वेळ : निद्रादेवीची आराधना करण्याची
आई मोबाईलवर काहीतरी काम करते आहे. तितक्यात चिरंजीवांची कर्कश्श हाक.
आSSSSSSई
आई : अरे काय झालं?
चिरंजीव : आई, आता झोपायची वेळ झाली ना?
आई : हो. मग?
चिरंजीव : मग आत्ता मोबाईल कशाला? ठेव तो मोबाईल.
आई : ओ आजोबा.. अलार्म लावत होते.
आईचं स्वगत उर्फ लाऊड थिंकिंग (ज्याचा आईला लवकरच पश्चाताप होणार आहे) : चला. झाले लावून अलार्म. ५.... ५:१५.... ५:३०. (स्नूज.... स्नूज.... स्नूज....)
चिरंजीव : आई
आई : आता काय राजा?
चिरंजीव : आई, तू तीन अलार्म का लावलेस? इतक्या वेळा का उठतेस? एकदाच उठायचं ना.
#आदि_आणि_इत्यादी
No comments:
Post a Comment