नॉर्वेला स्थलांतरित झालेल्या Bruce Bawer या अमेरिकी लेखकाच्या 'While Europe Slept: How radical islam is destroying the west from within' या पुस्तकातल्या एका महत्वपूर्ण घटनेचा अनुवाद केला आहे. नॉर्वेमधील निवासाच्या काळात Bruce Brawer ला आलेल्या अनेक अनुभवांच्या आधारे त्याने हे पुस्तक लिहून २००६ साली प्रकाशित केलं.
नॉर्वेसारखे
अनेक युरोपिय देश अतिसहिष्णुता आणि इस्लामोफोबियापायी राष्ट्रीय सुरक्षेच्या
दृष्टीने अत्यंत धोकादायक निर्णय किती सहजपणे घेतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुल्ला क्रेकर या अतिरेक्याची ही कहाणी.
--हेरंब ओक
=========================
फराज अहमन नजामुद्दिन नावाच्या एका इराकी कुर्दिश अतिरेक्याने १९९१ मध्ये नॉर्वे मध्ये मुल्ला क्रेकर या नावाने शरणागत/आश्रित (refugee) म्हणून प्रवेश केला. फराज अहमन नजामुद्दिन नावाच्या एका इराकी कुर्दिश अतिरेक्याने १९९१ मध्ये नॉर्वे मध्ये मुल्ला क्रेकर या नावाने शरणागत/आश्रित (refugee) म्हणून प्रवेश केला. त्याची पत्नी आणि कुटुंबीयही काही दिवसांनी त्याला येऊन मिळाले. १९९४ मध्ये त्याने इस्लामिक व्हिजन नावाची एक अतिशय जहाल मुस्लिम संघटना स्थापन केली. १९९६ ते १९९९ दरम्यान नॉर्वे सरकारकडून या अतिरेकी संस्थेला २,५०,००० क्रोनर (३५,००० अमेरिकी डॉलर्स) आर्थिक साहाय्य म्हणून देण्यात आले. धार्मिक संघटनांना सरकारद्वारे अर्थसाहाय्य दिलं जाणं ही नॉर्वे मध्ये नित्याची बाब आहे.
गंमत अशी की
नॉर्वे मध्ये शरणार्थी म्हणून प्रवेश केलेला हा माणूस नॉर्वेमध्ये राहिलाच नाही.
९/११ च्या वेळी हा इराक मध्ये होता. तिथे त्याने काही काळाने अन्सार अल-इस्लाम
नावाची अजून एक अतिरेकी संघटना स्थापना केली. त्याने आपल्या दहशतवादी
सहकाऱ्यांच्या मदतीने इराकमधल्या आसपासच्या गावांवर हल्ले करून त्यांना आपल्या
ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर शरिया कायद्याचा अंमल बसवण्यास
सुरुवात केली. बियारा नावाच्या खेड्यातील एका रहिवाशाने तिथल्या परिस्थितीचं वर्णन
केलं आहे, "गावात सीडीज, संगीत, गाणी यांच्यावर
बंदी घालण्यात आली. लोकांना सहलींना जाण्यास मनाई करण्यात येऊ लागली. फुटबॉल
खेळतानाच्या हाफ पँट्सवर बंदी घालण्यात आली. ज्या ज्या वेळी नमाजपठणासाठी अजानची
घोषणा दिली जाई त्यावेळी अतिरेकी संघटनेचे सैनिक घरोघर जाऊन लोकांना नमाजासाठी
बाहेर घेऊन जात. जे नागरिक विरोध करत त्यांना अमानुष मारहाण केली जात असे."
क्रेकरचं नाव सर्वप्रथम नॉर्विजन मीडियामध्ये आलं ते २२ ऑगस्ट २००२ मध्ये. क्रेकरची अन्सार अल-इस्लाम संघटना अल कायदाच्या मदतीने रासायनिक अस्त्रनिर्मिती करत असल्याच्या आरोपावरून नॉर्विजन अधिकाऱ्यांद्वारे त्याची चौकशी करण्यात येत होती. त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना नॉर्वेमधून हद्दपार करण्यात येणार होतं. त्यावेळी तो कदाचित इराक किंवा इराण असा कुठंतरी असावा. तो नक्की कुठे होता हे कोणालाच ठाऊक नव्हतं. त्यानंतर त्या सगळ्या प्रकरणाला एक निराळंच वळण मिळालं.
१ सप्टेंबर
रोजी Dagbladet या नॉर्वेच्या
आघाडीच्या वृत्तपत्राने एक बातमी दिली जिचा मथळा सर्वसामान्य जनतेच्या काळजाचा ठाव
घेणारा होता.
"माझी मुलं
त्यांच्या बाबांची रोज अतिशय आतुरतेने वाट बघतायत"
आणि त्याखाली
क्रेकरच्या तथाकथित पीडित पत्नीचा अतिशय केविलवाणा भासणार क्लोज-अप देण्यात आला
होता. त्याखाली दिलेली बातमी काहीशी अशी होती.
मुल्ला क्रेकर
(३९) ची पत्नी तिची मुलं आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय घाबरलेली आहे.
वर्षभरापूर्वी हे सुखी कुटुंबीय सहलीला जाण्यासाठी म्हणून निघणार होतं. परंतु
अचानक तिचा पती एकटाच निघून गेला आणि जाण्यापूर्वी तो तिला म्हणाला, "मी जातोय, कधी परत येईन
ठाऊक नाही. मला उत्तर इराकमध्ये एक महत्वाची कामगिरी पार पाडायची आहे."
"मुल्ला क्रेकर
अतिरेकी नाही" असं त्याच्या मुलीने ठाम प्रतिपादन केलं होतं. "तो एक
अतिशय चांगला मुस्लिम आणि दयाळू पिता आहे" अशी पुष्टी जोडायलाही ती विसरली
नाही. मुल्ला क्रेकर आणि त्याच्या कुटुंबियांविषयी नॉर्विजन जनतेच्या मनात
सहानुभूती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या अनेक लेखांचा निरनिराळ्या
वृत्तपत्रांमधून भडीमार करण्यात आला. त्यानंतर त्याला १३ सप्टेंबर रोजी इराण मध्ये
तात्पुरती अटक झाल्याची आणि त्यानंतर त्याला सोडून दिल्याची बातमी आली. त्यावेळी
तो नेदरलँड्सच्या दिशेने मार्गक्रमणा करत होता.
दुसऱ्या दिवशी
त्याला अॅम्स्टरडॅमच्या Schiphol विमानतळावर
दहशतवादाच्या आरोपाखाली अटक झाल्याची बातमी आली. जॉर्डनलाही तो अंमली पदार्थांच्या
तस्करीच्या आरोपांखाली हवा होता. (पुढच्याच वर्षी अमेरिका आणि इस्रायलला लक्ष्य
केल्याबद्दल जॉर्डनमध्ये त्याला प्रमुख आरोपी घोषित केले.). अमेरिकी
अधिकाऱ्यांनाही त्याची तपशीलवार चौकशी करायची होती. परंतु जॉर्डनमध्ये
गुन्हेगारांचे मानवी हक्क नाकारले जातात आणि अमेरिकेत मृत्युदंड आहे या कारणांस्तव
नेदरलँड्सने क्रेकरचं हस्तांतरण करण्यास नकार दिला. जानेवारीपर्यंत त्याला
नेदरलँड्समधेच ठेवून त्यानंतर त्याची पाठवणी नॉर्वेच्या दिशेने करण्यात आली.
त्याला नॉर्वेच्या ऑस्लो विमानतळावर अटक होणे अपेक्षित होते. परंतु
नेदरलँड्सप्रमाणेच नॊर्वेदेखील त्याला अमेरीका अथवा जॉर्डनकडे हस्तांतरित करण्यास
अनुत्सुक असल्याने त्यांनी त्याची सुटका केली. त्यानंतर मुल्ला क्रेकर सातत्याने
बातम्यांमध्ये झळकू लागला.
फेब्रुवारी
२००३ मध्ये त्याचे पारपत्र (पासपोर्ट) रद्द करण्यात आले. मार्च मध्ये एका
मुलाखतीदरम्यान त्याने अमेरिकेला उघडपणे धमकी दिली, "त्याचे कित्येक आत्मघातकी सैनिक अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी
त्याच्या इशाऱ्याची वाट बघत थांबले आहेत." ही सगळी मुक्ताफळं ऐकल्यानंतर
नॉर्विजन पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र जेमतेम दोन आठवड्यांनंतर त्याची
सुटकाही झाली. एप्रिल २००३ मध्ये अन्सार अल-इस्लामने क्रेकरच्या सूचनेवरून एका
बारा वर्षीय मुलाचा अतोनात छळ केल्याची बातमी आली. त्यानंतर ९/११ ही अल्लाची देणगी
असल्याचं क्रेकरचं एका जाहीर भाषणातलं वक्तव्यही बातम्यांमध्ये झळकलं.
ऑगस्ट २००३
मधल्या बगदादच्या युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयावरील हल्ल्यामागे अन्सार अल-इस्लाम
असल्याची बातमी आली. एवढं होऊनही क्रेकरच्या या कृष्णकृत्यांचे उल्लेख नॉर्वेच्या
प्रमुख मीडियामध्ये अभावानेच होत होते. नॉर्वे सरकार क्रेकरला अजूनही अतिशय
सहृदयतेनेचे वागवत होते. ऑगस्ट २००३ मध्ये एका दूरचित्रवाणीवरील मुलाखतीदरम्यान
आपण 'जिहादी' असल्याचं क्रेकरने थेटपणे मान्य केलं. मात्र त्यावर
मुलाखतकाराने त्याला त्या अनुषंगाने कुठलेही प्रश्न विचारले नाहीत. क्रेकरने
लादेनचं केलेलं कौतुक ऑन रेकॉर्ड असूनही मुलाखतकाराने त्यावरूनही त्याला अडचणीत
आणण्याचे प्रश्न न विचारण्याचं धोरण स्वीकारलं. अतिरेक्यांना मुक्तपणे संचार करू
देण्याच्या नॉर्वेच्या अतिसहिष्णू कारभाराला क्रेकर अक्षरशः उघडपणे हसत होता.
युरोपीय
न्यायव्यवस्था देखील गुन्हेगारांप्रति (अनावश्यक अशी) अतिसहिष्णुता दाखवणारीआहे.
नेदरलँड्सने अटक केल्याबद्दल डच न्यायालयाने त्याला ४९७० युरोजची नुकसान भरपाई
म्हणून देण्याचे आदेश दिले. ही घटना ऑगस्ट २००३ मधली. मात्र एप्रिल २००४ मध्ये
वरच्या न्यायालयाने ही भरपाई वाढवून ४५,००० युरोज
केली. २००४ च्या मध्यावर क्रेकरच्या वकिलाने घोषणा केली की क्रेकरविरुद्ध
द्वेषपूर्ण रीतीने खटला चालवल्याबद्दल नॉर्विजन सरकारविरुद्ध तो फिर्याद दाखल
करणार असून त्यासाठी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट असलेले कॉलिन पॉवेल यांना
साक्षीदार म्हणून बोलावण्याचा त्याचा मानस असल्याचेही त्याने जाहीर केले.
अंततः
अमेरिकेच्या आणि नॉर्वेच्या प्रोग्रेस पार्टीच्या रेट्यापायी आणि क्रेकरचं खरं रूप
नॉर्विजन नागरिकांसमोर यायला लागल्याने काही खादारांनी क्रेकरला तुरुंगात
टाकण्याचे किंवा देशाबाहेर घालवून देण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. पण
त्यांच्या त्या प्रयत्नांवरही नोकरशाहीतील अधिकाऱ्यांनी, क्रेकरविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत, पाणी ओतले.
जून २००४ मध्ये
नॉर्वेच्या सरकारी वकिलांनी क्रेकरविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे कारण
देऊन त्याच्याविरुद्ध चालू असलेल्या सगळ्या खटल्यांमधून त्याची निर्दोष मुक्तता
करत असल्याचे जाहीर केले. दरम्यान क्रेकरने आपलं आत्मचरित्र प्रकाशित करण्याचा डाव
रचला. सर्व खटल्यांमधून निर्दोष मुक्तता झाल्याने क्रेकर आता 'इस्लामी कुर्दिश कार्यकर्ता' हे बिरुद
मिरवायला लागला होता. अनेक वृत्तपत्रांनी त्याच्या आत्मचरित्राचं तोंड फाटेस्तोवर
कौतुक केलं. त्याला good-natured
Teddy Bear, Uncle Mullah अशी विशेषणं बहाल करण्यात आली. "नॉर्वे, नेदरलँड्स आणि अमेरिकेचे सरकार आणि मीडियाने ज्यांना मनुष्य
वागणूक दिली अशा सर्वांचं प्रतिनिधित्व मुल्ला क्रेकर करतो आहे" असा
स्तुतीवर्षावही त्याच्यावर करण्यात आला. त्याच्या आत्मचरित्राला वाचकांकडून विशेष
प्रतिसाद मिळाला नसला तरी सार्वजनिक जीवनात लोक त्याच्याकडे कौतुकाने आणि आदराने
बघायला लागले. SOS Racism आणि The Anti-Racism Center सपोर्ट ग्रुप्स कडून त्याला
वाढता पाठींबा मिळायला लागला.
२००३ च्या
सुरुवातीला काढण्यात आलेल्या इराकयुद्धविरोधी मोर्चांमध्ये सहभागी झाल्यानंतर
क्रेकरची लोकप्रियता शिगेला पोचली होती. त्याच्या जाहीर सभांना अलोट गर्दी होत
असे. त्याच्याशी हात मिळवायला, बोलायला, त्याला भेटायला लोक गर्दी करत असत. त्यात नॉर्वेचे स्थानिक
आणि बाहेरचे नागरिक अशा दोघांचाही समावेश असे.
--Bruce Bawer
Book : While Europe
Slept: How Radical Islam is Destroying the West from Within