ठोकला.
"हा गणपती बाळराजांच्या निमित्ताने आहे. त्यामुळे बाळगणेशाचा पाळणा आपण मखर म्हणून करुया". बघता बघता आ वासले गेले, दाही डोळ्यांमधले भाव आधी आश्चर्य, मग अविश्वास आणि त्यानंतर कौतुक अशा चढत्या क्रमाने बदलत गेले. ही कल्पना मी सुचवतो आहे यावर विश्वास ठेवणं सुरुवातीला कठीण गेलं असलं तरी सगळ्यांना कल्पना मात्र जाम आवडली होती. त्यानंतर ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाहीला सुरुवात केली गेली.
१. एक मोठा खोका घेऊन त्यात भरपूर कपडे आणि पुस्तकं भरली गेली.
२. चांगल्या जाड सेलोटेपने खोका बंद केला गेला.
३. त्यावर पाचही बाजूंनी सोनेरी कागद लावला गेला. अशा तर्हेने पाळण्याचा बेस तयार झाला.
४. चारी बाजूंना कुंपणसदृश भिंती पाळण्याची चौकट म्हणून लावल्या गेल्या.
५. सोनेरी कागदांचे गोल तुकडे करून त्यांना पाळण्याच्या सोनेरी दोर्यांचं रूप दिलं गेलं.
एका मिनिटात लिहिलेल्या या पाच स्टेप्ससाठी प्रत्यक्षात पाच माणसांना सात दिवस रोजचे किमान चार तास राबावं लागलं. (सहावा माणूस (मी नाही) छोट्या गणपतीला सांभाळायला असे.).
**
विषयांतर :
१. अशी पाच मखरं करायला तीन माणसांना किती दिवस लागतील?
२. हेच मखर दोन दिवसांत पूर्ण करायला किती माणसं लागतील?
३. हेच मखर तीन माणसांनी पूर्ण करायला किती दिवस लागतील?
या प्रश्नांची अचूक उत्तरं देणार्यांना मंडळातर्फे एकशे एकवीस मोदकांचं बक्षीस.
**
आणि अशा तर्हेने माझ्या आयुष्यातलं पाहिलं मखर ज्यात मी कॉफी, मॅगी, झोप या टीम्स मध्ये नाव नोंदवून कपडे सांभाळण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात उतरून लढण्याचं काम केलं होतं ते जन्माला आलं. खाली पाहून (म्हणजे पोस्टमध्येच व्हो) ते आपल्यालाही पाळण्यासदृश नाही नाही पाळणाच दिसतो आहे की नाही याची खात्री करून घ्या. नसल्यास नेत्रवैद्य गाठण्याची घटिका समीप आली आहे असे खुशाल समजावे.

------
यंदा तर प्रसंग मोठा बाका होता. राजमाता-पिता आणि राणीमाता-पिता आपापल्या राज्यांत सुखाने नांदत होते. बाळगणेशाचे पराक्रम अतिवेगाने वृद्धिंगत होत होते. चार दिवसांवर गणेशाचं आगमन आलं तरीही मखरातला 'म'ही तयार नव्हता.. तयार कसला सुचतही नव्हता !! सिंहासन, परडी हे दोन प्रमुख स्पर्धक स्पर्धेत आघाडीवर होते. शेवटी साधं, सोपं, सुटसुटीत असे तीन वरचे 'सा' मिळाल्याने परडीने स्पर्धा जिंकली आणि आम्ही परडीच्या तयारीकरता दुकानं पालथी घालायला सुरुवात केली. परडीच्या आकाराची प्लास्टिकची टोपली घेताघेता गेल्यावर्षीचा पाळणावाला मेंदू चळवळायला लागला आणि अचानक एक नवीन कल्पना सुचली आणि बघता बघता त्याला मूर्त स्वरूप दिलं गेलं. (हे बघता बघता हे फक्त म्हणण्यापुरतं आहे. त्याला मूर्त स्वरूप देता देता आमच्या स्वतःच्या मूर्त्यांची स्वरूपं बदलली गेली ;) )
१. प्लास्टिकच्या दोन टोपल्या एकमेकींवर ठेवून तळाशी भोकं पाडून दोरीने घट्ट गाठ मारून त्या एकमेकांना जोडून निरांजनासारखा आकार केला.
२. निरांजन हे नेहमी चांदीचंच असल्याने भल्यामोठ्या चंदेरी रोलची खरेदी झाली.
* पुढच्या वर्षी मखर म्हणून निरांजन करू इच्छिणार्या भक्तजनहितार्थ प्रकाशित : चंदेरी कागद प्लास्टिकला चिकटत नाही. सारखा निसटतो, निघतो. निरांजनाच्या (माजी टोपलीच्या) गोल वळणार्या आकाराबरहुकुम कागदाने वळावं इतकं काही जीवाभावाचं नातं त्यांच्यात नसतं. कागद निघत राहतो, आपण चिकटवत राहतो, हात गमने माखत राहतात, वेळ वाया जातो, आपण वैतागतो, चिडचिड होते आणि अखेरीस पाच तासांच्या ऐवजी साडेतीन-चार तासाची झोप नशिबी येते. हे सगळं टाळण्यासाठी टिटानियम सिल्व्हर कलरचा कुठल्याही पृष्ठभागावर वापरता येणारा स्प्रे घेणं सगळ्यांत सोयिस्कर. थोडा महाग पडतो पण काम लवकर आणि अचूकपणे पूर्ण होण्याची आणि तस्मात् झोपेची हमी. उगाच चिक्कुबाजी करून एक स्प्रे घेतलात तर अखेरीस तो कमी पडतो आणि निरांजनाचा तळ आणि जिथे ज्योती असतात तो वरचा भाग आपला मुळचा (आमच्या केसमध्ये लाल) रंग दाखवत राहतो. पुन्हा दुसर्या दिवशी दुकानात जाऊन तसाच स्प्रे पुन्हा घेऊन येऊन 'ये लाल रंग कब मुझे छोडेगा' असं म्हणत पुन्हा पुन्हा (स्प्रेचे) हात मारावे लागतात.
३. चंदेरी कागद रात्रीही डोळ्यासमोर चंद्र न उभा करू शकल्याने आम्हाला वर जनहितार्थ प्रकाशित केल्याप्रमाणे रोज एक या प्रमाणात दोन दिवस हार्डवेअरच्या दुकानाच्या चकरा माराव्या लागल्या आणि रात्री घरी येऊन रंगकाम करावं लागलं. पण दोन बाटल्या रित्या करून झाल्यावर ते लखलख चमचमणारं निरांजन बघून डोळ्यांचं पारणं का कायसंसं म्हणतात ते फिटलं.
४. त्यानंतर जाड पुठ्ठ्याचा ज्योतीचा आकार तयार करून त्यावर सोनेरी कागद (हो इथे मात्र कागद चालतो कारण.... पाणीच मिळे पाण्याशी | सारखाच भेटे सारख्याशी | विजातीय द्रव्यांशी | समरसता होणे नसे || - इति प.पू. दासगणू महाराज) चिकटवला.
५. निरांजनाच्या मध्यभागी जिथे गजनानाचं विश्रामस्थान आहे त्यासाठी जुन्या मोबीलचा खोका कामी आला. फिट्ट बसलेल्या त्या खोक्यालाही चंदेरी रंगाचं सचैल स्नान घातलं गेलं आणि त्यालाही निरांजनाशी एकरूपता प्राप्त करून दिली.
६. वरच्या टोपलीचा म्हणजे आता निरांजनाच्या वरचा भाग म्हणून ओळखल्या जाणार्या भागाच्या तळात आणि या खोक्यात असलेली गॅप भरून काढण्यासाठी तांदुळांचा मुक्त हस्ते वापर केला गेला.
७. निरांजन तयार झाल्यानंतर ते जिथे ठेवायचं आहे ते मोठ्ठं टेबल सजवलं गेलं. पाठीमागे गणपतीस्तोत्र लिहिलेला मोठा भगवा पडदा लागला आणि त्याच्या आजूबाजूला दीपमाळा लावल्या गेल्या.
हुश्श.... लिहिता लिहिता धाप लागली. लिहायला पाच मिनिटं लागलेल्या त्या वरच्या मखराच्या वेळी घातलेली गणितं आता यावेळी सोडवून बघा. बघा केवढी मोठी उत्तरं येतात ते. उत्तरं जेवढी मोठी तेवढी चिडचिड मोठी आणि तेवढीच झोप छोटी.
अखेरीस, गणेशाचं आगमन, प्राणप्रतिष्ठा, आरती, प्रसाद आणि विसर्जन सगळं सगळं यथासांग पार पडलं.
------
हे एवढं सगळं का लिहिलंय? कशासाठी लिहिलंय? नक्की काय सांगायचंय याला? या पोस्टचं अर्थ काय? उपयोग काय? मेसेज (!!!) काय? चित्रपटासारख्या साध्या करमणूकप्रधान गोष्टींतूनही मेसेज शोधणारे आपण लोक... ही एवढी मोठी बकबक पोस्ट वाचली पण त्याचा अर्थ काय, ती कशासाठी लिहिली आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काहीच इंटरेस्ट वाटणार नाही आपल्याला या पोस्टमध्ये. तर सांगतो.. अर्थ सांगतो, उद्देशही सांगतो.
ते वर सांगितलेल्या खानपान, निद्राग्रहण, निद्रानाश विभागात मनसोक्त भटकंती करून झाल्यावर कंटाळून मी एकदा बाप्पासमोर उभा राहिलो आणि त्याची प्रार्थना केली..
"बाप्पा, लोकं बघ ना किती छान छान मखरं करतात, त्यांना मखराच्या छान छान आयडिया सुचतात, सिंहासन, कमळ, रथ, असं काय काय करतात.. त्यासाठी लागणारे सोनेरी, चंदेरी, लाल, निळे, हिरवे असे कसलेकसले चौकोन कापतात आणि सुंदर डिझाईन बनवतात. आणि मी !! मी आपला उगाच मॅगी, कॉफी कायकाय करतोय, झोपा काढतोय. प्लीज मला पण हे असं सगळ्यांसारखं मखर बनवता येऊदे ना.. प्लीज प्लीज.."
अचानक बाप्पा किंचित हसला आणि बोलायला लागला (खोटं नाही बोलत.. अगदी खरं सांगतोय.. म्हणाल त्याची शप्पत घेतो).. म्हणाला "काळजी करू नकोस. दरवर्षी माझी प्रार्थना करत रहा. सगळं ठीक होईल"
क्षणभर माझा स्वतःवर विश्वासच बसला नाही. चक्क बाप्पा बोलतोय?? पण सोंड हलताना व्यवस्थित दिसत होती. शंकेला जागाच नव्हती. मी प्रचंड खुश झालो होतो. प्रत्यक्ष बाप्पाने आशीर्वाद दिला होता. मी पुन्हा पुन्हा बाप्पाला नमस्कार केला आणि म्हणालो "बाप्पा, खूप खूप आभार्स.. मी पुढच्या वर्षीपासून न कंटाळता, टाळाटाळ न करता नियमितपणे मखर करत जाईन, सगळ्यांना मदत करत जाईन."
बाप्पा एकदम रागावल्यासारखा वाटला. किंचित ओरडून तो म्हणाला "तुला जेवढं सांगतोय तेवढं कर. तुला मखर करण्यासाठी मदत करायला कोणी सांगितलंय? मी सांगतो तेवढंच कर. दरवर्षी नियमित माझी प्रार्थना करत रहा. बास. इतकंच"
बाप्पाला एवढं रागवायला काय झालं हे कळेना. मी आपला 'कष्टेविण फळ नाही, कष्टेविण मखर नाही' म्हणत स्वतः मखर करणार्यांच्या मदतीला जायला तयार होतो. ते कसं करतात हे बघून आपणही मखर करायला शिकावं असा साधा सरळ विचार होता माझा. पण बाप्पाने एवढ्या ठामपणे नाही म्हंटल्यावर मी लगेच सावरून घेत "बरं बरं. तू म्हणशील तसं... मी फक्त प्रार्थना करीन तुझी दरवर्षी.. अगदी मनोभावे."
बाप्पा म्हणाला होता ते खरं होतं. अगदी शेंट परशेंट खरं !! कारण अशी अनेक वर्षं प्रार्थना करत राहिल्यावर थेट मखर नाही पण उत्तम मखर करू शकणारी आर्टिस्ट बायको बाप्पाने मला दिली. नुसतीच आर्टिस्ट नाही तर चतुर आर्टिस्ट !! जी मखराच्या कल्पना अशा काही रीतीने मांडते की माझ्या तोंडून आपोआपच हवं ते, योग्य ते उत्तर बाहेर पडून मखराची आयडिया आपली स्वतःचीच आहे असं मला वाटतं राहतं, अशीच माझी समजूत होते (आणि मग मी असल्या पोस्ट्स पाडत राहतो.) .. सुबक मखर, ग्रेट आयडिया, बायको खुश, त्या आयडियेची मालकी आपली असल्याच्या अविर्भावात मी खुश, उत्तम, देखणं मखर मिळाल्याने बाप्पा खुश. विन विन सिच्युएशन !! (अर्थात या चतुराईचा साक्षात्कार (पुन्हा साक्षात्कार !! पण ठीक्के. बर्याच वेळाने झालाय त्यामुळे चलता है..) मला नुकताच मखराने परडीच्या थ्रू निरांजनाचं रूप घेताना सॉरी घेऊन झाल्यावर झाला)
तर मग कळलं का तात्पर्य? मिळाला का मेसेज?
प्रार्थना करत रहा. इच्छा कुठल्या ना कुठल्या 'रुपात' पूर्ण होईलच !!!

मेशेज मिळाला ....आमचा पण मेसेज दे न...मखर अगदी दृष्ट लागण्यासारख झालंय...आणि आधीचा पाळणा तर मस्तच आहे...
ReplyDeleteमी स्वतः याबाबतीत एकदम शून्य आहे असा पूर्वानुभव आहे...शाळेत रुमालावर काही बाही शिवणी काढणे पण outsource केल होत म्हणजे बघ..
असो...ते मोदक तसेही कुणाला मिळणार नाही आहेत....तेव्हा कुणाकडे पाठवायचे हे वेगळा संगयाला नको....(नाहीतर भाजीच parcel येणार नाही...(धमकी नाही रे...फक्त सांगतेय...)
are ho murti kakani aanali ki kay???
धन्स धन्स.. सुंदर मखराचं श्रेय कोणाला हे तुला मेशेजमधून कळलंच असेल ;) .. पाळण्याचंही तेच.. :)
ReplyDelete>> मी स्वतः याबाबतीत एकदम शून्य आहे असा पूर्वानुभव आहे.
अगदी अगदी मीही.. ग्रेट माईंडस .. ;)
येणार येणार मोदक येणार.. पण भाजी मिळाल्याशिवाय नाही.. कारण भाजीची पोस्ट आधीची आहे ;)
नाही अग.. मूर्ती इथूनच घेतली. आमच्या घराजवळ भरपूर इंडियन स्टोर्स आहेत. तिथल्याच एका स्टोअरमधून घेतली. सुंदर, सुबक मुर्त्या मिळतात तिथे. थेट भारतातून येतात.. गेल्या वर्षीची मूर्तीही त्याच दुकानातून घेतली होती.
पाळणा नि निराजंन दोन्ही सुंदर दिसतायंत. झकास आहेत. पोस्ट जबरदस्त लिहिली आहेस. तुझ्यासारखं मला लिहिता आलं ना की मीपण बाप्प्पाला १२० मोदकांचा नैवेद्य दाखवेन. मी कधीकाळी थोडं फार कलाकुसरीचं काम केल्याची भरपाई म्हणून माझ्याही डोक्यावर असली काम टाकली जायची. कंटाळा यायचा पण नंतर गोडी वाटायची. भारतातच मिळू शकणारं काही कलाकुसरीचं सामान पुढे कधी हवं असेल, तर सांग. इथून पाठवून देईन.
ReplyDeleteहेरंबा, सकाळी सकाळीच थोबाडपुस्तिकेवर फोटू पाहून वाह! झालं होतच. आता त्या मागचा भलाथोरला इतिहास वाचून अजूनच भावलं.
ReplyDeleteपोस्ट खासच. तुझी आंबटी, तुरटी पासून सुटका झालीच आता. :)
छोडनेका नही... पाहिलेस नं एकच काय दोन दोन झकास जमलेत. आमच्या घरी पंधरा दिवस आधी सुरवात केली तरीही अगदी खुद्द गणपती आवरा म्हणेतो आम्ही कुठे वर्ख चिकटव तर कुठे रंग लाव करत राहायचो. मग गणपती बाप्पा थाटात विराजमान झाले की डोके थोडेसे ताळ्यावर येई... मग अश्या एक एक भारी आयडीयांचे पेव फुटे की शेवटी बाप्पाच पळ काढे. :D
मी वाचून अंमळ दमलेयं, जरा मोदक धाडतोस का??? :)
नमस्ते मंडळी, तुम्हां लोकांची समस्या माझे सत्य वक्तव्य आहे। कारण मी एखाद्या गोष्टीच्या मूळ कारणाकडे जाण्याचा आणि माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही लोक केवळ त्या गोष्टीवर वर -वर "गॉसीप" करून, एक - दुसर्याची खिल्ली उडवून त्यातून तुच्छ सुख मिळविण्याचा प्रयत्न करीत असता. मला ह्या ब्लॉग चा सन्दर्भ चांगला माहित आहे. तुम्ही गणेश मूर्ति १० दिवस बसवून गणेशाच्या नावाचा दुरुपयोग करून स्वतःची चंगळ करू इच्छित आहात. ती मूर्ति तर जड आहे. ती तुंम्हाला काय अडवविणार?
ReplyDeleteकृपया कोणत्याही वस्तुच्या मूळात जाण्याचा प्रयत्न करा. कारण आपण मनुष्य आहोत. विचारशील आहोत. प्रथम विचार करणे मग कृति करणे हीच बुद्धिमत्ता आहे.
धन्यवाद.
हेरंबा .... दोन्ही मखर , मूर्ती आणि पोस्ट नेहमीप्रमानेच अगदी झकास रे....
ReplyDeleteरात्री जागून मखर बनवणे आणि गणपती ची सजावट करताना एकमेकावर ओरण्यात आणि टोमणे मारण्यात खूप खूप मजा येते रे .....
आपल्याला ’लिहिता’ येतं - एवढया ’हस्तकले’वर मी आजतागायत समाधान मानले आहे :-)
ReplyDelete'सारी सोंगं आणता आली तरी कलेचं सोंग आणता येत नाही'
ReplyDeleteअगदी खर... पण आता कला छानच बहरली आहे, निरांजन आणि मखर मस्तच जमली आहे..आणि बाप्पांची मुर्ती सुंदर आहे..
गणपती बाप्पा मोरया!
जबरदस्त........
ReplyDeleteएक छोटेखानी मंडळच आहे कि तुमच......
झक्कास झालीये पोस्त आणि हो पाळणा आणि निरंजन सुद्धा......
शुभेच्छा .........
पुढच्या वर्षीही असाच काहीतरी नवीन पाहायला मिळेल अशी आशा करतो आम्ही......
मस्त :)
ReplyDeleteमस्त जमल आहे रे मखर आणि ही पोस्ट (पेटंट हेरंब स्टाईल) पण ...पाळणावाल मखर तर खुप आवडल.मी अजुनही हया मंडळात सहाय्यक म्हणुनच असतो, हे इथे पकड,हे काप..वैगेरेतर मग लगे रहो हेरंब भाय ऐसेही...पुढच्या वेळी पण असच काहीतरी मस्त झाल पाहिजे...तुझा मेशेज मिळाला आता आमचाही मेशेज/कौतुक पोहोचु दे योग्य ठिकाणी...
ReplyDeleteदोन्ही मखरं फारच छान आहेत!! पाळणा तर फार भारी!
ReplyDeleteपण माबदौलत विशेष खुश झाले आहेत ते ब्लॉग च्या सुरुवातीच्या दोन तीन प्याराग्राफ वर! ....झ्याक आहे!!
च्यामारी...एक्दम धरुन फ़ट्याक...पाळणा शॉलीड आहे रे...निरंजन मस्तच...सजावटीवर लिहल...आता थोड फ़ार मोदकांवर लिहा.. :) :)
ReplyDeletebhakti- hi heramb dada mastch. ganpatitar khup sundar ahe. ani ho makharhi. babani madat keli ka? te hastkalet mahir ahet. maza ali vachtana
ReplyDeleteहेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहू तोषवी.
ReplyDelete||बाप्पा मोरया||
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहू तोषवी.
ReplyDelete||बाप्पा मोरया||+१
झक्कास झाली आहे रे पोस्ट.मजा आली वाचताना .
ReplyDeleteएकदम हेरंब स्टाईल ..
खूप आवडली ..
काल तुला बोलल्याप्रमाणे बाप्पा अन मखर तर सुंदर झाल आहे.
बर्याच दिवसांनी पोस्टलास...
ReplyDeleteपण देर आये दुरूस्त आये! :)
लय भारी! छोटा गणपती ऑलवेज रॉक्स! आमच्या घरी ह्यावेळेस माझा पुतणा रॉकला!
मखर मस्त जमलंय. आणि मुर्ती पण मस्त आहे एकदम. गणपतीचा मुकुट पण सुंदर आहे.
ReplyDeleteदोन्ही मखर , मूर्ती आणि पोस्ट नेहमीप्रमानेच अगदी झकास ..
ReplyDeleteआवडेश...
खूप आभार्स कांचन. :)
ReplyDeleteबाप रे .. हे कैच्याकै.. उलट तुझ्यासारख्या कथा मला लिहिता आल्या तर मीच बाप्पाला नैवेद्य दाखवेन..
हो तुझी कलाकुसर तुझ्या आय-क्रिएटीव्ह ब्लॉगवर बघितली आहेच.. त्यामुळे तुझ्या डोक्यावर असली कामं टाकली जात असतील तर काहीच नवल नाही. :)
अग आणि कलाकुसरीचं सामान मागवलं तरी ते वापरता आलं पाहिजे ना. आमची आपली सिल्व्हर रंगरंगोटीच ठीक आहे ;)
श्रीताई, आता कळलं ना किती मोठ्ठाच्या मोठ्ठा इतिहास होता त्याच्यामागे :) हो.. आंबटी, तुरटीपासून सुटलो खरा..
ReplyDeleteते काय असेच जमले ग कसेबसे.. वाट लागली जमवता जमवता.
>> की शेवटी बाप्पाच पळ काढे.
हा हा.. पळता बाप्पा डोळ्यासमोर आला :)
मोदक धाडले आहेत बघ.. मिळाले की कळव आवडले का ते..
चि. राजेश, निरर्थक आणि असंबद्ध बोलण्यात तुझा हात कोणीही धरू शकत नाही हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. आपण एकमेकांना ओळखतही नाही त्यामुळे "मला ह्या ब्लॉग चा सन्दर्भ चांगला माहित आहे" या तुझ्या वाक्याला काहीच अर्थ नाही.
ReplyDelete"तुम्ही गणेश मूर्ति १० दिवस बसवून गणेशाच्या नावाचा दुरुपयोग करून स्वतःची चंगळ करू इच्छित आहात." हा मुर्खासारखा शोध तू कुठून आणि कसा लावलास याचं तत्वज्ञान तुझं तुझ्यापाशीच ठेव. अधिक बोलत नाही.. तुला मी बझवरून ब्लॉक केलं आहेच तसंच ब्लॉगवरूनही ब्लॉक करावं अशी इच्छा नसेल तर पुन्हा इथे येऊन कमेंट टाकण्याचे कष्ट घेतले नाहीस तर अधिक बरं होईल.
अजून एक. तुझी दुसरी निरर्थक कमेंट डिलीट केली आहे.. तशी मी ही कमेंटही डिलीट करू शकलो असतो पण तुला एकदा ठणकावून सांगण्याची गरज होतीच.. धन्यवाद !!
घरी गणपती नसला तरी ह्या आठवणी अनुभव तसेच आहेत...
ReplyDeleteरात्री जागून मखर बनवणे, काही चुकल कोणाचा सजावट करताना तर त्याला भारी फाइन असतो आमच्या इथे ;)
बाकी पोस्ट झक्कासच..बाप्पा मोरया रे !!
सचिन, खूप खूप धन्स.. ओरडण्यात आणि टोमणे मारण्यात मजा येते रे पण जागरणापायी दुपारी हापिसात पेंगताना वाट लागयची जाम ;)
ReplyDeleteसविताताई, तुमची ’हस्तकला' किती उच्च उच्च दर्जाची आहे याची मला पूर्ण कल्पना आहे !! :)
ReplyDeleteगौरव, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार..
ReplyDeleteजरा दमछाकच झाली पण जमलं :D
पुन्हा एकदा आभार. अशीच भेट देत रहा ब्लॉगला.
प्रतिक्रियेबद्दल खूप धन्स स्वप्ना..
ReplyDeleteहो ग्.. छोटेखानी मंडळच.. पण आहे नाही.. होतं.. सध्या तरी फक्त आम्हीच आहोत. :)
पुढच्या वर्षीही अशीच मारामारी करत बनवू काहीतरी..
आणि ब्लॉग वर स्वागत.. अशीच भेट देत रहा..
अजून एक.. तुझ्या आयात-निर्यात, कंटेनर वाल्या सगळ्या पोस्ट्स वाचल्या आहेत. फक्त मला त्यातलं ओ की ठो कळत नसल्याने आजवर प्रतिक्रिया दिली नव्हती.
अनेक आभार मंदार..!
ReplyDeleteदेवेन, धन्यु धन्यु.. अरे सहाय्यक दिग्दर्शकाचाच एक दिवस दिग्दर्शक होतो.. सो लगे रहो.. ;)
ReplyDeleteयावेळचं कसं बसं निस्तरलं.. बघू पुढच्या वेळी काय होतंय :)
प्रार्थना करत रहा.. तुझा मेशेजही 'योग्य' ठिकाणी पोचेलच !
हेहेहे.. अश्विन आभार्स... नमनाचं 'घडाभर' तेल हेच बऱ्याचदा जास्त 'चविष्ट' असतं असा पूर्वानुभव आहेच.. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.. :)
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..
यवगेशा, फट्याक आभार.
ReplyDelete>> आता थोड फ़ार मोदकांवर लिहा.. :) :)
भारी आयडिया आहे. लोकहो, 'माझे खादाडीचे प्रयोग : भाग ४' (सहन करण्या) साठी तयार रहा.
भक्ती, धन्स भक्ती. हो गणपती आम्हालाही जाम आवडला. मखर सगळ्यांनाच आवडलं हे पाहून आता मलाही आवडायला लागलंय ;)
ReplyDeleteकाकाने भरपूर मदत केली. जाम धम्माल आली.
सिद्धार्थ, प्रार्थना करत रहा. गजमुख 'भक्तांना' तोषवेलच. ;)
ReplyDeleteमाऊ, आभार्स.. (सिद्धार्थला जे लिहिलंय ते तुला लिहू शकत नाही ;) )
ReplyDeleteसागरा, धन्स रे..
ReplyDelete>> मजा आली वाचताना .
हे म्हणजे (मखर करताना) आमचा जीव जातो आणि (वाचताना) तुमचा खेळ होतो तसं झालंय ;)
आभार्स..
बाबा, हो रे.. खूप गॅप झाली.. आधी सुचत नव्हतं आणि नंतर (मखरामुळे) वेळ नव्हता.. आता मोकळा झाल्या झाल्या पोस्टलो..
ReplyDelete>> छोटा गणपती ऑलवेज रॉक्स! आमच्या घरी ह्यावेळेस माझा पुतणा रॉकला!
छोट्या गणपतींना रॉकायला फक्त भाद्रपदच लागतो असं काही नाही रे ;)
खूप आभार काका. मेहनत सार्थकी लागली म्हणायची..
ReplyDeleteगणपतीचा मुकुट आईने मुद्दाम मुंबईहून पाठवला. मुकुट, दुर्वा, कंठी, फुलं, विड्याची पानं (सगळं चांदीचं आणि वर सोन्याचं पाणी दिलेलं)
आका, खूप आभार्स.. सगळ्यांना मखर आवडलं हे ऐकून खूप बरं वाटतंय.
ReplyDeleteआभार्स सुहासा..
ReplyDeleteअरे आम्ही पण गेल्या दोन वर्षांपासून गणपती आणायला लागलो. तोवर मखराचं काम कधीच एवढं सिरीयसली केलं नव्हतं.. पण आता मजा येते जाम..
बापरे असा फाईन आमच्याइथे असता ना तर दर गणपतीला मी कफल्लक झालो असतो ;)
हेरंबा अरे कसले सुंदर बनवले आहेस मखरं... माणसाने मॉडेस्ट असावे पण किती ?;)
ReplyDeleteपोस्ट खुसखूशीत झालीये जाम (तळणीच्या मोदकासारखी.... :) )
बाकि छोटा गणपती रॉक्स हे तर कायमस्वरुपी (ओंकाररूपी )सत्य आहे रे!!:)
आभार्स तन्वे.. अग मॉडेस्ट कसलं प्रॅक्टिकल म्हण ;)
ReplyDeleteवा वा.. तुही 'तळणीचे मोदक' वालीच का?? सही !!
>> बाकि छोटा गणपती रॉक्स हे तर कायमस्वरुपी (ओंकाररूपी )सत्य आहे रे!!:)
अग त्याच्यामुळे तर गणपती सुरु झाला आमच्याकडचा :) .. तो ऑलवेज रॉक्स :)
पोस्ट जाम भारी झालीये, मखर कल्पना आणि इम्प्लीमेंटेशन (बाप्पा माफ करा) जबरी झालेय... जाम फॉर्मातली पोस्ट वाटतेय हेरंब..
ReplyDeleteagain credit goes to Aadi :)
हा हा आनंदा... खूप आभार्स रे.. पोस्ट फॉर्मातली आहे की नाही ते तूच ठरव :) ..
ReplyDelete>> again credit goes to Aadi :)
As usual :)
मस्त सजावट आणि मखर ! आणि तेवढीच सुंदर पोस्ट !
ReplyDeleteइथे, टिळकनगर चा देखावा छान केलाय नेहमीप्रमाणे. पाहायला पाहिजे.
अप्रतिम ,सुंदर बापा चागल्या कल्पना व शक्ती देणार .
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार, क्षितीज.. !
ReplyDeleteटिळकनगरचे फोटो काढलेस तर ब्लॉगवर टाक तुझ्या.. म्हणजे मला बघता येईल..
काका, खूप आभार.. सगळं बाप्पाच्या कृपेने तर चाललंय :)
ReplyDeleteHey, we still miss that maggy!!!
ReplyDeleteVinod, I 'want to' believe you ;)
ReplyDeleteThanks re :)
DADA SOLID ZAL AAHE MAKHAR AANI POST SUDDHA,
ReplyDeleteMAKHAR KARATANACHE PHOTO KADHALE AAHES KA? AADITEY NE KAY ODHA ODHI KELI TYALA KHELAYALA KHUP NAVIN VASTU DISAT ASATIL. AANI TONDAT GHALAYALA TAR KHUPACH CHAVIST VASTU, SPRAY, KAGAD MAJA AALI ASEL AADITEYALA SAMBHALATANA.
HEMALI
धन्स हेमाली.. अग आदितेयला सांभाळून मखर बनवता आलं हेच खूप. ते बनवताना फोटो कसले काढणार... आणि काढले असते तरी मग पुन्हा कॅमेरा सांभाळण्याचे प्रॉब्लेम.. याने तर वाट लावली असती कॅमेराची..
ReplyDeleteमखर बनवताना ओढाओढी केली याने पण त्यामानाने बराच शांत होता. त्यामुळे तर एवढं बनवता आलं नाहीतर सगळीच वाट होती..:)
झ्याक पोस्ट आहे. मस्तच लिहिलं आहे एकदम. :-) तुमच्या या लेखमालेच्या चाहत्यांमध्ये आज एकाची भर पडली हेरंबराव... :-)
ReplyDeleteधन्स धन्स संकेतराव.. ("राव मत कहो ना" असं आता आपण दोघेही एकमेकांना म्हणूया ;) )
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार. अशीच भेट देत राहा ब्लॉगला.
आणि 'फॉलो' वर क्लिक केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.. बाप्पाच्या कृपेने तुम्हाला ताबडतोब २१ मोदक खायला मिळोत ;)
लय भारी राव ! तुमचा मेसेज देण्याची idea लय म्हणजे लय म्हणजे लय भारी !! पोस्त पण एकदम झकास !!! तुमच्या ह्य पोस्त साठी सलाम म्हणून गणपती चौकात "शिव-गर्जना " style ढोल वाजवता आला तर बघतो !!!
ReplyDeleteमोदक खायला मिळाले, पण २१ नाही. (मी दिवसेंदिवस जाडा होत चाललो आहे असं लोकांचं म्हणणं असल्यामुळे (हे फक्त लोकांचं म्हणणं आहे, माझं नाही.. लोक जळतात माझ्यावर यू नो!) थोडे कमी खाल्ले.) पण खायला मिळाले हे महत्त्वाचं, नाहीतर अमेरिकेत कुठून येणार मोदक? (पक्षी: आम्ही अमेरिकेत आहोत). कॉलेज चालू असल्यामुळे आता भारतात जायला वेळ आहे. आणि कामावरूनही सुट्टी मिळेल की नाही देव जाणे. (पक्षी: आम्ही शिकतोही आणि नोकरीही करतो. (’बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ हे शब्द वापरायला हवे होते या ठिकाणी...) उपपक्षी: मी शिकतोय म्हणजे माझं वय तसं कमी आहे आणि मी तरुण आहे हीही गोष्ट सुज्ञ वाचकांच्या ध्यानात येईलच.) तेव्हा सध्या अमेरिकेच्या मोदकांवरच भागवतोय. :-) असो. काल हा लेख वाचल्यावर तुझे बाकीचेही काही लेख वाचले. मस्त आहेत सगळेच. तेव्हा मला वाटतंय आजचा माझा दिवस तुझे उरलेले लेख वाचण्यातच जाणार आहे.
ReplyDeleteविक्रम, भरपूर भरपूर धन्स..
ReplyDeleteआणि "शिव-गर्जना " स्टाईल ढोल बद्दल धुमधडाका धन्स !!
धन्स रे संकेत.. खरंय.. अमेरिकेत शिकणार्या आणि लग्न न झालेल्या तरुण विद्यार्थी-नोकरी करणार्यांना (होप मी सगळं कव्हर केलंय ;) ) मोदक मिळणं तसं अवघडच. तरी तुला मिळाले हे नशीबच..
ReplyDeleteआणि तू लावलंयस काय? आज सकाळी उठून बघतो तर माझा मेलबॉक्स 'संकेत आपटे यांची नवीन कमेंट' अशा मेल्सने भरून गेलेला !!!! खरं सांगतो पहिल्यापासून असा कोणी ब्लोग वाचला ना आणि तेही सगळीकडे प्रतिक्रिया देत देत की ब्लॉगरला किती आनंद होतो हे मी शब्दात सांगू शकत नाही.. खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प आभार.. !!!!!!!!!
http://www.youtube.com/watch?v=1b_04_Xxtlc&feature=related
ReplyDeletehttp://www.youtube.com/watch?v=8JjENblGUqE&feature=related
he ghya - shiv garjne shivay mya punekarach ganapati ustav purna hot nahi rai !!
ek alka talkies chokatala ani ek ganapati choukata madhla ahe !
हा हा विक्रम.. तुम्ही तर खरोखरीच ढोलताशे घेऊन आलात राव.. खूप खूप आभार्स :)
ReplyDeleteव्वाह सुरेख... :)
ReplyDeleteसौरभ, चिक्कार धन्स रे :)
ReplyDelete