Cody Mcfadyen या अमेरिकन लेखकाच्या Smoky Barrett सिरीज मध्ये ५ पुस्तकं आहेत.
1. Shadow Man
2. The Face of Death
3. The Darker Side
4. Abandoned
5. The Truth Factory
स्मोकी बॅरट ही एफबीआय ची स्पेशल एजंट आहे. एका विकृत सिरीयल किलरने तिच्या कुटुंबीयांचं दुर्दैवी हत्याकांड घडवून आणून तिच्यावरही प्राणघातक हल्ला केलेला असतो. सुदैवाने त्या जीवघेण्या हल्ल्यातून जेमतेम वाचलेली स्मोकी ही विद्रुप चेहरा, असंख्य जखमा आणि कमालीचं नैराश्य या सगळ्यांच्या साथीने आयुष्य ढकलते आहे.
आणि अचानक अजून एका
अशाच विकृत सिरीयल
किलरचं आव्हान तिच्या पुढ्यात
उभं ठाकतं आणि
स्मोकी पुन्हा जुन्या उमेदीने
त्याला सामोरी जाते. शाडो
मॅन या पहिल्या
पुस्तकाचा हा साधारण
गोषवारा.
पुढच्या पुस्तकांमध्येही असेच पण
वेगळ्या तऱ्हेचे, विक्षिप्त, खुनशी,
विकृत सिरीयल किलर्स
वाचकांच्या भेटीला येतात. प्रचंड
रक्तस्राव, खुनी हल्ले,
हत्याकांडं यांनी भरलेली ही
पुस्तकं आहेत.
*अर्थातच सर्व वाचकांना
न झेपणारी.*
ज्यांना या प्रकारचं
जान्र आवडतं त्यांना
नक्की आवडू शकतील.
अर्थात शाडो मॅन
मध्ये जाणवणारी लेखकाची,
पात्रं आणि प्रसंग
यांवरची पकड पुढच्या
पुस्तकांमध्ये हळूहळू निसटत चालल्याचं
जाणवतं. तिसरं पुस्तक (डार्कर
साईड) मध्ये तर
उगाचच काहीही चाललंय
असं वाटतं काही
वेळा. त्यामुळे मी
चौथं पुस्तक सुरू
केलं पण संपवलं
नाही. हळूहळू संपेल.
बघू.
ज्यांना रक्तरंजित, बीभत्स, विकृत,
विक्षिप्त सिरीयल किलर्स आणि
हत्याकांडं, त्यातली
वर्णनं, गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या अचाट
विचित्र पद्धती आणि त्यावर
स्पेशल एजन्टसची दमदार प्रत्युत्तरं
अशा प्रकारचे विषय
आवडतात त्यांना नक्की आवडेल
अशी ही बुकसिरीज.
#CodyMcFadyen
#SmokyBarrett
*अर्थातच सर्व वाचकांना न झेपणारी.*
ReplyDeleteहम्म मी याच प्रकारामध्ये आहे :-|