'फेसबुक' या नावाचं काही अस्तित्वात नसल्याच्या काळातल्या एका प्रसंगापासून चित्रपटाला सुरुवात होते. या प्रसंगानंतर फेसबुक (तेव्हाचं फेसमॅश) जन्म घेणार आहे अशी पुसटशीही शंका येणार नाही असा हा प्रसंग. मार्क झकरबर्ग त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला असतो. तिथे काही कारणावरून त्यांच्यात खटका उडतो, शब्दाने शब्द वाढत जातो.. खरं तर साधा भांडणाचा प्रसंग पण या पहिल्याच प्रसंगात आपल्याला कळतं की स्क्रीनवर जो पोरगेलासा मुलगा दिसतो आहे तो साधासुधा नाहीये. तो प्रचंड बुद्धिमान आहे, अतिशय हुशार, सुपीक डोक्याचा आहे. सहज बोलता बोलता अनेक फॅक्ट्स तो लीलया मांडतो. पुढे चित्रपटात अनेक प्रसंग आहेत, प्रचंड तिखट, भेदक, हुशार संवाद आहेत ज्यातून मार्कच्या तर्कशुद्ध पण यांत्रिकतेने विचार करण्याच्या पद्धतीची आपल्याला ओळख होत जाते. कित्येकदा या यांत्रिकतेचा अतिरेक होतो. पण मार्कला त्यात काहीही वावगं वाटत नाही. त्याच्यासाठी ते फारच सरळ-सोपं-स्वाभाविक असतं. नाहीतर गर्लफ्रेंडशी भांडताना (वाचा समजूत काढताना) चायनाबद्दलच्या फॅक्ट्स कोण सांगत बसेल बरं??
भांडणानंतर दोघेही रागाने निघून जातात. मार्क आपल्या होस्टेलरूममध्ये येऊन लॅपटॉप सुरु करतो. नायिकेने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून आपला मित्र एदुआर्दोच्या मदतीने एक प्रोग्राम लिहितो ज्यात कॉलेजमधल्या मुलींची एकमेकींशी आणि प्राण्यांशी अपमानास्पद पद्धतीने तुलना केलेली असते. प्रोग्राम लिहितो, बीअर रिचवतो आणि एकीकडे त्या सगळ्याचं लाईव्ह ब्लॉगिंग करतो. ब्लॉगमध्येही आपल्या मैत्रिणीचा खूप वाईट पद्धतीने अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यानंतर नेटवर्क हॅक करून तो प्रोग्राम कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवला जातो. मुली संतापतात, चिडतात, मैत्रिणीची बदनामी होते. मार्कचा हेतू साध्य होतो. या दोन प्रसंगांनंतर फेसबुक (फेसमॅश) सुरु झालेलं असतं. पण हे प्रसंग प्रत्यक्ष घडत असतानाच्या दरम्यान दाखवलेल्या छोट्या छोट्या घटना आणि संवाद हे प्रचंड फास्ट आणि कल्पक आहेत. मार्कची असामान्य हुशारी, तो इतरांच्या किती पुढचा विचार करू शकतो, बघता बघता समोरच्याला कसा शब्दात पकडू शकतो हे पाहताना थक्क व्हायला होतं. कदाचित हे सगळं बिंबवण्यासाठीच या चित्रपटातले संवाद हे अतिशय अतिशय फास्ट आहेत. कित्येकदा गुंतागुंतीचे वाटण्याएवढे कल्पक आहेत.. ही गुंतागुंत मार्क आपल्या साध्या साध्या संवादांतून इतक्या अचूकपणे व्यक्त करतो की कित्येकदा त्याच्यावर चालू असलेल्या खटल्यादरम्यान प्रतिपक्षाचे वकील एवढे मेटाकुटीला येतात की मार्कच्या वकिलाला विनंती करून मार्कला नीट उत्तरं द्यायला सांगावीत अशी विनंती करण्याची वेळ त्यांच्यावर येते. मात्र आपल्या वकिलाकडून परवानगी मिळाल्यानंतर मार्क त्याच प्रश्नांची एवढ्या सरळपणे उत्तरं देतो की त्याच्या हुशारीला मनोमन पुनःपुन्हा सलाम केल्याशिवाय आपल्याला राहवत नाही!!
पण तो अगदीच सोवळा आहे असं मात्र नाही. प्रत्यक्षातल्याची कल्पना नाही पण निदान चित्रपटातला मार्क तरी सोवळा नक्कीच नाही. (हा चित्रपट सत्यघटनांवर आधारित असला तरी प्रामुख्याने 'अॅक्सिडेंटल बिलियनियर्स' या पुस्तकावर आधारित आहे.) आणि त्याचं हे सोवळं नसणं चित्रपटातल्या अनेक प्रसंगांतून स्पष्ट दिसतं. तो कधी कधी अजाणतेपणी, कित्येकदा जाणूनबुजून समोरच्याला तोंडघशी पाडतो, त्याची फसगत करतो. कित्येकदा हे त्याला करायचं नसतं पण तरीही तो ते करतोय असंही वाटत राहतं. चित्रपटाच्या शेवटी "आय अॅम नॉट अ बॅड मॅन" म्हणतानाची त्याच्या चेहर्यावरची वेदना बरंच काही सांगून जाते. आपल्यावर चित्रपट काढला जावा (आणि त्यात आपली इमेज काळ्या रंगत रंगवली जावी) हे (खर्या) मार्कला (अर्थातच) मान्य नव्हतं आणि ते त्याने तसं बोलूनही दाखवलं होतं. "मी जिवंत असताना कोणी माझ्यावर चित्रपट काढला नसता तर अधिक बरं झालं असतं" अशी प्रतिक्रिया चित्रपट निघाल्यावर त्याने दिली होती. पण अर्थात तरीही चित्रपट निघाला, प्रदर्शित झाला आणि धोधो चाललाही !! मार्कने नापसंती दर्शवली असतानाही तो प्रदर्शित झाला म्हणून काही कोणी जाळपोळी, दगडफेक, संप, बंद, आंदोलनं केली नाहीत की मुख्यमंत्र्याला (इथे गव्हर्नरला) स्वतः थेटरात हजर राहून इस्पेशल संरक्षणात चित्रपट दाखवावा लागला नाही !!!! यावरून अजून एक आठवलं ते म्हणजे येशू ख्रिस्ताचा आक्षेपार्ह उल्लेख असलेलं डॅन ब्राउनचं 'दा विंची कोड' हे पुस्तक आणि त्याच नावाचा सिनेमा हे दोन्ही ख्रिश्चनबहुल असलेल्या पाश्चात्य देशात हातोहात खपले. दोन्हींनी जोरदार धंदा केला. पण भारतातल्या चर्चेसनी मात्र त्यावर बंदी आणावी म्हणून जोरदार निदर्शनं केली.. हाय की नाय मज्जा..?? मागे एकदा माझ्या एका अमेरिकन सहकार्याशी बोलताना मी त्याला येशूच्या आक्षेपार्ह उल्लेखाबद्दल आणि त्या पुस्तक/चित्रपटाबद्दल विचारलं होतं तेव्हा तो अतिशय सहजपणे म्हणाला होता की "त्यात काय..? ती तर फक्त एक काल्पनिक कथा आहे. इटस जस्ट अ नॉव्हेल.. जस्ट अ फिक्शन.. !!!"... तेव्हा मला त्याच्या पाठीवर एक जोरदार थाप मारावीशी वाटली होती.. असो ! विषयांतर झालं. कुठल्याही चित्रपट/पुस्तकाचं परीक्षण/समीक्षण म्हणून पोस्ट न लिहिता निव्वळ 'माझा दृष्टीकोन' या अनुषंगाने पोस्ट लिहिण्याचं एक बरं असतं (समीक्षा करण्याएवढी योग्यता नसते ही झाकली मुठ झाली.) .. असं कधीही कुठेही कितीही भरकटता येतं आणि वर मी कुठे समीक्षण लिहितोय असं म्हणून हात वर करता येतात.. ;) (आणि वर पुन्हा का भरकटलोय हेही जाहीरपणे सांगता येतं ;))
![]() |
मार्क : चित्रपटातला आणि खरा |
चित्रपटातलं कुठलंही पात्र मी वर लिहिलेल्या वाक्यांमधलं एकही वाक्य स्पष्टपणे बोलत नाही की सांगत नाही. "मार्कला असं वाटलं .. म्हणून त्याने असं असं केलं.. त्याला खरं तर हे असं करायचं होतं.. तो असा असा हुशार आहे" असं कोणीही स्पष्टपणे सांगत नाही पण तरीही काय घडलं, काय झालं असावं, कोण कसं आहे, कोणी काय केलं, काय केलं नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थितपणे कळतात. आणि याचं संपूर्ण श्रेय एकाच व्यक्तीला आहे. श्रीयुत डेव्हिड लिओ फिंचर !! या माणसाने कमाल केली आहे. कथेला पुढे-मागे नेणारे प्रसंग, एखादा भूतकाळात घडणारा प्रसंग आणि तोच प्रसंग पुढे खेचून नेऊन वर्तमानकाळातल्या प्रसंगात त्या जुन्या प्रसंगाच्या अनुषंगाने प्रश्न विचारणं (उदा वकील एदुआर्दोला सही करण्यासाठी पेन देतो तो भूतकाळातला प्रसंग आणि तो प्रसंग तिथेच संपवून वर्तमानकाळात (दुसरा) वकील त्याला विचारतो की "मग तू त्या पेनाने काय केलंस" हा प्रसंग आणि असे कित्येक प्रसंग) हा प्रकार अनेक प्रसंगात, घटनांमध्ये इतक्या अप्रतिम रीतीने जमवला आहे या माणसाने की चित्रपटाचं ते मागे-पुढे जात जात हळू हळू कथा उलगडवत नेणं हे आपल्याला प्रचंड आवडून जातं !!! खरं तर मला फिंचरचा यापूर्वी 'पॅनिक रूम' वगळता कुठलाही चित्रपट विशेष आवडला नव्हता. तसे त्याने सेव्हन, क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन, झोडियॅक, फाईट क्लब असे बरेच लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. पण निदान मला तरी यात प्रचंड आवडला असा कुठलाच चित्रपट नव्हता (मला कल्पना आहे की यावर प्रचंड वाद होऊ शकतो. पण तरीही...).. पण हा माणूस नेहमी काहीतरी वेगळं करत असतो हे मात्र नक्की. त्यामुळेच सुरुवातीच्या त्या आकर्षक टॅगलाईनने लक्ष वेधून घेतल्यानंतर फिंचर दिग्दर्शन करतोय म्हंटल्यावर फेसबुकबद्दल काहीतरी आगळंवेगळं बघायला मिळणार याची १००% खात्री झाली होती आणि ती अपेक्षा या माणसाने १०००% पूर्ण केली. फिंचरचे चित्रपट बर्याचदा गुंतागुंतीचे असतात. खूप विचार करून आणि नीट लक्ष देऊन बघायला लागतात.. प्रत्येक संवादात बराच अर्थ दडलेला असतो. ते या चित्रपटाच्या बाबतीतही अगदी अगदी खरं आहे. शक्यतो सबटायटल्स ऑन करून बघितलात तर अधिक उत्तम. जास्त एन्जॉय करता येईल चित्रपट !!
माझ्या एका मित्राला शाहरुख-उर्मिलाच्या'चमत्कार'ची गाणी एवढी आवडायची की तो म्हणायचा की "मी कधी जर चित्रपट काढला तर अनु मलिकलाच संगीत करायला देईन." .. त्यानंतर हा संवाद आमच्यात खूप कॉमन झाला. त्याप्रमाणे आत्तापर्यंत अशा माझ्या स्वतःच्या (! ;) ) कित्येक चित्रपटांसाठी मी संगीतकार/दिग्दर्शक/संवादलेखक यांची निवड वेळोवेळी केलेली आहे. ;) त्याच धर्तीवर पुढे म्हणायचं झाल्यास मी आयुष्यात कधी चित्रपट काढला तर तो असाच असेल असा प्रयत्न मी करेन किंवा मग मी सरळ फिंचरलाच दिग्दर्शन करायला सांगेन.. :)
फेसबुकने जगाला किती मोठ्या प्रमाणात झपाटलं आहे हे दाखवणारा आणि तितक्याच टोकदारपणे आजच्या सामाजिक स्थितीवर बोट ठेवणारा एक छोटा प्रसंग चित्रपटाच्या शेवटी आहे. खटला संपल्यावर मार्क आपल्या लॅपटॉपवर काम करत असताना प्रतिपक्षाची ट्रेनी वकील त्याला विचारते "तू काय करतो आहेस?".. मार्क उत्तरतो "बॉस्नियाची स्थिती कशी आहे ते बघतोय" .. ती खिन्नपणे हसून म्हणते "बॉस्निया... हं !! जिथे साधे रस्ते नाहीयेत पण फेसबुक मात्र नक्की आहे. !!!"
'सोने' बघून झाल्यावर मी फेबुवर स्टेटस मेसेज टाकला होता. "इफ यु डोन्ट वॉच सोशल नेटवर्क, मार्क वुईल डिसेबल युअर फेसबुक अकाउंट... !!!"
(यस.. ही कॅन.. ही इज प्रोबॅबली रजनी इन द वेब वर्ल्ड.. ;) चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कळेलच की तो काहीही करू शकतो :) ) !!
थोडक्यात हे न चुकवावेसे 'सोने' आहे. इटस अ सोशल 'ग्रेट'वर्क !!
टॉप न्यूज. मोस्ट रिसेंट १+ : 'सोने' च्या जबरदस्त संवादांपैकी काही निवडक संवाद इथे अनुभवता येतील.
बघितलाय!
ReplyDeleteडोक्यातील कुठला भाग भयंकर सुपीक असेल काही सांगता येत नाही! असं काहीसं वाटलं होतं!
"त्यात काय..? ती तर फक्त एक काल्पनिक कथा आहे. इटस जस्ट अ नॉव्हेल.. जस्ट अ फिक्शन.. !!!" हे त्या समाजातील लोकांनाच 'थिंकिंग' दाखवतं, नाही का? आपल्या भावना इतक्या अश्या उघड्यावर पडल्यात ना कि एक माशी बसायची खोटी, सगळी कालवाकालव!
छान झाली आहे पोस्ट! आणि ह्या सिनेमावर लिहिलंस चांगलं झालं! ( मी बघितलाय म्हणून नाही! तर इतर मित्रमैत्रिणींनी पण बघावा म्हणून! :) )
हा हा.. त्या माणसाचं संपूर्ण डोस्कंच महासुपीक आहे ना?
ReplyDeleteखरंच ग त्याच्या विंची कोडवरच्या एवढ्या सहजतेने आलेल्या प्रतिक्रियेचं मला खरंच कौतुक वाटलं होतं खूप !
प्रतिक्रियेबद्दल धन्स.. बरंच सिनेमा-सिनेमा झाल्याने लिहू की नको प्रश्न पडला होता पण शेवटी अगदीच राहवलं नाही म्हणून लिहून टाकलं..
खरंच आवर्जून प्रत्येकाने बघावासा चित्रपट आहे हा !!!
पाहिला तेव्हाच आवडला होता .....
ReplyDeleteआणि तू लिहलयस त्याप्रमाणे संवाद समजण्यासाठी दोनदा पाहिला आणि अगदी सेम अधे मध्ये पॉझ घेऊन विकिवर फिरून यायचो आणि मग पुढे.
हेरंबा ,तू डायरेक्ट रजनीचाच संदर्भ दिला आहेस आता पाहावाच लागेल हे सोने....
ReplyDeleteम्या पायलेला नाय पन तुमी सुचवू लागले म्हनलं की पहावा लागलं.... :) त्यात वर अनाबाईंचे बी रेकमंड्येसन दिसू लागलेय म्हनल्यावर तर आता पयलं काम ह्येच करावं असं ठरवलयं...
ReplyDeleteमलाही ती "यु डोन्ट गेट टू ५०० मिलियन फ्रेंड्स विदाऊट मेकिंग अ फ्यु एनिमीज" टॅगलाईन जाम आवडलीये...
बाकि पोस्ट झकास जमून आलीये हे तूला दरवेळेस का सांगावे लागते रे... मी नाही सांगणार जा!! :)
या पोस्टमधे तुझे आणि अमितचे एक साम्य सापडले मला ... तो पण असाच स्वत:च्या (;)) सिनेमासाठीचे समस्त स्टारकास्ट, संगीत दिग्दर्शक वगैरे ठरवत असतो.... :)
बघितला आणि प्रचंड आवडला....
ReplyDeleteआज परत बघेन घरी गेल्यावर :)
अगदी मनातलं लिहिलं आहेस रे, हेरंब! फेसबुक थक्क करून सोडणारा चित्रपट आहे. मार्कचं झपाटलेपण १०० टक्के या चित्रपटात दिसतं. मार्कच्या दृष्टीने विचार केला तर तो खरंच "बॅड मॅन" नाही. ही इज "जस्ट पॅशनेट". मी सुद्धा त्याचा विकी सर्च केला होता. डोकं पार आऊट झालं त्याची माहिती पाहून. देव एखाद्याला बुद्धीमत्ता देतो तेव्हा मनापासून देतो. आज पुन्हा पहाते सो.ने.
ReplyDeleteमी चक्क आश्चर्यचकित झालोय, कारण: काल-परवाच तुमची आलेला प्रतिसाद आणि लगेच ही पोस्ट, खूपच फास्ट आहात!
ReplyDeleteछान जमलंय सर्व काही, हं पण फिंचरच्या "फाइट क्लब"च्या तुमच्या आवडी बाबतीत माझं दुमत आहे; तुम्ही अगोदरच माझी त्यावरील पोस्ट वाचली असावी बहुधा.
असो, मार्कची कुठलीही गोष्ट सहजगत्या न अवलंबण्याची त्याची असामान्य तीक्ष्ण वैचारिक वृत्ती दर्शवणारा या चित्रपटातील एक प्रसंग तुम्ही विसरले असं वाटतं--"रिलेशन स्टेटस" अपडेट करण्याची सुविधा.
एनि वे, मी काल रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार!) "दि ए-टीम" बघितला, त्यावर लिहायचं म्हणत होतो, पण आळस हा माझा जीवलग मित्र इकडे काही दिवसांपासून पडीक आहे, कधी जाणार आहे काय माहीत?
chaanach ahe ha movie. I liked it a lot too, aNee gammat mhanaje koNee sue nahee kela asha padhadhateene depict kela gela saGala taree- pratima vagaire dagalalee nahee kunachee:-)
ReplyDeletepuN sagalach kathanak lihun takalayas,:-) thoda untold part thevayachas.
commentla kay hotay? chaanach ahe ha movie. I liked it a lot too, aNee gammat mhanaje koNee sue nahee kela asha padhadhateene depict kela gela saGala taree- pratima vagaire dagalalee nahee kunachee:-)
ReplyDeletemala tya twins cha kaam kelelya actorcha puN kautuk vatala chaan sambhalay tyane subtle difference sin personalities..
puN sagalach kathanak lihun takalayas,:-) thoda untold part thevayachas.
अरे खूप सही आहे हा सिनेमा.मी पाहिलंय .
ReplyDelete१२७ Hours हा सुद्धा मला आवडला
>>>"यु डोन्ट गेट टू ५०० मिलियन फ्रेंड्स विदाऊट मेकिंग अ फ्यु एनिमीज"
ReplyDeleteटॅग लाइन प्रचंड आवडली.....मी अजुन काही पाहिला नाही बघु कधी योग येतोय ते :) :)
>>>"यु डोन्ट गेट टू ५०० मिलियन फ्रेंड्स विदाऊट मेकिंग अ फ्यु एनिमीज"
ReplyDeleteयोगेश +१...
चित्रपट पहाण्याच्या बाबतीत जरा उदासीन आहे मे.
खरंय रे अप्रतिमच आहे तो.. विकीवर फिरत फिरत बघितल्याने अनेक घटना आणि त्यांच्यामागची पार्श्वभूमी व्यवस्थित कळते.
ReplyDeleteहेहे देवेन.. नो डाउट तो रजनीच आहे वेब वर्ल्डमधला :)
ReplyDeleteतन्वी, अग नक्की नक्की बघ. तुलाही टॅगलाईन एवढी आवडली म्हणजे पिक्चर नक्कीच जाम आवडेल. खुपच मस्त आहे.
ReplyDeleteअग पोस्टचं काय.. अप्रतिम चित्रपटावर लिहिताना आपोआपच पोस्ट चांगली होते ;)
>> या पोस्टमधे तुझे आणि अमितचे एक साम्य सापडले मला ... तो पण असाच स्वत:च्या (;)) सिनेमासाठीचे समस्त स्टारकास्ट, संगीत दिग्दर्शक वगैरे ठरवत असतो.... :)
गुड .."यु आर नॉट अलोन" वालं फिलिंग आलंय मला ;)
हेहे सुहास.. आपण एक ग्रुप करुया.. सोने दोनदा बघणार्यांचा :)
ReplyDeleteअगदी परफेक्ट बोललीस.. देव एखाद्याला बुद्धीमत्ता देतो तेव्हा मनापासून देतो. आणि मार्कच्या बाबतीत तर हजार लोकांची बुद्धिमत्ता एका माणसाला दिल्यागत दिलीये देवाने :)
ReplyDeleteचला, सोने दुसर्यांदा पाहणार्यांच्या ग्रुप मध्ये तुलाही अॅड करतो :)
विशाल, अरे फास्ट वगैरे काही नाही रे.. मी १५-१० दिवसांपूर्वीच बघितला होता सोने. पण लिहायला वेळ मिळाला नाही आणि आळस.. दोन्ही.. पण परवा लिहायला बसलो आणि सगळं जमून आलं. म्हणून तर तुला प्रतिक्रियेत म्हटलं होतं की १-२ दिवसात टाकतो पोस्ट.
ReplyDeleteअरे आणि मला माहित्ये 'फाइट क्लब' बद्दल प्रचंड दुमत होणार म्हणून. पण तरीही मी मुद्दाम लिहिलं तसं.. मला खरंच फार ग्रेट वगैरे वाटला नव्हता तो. कधीच.. अजूनही वाटत नाही.. त्यापेक्षा सेव्हन, पॅनीक रूम वगैरे खूप चांगले आहेत.. असो.
"रिलेशन स्टेटस" अपडेट करण्याची सुविधा हे एक भारी प्रकरण होतं. अरे पण मी मुद्दामच चित्रपटाबद्दल आणि त्यातल्या महत्वाच्या प्रसंगांबद्दल थोडं कमीच लिहिलंय. पण या प्रसंगाचा उल्लेख नक्की यायला हवा होता मला मान्य आहे. राहून गेला असावा.. असो..
दि ए-टीम मस्त आहे असं ऐकलंय मी. बघितला नाहीये अजून. पटकन एक मस्त पोस्ट लिहून टाक ए-टीम वर..
हेरंब, मी हा सिनेमा अजून पाहिलेला नाही. पण आमचेही लक्ष त्या टॆगलाईननेच वेधून घेतले होते. आता तुझे परिक्षण वाचून लवकरात लवकर योग आणतेच. आता विकी वर जाऊन थोडा सर्चही करते. :)
ReplyDeleteस्मिता, खरंय.. कोणीही स्यू नाही केलं की कोणाची प्रतिमा डागाळली नाही. कधी शिकणार आपण हे!!
ReplyDeleteहो मलाही ते जुळे बंधू आवडले होते. मस्तच काम केलंय त्यांनी..
सगळं कथानक? अग असं काय. उलट मला तर वाटतंय की मी २० टक्केही लिहिलं नाहीये (मुद्दामच).. अग चिक्कार सिन्स, मुद्दे, पात्र यांचा उल्लेखही नाही केलाय मुद्दाम.. (आता पोस्टमध्ये काय काय नाही लिहिलंय हे कमेंट मध्ये सांगणं म्हणजे फार्फार मोठा इनोद होईल ;) ) .. मी मार्कबद्दल दिलेल्या माहितीबद्दल म्हणत असशील तर ती विकीवर उपलब्ध आहेच. मी मुद्दाम कमी उल्लेख करण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून ज्यांनी बघितला नसेल त्यांचा हिरमोड होऊ नये आणि पोस्ट वाचून सगळ्यांना बघावासाही वाटावा..
सागर, खुपच सही आहे..
ReplyDelete१२७ Hours माझ्या लिस्ट मध्ये आहे आता.
योगेश, त्या टॅगलाइनमुळेच तर मी सुरुवातीला खूप प्रभावित झालो होतो. प्रत्यक्षात तर अजूनच ग्रेट आहे चित्रपट.. नक्की बघ तू.. योग काढून..
ReplyDeleteसिद्धार्थ,
ReplyDeleteयोगेशला दिलं तेच उत्तर तुलाही.. :)
कितीही उदासीन असलास तरी या चित्रपटाच्या बाबतीत उदासीनता झटक प्लीज..
खरंच खुपच कॅची आहे ग ती टॅगलाइन, श्रीताई..
ReplyDeleteमीही चित्रपट बघायच्या आधी आणि बघता बघता (आणि बघून झाल्यावरही) बराच सर्च मारला होता विकीवर. चित्रपट अधिक चांगल्या पद्धतीने कळायला मदत होते त्यामुळे..
mast.........
ReplyDeleteaaplyala aavadlelya chitrapatabaddal aas kahi chan vachal ki aajun chan vatat....mast..........
BTW.....tuze aadhiche sagale posts vachun zale......tehi chan mast....
kahi kahi tar ekdam chya mari dharun duoom phatyak...:)
भांडणानंतर दोघेही रागाने निघून जातात. मार्क आपल्या होस्टेलरूममध्ये येऊन लॅपटॉप सुरु करतो. नायिकेने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून आपला मित्र एदुआर्दोच्या मदतीने एक प्रोग्राम लिहितो ज्यात कॉलेजमधल्या मुलींची एकमेकींशी आणि प्राण्यांशी अपमानास्पद पद्धतीने तुलना केलेली असते. प्रोग्राम लिहितो, बीअर रिचवतो आणि एकीकडे त्या सगळ्याचं लाईव्ह ब्लॉगिंग करतो. ब्लॉगमध्येही आपल्या मैत्रिणीचा खूप वाईट पद्धतीने अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यानंतर नेटवर्क हॅक करून तो प्रोग्राम कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवला जातो. मुली संतापतात, चिडतात, मैत्रिणीची बदनामी होते. मार्कचा हेतू साध्य होतो
ReplyDeleteहे फक्त चित्रपटापुरत असेल तर ठीक .. अन्यथा अशा असंवेदनशील माणसांच्या बुद्धीबद्दल मला काही फार विशेष वाटत नाही .. काही गोष्टी तुम्हाला मिळतात .. त्यात काय मोठ? त्याचा वापर तुम्ही कसा आणि कशासाठी करता हे महत्त्वाच!
te twins ekach actor ne sadar kele ahet he kalalyavar tar farach impress zale hote. mhanaje almost eksarakhe puN kahee subtle differences- he kitee avaghad ahe na abhinay karaNyachya drishteene?
ReplyDeletethoda ativascha view puN vichar karaNyasarakha ahe- puN overall ya movie chya matter of fact style muLe impact strong hotoch.
धन्स धन्स रोहित.. सगळे पोस्ट्स वाचलेस?? सही.. अभिनंदन ;) हेहे
ReplyDeleteसविताताई, तुमच्या मताशी अगदी संपूर्ण सहमत.. चित्रपटात कुठेही मार्कला हिरो म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झालेला नाही (किंबहुना त्याला ग्रे शेडमध्येच रंगवलं आहे.) आणि मीही हे वाक्य लिहिताना तो कसा ग्रेट आहे, मोठा आहे अशा अर्थाने मुळीच लिहिलं नव्हतं.. फक्त कथेचा प्रवास सांगताना आणि प्रामुख्याने फेसबुकच्या जन्माविषयीची माहिती देताना आलेले तपशील आहेत ते.
ReplyDeleteएखाद्याला असामान्य बुद्धिमत्ता मिळाली असली तरी तो तिचा वापर कसा आणि कोणासाठी करतो हे सर्वात महत्वाचं. नाहीतर त्या असामान्य बुद्धिमत्तेचा उपयोग तसा शून्यच.. मला वाटतं चित्रपटातही थोडंफार हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात पूर्णपणे नाही कारण शेवटी हा काही संदेशात्मक चित्रपट नसून जे घडलं तसं दाखवण्याचा प्रयत्न आहे. असो. पण तुमचा मुद्दा पूर्णपणे पटला..
स्मिता, अगदी अगदी.. मलाही जेव्हा ते दोघे एकच आहेत हे कळलं तेव्हा धक्काच बसला होता. वाटतच नाही अजिबात !!
ReplyDeleteहो सविताताईंचा मुद्दा पूर्ण पटलाच. पण तसं काही दिग्दर्शकालाही दाखवायचं नसावं असं मला तरी वाटतं.
मी फार फेसबुक वापरत नाही... पण जमल्यास हा चित्रपट बघीन..
ReplyDeleteतळटीप : आपण फेसबुकला थोबाडपुस्तक म्हणतो हे कुणी मार्कला कळवेल का??? ;)
माझ्या मते जगात फार थोडी अशी व्यक्तिमत्व झालीत ज्यांना ग्रे शेड नसतेच! :)
ReplyDeleteबघायचा आहे..बघायचा आहे म्हणून बरेच दिवस चालू आहे...पाहू कधी योग येतो ते!
रोहन, अरे मीही सुरुवातीला वापरत नव्हतो. म्हणजे मला कळायचंच नाही ते नक्की काय आहे आणि कसं वापरायचं ते. कारण मी ते ऑर्कट सारखं समजायचो. पण नंतर कळलं ते आपल्या बझसारखं वापरायचं असतं.. आणि त्यानंतर काय मग दणादण सुरु :)
ReplyDeleteनक्की बघ हा चित्रपट. अफाट आहे !!
>> तळटीप : आपण फेसबुकला थोबाडपुस्तक म्हणतो हे कुणी मार्कला कळवेल का??? ;)
त्याच्या वॉलवर जाऊन लिहायला हवं ;)
खरंय बाबा.. तसंही आपण ज्यांना नायक मानतो ते कोणासाठी तरी खलनायकच असतात.. (शिवाजीराजे आणि सावरकरही यातून सुटले नाहीत.. तर मार्कची काय कथा. मी कोणाचीच तुलना करत नाहीये कोणाशी.. गैस नको.) and vice versa !!
ReplyDeleteलवकरात लवकर बघ बाबा नाहीतर तुझं फेबु अकाउंट बसायचं ;)
>>>>रोहन, अरे मीही सुरुवातीला वापरत नव्हतो. म्हणजे मला कळायचंच नाही ते नक्की काय आहे आणि कसं वापरायचं ते. कारण मी ते ऑर्कट सारखं समजायचो.
ReplyDeleteमला अजूनही समजत नाही... फेसबुकाचे नक्की म्हणणे काय आहे ;)
अग सोप्पं आहे. फेबुकडे आपल्या बझ प्रमाणे बघ.. मग सगळे प्रश्न चटकन सुटतील.. माझेही असेच सुटले :)
ReplyDeleteDavid Fincher really did a great job in movie,especially when it comes to verbal duals,in which he is a specialist.another power house of Social Network I will say is Jesse Eisenberg,he played Zuckerberg powerfully.But ultimately I definitely don't think social's Golden Globe was a deserving choice especially when you have movies like Inception and The Fighter.
ReplyDeleteYeah Anee.. Completely agree with both your points. Vebal duels as breathtaking as Jesse Eisenberg's performance.
ReplyDeleteBut I do not agree with the last part of the comment :). I personally in favor for social Network than Inception when it comes to Golden globe. Havent watched Fighter, so cant comment.
जोरकस निषेध!!! :)
ReplyDeleteमी येतो परत .. अर्थात सिनेमा पाहून...
हेरंब,
ReplyDeleteतुमचं लिखाण आवडल.
हे 'सोने'(चित्रपट)बघण्याचा योग जुळून येत नाही म्हणजे माझ्या लॅपटॉप
ला saved आहे.
हा ब्लॉग वाचुन आता फार इच्छा होत आहे
आनंदा, निषेध? आयला खादाडीबरोबर आता चित्रपटांच्या पोस्टलाही निषेध यायला लागले म्हणजे संपलंच :)
ReplyDeleteराहुल, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..
ReplyDeleteअगदी नक्की बघा. खरंच हे सोने अगदी चुकवावंसंच आहे..
नवीन पोस्ट कधी ?
ReplyDeleteलवकरच रे.. वर्क इन प्रोग्रेस :)
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteइंग्रजी चित्रपटांबद्दल एवढे जास्त आकर्षण नाही मला. बघायचा प्रयत्न केला आहे. कदाचित ते माझ्या डोक्यावरून जातात बहुतेकदा. ज्युअरासिक पार्क - पार्ट 1, स्पीड, होम अलोन, बेबीस डे आउट, titanic आणि Jackie Chan चे एक-दोन चित्रपट हे सर्व मनापासून आवडले.
आता तुमची पोस्ट वाचून हा चित्रपट पहावासा वाटतो आहे. योग आला तर नक्की बघेन. (शिवाय मला माझे फेबु अकाउंट प्रिय आहे ;) )
बाकी पोस्ट एकदम झक्कास ...!!!
पुढच्या पोस्ट साठी शुभेच्छा....!!!
आभार शाशा.. हा चित्रपट अगदी आवर्जून बघण्यासारखा आहे. नक्की बघा. आणि तुम्ही पाहिलेले चित्रपटही खुपच छान आहेत. हे लोक एवढे वेगवेगळे विषय एवढ्या सक्षमपणे हाताळतात ना की बस !! अजून अजून चित्रपट पाहिलेत की आपोआप आवडायला लागतील..
ReplyDeleteसुपर सिनेमा आणि तू सुपर लिहिलं आहेस... जाम आवडेश!
ReplyDeleteअनेक आभार्स आनंदा...
ReplyDeleteचला 'विवाह' (चित्रपट रे.. ;) ) झाल्यावर बघितलास एकदाचा हाही... :P
कोणत्याही चित्रपटावरच्या कोणत्याही लेखावर आमची हमखास एकच प्रतिक्रिया: ‘बघायला हवा हा चित्रपट एकदा’.. :-D आणि ९९% वेळा ही प्रतिक्रिया चालून जाते, कारण खरंच मी तो चित्रपट बघितलेला नसतो! :-D
ReplyDeleteहाहाहा.. पण हा नक्की बघ रे.. अप्रतिम आहे !
ReplyDelete