'मटा' मध्ये

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3532816.cms


प्रिय संपादक, महाराष्ट्रातील सध्याचे वाढते धार्मिक/जातीय वेड आणि त्यावर आजच्या तरुणांची रिएक्शन हा कवितेच्या रुपात मांडायचा हा प्रयत्न आहे.

आपला
हेरंब ओक
न्यू जर्सी
.............................. 

हरकत नाय !!
हरकत नाय हरकत नाय !! 
कुणीही कितीही मेले तरी कितीही बळी गेले तरी 
हरकत नाय हरकत नाय !!
मारा झोडा ठेचुन काढा 
गोळ्या झाडा बाँब फोड़ा 
त्यांच डोक आमचा हातोड़ा 
ताज्या रक्ताचा पडुदे सडा
एका घावात मागाल पाणी असे आहोत आम्ही सनातनी 
आमच्या देवांची मस्करी करायची नाय !!
हरकत नाय हरकत नाय !! 
कुणीही कितीही मेले तरी कितीही बळी गेले तरी 
हरकत नाय हरकत नाय || १ ||

खसकन उपासा नंग्या तलवारी 
दिसूदे आपली ताकद खरी 
भेदरल्या पाहिजेत दिशा चारी 
थरथर कापेल दुनिया सारी
आमच्या समोर नको अजीजी उगाच नही आम्हाला म्हणत "पाजी" 
आमच्या गुरु च्या वाटेला जायच नाय !!
हरकत नाय हरकत नाय !! 
कुणीही कितीही मेले तरी कितीही बळी गेले तरी 
हरकत नाय हरकत नाय || २ ||

शिवबा आमचा आम्ही त्याचे मावळे 
उलट बोलाल तर तोंड करू काळे 
आदर व्यक्त करायचे आमचे मार्गच आगळे 
फासून डाम्बर घर रंगवू सगळे
मुखी शिवबा हाती ग्रेनेड अशी आमची राष्ट्रवादी ब्रिगेड 
शिवबाचे स्मारक उभारू देत नाही म्हणजे काय !!
हरकत नाय हरकत नाय !! 
कुणीही कितीही मेले तरी कितीही बळी गेले तरी 
हरकत नाय हरकत नाय || ३ ||

दिसला भैय्या तर सोडू नका 
टँकसया फोड़ा सामान फेका 
एकच असा देऊ जोरदार धक्का 
की "आपला" खुंटा होइल पकका
नवमहाराष्ट्राची आम्हालाच जाण आम्ही करू नवनिर्माण 
मराठी सोडून दुसर काही बोलायच नाय !!
हरकत नाय हरकत नाय !! 
कुणीही कितीही मेले तरी कितीही बळी गेले तरी 
हरकत नाय हरकत नाय || ४ ||

पण थाम्बा हे काय !! 
हे सगळ अचानक थाम्बतय काय 
होय ! कारण मी आहे आजचा तरुण कुठल्याही झापडांशिवाय 
मीच गोविन्दसिंह मीच कृष्ण आणि मीच शिवराय 
आमच्या तरुणाईला फसवयाच नाय 
याद राखा गाठ आमच्याशी हाय
ज़ातिधर्माच्या नावाने फूट पाड़ाल तर 
होय !! आमची हरकत हाय हरकत हाय हरकत हाय !!!

5 comments:

 1. खूप छान कविता वाचायला मिळाली. कृपया माझा पंडित भीमसेनजीबद्दल लिहिलेला लेख वाचावा आज त्यांचा जन्मदिवस.

  ReplyDelete
 2. धन्यवाद. आपण लिहिलेला लेख वाचतो आता.

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. खूप छान कविता वाचायला मिळाली. https://mazisamruddhi.blogspot.com

  ReplyDelete

रक्तरंजित पुस्तकमाला : Cody Mcfadyen (Smoky Barrett Series)

Cody Mcfadyen या अमेरिकन लेखकाच्या Smoky Barrett सिरीज मध्ये ५ पुस्तकं आहेत .   1. Shadow Man   2. The Face of Death   3. The D...