Saturday, January 20, 2018

प्रोटेक्शन

प्रश्न : मुलांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, 'अवघड' प्रश्न असले तरी टाळू नयेत, उलट सगळं नीट सोप्या भाषेत, त्यांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगावं, अजिबात टाळाटाळ करू नये हे असं सगळं सगळं असंख्य लेख, ब्लॉग्ज, पोस्ट्स, व्हिडिओज, आर्टिकल्स इ० सगळ्या ठिकाणी वाचलेलं असलं तरी ते सगळं साफच विसरून जाऊन त्याच्या अगदी १०१% उलटं वागण्याची वेळ कुठली?

उत्तर : ती वेळ म्हणजे आज रात्री १० ची जेव्हा बेसावध क्षणी टिव्हीवरची अ‍ॅड बघताना लेक यॉर्कर टाकतो की "बाबा, हे *स्टेन प्रोटेक्शन* म्हणजे काय रे?" आणि आपण दहा-एक सेकंद पूर्ण ब्लॅंक होऊन, वरचे सगळे सल्ले साफ विसरून जाऊन "अरे ते स्टेन नसेल टेन वगैरे काहीतरी असेल" किंवा "अरे वॉशिंग पावडरची अ‍ॅड आहे ती बहुतेक" असलं काहीतरी थातूर मातूर बडबडून प्रश्न शिताफीने (!) टाळतो. तीच!! तीच ती वेळ !!

बेटर लक नेक्स्ट टाईम, बाबा. यु नीड इट !!

6 comments:

  1. >>बेटर लक नेक्स्ट टाईम :)

    ReplyDelete
  2. हेरंब, मला जाम टेन्शन आलंय. आमच्याकडे आताच एवढे प्रश्न आहेत. हा प्रश्नासूर मोठा होऊन एक दिवस मला गिळून टाकणार!

    ReplyDelete
    Replies
    1. हो ग. ही तर सुरुवात आहे आणि सुरुवात झाल्या झाल्याच मला बाबा म्हणून पुढे काय वाढून ठेवलंय हे दिसतंय. अर्थात जे दिसतंय ते तर फक्त हिमनगाचं टोक आहे हे ही नक्की.

      Delete

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...