Tuesday, January 19, 2010

अप्सरा आली (च नाही) !!

"गणा आणि त्याचे साथीदार तमाशासाठी बाईचा शोध घेत असतात. शेवटी किशोर कदमला (त्याचं चित्रपटातलं नाव विसरलो) एका जत्रेत/लग्नात ती नाचताना दिसते. संगीतावर नाचणारी लयदार पावलं, मोकळे केस अशी बेधुंद नाचणारी सोनाली कुलकर्णी काही क्षणातच पडद्यावर अवतरणार असते. तिच्या घामेजल्या चेहऱ्यावर कॅमेरा स्थिरावतो."

आणि मी एकदम वैतागून म्हटलं "हात्तीच्या, अजूनही सोनाली कुलकर्णीची एन्ट्री नाही? मला वाटलेलं हीच असणार सोनाली कुलकर्णी".
हा असा काय वेंधळ्यासारखं बडबडतोय अशा नजरेने बायकोने माझ्याकडे बघितलं.
"काय झालं?" मी
"बरा आहेस ना?" बायको
"????" मी
"अरे बाबा हीच तर आहे सोनाली कुलकर्णी" बायको
"क क क क्काय" असं मी एकदम शाहरुख थाटात कोरडलो.. आपलं ओरडलो
"अग असं काय" माझा पुन्हा एकदा निष्फळ प्रयत्न
"का?"
"अगं ही कोण सोनाली कुलकर्णी? मला वाटलं ती आपली सोनाली कुलकर्णी आहे या सिनेमात"
माझ्या अज्ञानमुलक प्रश्नाला वैतागून किंवा सोनाली कुलकर्णीला आपली म्हटल्याने बायकोने शांत राहणं पसंत केलं.

त्याचं झालं काय की मी नटरंग बघण्याआधी कुठेही त्याचे प्रीव्युज, प्रोमोज, पुरस्कार सोहळे वगैरे बघितले नव्हते. (गाणी बऱ्याच दिवसां पासून ऐकतोय पण विडीओज नाही बघितले. अर्थात युट्युबच्या युगात हे एवढं अडाणी राहणं म्हणजे जरा अतीच झालं.) जिथे जिथे ऐकलं तिथे तिथे अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी असंच ऐकलं होतं. आणि जेवढे फोटो बघितले ते पण सगळे अतुल कुलकर्णीचे रांगड्या रूपातले. नंतर नटरंगचे बरेच रीव्युज वाचले.पण मला ज्या २ गोष्टी अपेक्षित होत्या त्याबद्दल एकाही ओळीचा कुठेच उल्लेख नव्हता.

१. सोनाली कुलकर्णीने कारकीर्दीत प्रथमच केलेल्या तमासगीर बाईच्या भूमिकेबद्दल
२. वय झालं असूनही (अर्थात इतकंही नाही बट स्टील) सोनालीने अप्सरा अप्रतिम रंगवलीये

वगैरे वगैरे... अशा काही ओळींची मला अपेक्षा होती. पण कुठेच काहीच न आल्याने मला वाटलं की सोनालीला अगदीच छोटी भूमिका असावी.

पण हाय रे..  ही अप्सरा वेगळीच निघाली. मी "मुक्ता" पासून कारकीर्द सुरु करून अप्रतिम अभिनय, निखळ,गोड हास्य आणि सुस्पष्टट (कित्ती स्पष्ट ते कळावं म्हणून ट ला ट मुद्दाम जोडलाय) शब्दोच्चार या प्रमुख गुणांवर पुढे असंख्य अविस्मरणीय भूमिका साकार करणाऱ्या त्या सोनाली कुलकर्णी नावाच्या अप्सरेची वाट बघत होतो. अर्थात या सोनालीला नावं ठेवत नाहीये मी. पण आपल्या  (ज्यामुळे बायकोने शांत राहणं पसंत केलं त्या) सोनालीची जादू  काही औरच. तिच्या मुक्ता मधल्या अभिनयाने आणि दिसण्याने वेड लावलं होतं. त्यानंतर दोघी, कैरी, देवराई, सखाराम बाईंडर (सयाजी शिंदे बरोबरचं) करत करत दिल चाहता है पर्यंतचा थक्क करून सोडणारा प्रवास. इथे खरंच टिळक जयंतीच्या दिवशी आढळणारा आगरकरांबद्दलचा (किंवा तत्सम.. तपशील चुकले असतील) जाज्वल्य पुणेरी अभिमान दाखवण्याचा हेतू नाही. पण खरंच नामसाधर्म्याने झालेल्या गोंधळामुळे (किंवा आमच्या अडाणीपणामुळे) का होईना आमची अप्सरा आलीच नाही :(

जनहितार्थ : सिद्धार्थची जनहितार्थची कल्पना आवडली. (कमेंट बघा). जुनियर सोकूचे सगळे फोटोज लावणं शक्य नाही. म्हणून "जनहितार्थ" म्हणून एक लावतोय. आणि ज्यू सोकू चा लावल्यावर "आपल्या" सोकू चा पण लावलाच पाहिजे म्हणून तो ही लावतोय :)

"नटरंग" वाली सोकू

 
"आपली" सोकू 

(ज्यु सोकू इ-मेल forward वरून आणि "आपली" सोकू आंतरजालावरून  साभार)

40 comments:

  1. >> माझ्या अज्ञानमुलक प्रश्नाला वैतागून किंवा सोनाली कुलकर्णीला आपली म्हटल्याने बायकोने शांत राहणं पसंत केलं.
    हा..हा... तिचं नाव आता सोनाली कुलकर्णी२ ठेवलं पाहीजे... :-)

    ReplyDelete
  2. :) हो ना आनंद.. तिला नं २ किंवा सो-कु जुनियर असं काहीतरी म्हटलं पाहिजे. उगाच आमच्या सारख्यांचा गैरसमज (आणि हिरमोडही) होतो..

    ReplyDelete
  3. kishore kadamcha cinematala nav 'pandaba' ahe :-)

    ani tu ha cinema kuthe pahilas ? torrent varun download kelas kaa ? tasa asen tar mala hi link de ki rav download karto ithe

    -Ajay

    ReplyDelete
  4. "क क क क्काय" असं मी एकदम शाहरुख थाटात कोरडलो mastach

    ReplyDelete
  5. अगदी खरंय मी ही काहीसा गोंधळलो होतो नाम सादृश्यामुळे

    ReplyDelete
  6. माझा पण असाच पोपट झाला....मला पण वाटली तीच आपली सोनाली....नटरंग आणि खास अतुल आणि सोनाली साठी मी थेट दिल्लीहून पुण्याला जाणार होतो ..त्यातच झेंडा आणि शिक्ष्नाच्या... पण पहाण्याचा विचार होता....पण कालच मित्राने मला खास नटरंग्मधील सोनालीचे लावानितले फोटो send केले....म्हणालो ही कोण ती 'जाऊ द्या ना घरी' वाली का तर तो म्हणतोनाही हीच ती सोनाली..आणि मी उडालोच.....जिथे आपली सोनाली नाही तिथे पुणे ट्रिप कैंसल झेंडा पण नाही आणि शिक्ष्नाच्या.. पण नाही...:(

    ReplyDelete
  7. आपली 'सोनाली कुलकर्णी' अप्सरा आहेच .. पण ही नवीन 'सोनाली कुलकर्णी' कमी 'अप्सरा' नाही. तुला एक मेल केलाय तो बघ ... ;)

    आणि बोल 'अप्सरा आली' ... :D

    ReplyDelete
  8. he he ... same pinch

    'apsara' cha photo baghoon mi hi navryala vicharale hote, 'arre hi kuthalya angle ne so-kul saarakhi disate?' mhanoon :)

    ReplyDelete
  9. अरे खरं की काय? मी पण आपली 'दिल चाहता है' वाली सोनाली कुलकर्णीचं धरून चाललेलो. मला पण प्रोमोमध्ये नीट ओळखता आली नाही. म्हटलं मेकअपमुळे वेगळी दिसत असेल. परवा "सारेगम"च्या मंचावर 'नटरंग'ची टीम आलेली तेंव्हा देखील "सोनाली" कशी नाही आली हा प्रश्न पडलेला. आत्ता तुमचा बॉग वाचून सगळा उलगडा झाला.

    ReplyDelete
  10. @अजय, ओह यस. मला पांडू, पांडा असं काहीसं वाटत होतं. पण नक्की आठवत नव्हतं. म्हणून म्हटलं उगाच लोचा नको.
    अरे मराठी चित्रपटांसाठी आमचा एकमेव तारणहार म्हणजे apalimarathi.com . इथे पण बरेच उशिरा येतात नवीन पिक्चर. पण नटरंग फारच लवकर आला. आम्हाला अजून साधारण६ महिन्यांनी बघायला मिळेल असं वाटत होतं. पण गणा पावला.

    ReplyDelete
  11. धन्यवाद सुषमेय. काल मला एकता आणि राकेश रोशन दोघांचेही फोन आले की आम्ही एवढी क क क ची पारायणं करतो आणि तू एकट्या शाहरुखचं नाव का घातलस म्हणून ;-)

    ReplyDelete
  12. @रोहन, मिळाला तुझा मेल. छानच दिसते रे ही जुनियर सोकू पण. मी आता असं म्हणतोय पण तुला एक गम्मत सांगतो. मला हेच मेल गेल्या आठवड्यात पण आलं होतं. मी १-२ फोटोज बघून ते सरळ डिलीट करून टाकलं. म्हंटलं ही कोण स्वतःला अप्सरा म्हणवणारी ;-) .. मेंटल ब्लॉक यु नो ...

    ReplyDelete
  13. हो ना पेठेकाका, बऱ्याच जणांचा असाच गोंधळ झाला..

    ReplyDelete
  14. हा हा हा अतुल. माझं पण अगदी असंच झालं होतं त्या मेलच्या बाबतीत. रोहनला दिलेला रिप्लाय वाच. आणि अगदी बरोबर आहे. सोनाली समोर "झेंडा","शिक्षणाच्या .." वगैरे वगैरे काहीच नाही. सब कुछ निछावर उसपे.

    ReplyDelete
  15. गौरी, काल पोस्ट टाकेपर्यंत मला असं फार फार लेफ्ट-अलोन वाटतं होतं. पण आता हायसं वाटतंय बरेचजण आहेत आपल्याबरोबर ते बघून. :-)

    ReplyDelete
  16. हा हा सिद्धार्थ. Welcome to the Confusion-Club. बरेच जण आहेत इथे तुझ्या-माझ्या सारखे :)

    ReplyDelete
  17. सोकुचं मेल आमाला बी पाठवा राव!!!

    ReplyDelete
  18. सिद्धार्थ, मला एक परीक्षा-पत्र (टेस्ट मेल रे ;) ) टाक. तुला forward करतो ते मेल.

    ReplyDelete
  19. या भ्रमनिरासात मीही आहे बरं का.....आपली सोनाली कशी आपली आहे. अतुल बरोबर तीच असणार हे गृहित धरलेले...पण... ही सोकु नंबर-२ आहे हेही शूट सुरू होताच कळलेले. गोडच आहे हीही.:) मीही आपली मराठीवरूनच डाऊनलोड करून घेतला. मायदेशात येऊ तेव्हां कुठेच लागलेला असणार नाही आणि डिव्हीडीही लवकर काढायचे नाहीत... तेव्हां नाविलाज को क्या विलाज.... बाकी तुझ्या म्हणण्याला शंभर टक्के दुजोरा.... आपली अप्सरा आलीच नाही राव.... मात्र ’अतुल्या ’ जबरीच हाय नव....:)

    ReplyDelete
  20. हो ना भाग्यश्रीताई, आपली सो-कु बघायला मिळणार हे गृहीत धरलेलं असल्याने ही सो-कु कितीही गोड असली तरी तशी वाटत नाही :( .. apalimarathi.com म्हणजे आपल्या सारख्यांसाठी वाळवंटात खरखुरं जळ (मृगजळ नव्हे) मिळाल्या प्रमाणेच :)
    बाकी अतुल्या या चित्रपटात अतुल्या राहिलाच नाही. तो पूर्ण वेळ "गणा" च वाटतं होता. नटरंग जगलाय तो अक्षरशः. अर्थात हे त्याच्या प्रत्येक भूमिकेला लागू होतं म्हणा.
    पण हो. "अप्सरा" आलीच नाही हा सल नेहमी बोचत राहणार :(

    ReplyDelete
  21. अरे इतक्यात मला सोकु जाम बोर झालीय का ते विचारु नकोस....मी एक जाम गरम (म्हणजे डोक्यात गेलेला) पिक्चर लावलेला "गुलमोहर" सोडून दिला पाच-पंचवीस मिन्टं पाहून.....सोकुचा दोष नाही पण ती सारखी सारखी अशाच भूमिका करते म्हणून मला वैताग आलाय...त्यामुळे मलातरी ही अप्सरा आवडली...आणि खरंतर तिला्ही जास्त फ़ुटेज नाहीये सिनेमात असंही मला वाटतंय...कदाचित नाचाचाच मुख्य भाग असावा...पण गाणी आणि गुणा छानच....

    ReplyDelete
  22. काय सांगतेस? सोकू सिनियर आणि डोक्यात? "गुलमोहर" बघितलाच पाहिजे आता काय दिवे लावलेत तिने ते बघायला.. आणि तू म्हणालीस तसं गाणी आणि गुणा सोडलं तर बाकी बघायचंय काय त्या पिक्चर मध्ये? :-)

    ReplyDelete
  23. धत तेरे की.... मग ती अमृता खानविलकर कोण??? ट्विटरवर मी कोणाची तरी ट्विट रीट्विट केली होती. त्यात असं लिहिलं होतं, "नटरंगच्या ’अप्सरा आली’मधील अमृता खानविलकरच्या अदा पाहून कोणीही ’आss!!’ वासतोय...!" अन ही सेकंड सोनाली कुलकर्णी, दिल चाहता है वाली नाही तर??? माझा तर गोंधळ झालायं...! ;)

    - विशल्या!

    ReplyDelete
  24. विशल्या, कोणी सांगितलं नटरंग मध्ये अमृता खानविलकर आहे म्हणून? मी बघितलेल्या वर्जन मध्ये तरी नव्हती.. हा हा ;-)
    आणि यात "दिल चाहता है" वाली सोकू नाहीये.. नवीन जुनियर सोकू आहे. तिथेच तर समस्त जनता कन्फ्युज झालीये.... माझ्यासकट..

    ReplyDelete
  25. माझ्या मते तुम्ही जूनियर सोकुचे फोटो (जे मला ई मेल केलेत) ते ह्या पोस्टवर पुरावा म्हणून लावायला हवे होते. अर्थात तुमच्यासारख्या "सीनियर सोकु" वेड्या माणसासाठी ते अंमळ कठीण होते पण जनहितार्थ म्हणून मी आपलं सांगितलं. ;-)

    ReplyDelete
  26. सिद्धार्थ, ज्यू सोकुचे सगळे फोटोज लावणं शक्य नाही. पण "जनहितार्थ" म्हणून एक लावतोय. आणि ज्यू सोकू चा लावल्यावर "आपल्या" सोकू चा पण लावलाच पाहिजे म्हणून तो ही लावतोय :)

    ReplyDelete
  27. मी सुदधा सुरुवातीला हया नावामुळे तुमच्यासारखाच फ़सलो होतो...पण एका मित्राने वेळेवर हे रहस्य उलगडल्यामुळे आमची पुढील फ़जिती टळली.. :)

    ReplyDelete
  28. हो ना. आमची फजितीही झाली आणि मूड ऑफ ही :(

    ReplyDelete
  29. बाबांनो ती पहिली नाचली ना बाराच्या गाडीवर त्या मिस अमरुता खानविलकरांची........आजकाल ती पण डोक्यात जायला लागलीय म्हणजे तशी कधीच ती डोक्यावर बसवली नव्हती म्हणा...पण तू यु ट्युबवर पहा... झी मराठीच्या एका कार्यक्रमात ऍंकर म्हणून डोकं खातेय....(आता मी का पाहाते तर आईची कृपा..सध्या झी मराठी विकत पाहातोय..पण यु ट्युबवर लेट फ़ुकटपण मिळतं....:)

    ReplyDelete
  30. आयला SSS .. हे तर माहितच नव्हतं... पुन्हा बघतो ते गाणं आता. आणि अर्थात मिस झालं म्हणून काही प्रॉब नाही. अमृता खानविलकर लक्षात ठेवली काय नाही ठेवली काय दोन्ही एकच :-)

    ReplyDelete
  31. विशल्या, मी माझी शब्द मागे घेतो रे बाबा. अपर्णा ताईंनी डोळे उघडले रे माझे ;-)

    ReplyDelete
  32. मी कसला होपलेस आहे... मी चुकून हर्षदा खानविलकर आणि अमृता खानविलकर मध्ये कन्फ्युज झालो होतो. आता विकी दादाने सांगितलं की अमृता खानविलकर म्हणजे "गैर" वाली.

    ReplyDelete
  33. ताईईईईईईईईईई,......????????? ईईईईईईईईई.....मुंग्या चावल्यासारखं वाटतंय बाबा....मी घरात शेंडेफ़ळ आहे मला फ़क्त हरभर्याच्या झाडावर चढवा...ताई-बिई असं काही म्हणून मोठेपण्याच्या झाडावर नको................
    होपलेस हा हा हा.....आम्ही तरी अजून ब्लॉगवरच्या होप्स सोडल्या नाहीत म्हणून येऊन येऊन कॉमेन्टतो...

    ReplyDelete
  34. अग माझे डोळे उघडलेस म्हणून ताई म्हटलं. बाकी काही नाही. विशेष मनावर घेऊ नकोस ते. :)

    आणि तो "होपलेस" माझ्या बायकोचा आवडता शब्द आहे. तो जरा तात्पुरता उसना घेतला :)

    ReplyDelete
  35. आपल्या ’सोकु’चाही मराठमोळ्या वेषातला फ़ोटू टाकला असतास तर ...?? लेखाची खुमासदारी अजून वाढली असती. ;)

    ReplyDelete
  36. अग पालथं घातलं आंतरजाल.. पण या फोटूपेक्षा चांगला फोटू नाही सापडला. काय काय फालतू फोटोज आहेत आपल्या सोकुचे आंतरजालावर ..

    ReplyDelete
  37. नवीन सिनेमा "रन्गा रन्गा’ मधे आपलि सोकु मस्त दिस्तेय-- निदान प्रोमोज मधे तरी.

    ReplyDelete
  38. अच्छा.. हे नव्हतं माहीत.. आजच बघतो युट्यूब मध्ये शोधाशोध करून. आभार अरुणा ताई..

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...