प्रिय जंपिंग ज्याक उर्फ जितु,
खरंतर मायन्यात शोभा वहिनींचंही नाव लिहायचं होतं. परंतु मी त्यांना पर्सनली ओळखत नसल्याने बोटं धजावली नाहीत. अरे कितीही म्हंटलं तरी मी मध्यमवर्गीय माणूस (खराखुरा.. तुझ्या लेकीच्या सोपमधला 'चमकधमक' वाला मध्यमवर्गीय नव्हे रे.. सोप शब्दाने पत्राच्या सुरुवातीलाच विनाकारण गैरसमज होणार असल्यास तो टाळण्यासाठी 'मालिका' असे वाचावे.).. त्यामुळे थेट वहिनींचं नाव कसं घेणार? तेव्हा तुझं एकट्याचं नाव ठीक आहे. अर्थात हे सगळे विचार वहिनींना उद्देशूनही लिहिलेले असून त्यांच्यापर्यंतही पोचवावेत ही विनंती.
परवाच तुझ्या लेकाच्या अभिनयाने (!!!!) सजलेला रोहितचा गोलमाल-३ पाहिला. खरंतर ज्यांचं आडनाव दोन अक्षरी असतं आणि 'श' ने सुरु होऊन 'ट' ने संपतं अशा माणसाने चित्रपट काढणं तर दूर उलट चित्रपटगृह, सीडीज, पॉपकॉर्न अशा चित्रपटाशी संबंधित गोष्टींच्याही पन्नास मैल परिघात वावरू नये असा अलिखित नियम असताना या माणसाने चित्रपट बनवला आणि तोही तीन तीनदा हे पाहूनच सर्वप्रथम मला त्याची अतीव चीड आणि माझी आत्यंतिक कीव आली होती. 'रोहित' नाव असलेल्या माझ्या मित्रांशी उगाच भांडण काढून त्यांना उगाचंच यथेच्छ बुकलण्याचीही अनावर उर्मी दाटून आली होती. अर्थात माझं हे 'श' आणि 'ट' (उगाच वेलांट्या जोडून चुकीचे शब्द तयार केल्यास त्यास प्रस्तुत पत्रलेखक जवाबदार नाही !!) बद्दलचं मत त्याच 'श' आणि 'ट' वाल्याच्या क्वचित आंघोळ करणार्या, सदैव चेहरा एकतर पाडून किंवा डोळे मोठे करून विचित्र पट्टीतल्या आवाजात बोंबलून त्यालाच अभिनय समजणार्या 'भाईबंदाच्या' कृपेनेही तयार झालेलं असल्याने त्यात सर्वस्वी रोहितचाच दोष आहे असंही नाही.
पण मी हे सगळं तुला का सांगतोय? आपण आपलं पुन्हा तुसशारकडे वळू. बरोबर लिहिलंय ना रे नाव?? की तुषार हवं ? नाही आमच्या ढवळे मास्तरांनी पाचवीत पाया पक्का करून घेतलेल्या इंग्रजी स्पेलिंग प्रमाणे नाव लिहितोय. मला खरंतर पूर्वी तुषारच वाटायचं पण TUSSHAR असं स्पेलिंग बघितल्यावर नेमकं काय म्हणावं कळेना. कारण तुसशार असेल आणि मी नेमकं आमच्या दळवीच्या नावाप्रमाणे तुषार म्हंटलं आणि तू 'अब तक' वाल्या नानाच्या "क्या रे तुम नॉर्थ इंडियन्स.. वेशाली नही वैशाली... वैशाली.. वै वै" च्या स्टायलीत "क्या रे तुम मराठी (राजच्या धाकाने हल्ली बॉलीवूडात घाटीच्या ऐवजी तुम्ही लोक मराठी म्हणता असं ऐकून आहे) लोग.. तुषार नही तुसशार... तुसशार.. तुस तुस" असं करत अंगावर आलास तर काय घ्या !!! परंतु नंतर आठवलं की तुझ्या कन्येने (की तूच?) त्याच्या स्पेलिंगमधला एक एस वाढवून त्याची कारकीर्द (!!) (तुसशार आणि कारकीर्द हे दोन शब्द एकत्र आले की मला पुलंचा सशाचा टाळू आणि गंडस्थळाचा विनोद आठवतो. असो. तो तुला माहित नसणं ही तुझ्यासाठी इष्टापत्तीच समज. इष्टापत्ती म्हणजे काय ते मी तुला पुढच्या पत्रात समजावून सांगेन.) फुलवण्याचा क्षीण प्रयत्न केल्याचं स्मरतं. अरे पण असं असतं तर लोकांनी एकच काय दहा दहा अक्षरं वाढवून विव्व्व्व्व्व्व्व्व्व्वेक (कुणी मुश्रान घ्या कुणी ओबेरॉय घ्या) किंवा राक्क्क्क्क्क्खी (शक्यतो सावंत.. गुलजार घेतलीत तरीही आमची हरकत नाय) किंवा मग गेला बाजार.... जाऊदे बरीच आहेत बाजारात.. किती म्हणून सांगू.. थोडक्यात अक्षरं वाढवून का कुणाची कारकीर्द फुलते?
तर पुन्हा मूळ मुद्दा. तुझ्या तुसशारचा गोलमाल मधला अभिनय बघितला आणि एकदम कुणी टाळूला एरंडेल किंवा बुरशी किंवा शेपू चोळला... तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते?.... तर जसं वाटेल तसलं काहीतरी गिळगिळीत, उलटी होईलसं वाटणारं काहीतरी झालं. अर्थात हे संपूर्ण चित्रपटालाच लागू होतं पण ते तसं गिळगिळीत वाटायला लावण्यात तुसशारचा सिंहाचा वाट असल्याने त्याला श्रेय देतोय. मला तर आधी क्षणभर तो काय करतोय तेच कळेना. म्हणजे ते चित्रविचित्र हातवारे, विचित्र तोंडं, पोट प्रचंड दुखत असेल तर बैल जसा ओरडेल तशा आवाजात केलेला आरडाओरडा याला अभिनय म्हणतात? हेच शिकवलंस तू तुझ्या पोराला? (उगाच आडात-पोहर्यातची म्हण आठवतेय..).. या असल्या अभिनयाला थेटरात माझ्या बाजूची काही डोकी हसताना बघून यांना नक्की रोहित किंवा तू किंवा मग एकता यांनी पैसे देवून बसवलंय असं वाटून गेलं.................. छ्या छ्या... वेडा का काय तू? मी आणि गोलमाल आणि थेटरात? छ्या.. मी तो घरी पायरेटेड सीडीवर बघितला (दुर्बळाचा तेवढाच सूड रे..).. ते वरचं वाक्य होतं ते माझ्या एका दुर्दैवी मित्राचं. नंतर चार दिवस तो प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला होता, बॉलीवूड जमीनदोस्त करण्याविषयी काहीतरी झोपेत बडबडत होता वगैरे ऐकलं. तरी त्याला आम्ही रोहित चौथा गोलमाल काढतोय हे अजून सांगितलं नाहीये. बिचारा निराशेच्या झटक्यात जीवाचं काही बरंवाईट करून घ्यायचा !!!
परंतु एका गोष्टीची मात्र दाद दिलीच पाहिजे. तुसशारच्या असीम त्यागाची.. स्वतः एवढा भीषण अभिनय करून अन्य सहकलावंतांचा (वाचा कुणाल खेमू) अभिनय प्रेक्षकांना आपोआपच आवडायला लागेल आणि एवढ्या भयंकर चित्रपटामुळे अन्य चित्रपट हे प्रेक्षकाच्या आपोआपच आवडत्या यादीत स्थान पटकावतील यासाठी केलेला त्याग !! त्या त्यागाला उपमा नाही. त्या त्यागाची तुलना नाही. तुलना करायची झालीच तर पूनम पांडेने (न) केलेल्या वस्त्रत्यागाशीच त्याची तुलना करता येईल.
पण तुला अजून एक सांगायचंय.. महत्वाचं आहे अगदी. कांदा, चप्पल काय काय ते हाताशी घेऊन बस हे वाचण्यापूर्वी. मारायला नाही रे बाबा... हुंगायला. असल्या लेकाचा बाप होणं काय सोपी गोष्ट आहे? चप्पल आणि कांदा म्हटल्यावर त्याचा मारण्याशिवाय (वाच मार खाण्याशिवाय) अन्य काही उपयोग होऊ शकतो हेच विसरायला झालं असेल ना तुला? मानलं रे बाबा तुला. महान आहेस तू. असं कोणी सामान्य माणसाने, प्रेक्षकाने महान म्हंटलं की फिल्मफेअरचा किंवा सरकारचा 'लाईफटाईम अचिव्हमेंट' पुरस्कार मिळतो का याची कल्पना नाही रे.. सॉरी. :(( .... अरे हो विसरलोच होतो.. तुला तर आधीच मिळाला आहे नाही का तो पुरस्कार.. तेवढा एकच तर मिळाला आहे की.. खरंच सॉरी हां. असो.
नाही मला सांगायचंय ते दुसरंच आहे. म्हणजे कांदा, चप्पल फिल्मफेअर वगैरे बद्दल नाही रे. दुसरंच. चांगली बातमी आहे म्हण. मला तुझ्या तुसशारचा एक चित्रपट आवडतो. अगदी मनापासून आवडतो. प्रचंड आवडतो. तो मी थेटरातही बघितला आहे. कुठला माहित्ये का? 'गायब' !!! आता प्रामाणिकपणे सांगायचं तर पूर्ण चित्रपट काही आवडला नाही पण शेवटची पंधरा मिनिटं मात्र खूप आवडली. तुसशार तेव्हा खरोखर गायब असतो आणि स्क्रीनवर फक्त त्याचा शर्ट दिसत असतो ना.. ती शेवटची पंधरा मिनिटं अप्रतिम आहेत. बाकीच्या चित्रपटाबद्दल काय बो(बोंब)लणार? तो रामूचा चित्रपट आहे म्हंटलं की संपलंच ना.. पण आपण नेहमी चांगलं तेच घ्यावं अशी आमची सोप-विरहित मध्यमवर्गीय शिकवण आहे. लेकाचा एखादा चित्रपट पंधरा मिनिटं तरी का होईना कोणालातरी आवडला ना.. झालं तर मग !!!! उरलेल्या दोन तासांचं करायचंय काय तुला?
पण एक मात्र खरंच आवडलं मला.... बघितलंस?? पत्र लिहिण्याचं मूळ आणि सगळ्यात महत्वाचं कारण सांगायचं विसरणारच होतो रे. हे असं होतं बघ. मूळ मुद्दा सांगायचा राहूनच जातो. काय करणार.. तुझ्या लेकीच्या सोप्सची सवय. घरात दिवसरात्र तेच चालू असतं ना !! (काय म्हणतोस तुझीही तीच अवस्था आहे?? अरारारारा.. म्हणजे आपलं अरेरे..) तर मला तुला विचारायचंय ("मला तुला विचारायचंय" हे अगदी पुणेरी आमंत्रणासारखं वाटतं नाही? "आम्हाला तुम्हाला एकदा जेवायला बोलवायचंय !!" च्यायला कोण कोणाला बोलावणार त्याचा पत्ताच लागू देत नाहीत.).... तर मला तुला विचारायचंय की हे हातवारे, तोंडं आणि चित्रविचित्र आवाज यालाचचचचचच अभिनयचचचच म्हणतातचचचचच असं भासवणारा जो आत्मविश्वास आहे ना तुसशारच्या चेहर्यावर तो अगदी काबिले तारीफ. म्हणजे अगदी प्रश्नच नाही.. कुठून आणता रे हा आत्मविश्वास?? कुठे मिळतो?? खरंच मानलं पाहिजे. अभिनयाचं भांडं अगदी ठणठणीत रिकामं असतानाही एकावर एक चित्रपटांचा मारा करण्याचं कसब कसं मिळवता? बघ ना.. अगदी तोच आत्मविश्वास तुझ्या लेकीकडेही आहे. कचकड्याच्या बाहुल्या, छानछोकीत राहणारी पात्रं (कृ श्लेष शोधू नये. श्लेष म्हणजे काय हे माहित नसणं हीही एक इष्टापत्तीच.. पुढच्या पत्रात हेही समजावून सांगेन..), लफडी, बंगले, गाड्या, खानदान की इज्जत, 'वो', रडकी बहु, १००+ वर्षांची आजी, उंची कपडे/सेट्स या एवढ्या कॉमन भांडवलावर आणि शून्य कथेच्या बळावर काय काय पराक्रम केलेत या बयेने. सॉरी चुकून पोटातलं ओठावर आलं. या मुलीने.. !! अर्थात संदीपने "मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही" हे गाणं जिच्यामुळे प्रेरित होऊन लिहिलं त्या माझ्या बायकोनेही 'मिहीर' गेल्यावर (थेट मेल्यावर कसं म्हणणार रे?) त्याला परत आणण्यासाठी निघालेल्या मोर्चात ज्या हिरीरीने भाग घेतला आणि अखेरीस मिहीरला परत आणलंच ते पाहता तिच्या आत्मविश्वासाबद्दल (म्हणजे एकतेच्या रे) मला यत्किंचितही शंका उरली नाही. असो. तुझ्या लेकीबद्दल आत्ता नको. हे पत्र सर्वस्वी तुसशारला अर्पण. पुढच्या पत्रात लेकीविषयी बोलू. तूर्तास तरी त्या अतीव आत्मविश्वासाबद्दल समग्र कपूर खानदानचं मनःपूर्वक अभिनंदन !!!
तुझाच,
ससशिरीषसस
(दोन चार 'स' वाढवून माझीही कारकीर्द फुलते का बघतो)
ता.क. : छे रे बाबा.. कणेकर कुठला? मला वाटलंच तुला कणेकर वाटणार म्हणून. पत्र लिहून झाल्यावर वाचून बघताना मलाही तसंच वाटलं एकदा. म्हणून मी हे पत्र चक्क लोकप्रभेला पाठवलंही होतं. त्यांचं उलट उत्तर आलं की ही असली पत्रं आमच्या लोकप्रभेत नकोत. आमच्याकडे ऑलरेडी एक 'मेतकुट ' चालू आहे !!!!!!!
================================================
तळटीप : कोणाच्याही श्रद्धास्थानांना धक्का लागून भावना दुखल्या बिखल्या असतील तर आपली आपण मलमं लावून घेणे.. आम्ही जवाबदार नाही !!
* हे पत्र सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीत छापून आलं आहे.

>>> तुसशार तेव्हा खरोखर गायब असतो आणि स्क्रीनवर फक्त त्याचा शर्ट दिसत असतो ना.. ती शेवटची पंधरा मिनिटं अप्रतिम आहेत.
ReplyDeleteहा हा हा हा हा
>>>"आम्हाला तुम्हाला एकदा जेवायला बोलवायचंय !!" च्यायला कोण कोणाला बोलावणार त्याचा पत्ताच लागू देत नाहीत.)....
हा हा हा हा हा
अजून खूप सारे हा हा हा हा हा ... सगळेच सांगायचे तर पूर्ण पोस्टच टाकावी लागेल.... :)
तुसशारला झालेल्या रोगावर वैद्य पाटणकरप्रमाणे वैद्य हेरंब ओक काढा.
ReplyDeleteरच्याक. इतक्या दिवसाची भडास तू एका मुक्या प्राण्यावर काढलीस हे बरे नाही केलेस. उद्या मेनका गांधी तुझ्यावर पेटली तर आम्हाला नको सांगू. पोस्टची वेळ पाहता ने तुझी झोप उडवली आहे हे नक्की.
आणि गायब हा अंतरा माळीसाठी बनवलेला सिनेमा होता रे. ती सोडून बाकी सगळे गायब करण्याच्याच लायकीचे होते.
खतरा लिवलंस रे भावा :)
ReplyDeleteजबरी... गोलमाल म्हणजे सगळा गोलमालच आहे ना :)
ReplyDeleteहा हा हा ... ज ब रा ट :-)
ReplyDeleteकसले फटके मारले आहेस...जवाब नही !!
तुसशारला झालेल्या रोगावर वैद्य पाटणकरप्रमाणे वैद्य हेरंब ओक काढा. + १ :)
:D:D:D:D प्रचंड लोळालोळी हेरंब! प्र चं ड! आणि त्याहीपेक्षा माझ्या मनात जे ठसठसत होतं त्याला कैच्याकै वाट करून दिलीत! हॅट्स ऑफ! आणि धन्यवाद!
ReplyDeleteवाह क्या बात है!वाचताना खूप हसत होते... धमाल आली!
ReplyDeletepost aawadali..
ReplyDeletepan golmaal 3 itakahi waeet nahiye..
doka bajula theun baghata yeil asa ahe..
n btw tumhala Ajay devgan aawadato na? mag kiman tya cha sathi tari movie sahan karayacha na..
हेहे! कसला वैतागलायस! :) मी काही धाडस करणारच नव्हते..पण बरं झालं तू धोक्याची घंटा वाजवलीस ! :)
ReplyDeleteतोफगोळेच मारलेस...धाड धाड! मस्त! :)
जबरदस्त कणेकर, माचकर, संझगिरी सगळे ओवाळून टाकावेत असा लेख झालाय हा
ReplyDeleteप्राची आभार्स :).. वाईट चित्रपटावर सूड मिळवण्याचा आसुरी आनंद मिळतो अशा पोस्ट्स लिहून ;)
ReplyDeleteमुका प्राणी !! हाहाहा.. अरे तो मुका असतानाही इतका डोक्यात गेला बडबडला असता तर मी बहुतेक टीव्हीलाच बुकलला असता !
ReplyDelete>> गायब हा अंतरा माळीसाठी बनवलेला सिनेमा होता..
अगदी सहमत.. पण आता अंतराच गायब झालीये :P
धन्यवाद वो विशालभौ :)
ReplyDeleteआप्पा खरंच !! गोलमाल म्हणजे भीषण प्रकार आहे.. नुसत्या आठवणीनेही थरकापलो मी :P
ReplyDeleteधन्स सुहास..
ReplyDeleteअरे.. काही प्रयत्न न करता आपोआप आलेत ते फटके... म्हणजे केवढा वैतागलो असेन बघ.. गोलमाल काय लायकीचा पिक्चर आहे याची मला पूर्ण कल्पना होती............. असं मला वाटत होतं. कारण प्रत्यक्षात तर तो अति अतिच बथ्थड पातळीचा निघाला :)
आभार्स आभार्स विनायकजी :)
ReplyDeleteखरंच हे असले सिनेमे बघून जे ठसठसत असतं ते अशा पोस्ट्स टाकून त्यांचा समाचार घेतल्याशिवाय थांबायचं नाही. चला तुमच्याही ठसठसण्याला वाट मिळाली.. बरं झालं :)
श्रिया, प्रतिक्रियेबद्दल अनेक अनेक आभार्स आणि ब्लॉगवर स्वागत..
ReplyDeleteअशीच भेट देत रहा.
धन्यवाद अनामिक..
ReplyDeleteखरंय तुमचं. कदाचित नसेलही एवढा वाईट.. माझी कपॅसिटी जरा कमी आहे असं म्हणूया हवं तर.. अहो डोकं बाजूला काय बाजूच्या खोलीत ठेवून, ना ना प्रकारचे चष्मे बदलून झाले तरी काही फरक पडला नाही. कारण तुसशाररूपी कर्णपिशाच्च सतत कानात ओरडत होतं !!
मी ही पोस्ट लिहिण्यासाठी जेवढा मुव्ही सहन केलाय ना तो देवगणच्या कृपेनेच हो !!
अनघा, अग प्रचंड वैतागलोय. म्हणजे गोलमाल १ बघूनच बाकी गोलमालची काय लायकी असणार याचा अंदाज आला होता पण ३ मधे तर कहर आहे. समोर बसलेल्या प्रेक्षकाला किंचितही अक्कल नाही आणि तो मेंदू विकून आपला चित्रपट बघायला बसला आहे ही जी हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शकांची मानसिकता आहे ना ती प्रचंड डोक्यात जाते !!
ReplyDeleteअरे बापरे ओंकार.. फारच मोठी कॉम्प्लिमेंट दिलीत की.. धन्स धन्स :)
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा !
सत्यवानराव,
ReplyDeleteकोटीकोटीनं कोट्याकरून तुम्ही आपल्या कोट्याधीश असण्याचा प्रत्यय दिलात की हो! :D
आवडलं पत्र आपल्याला! मी अजून गोलमाल-३ पाहिलेला नाही.. पण पाहीन.. प्रभुजी आहेत ना त्यात! :)
हेरंबा.....
ReplyDeleteतुषार वर एवढा जाळ का काढला रे ? अरे होत अस कधी-कधी कि अगदी चांगल्या जातीच्या आंब्याच्या झाडाला सुद्धा नाही तो नाही कधी मोहोर लागत.पण म्हणून आंबा खायचं म्हणून का कोणी सोडतं? फवारा मारून,कीटकनाशकं वापरून काही तरी प्रयत्न आपण करतोच नं?तसंच आहे हे... कणेकरी भाषेत सांगायचे तर हा वेंगसरकर सारखं नशीब घेऊन आलाय.त्याला नव्हती का पूर्वी टेस्ट क्रिकेट मध्येच वारंवार फेल जाऊन सुद्धा नेट प्रक्टिस करायची संधी मिळाली? होत असं कधी कधी..............सर्व सामान्य लोकांची धनरेषा हि तळ हातावरून निघते नि तेथेच संपते तर काही अपवाद असे हि असतात कि त्यांची Xगणा मधून निघते नि थेट मस्तकात जाते. कोण काय करणार? ज्याचं त्याच नि आपलं नशीब अन काय दुसरं?
तसं मी रोहित शेट्टीला सुद्धा कळवलय कि "उसाचा रस अगदी चीपाडातून जरी येत असला तरी त्याला सुद्धा एक मर्यादा आहे.चीपाडाचा अगदी दाण्या सारखा कूट करून त्यात घाल घाल पाणी घालून त्यालाच रस म्हणायचे दिवस अजून यायचेत." १७ नंबर उसा साठी दुसरा गाळा शोध नाही तर गुऱ्हाळचं बंद कर म्हणून.
ReplyDeleteहे हे हे हेरंsssब हे हे हे हेरंsssब.... हेरंब ईज बॅक अगेन :)
ReplyDelete(आवडलं किनई गाणं सांग ... हो म्हण मुकाट तुझ्या लाडक्या ’गोलमाल’ च्या चालीवर लिहीलंयं हो!!)
हेरंबा आभार रे त्या जितू आणि शोभाचे, त्यांनी असली दिव्य कार्टी जन्माला घातली नसती तर असकी करमणूक कुठून मिळाली असती जगाला ;) .... तरी तुसशार बरा रे, ते कुरमूऱ्याचं पोतं अजून वैताग आहे :)
हेरंबा भन्नाट सुटलायेस पुन्हा एकदा.... मस्त मजा आली वाचताना...
अरे बरं या लोकांना असले भयंकर उपद्रवी शिणिमे काढायचेच तर नावं नवीन द्यावीत रे , जुन्या गोलमालचा अपमान आहे रे हा!!
तरी बरं करीना नामक ’शुन्य आजारी’ बाई या गोलमालात नव्हती.... पुढचे भाग पहाण्याच्या फंदात नको पडूस कधीही.... (याचा अर्थ मी ते पहिलेत असे समजून मला ब्रेव्हरी ऍवॉर्ड दे असा नाही :) )
पोस्ट लय लय भारी :)
(विद्याधरांचं कमेंट दिसे ना जनू ;) ..त्याचे लाडके प्रभुजी आहेत त्यात :)..)
आयला नेमकं नेट-फ़्लिक्सवाल्यांनी हीच डिव्हीडि पाठवली आहे..तुझा संताप पाहता लवकर उघडणार नाही आता बहुतेक..तसंही मुलं (जर) लवकर झोपली तरंच आमच्या वाट्याला पिच्चर येतात तो अमुल्य वेळ वाचवायला हवाच नं....
ReplyDeleteपोस्टमध्ये सॉलिड षटकार मारलेत...यालाच सात्विक का काय तो संताप म्हणतात का रे भौ?? जंपिग ज्याक खु खु खु.....मला पांढर्या (तंग) कपड्यातला जितु आठवला..
बाबासाहेब, आभार तुमचे कोट्यानुकोटी :P
ReplyDeleteतू गोलमाल-३ बघणार हे तर नक्कीच. पण प्रभूजींवरही काही फालतू (अपमानास्पद याअर्थी) दृश्य आहेत.. उदा कुत्रा चावणे वगैरे.. एखाद्या नवख्यावर तो सीन चित्रित झाला असता तर ठीक होतं. मिथुनदा वर नको होता.
सदानंद दादा,
ReplyDeleteहो रे.. थोडा जास्तच जाळ काढला गेलाय हे मान्य.. पण तो अर्थहीन, टुकार, बिनडोक आणि निव्वळ तारस्वरातला आरडाओरडा या सगळ्याने डोकं एवढं किटून गेलं होतं की त्या भरात सगळा राग ब्लॉगमधून निघाला :)
आणि त्या रोहितला कितीही समजावून सांगितलं तरी फरक पडेलसं वाटत नाही. तो गोलमाल ४-५-६-७-८ काढत जाणार.. तेवढी मानसिक तयारी करायला हवी :(
>> हे हे हे हेरंsssब हे हे हे हेरंsssब
ReplyDeleteहाहाहाहाहा !!! ते गाणं आवडीचं आहे माझं. चित्रपटातली एकमेव जमेची बाजू... माझ्या दृष्टीने..
खरंय ग.. जुन्या क्लासिक गोलमालचं नाव तरी नको होतं या गधड्यांनी वापरायला..
अग.. शून्य आजारी करीना आहे की यात. मला तर ती आवडतेही थोडीफार का होईना पण या चित्रपटात प्रचंड डोक्यात गेली. किंबहुना देवगण, अर्शद वारसी, श्रेयस असे एकापेक्षा एक आवडते लोक आहेत यात.. पण सगळ्यांचा रागराग व्हायला लागलाय या चित्रपटानंतर !!
बाबाचीही प्रतिक्रिया आहे बघ वरती. बहुतेक तुमच्या दोघांच्याही प्रतिक्रिया जवळपास एकावेळी आल्या असाव्यात त्यामुळे तुला दिसली नाही कदाचित.
मी तर म्हणतोय की गोलमाल ४ पण बघायचा आणि स्पेश्यल पोस्ट टाकून रोहितची चिरफाड करायची यावेळी.. बघू त्याचं नशीब किती जोरावर आहे ते.
अरारा... तुम्ही घेतलीत का ती?? संपलं... वाट आहे आता.. आधीच डोकेदुखीच्या गोळ्या घेऊन बस तरच चित्रपट संपेपर्यंत सर्वाईव्ह होशील !! ;)
ReplyDeleteअग सगळ्या षटकारांचे धनी रोहित आणि तुसशार.. म्या काय फक्त भारवाही :P
>> पांढर्या (तंग) कपड्यातला जितु
लोल्झ... तोफा तोफा तोफा तोफा ;)
हहहहहेरंबा, तुझं धाडस कसं झालं बाबा गोलमाल बघण्याचं? बाकी तीन तास छळ करून घेतल्यावर हे व्हायचंच.
ReplyDeleteखुरटलेला वाटतो तो. पुर्ण शारीरिक वाढ न झाल्यासारखा दिसतो तुस्स्स्सार. त्याच्या बहीणीने त्याच्या वाटणीचं खाल्ल्यासारखी दिसते ती!!
ReplyDeleteगोलमाल १ पाहूनही ३ पाहायचं धाडस केलत .. याला म्हणतात 'आपल्या कर्माची फळ भोगण!' :-)
ReplyDeleteहाहा गौरी.. अग मित्राकडे जरा कामासाठी गेलो होतो.. त्याने लावला होता.. अर्थात तो मी बघितला हे माझं स्वतःचंच पाप :P
ReplyDeleteछळ ??? छळ इज अॅन अंडरस्टेटमेंट !!
हाहाहाहा काका.. सगळं उलटसुलट झालंय खरं.. !! हा चित्रपट बघितल्यानंतर तर तो मानसिक खुरटलेलाही वाटतो :)
ReplyDeleteसविताताई :)
ReplyDeleteअहो बघावा लागला.. दुर्दैव... गोलमाल-१ फार मोठ्या अपेक्षेने बघितला होता. तरीही गोलमाल-३ चुकून, अनिच्छेने का होईना बघितला तरी पाप ते पापच.. आयुष्यातले तीन तास कुरतडले त्या राक्षसांनी !!
are bakee sagaLa theeK ahe puN te puNeree amantraN ata kalabahya zalay mandaLee ( mhaNaje ata amhee 'bolavayachay' evaDha suDhdha mhaNat naHee, kaLala?? ugch kTkaT nako aNee risk nako, kharach alat tar????? !:-)))
ReplyDeletebtw: juna golmaal mhaNaje rhishikesh mukharjeechach mhaNatay na? ka tumhala ( tu, tanvi) golmaal 1 avadala hota?? tasa asle tar shirsashtang namaskar!!:-)
कमेंट टाकायला उशीर झाल्याबद्दल मंडळ आपली माफ़ी मागत आहे...
ReplyDeleteइतक्या दिवसांचा वचपा शॉल्लीड काढला आहेस....लोळागोळा झाला ;)
हाहाहा स्मिता.. पुणेकर्स अजूनच चवताळतील आता ;)
ReplyDeleteजुना गोलमाल म्हणजे अर्थातच हृषीकेश मुखर्जींचाच ग.. शेट्टीचा गोलमाल ज्याला कोणाला आवडला असेल त्याला माझाही साष्टांग नमस्कार !!!
हाहाहा विक्रांत... धन्यवाद धन्यवाद मान्यवर.. झक्कास प्रतिक्रिया एकदम :)
ReplyDeleteआणि फेबुवर शेअर केल्याबद्दल विशेष आभार्स..
>> कणेकरांना बोचकारे काढून भावना दुखावल्याबद्दल समस्त आचरट/चरबट कणेकर फॅन क्लबतर्फे निषेध !
म्हणूनच मलमाच्या पाट्या टाकल्या होत्या शेवटी :P .. कणेकरांना बोचकारताना मला अगदी तुझीच आठवण झाली होती :)
अरे माफी कसली त्यात. तुसशार तेवढाच खुश झाला असेल ती त्याची निंदानालस्ती कोणापर्यंत तरी का होईना थोडी उशिरा पोचली ;)
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल लय लय आभार्स :)
पोस्ट आवडल्या गेली आहे !!!!
ReplyDeleteमस्तच लिहिलयस :)
धन्यवाद प्रीतमोहर.. प्रतिक्रियेबद्दल आभार्स आणि ब्लॉगवर स्वागत.
ReplyDeleteअशीच भेट देत रहा.
कुठला तो मेला बेकार दिवस होता की हा डब्बागोल शिनुमा टिव्हीवर पाहण्याचं महापातक मी केलं आणि यथेच्छ कपाळ बडवलं. पुढचे दोन दिवस आपसुक काहीबाही आवाज घशातून निघायला लागलेले. :D :D
ReplyDeleteबाकी आडात निदान प्लेझंटनेस तरी होता रे... पोहर्यात सगळाच अंधार. आता तुझे शालजोडीतले वाचून जरा जीव निवला. खूप दिवसांची कोपरखळ्यांची उणीव भरून निघाली.
सहीच!:)
हाहाहाहा श्रीताई, अगदी अगदी असंच कपाळ बडवावंसं वाटत होतं मला हा दळभद्री शिणुमा बघितल्यावर.
ReplyDelete>> बाकी आडात निदान प्लेझंटनेस तरी होता रे.
हो ते आहेच ग.. पण तरीही शेवटी शेवटी चक्क आपल्या माधुरीबरोबर येण्याचं धाडस केलं होतं त्याने.. त्यामुळे डोकं फिरलं होतं.
प्रतिक्रियेबद्दल आभार्स ग.
अरारारारारा... (अरेरे नाही खरच अरारारारा..) अलीफलैला मध्ये जितुने आकाच्या मदतीने (आपला आका नव्हे.. :D) झटक्यात ७ प्रश्न सोडवले होते... आमचा हा एकच प्रश्न सोडव म्हणाव...
ReplyDeleteअरे मी हल्ली हिंदी चित्रपटाच्या नादी लागतच नाही (हिंदी चित्रपट म्हणजे काय रे भाऊ? असे पू.ल. स्टाइल मध्ये विचारायची वेळ येईल असे चित्रपट) त्यापेक्षा मराठी सिनेमा खरच दर्जा उंचावतो आहे... सोबतीला आहेत विंग्रजी शीणेमे... :)
अरे तन्वीने लिहिलेले गाणे आणि महेंद्रदादाची कमेंट... :) हसून पुरेवाट... 'खुरटलेला'... हा हा हा ....
हाहाहा रोहणा.. एकच प्रश्न सोडवताना दमछाक :)
ReplyDeleteमी तर हिंदी चित्रपटांपासून कित्येक मैल लांब असतो. हा दुर्दैवाने बघावा लागला. आणि त्यामुळे माझं विंग्रजी चित्रपटांवरचं प्रेम अधिकच वाढलं ;)
तन्वीचं गाणं आणि 'खुरटलेला'... लोल्झ :)
>>वाईट चित्रपटावर सूड मिळवण्याचा आसुरी आनंद मिळतो अशा पोस्ट्स लिहून ;)
ReplyDeleteहे अगदी करेक्ट....
पिच्चर पाहून झाल्यावर डॉ. अस्थाना सारखा हसायला लागलो आम्ही...
हाहा सागर.. खरंय.. मी पण असाच प्रचंड संतापलो होतो. त्या संतापात लिहून काढलं सगळं :)
ReplyDeleteहाहाहाहाहा... प्रचंड भारी. जियो हेरंबराव, जियो.. :-)
ReplyDeleteआताच तुझ्या दोन (सहा) हेवीवेट पोस्टस वाचल्यावर ही वाचली आणि जरा नॉर्मल झालो... जबरा फटके दिलेत ... खुसखुशीत लेख ...
ReplyDeleteतुसशारला झालेल्या रोगावर वैद्य पाटणकरप्रमाणे वैद्य हेरंब ओक काढा. + १ :)
धन्यवाद संकेतशेठ :)
ReplyDeleteधन्स देवेन.. अरे असला पकलो होतो तो आक्रस्तळेपणा बघून.. त्यामुळे सगळी भडास एकदम बाहेर पडली :)
ReplyDeleteमी हा चित्रपट अजून पहिला नाही... आणि ह्या लेखावरून असं वाटतं कि मी फारंच नशीबवान आहे. बाकी लिहिण्याची शैली आवडली... मजा आली. खासकरून आम्हाला तुम्हाला जेवायला बोलवायचंय वगैरे!! धम्माल धम्माल धम्माल
ReplyDeleteमंदार, प्रतिक्रियेबद्दल आभार. बघितला नसशील तर तुझ्यासारखा सुदैवी तूच !!
ReplyDeleteआधी माझा जरा गोंधळ झाला तुझं नाव बघून. कारण याच नावाचा माझा अजून एक मित्र आहे आणि त्याने आधीच प्रतिक्रिया दिली होती. पुन्हा प्रतिक्रिया बघितल्यावर मग प्रोफाईल बघितली तेव्हा कळलं की ही वेगळी व्यक्ती आहे.
असो. प्रतिक्रियेसाठी पुन्हा एकदा आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..
मित्रा... फार भारी.
ReplyDeleteआणि तुझ्या या शैलीनी अजुन मजा आणली. उत्तुंग षटकार... आवडलं.
धन्यवाद धुंद रवी. विनोदाच्या बादशहाकडून पावती मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट :)
Delete>>हे हातवारे, तोंडं आणि चित्रविचित्र आवाज यालाचचचचचच अभिनयचचचच म्हणतातचचचचच असं भासवणारा जो आत्मविश्वास आहे ना तुसशारच्या चेहर्यावर तो अगदी काबिले तारीफ<<<
ReplyDeleteलई भारी!
आणि खरंय रे!! दुर्दैवाने थुसारचा इतर कोणताही सिनेमा बघायची दुर्दशा ओढवलीच तर त्याला गोंगाट करताना तरी बघावं लागत नाही! गोलमाल पाहताना मात्र अवस्था बिकट होते!