Thursday, May 21, 2020

वाकडं तोंड (डीडीएलजे-३)

आणि अखेरीस तिसरा किस्सा करून तीन सामन्यांची मालिका सुफळ संपूर्ण केली साहेबांनी. 

करवा चौथच्या रात्री गच्चीवर यायला शाहरुखला उशीर होतो तो प्रसंग चालू होता. राजला यायला उशीर झाला म्हणून सिमरन रागावून तोंड वाकडं करते. त्या प्रसंगाचं (क्रॉस) कनेक्शन आमच्या वीराने थेट मायमराठीतल्या शीरेलशी जोडलं!!

"बाबा, हे दोघे म्हणजे अण्णा नाईक आणि शेवंता वाटतायत."

बाबा बेशुद्धीच्या सीमेवर असताना वीर त्यांच्या पृथक्करणाचं ससंदर्भ स्पष्टीकरण पुरवते झाले "कारण की जेव्हा अण्णा येतात तेव्हा शेवंताही त्यांच्याकडे बघून असंच वाकडं तोंड करून रागवत असते." 🤦‍♂🤦‍♂🤦‍♂🤦‍♂🤦‍♂

1 comment:

२०२५ ची वाचनपूर्ती

२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...