Thursday, June 30, 2016

उघडं

सहकुटुंब चाललो होतो आणि अचानक प्रचंड पाऊस कोसळायला लागला. छत्रीचा साधा शो-पीस म्हणूनही उपयोग होईना म्हणून मग रस्त्याच्या कडेला एका दुकानाच्या शेडखाली जाऊन उभे राहिलो. चिरंजीवांनी पहिल्याच चेंडूवर षटकार लगावण्याचा सेहवागी निश्चय केला असल्याप्रमाणे आसूड ओढला.

चिरंजीव : बाबा, घरी कसे जाणार आपण? उघडं आहे.

मी : काय????

चि : बाबा, पाऊस पडतोय. उघडं आहे.

मी पटकन छत्रीला भोक बिक पडलंय की काय ते बघितलं. शो-पीस सुस्थितीत होता.

मी : अरे काय उघडं आहे?

चि.  : बाबा, आपलं उघडं आहे.

मी क्षणभर चपापुन जाऊन पटकन शर्टचं एखादं बटन (आणि हो जीन्सची झीपही. का खोटं बोला उगाच?) चुकून उघडी राहिलीये का ते चाचपून बघितलं. (हो. देवाघरच्या फुलाच्या तोंडून देव कदाचित वॉर्निंग देत असावा. उगाच रिस्क का घ्या?). सुदैवाने सगळं बंद होतं.

माँसाहेब : अरे काय बडबडतोयस बेटा?

मी : काय झालंय काय नक्की?

अत्यंत दयार्द्र नजरेने पहात शक्य तितक्या संयमी आवाजात चिरंजीव उत्तरले.... "बाबा, एवढा पाऊस पडतोय, आपण पूर्ण भिजलोय, कपडे भिजलेत. आता घरी कसे जाणार आपण??? आपलं उघडं आहे."

तेवढ्यात अचानक खाडकन वीज चमकली आणि मी धबधब्यासारखं कोसळू पाहणारं हसू महत्प्रयासाने आवरून धरत चँडलर बिंगचे शब्द उसने घेत उत्तरलो "द वर्ड यु आर लुकिंग फॉर, डिअर, इज 'अ-व-घ-ड'

7 comments:

  1. कहाणी च्या शेवट पर्यंत, आमच पण उघडच होत

    ReplyDelete
  2. मनातले विचार फेसबुक ऐवजी पुन्हा ब्लॉगवर आल्याचे पाहून बरे वाटले. 👍

    💐💐💐

    ReplyDelete
  3. मनातले विचार फेसबुक ऐवजी पुन्हा ब्लॉगवर आल्याचे पाहून बरे वाटले. 👍

    💐💐💐

    ReplyDelete
  4. मुलांच्या बोलण्याची गती प्रचंड असली की असं होतं अनेकदा. आमच्या नात्यात एक मुलगी फोन "ठेऊ का" असं "ठ्यु का?" असं म्हणायची hahahaha

    ReplyDelete

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...