गेल्या आठवड्यात डग्लस मरे (Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं 'द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप' (The Strange Death of Europe) हे पुस्तक वाचायला सुरुवात केली. गेले अनेक महिने वाचायचं म्हणत होतो पण काही ना काही कारणांनी राहून जात होतं. आत्ताही राहूनच गेलं. पण वेगळ्या कारणामुळे. खुद्द डग्लस मरेच्याच दुसऱ्या एका पुस्तकामुळे. 'स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप' वाचत असताना नेटवर डग्लस मरेच्याच 'इस्लामोफिलिया' (Islamophilia) या विचित्र नावाच्या पुस्तकाने लक्ष वेधून घेतलं. 'इस्लामोफिलिया' चाळत असताना ते एवढं आवडलं की आधी तेच संपवायचं ठरवलं.
जगभरातली डापु मीडिया, तथाकथित ‘Internet
Intellectuals’, हॉलिवूड
इत्यादींच्या कृपेने आपण 'इस्लामोफोबिया' या शब्दाशी एव्हाना परिचित झालेलो असतो. पण हे इस्लाम बद्दलचं फिलिया हा काय
प्रकार आहे हे मला कळेना. फिलिया म्हणजे आवड. पुस्तकप्रेमींसाठी वापरली जाणारी
संज्ञा म्हणजे bibliophile,
किंवा लहान मुलांची 'आवड' असणाऱ्या आणि त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्या
प्रौढ लोकांसाठी वापरली जाणारी paedophile ही संज्ञा ही याची
काही उदाहरणं.
'इस्लामोफिलिया' हे अगदी छोटंसं पुस्तक आहे. जेमतेम ७५-८० पानी. त्यात डग्लस मरे आपल्याला आधी इस्लामोफोबिया या शब्दाचा अर्थ थोडक्यात समजावून सांगतो. आधुनिक जगातल्या वैचारिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी मूलभूत तत्त्वांना नाकारणारऱ्या सातव्या शतकातल्या इस्लामी (अ)विचारधारेला विरोध करणारे संतुलित विचारांचे लोक म्हणजे इस्लामोफोब ही साधीसोपी जगन्मान्य व्याख्या. आता पुढे जाऊन मरे म्हणतो की तुम्ही आम्ही सर्वच जण इस्लामोफोब आहोत. आपण एखादं 'चुकीचं' (अर्थात इस्लामच्या दृष्टीने चुकीचं) नाटक अर्थात वोल्टायरचं मुहंमद पैगंबरांच्या आयुष्यावर बेतलेलं 'महोमत' (Mahomet) नावाचं नाटक बघितलं किंवा सलमान रश्दीलिखित 'The Satanic Verses' सारखं एखादं 'चुकीचं' पुस्तक वाचलं की आपण लगेचच इस्लामोफोब ठरतो.
इस्लामोफोब हा शब्द युरोपात (किंबहुना जगभरातच)
गेल्या काही दशकांत शिवीसारखा वापरला जायला लागलेला आहे. एखाद्यावर 'इस्लामोफोब' असण्याचा आरोप ठेवला गेला की त्याचं सामाजिक
जीवन नकोसं करून ठेवलं जातं, त्याला त्याच्या सार्वजनिक जीवनात असंख्य
अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यामुळेच आपल्यावर इस्लामोफोब हा शिक्का बसू नये
यासाठी कुठलाही नागरिक इस्लामविषयी मत व्यक्त करताना अतिशय काळजीपूर्वक आणि
सुरक्षित अशी भूमिका घ्यायला लागतो. इस्लाम, त्यातल्या कुप्रथा इत्यादींवर टीका न करता "तो त्यांच्या धर्माचा अंतर्गत
मामला आहे" असं म्हणून सोडून द्यायला लागतो. आणि या सगळ्या गोष्टी ब्रिटनमधले
सरकारी वकील असोत की न्यायाधीश, कलाकार असोत की पॉपस्टार्स, मंत्री असोत की दस्तुरखुद्द पंतप्रधान, एवढंच कशाला खुद्द ब्रिटिश राजघराणं, प्रिन्स-बीन्स ते अगदी थेट पोप महाशय असल्या सगळ्यांकडून
अगदी कसोशीने पालन केल्या जातात, अंगिकारल्या जातात. काहीही झालं तरी आपल्यावर 'इस्लामोफोब' असण्याचा शिक्का बसू नये याचा यातला प्रत्येकजण
कसोशीने प्रयत्न करत असतो. आपली छबी कुठूनही, चुकूनही इस्लामोफोब वाटू नये यासाठी ते पराकोटीच्या कसरती करत राहतात!
इंग्लंडमधलं ग्रुमिंग/रेपिंग गँग्जचं कुप्रसिद्ध प्रकरण हा याचाच दुर्दैवी परिपाक आहे. गेल्या २५-३० वर्षांत इंग्लंडमधल्या १०-१५ वर्षं वयोगटातल्या किमान वीस हजार ते पाच/दहा लाख गौरवर्णीय ब्रिटिश मुलींवर ३० ते ६० वयोगटातल्या पाकिस्तानी पुरुषांनी अपहरण, डांबून ठेवणे, हत्या, शारीरिक अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार अशा प्रकारचे हजारो गुन्हे केलेले आहेत. निष्पाप मुलींना हेरून, त्यांच्याशी ओळख वाढवून, त्यांच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करून, त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे ही पहिली पायरी, त्यानंतर त्या मुलींना त्यांच्या ओळखीच्या अन्य मुली, मैत्रिणी, बहिणी इत्यादींना घेऊन येण्यासाठी भाग पडणे, व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करणे, मादक पदार्थांचा वापर करून त्यांना आपल्या कह्यात घेणे ही दुसरी पायरी आणि त्यानंतर या मुली आपापल्या ओळखीच्या अन्य गटांमध्ये अक्षरशः वाटणे किंवा फिरवणे (अगदी याचप्रकारे इस्लाममध्ये गुलाम स्त्रियांचा व्यापार होत असे, युद्धात सापडलेल्या कैदी स्त्रियांचं वाटप होत असे. ही पद्धत इस्लामच्या सुरुवातीच्या काळापासून ते थेट अगदी अलीकडे आयसिसने यझिदी स्त्रियांना गुलाम बनवण्यापर्यंत वापरण्यात येत होती. नादिया मुरादच्या 'द लास्ट गर्ल' या सत्यकथेत याचे भयावह उल्लेख आहेत.)
या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या
प्रकरणांवर ब्रिटनमध्ये अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत, अनेक चित्रपट आणि माहितीपट प्रदर्शित करण्यात आले आहेत.
पुस्तकं
Just a Child: Sammy Woodhouse
Broken
and Betrayed: Jayne Senior
Pimped
: Samantha Owens
Girl
for Sale: Lara McDonnell
Three
Girls (मिनिसिरीज)
Betrayed
Girls (माहितीपट)
त्यानंतर लेखक अमेरिकेतल्या इस्लामोफोबियाविषयीशी भाष्य करतो. त्यात जॉर्ज बुशवर चांगलेच कोरडे ओढलेले आहेत. ९/११ च्या भयंकर हल्ल्यांनंतर काही दिवसांतच तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या बुशने वॉशिंग्टन इथल्या एका इस्लामी केंद्रात कुराणाचं इंग्रजी भाषांतर हे मूळ अरबी कुराणाशी कसं अप्रामाणिक आहे या विषयावर भाषण ठोकलं होतं.
त्यानंतर पुस्तकात बराक ओबामा, हिलरी क्लिंट्न आणि सीआयए डायरेक्टर जॉन ब्रेननच्या
इस्लामप्रेमाचे काही प्रसंग नमूद करण्यात आले आहेत. ब्रेनन हा सुरुवातीला अमेरिकन
राष्ट्राध्यक्षांच्या दहशतवादविरोधी सल्लागार समितीतील एक सामान्य अधिकारी होता जो
काही वर्षांतच सीआयए डायरेक्टरच्या खुर्चीवर जाऊन बसला!
हे लोण हळूहळू अमेरिकन सैन्यदलातही जाऊन पोचल्याचं लेखक नमूद करतो. अफगाणिस्तान युद्धादरम्यान कुराणाचा अपमान केल्याबद्दल एका ज्येष्ठ सेनाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचं एक उदाहरण वाचून वाचक थक्क होऊन जातो! २००९ मध्ये फोर्ट हूड, टेक्सस मधल्या सैन्यतळावर असताना निदाल हसन नावाचा अमेरिकन मेजर आपल्याच सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार करून १३ जणांचे जीव घेतो तर ३२ जणांना जायबंदी करतो. मात्र याला दहशतवादी कृत्य (Act of terrorism) न मानता कार्यालयीन हिंसा (workplace violence) चं गोंडस नाव देऊन त्या अतिरेकी मेजरला वाचवलं जातं.
अशा अनेकानेक विषण्ण करून सोडणाऱ्या धक्कादायक
अशा प्रसंगांनी हे पुस्तक भरलेलं आहे. पण या सगळ्यात मला सर्वात धोकादायक वाटलेली
गोष्ट म्हणजे लेखकाने दिलेल्या ब्रिटनमधल्या एका विज्ञान प्रदर्शनाचं उदाहरण. दावत
या शब्दाचा अर्थ आपल्याला बॉलि'वीड'वाले सांगतात तसा मेजवानी असा मुळीच नसून, इस्लामच्या भाषेत दावत म्हणजे धर्मपरिवर्तन अर्थात काफरांना
इस्लाममध्ये येण्यासाठी करण्यात आलेलं आवाहन/आमंत्रण असं आहे. या दावतचं एक
धक्कादायक उदाहरण लेखक आपल्यासमोर उलगडून दाखवतो तेव्हा आश्चर्याचा दुःखद धक्का
बसण्यापलीकडे आपल्या हातात काहीही राहत नाही!
२००६ सालापासून ब्रिटनमध्ये एका विज्ञानविषयक फिरत्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात यायला लागलं. या विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात (इस्लामबहुल अशा) मँचेस्टर मधून करण्यात आली. Foundation for Science, Technology and Civilisation या संस्थेच्या माध्यमातून 'समृद्ध मुस्लिम वारशा' संदर्भात जनजागृती करण्यासाठी या प्रदर्शनाची योजना करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मुस्लिम जगताने आधुनिक जगाला विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांसंदर्भात दिलेल्या देणगीची कल्पना आजच्या पिढीला यावी हा या प्रदर्शनाचा उद्देश होता. या प्रदर्शनाचं नाव होतं '1001 islamic inventions' अर्थात '१००१ इस्लामी शोध'. या प्रदर्शनाचं आयोजन अतिशय भव्यदिव्य स्वरूपात करण्यात आलं होतं. या प्रदर्शनासाठी ब्रिटीश आमदार, खासदार, मंत्री यांसारख्या मान्यवरांना तर आवर्जून आमंत्रणं देण्यात आली होतीच पण त्याचबरोबर न्यू यॉर्कमधील युनायटेड नेशन्सचे प्रतिनिधी, ब्रसेल्समधलं युरोपीय पार्लमेंटचे सभासद अशा जगभरातल्या अनेकानेक प्रबळ लोकांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर बेन किंग्जले या भारतीय वंशाच्या ब्रिटिश कलाकाराला घेऊन या प्रदर्शनावर एक लघुपट बनवून त्याचे जागतिक दौरे आयोजित करण्यात आले. इस्तंबूल, न्यूयॉर्क, लॉस अँजल्स इत्यादी ठिकाणी हे प्रदर्शन बघायला लाखोंच्या संख्येने गर्दी लोटली. ज्यात अर्थातच शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भरणा अधिक होता.
प्रदर्शनात इस्लामने जगावर केलेल्या उपकारांची
यादीच्या यादी होती. घड्याळ, कॅमेरा, संगीत, स्वच्छता, भोजन, अन्नपदार्थ, फॅशन किंबहुना अगदी रुबिक'स क्यूबचा शोधसुद्धा इस्लामनेच लावला आहे असे
दावे केले गेले. कला,
बीजगणित, भूमिती, लेखनकला, शेती, वैद्यकशास्त्रातले सारे शोध, सारं ज्ञान एवढंच नव्हे तर धरणं, पवनचक्क्या, व्यापारउद्यम, कापडचोपड, कागदनिर्मितीची कला, कुंभारकाम, काचनिर्मितीची कला, दागिने, चलन (currency) हे सारं सारं जगाला इस्लाममुळे मिळालं असंही ठामपणे
सांगितलं गेलं. अगदी विमानाचा शोधदेखील नवव्या शतकात अब्बास इब्न फिरनास या
मुस्लिम माणसाने लावला असं ठासून सांगितलं गेलं.
मी वर म्हंटल्याप्रमाणे हे पुस्तक अशा चमत्कारिक आणि धक्कादायक गोष्टींनी भरलेलं आहे. मात्र हे 1001 islamic inventions प्रकरण मला सर्वाधिक गंभीर वाटलं. या प्रदर्शनांना हजारो, लाखो शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी भेट देतात आणि आपण वापरतो ती प्रत्येक जीवनावश्यक वस्तू, प्रत्येक वैद्यकीय, स्थापत्यविषयक, विज्ञानविषयक शोध हा इस्लामनेच लावला आहे हे असत्य त्यांच्या कोवळ्या मनावर नकळतपणेच पण अगदी ठामपणे सत्य म्हणून बिंबवलं जातं. त्यांच्या मनात आपोआपच इस्लामबद्दल आदर निर्माण होतो, हळूहळू तो वाढत जातो आणि आपसूकपणेच ते इस्लामकडे आकृष्ट होतात. सुरुवातीच्या काळात तलवारीच्या बळावर आणि काही शतकांनी ती पद्धत कालबाह्य व्हायला लागल्यानंतर आधुनिक विश्वात लव जिहाद, लँड जिहाद, अनेक अपत्यं जन्माला घालून आपली संख्या वाढवण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी हा सर्वात नवीन आणि अत्यंत आकर्षक आणि रक्तविहीन धर्मप्रसाराचा असा हा 'कॅच-देम-यंग जिहाद' म्हणावा लागेल.
डग्लस मरेच्या 'इस्लामोफिलिया' या पुस्तकाला मेलनी फिलिप्स या अतिशय अभ्यासू ब्रिटिश पत्रकाराची प्रस्तावना लाभली आहे. त्यानिमित्ताने मेलनी फिलिप्सच्या लंडनिस्तान (Londonistan: How Britain is creating a Terror State within) या पुस्तकाचा परिचय झाला आणि ते पुस्तक आपोआपच २०२५ च्या वाचायच्या यादीत समाविष्ट झालं.
दरम्यान ब्रिटनमधल्या पाकिस्तानी ग्रुमिंग गँग्ज आणि त्याबाबतीतली सरकारी पातळीवरची निष्क्रियता, ब्रिटनचे अनेक तत्कालीन मंत्री त्याचप्रमाणे ग्रुमिंग गँग्जच्या खटल्यादरम्यान प्रमुख सरकारी वकील असणारा आणि त्यावेळी ज्याने हे प्रकरण जाणूनबुजून दाबून टाकलं असा आणि आत्ता चक्क ब्रिटनचा पंतप्रधान असणारा नीचतम इसम कीअर स्टार्मर अशा सर्वांवर सध्या इलॉन मस्क आपल्या X या प्लॅटफॉर्मवरून टीकेची झोड उठवत आहे. (X अर्थात पूर्वाश्रमीचं ट्विटर वोक लोकांच्या कचाट्यातून बाहेर पडल्याचा परिणाम). या संदर्भातच आज युट्युबवर 'इस्लामोफिलिया' च्या डग्लस मरेचा एक पॉडकास्ट समोर आला.
१. पहिला मुद्दा म्हणजे डग्लस मरेने ऑक्सफर्डशर मधल्या अत्याचारी पाकिस्तानी टोळ्यांच्या तावडीतून महत्प्रयासाने सुटून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर गुदरलेल्या भयावह प्रसंगाचं वर्णन केलं आहे (१४:०० ते १७:००). ऑक्सफर्डशर मधल्या एका अनाथाश्रमातली मुलगी दुर्दैवाने या पाकिस्तानी टोळ्यांच्या तावडीत सापडली. त्या लोकांनी तिला जबरदस्तीने अंमली पदार्थांचं सेवन करायला लावून, अनेक दिवस तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. एक दिवस सुदैवाने ती त्यांच्या तावडीतून निसटली आणि कशीबशी कॅब पकडून तिच्या अनाथाश्रमात आली. पण अर्थातच तिच्याकडे कॅबच्या भाड्याचे पैसे नव्हते. तिने अनाथाश्रमाच्या स्त्री(!!!!) अधिकाऱ्याला भाड्याचे पैसे भरण्याची विनंती केली असता तिने ती विनंती सरळसरळ नाकारली. दरम्यान पाकिस्तानी टोळ्या तिला शोधत शोधत त्या अनाथाश्रमापर्यंत येऊन पोचल्या. आपल्या सावजाला तिथे पाहताच त्यांनी तिला तिथून पुन्हा उचललं आणि त्यांच्या अड्ड्यावर घेऊन गेले आणि तिच्या दुर्दैवाचे दशावतार पुढची कित्येक वर्षं असेच चालू राहिले. काही वर्षांनी या पाकिस्तानी टोळ्यांविरुद्ध खटला उभा राहून या घटनेचा उलगडा झाला असता अनाथाश्रमाच्या त्या असंवेदनशील, बेजबाबदार आणि अकार्यक्षम स्त्री अधिकाऱ्यामुळे त्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्या स्त्रीने निगरगट्टपणे फक्त दोन ओळीत दिलगिरी व्यक्त करून प्रकरण संपवून टाकलं!
२. दुसरा मुद्दा वेगळ्या प्रकारे महत्वाचा आहे.
ब्रिटिश लोकांनी जेव्हा जगभरातल्या देशांना अंकित करत आपल्या वसाहती त्या त्या
ठिकाणी स्थापन करायला सुरुवात केली त्यावेळी तिथल्या तथाकथित मागासलेल्या
लोकांच्या अंधःकारमय जीवनात आशेचे किरण फुलवण्याची, त्यांचं जीवन सुखकर करण्याची जबाबदारी (White Man's burden) येशूने आपल्या सक्षम खांद्यांवर सोपवली असल्याच्या भ्रमात
ते वावरत असत. थोडक्यात ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी त्या देशांची संस्कृती, व्यवहार, आचारविचार, देव, धर्म हे सगळं हीन प्रतीचं, अज्ञानमय, अंधःकारमय होतं असा स्थानिक जनतेचा समज करून
देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. (अर्थात इस्लामच्या मतेदेखील मुहंमद पैगंबराला
प्रेषितत्त्व प्राप्त होण्यापूर्वीच काळ हा अंधःकारमय काळच समजला जातो). या
पॉडकास्टमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना (२३:०० पासून पुढे) डग्लस मरे
दुर्दैवाने हेच सत्य सांगतो, मात्र यावेळी wokism च्या कृपेने ही परिस्थिती दस्तुरखुद्द ब्रिटनवर ओढवलेली
आहे. गेली कित्येक वर्षं मीडियाच्या माध्यमातून ब्रिटनच्या नवीन पिढीसमोर ब्रिटनचा
भूतकाळ अत्यंत मानहानीकारक रूपात मांडला जात आहे. म्हंटलं तर हा काव्यगत न्याय
झाला मात्र त्याच वेळी इस्लामच्या पोलादी पंज्यात एका माजी महासत्तेची मानगूट
पकडली जात असून, वेळीच जागृत न झाल्यास हा इस्लामरुपी दैत्य
जगभरातल्या अन्य देशांना भक्ष्य करण्यात कुचराई करणार नाही या भीषण सत्याची
सत्याची जाणीवही होते.
अर्थात जगाला कह्यात घेऊन संपूर्ण जग इस्लामी
करून टाकण्याची इस्लामची विखारी मानसिकता ही जगभरातल्या woke नेत्यांच्या दृष्टीस पडत नसली तरी स्वतः इस्लामने मात्र आपल्या या विषारी
लालसेचा छातीठोकपणे आणि निर्भयपणे वारंवार पुनरुच्चार केला आहे. इस्लामची
असहिष्णुता, फक्त अर्थात इस्लामची एकच देव, एकच प्रेषित मानण्याची आणि त्यामुळे इतर धर्म, पंथ, भाषा, देव, श्रद्धा यांना नाकारून टाकण्याची जहरी मानसिकता
एव्हाना जगाला परिचित झालेली आहेच. यावर भरपूर लिहिलं, वाचलं, बोललं गेलेलं आहे. कशाचाही काहीही उपयोग होत
नाही हेही एव्हाना आपल्याला माहित झालेलं आहे. पण तरीही कधीतरी कुठेतरी एखादं
पुस्तक वाचलं जातं, एखादा व्हिडीओ, पॉडकास्ट वगैरे बघितला जातो, त्यातलं इस्लामचं जहरी सत्य पुन्हा एकदा सामोरं
येऊन प्रचंड हतबलता येते आणि ती अशी कीबोर्ड बडवून व्यक्त केली जाते. अथात या
व्यतिरिक्त आपल्या हातात आहे तरी काय म्हणा!
-हेरंब ओक