Wednesday, May 1, 2019

स्पॉयलर

********* SPOILER ALERT **********


"बाबा, बाबा, बाबा... तुला माहित्ये का की 'एन्ड गेम' मध्ये आपला आवडता आयर्न मॅन मरतो."

लेक टोनी स्टार्कचा अतीव फॅन असल्याकारणाने (They share the birth date, could be one of the prime reasons) मी हे त्याला सांगितलं नव्हतं. पण बाहेरच्या जगातल्या अव्हेंजर फॅन्स मुळे त्याला अखेर ते कळलं असावं.

"हो अरे. माहिती आहे मला"

"तुला माहिती होतं तरी मला का सांगितलं नाहीस" प्रतिप्रश्न!

आता काय बोलावं हे न सुचून मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेलो... "अरे मुव्हीमधल्या अशा महत्वाच्या घटना सांगायच्या नसतात. त्यांना स्पॉयलर्स म्हणतात. तू कशाला मला सांगितलंस? मला माहीत होतं म्हणून ठीके" मी उगाचच विद्वत्ता पाजळली.

"त्यात काय बाबा? हा काही स्पॉयलर नाहीये. तो काही खरा मरत नाही काही. फक्त पिक्चरमध्ये मरतो. खरा जिवंत आहे रे तो"
 
#बाबाचा_एन्डगेम
#आदि_आणि_इत्यादी

No comments:

Post a Comment

सिरीयल किलर्सच्या गुंतागुंतीच्या मनोविश्वाचा वेध घेणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व : ख्रिस कार्टर

डिटेक्टिव्ह रॉबर्ट हंटरला त्याच्या मोबाईलवर कॉल येतो. समोरचा आवाज हंटरला सुपरिचित असला तरी त्या आवाजाशी निगडित असलेल्या त्याच्या आठवणी फार भ...