Monday, February 1, 2010

ब्याद साली !!


चला.. गाडीने माणसं उडवणाऱ्या त्या हरामखोर संजीव नंदा, सलमान खान (तो तर माणसं, हरणं असं सगळंच मारतो) आणि अशा कित्येक  माजोरड्या श्रीमंतांच्या माळेतला मेरुमणी म्हणून नुरिया हवेलीवालाचं नाव ओवलं गेलं तर. दोघांना उडवलं बेशरम बेवडीने.. त्यातला एक पोलीस शिपाई आणि दुसरा सामान्य नागरिक. बयेने पार्टीतून निघताना दारू ढोसली होती, गाडी चालवताना बीअरचा एक कॅन ढोसून झाला. गाडीत मागच्या सीटवर ४ कॅन्स सापडले म्हणे. तिने गुन्हा कबुल केलाय पण त्यात पण तिची दोन व्हर्जन्स वाचनात आली. एकात म्हणे पोलीस चेकिंग चालू असलेलं बघून ती घाबरली (ढोसली असल्याने) आणि ब्रेकच्या ऐवजी एक्सलरेटर दाबला गेला तर दुसऱ्यात म्हणते की गाडी चालवत असताना बीअर पिण्यासाठी मान वर केली आणि तेवढ्यात गाडीवरचा ताबा सुटला. कुठलाही ग्राह्य धरलं तरी ती दोषी आहे हे नक्की. पण तिचा हलकट बाप म्हणतोय की तिने दारू प्यायालीच नव्हती. गाडीचा टायर फुटून अपघात झालाय. 

कधी नव्हे ते आपल्या हुशार पोलिसांनी गाडीची तपासणी केली. तसंच होंडा कंपनीकडून पण तिची तपासणी करवून घेतली. त्या अहवालानुसार टायर आणि इतर सगळे पार्टस ठीक आहेत. म्हणजे अपघात झाला तो गाडीतल्या दोषाने नव्हे तर गाडी चालवणाऱ्याच्या चुकीमुळे. आता पुढे काय? सलमानच्या वेळी पोलिसांनी ९३६ (किंवा फार तर १५-२० रुपडे इकडे तिकडे असेल) रुपये घेऊन सोडून दिलं त्याला. हिला कितीत सोडतायत देव जाणे. सलमानच्या बॉलीवूड इमेजला दबून म्हणे त्याला स्वस्तात सोडून दिलं होतं. पण हवेलीवाला चांगली मालदार पार्टी दिसत्ये आणि इथे काय तसं बॉलीवूड इमेज किंवा तत्सम लोकप्रियता वगैरे भानगड नाहीये. त्यामुळे थोडं जास्त कमिशन घेऊन सोडतील. म्हणजे १५-२० हजार. पण सोडणार एवढं नक्की.

त्या संजीव नंदाला कशी काय शिक्षा झाली देव जाणे. मला वाटतं देशभरातल्या तमाम षंढ न्यायालयं आणि नपुंसक न्यायाधीशांमधला तो एकमेव अपवाद असावा. खोटं नाही सांगत. कुठलाही खटला बघा ना.. कोणीही कितीही माणसं कितीही क्रूरपणे मारोत किंवा कितीही करोड रुपयांचा गफला करोत, शिक्षा काय असते ३ वर्षं कारावास, १५०० रुपये दंड आणि दंड न भरू शकल्यास अजून ६ महिने कारावास. एकापेक्षा जास्त गुन्ह्यात पकडला गेला तर दोन गुन्ह्यांच्या अनुक्रमे ३ वर्षं आणि अडीच वर्षं अशा वेगवेगळया शिक्षा होतात पण त्या दोन्ही एकत्र भोगायच्या असतात. ५ कोटी लुटो नाहीतर ५०० कोटी लुटो शिक्षा ३ हजार, ५ हजार किंवा फार फार तर ७०००. १०००० वगैरे म्हणजे तर डोक्यावरून पाणी. अरे ५ कोटी लुटलेल्या माणसाला ५ हजाराची शिक्षा म्हणजे शिक्षा आहे की न्यायाची भिक्षा? अरे काय मुर्खपणा आहे. कुठल्या जगात वावरतात हे न्यायाधीश लोक? मला कळायला लागल्यापासून कितीही भयानक गुन्हेगार असोत (काही अपवाद वगळता) त्यांना कधीही फाशीची शिक्षा दिलेलं बघितलेलं नाही. खालच्या कोर्टाने जर ठोठावलीच फाशीची शिक्षा तर उच्च न्यायालायातला एखादा भित्रा न्यायाधीश ती कमी करतो... चुकून माकून तो असेल जर थोडा कडक आणि त्याने शिक्षा कायम ठेवली तर काहीही झालं तरी सर्वोच्च न्यायालायाचा महान माणूस ती कमी करतोच. एक अफझल गुरुचा अपवाद वगळला (अर्थात तिथे केंद्र सरकारचा नाकर्तेपणा आणि बेशरमपण आड आला) आणि कोलकात्याचा धनंजय चटर्जी वगळला तर सांगा ना कोणाला झालीये फाशीची शिक्षा. (शिक्षा का देतात? ते गुन्हे करणाऱ्यांच्या मनात कायद्याची जरब बसावी आणि त्यांनी आणि इतर कोणीही पुन्हा तसे गुन्हे करण्यापुर्वी १००० वेळा विचार करावा म्हणून ना? पण असल्या दीड-दोन हजार आणि २ वर्षांच्या शिक्षांनी कोणाला कसली जरब बसणार आहे?). २००६ साली त्या देवस्थळी मायलेकींना डॉ दीपक महाजनांच्या निर्घृण खुनाबद्दल झालेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्त्रिया म्हणून कमी केली. अरे पण खून करताना पण त्या स्त्रियाच होत्या. आणि तरीही त्यांनी खून केला मग तोच स्त्रीपण फाशीची शिक्षा देण्याच्या आड कसा येऊ शकतो? २००६ च्या भैय्यालाल भोतमांगे प्रकरणात जनावरांप्रमाणे वागून स्त्रियांवर अत्याचार करून त्यांचे खून करणाऱ्या आरोपींना प्रबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडलं जातं. अरे न्याय आहे कि मस्करी? न्यायाधीश आहे की ठोकळा? 

मला माहित्ये लेख जरा जास्तच शिवराळ, उद्धट होतोय. नायायालय, न्यायप्रणालीचा अपमान होतोय. पण त्याबद्दल मी माफी बिफी काही मागणार नाहीये. खड्ड्यात जा. च्यायला आरोपींना योग्य शिक्षा देणे, आणि त्यामुळे कायद्याची जरब गुन्हेगारांच्या मनात निर्माण करून त्यांना गुन्हे करण्यापासून प्रवृत्त करणे हे तुमचं काम. ते तुम्ही धड करत नाही आणि कोणी काही बोललं की लगेच न्यायालयाचा अपमान होतो. अरे असा एवढ्या तेवढ्यावरून हगल्या-मुतल्या तुमचा अपमान होतो तर लोकांना तुमचा अपमान करण्यासारखी विधानं करायला भाग पडावं अशी वेळ आणता कशाला? आणि त्यातून माफी मागेनही पण सिद्ध करून दाखवा की मी खोटं बोलतोय. म्हणून मी बोलणार आज. मला हवं ते आणि हवं तसं. सुशिक्षित आणि पांढरपेशा असल्याने दडपून जाऊन, भाषेचा लहेजा सांभाळून, कोणाला काही लागणार नाही, कोणाचा काही अपमान होणार नाही असं हळू, मृदू, सौम्य भाषेत बोलून निष्क्रीय, नाकर्ते, बेशरम अशा टिपिकल व्हाईटकॉलर शिव्या नाही देणार मी आज. षंढला षंढच म्हणणार, नपुंसकला नपुंसकच म्हणणार. होऊदे कोणाचा अपमान होतोय तो. त्या सगळ्या अतिरेक्यांच्या केसेस लढवणाऱ्या वकिलांच्या, त्यांच्या शिक्षा कमी करायला भाग पाडणा-या सो कॉल्ड मानवाधिकार संघटना आणि त्यांचे सगळे फालतू कार्यकर्ते, सगळे बेशरम, कुत्तरडे राज्यकर्ते, पोलीस, न्यायाशीश यांच्या सगळ्यांच्या आयचा घो च्यायला. आणि आयचा घो म्हणजे महेश मांजरेकरचा दिलगिरीवाला नव्हे. खरोखरचा. सणसणीत, दणदणीत शिवीवाला घो. देतो मी तुम्हाला सगळ्यांना शिवी. थुंकतो मी तुमच्यावर. कुठच्या ब्रिगेडस आणि महासंघ आहेत त्यांनी ऐका रे. तुम्हा सगळ्यांच्या आयचा घो.

अरे उघडा रे डोळे. इथे जळतंय. तळमळतोय रे आम्ही इथे. भरडले जातोय. तो नुरिया हवेलीवालाने खून केलेला (हो खूनच. तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवला गेला पाहिजे खरं म्हणजे) सामान्य माणूस म्हटला ना मगाशी. अफझल माकनीजा त्याचं नाव. ३५ वर्षांचा तरुण रे बिचारा.. पोलीस चेकिंगसाठी बाईक थांबवली चेक पोस्ट वर आणि काही क्षणात त्याचं रुपांतर निर्जीव प्रेतात केलं त्या क्रूर बाईने. ऑन द स्पॉट गेला तो. घरी बायको आणि ४ वर्षांची मुलगी आहे. काय करणार त्या? म्हणून म्हणतो जळतंय. कधीचं जळतंय आत मध्ये. ९३ पासूनच. तेव्हाचे बॉम्बस्फोट, नंतर ट्रेन, संसद, अक्षरधाम, बोंब स्फोटांच्या मालिका आणि ताजं २६/११. दर वेळी तीच कथा. मुंबई,दिल्ली,हैदराबाद,बंगलोर,अहमदाबाद इ इ ठिकाणच्या नागरिकांच्या स्पिरीटचं कौतुक करणारे आणि त्या त्या घटनांपासून काहीही बोध न घेता आपला खादाडीचा उद्योग बिनदिक्कतपणे चालू ठेवणारे नाकर्ते राज्यकर्ते. रोज सकाळी ऑफिसला जाताना ग्राउंड झीरोकडे बघताना एकच विचार येतो मनात. कितीही मुर्ख आणि हट्टी असूदे तो बुश पण त्याने अशी काही जरब बसवली अतिरेक्यांच्या मनात, संरक्षण व्यवस्था अशी काही मजबूत केली की २००१ नंतर कित्येक प्रयत्नांनंतरही कोणालाही अमेरिकेचं काहीही वाकडं करता आलेलं नाही. जाउदे. टेररिझम हा विषयच नव्हता. थोडा भरकटलो. अर्थात तो स्वतंत्र लेखाचा किंबहुना प्रबंधाचा विषय आहे.

पुन्हा वळू आपल्या लोकल टेररिझम कडे. हे नंदा, साला खान, ती बेवडी हवेलीवाला हे सगळे लोकल टेररीस्टच. त्यांना धर्माचा माज आणि यांना म्हणजे या लोकलवाल्यांना पैशाचा माज. आणि तोही का तर त्याला खतपाणी घातलं जातं म्हणून. सिग्नल तोडला ५० रुपये द्या चायपानी. दारू पिऊन चालवताय गाडी द्या ५०० रुपये. दारू पिऊन गाडी चालवून माणसं पण मारलीत? बरं ठीके. दोन हजारात मिटवू सगळं  हे असं सगळं चाललंय आणि चालतंय म्हणून यांची पिलावळ फोफावतेय. 

- जर पहिल्या वेळीच त्या नंदाला किंवा नंदाच्या आधी ज्या ज्या कोणी अशी माणसं उडवली आहेत त्यांना १ कोटी रुपये दंड, ७५ वर्षं सक्तमजुरी आणि मेलेल्या प्रत्येक माणसाच्या कुटुंबाला ५-५ कोटी रुपये द्यायचे अशी गंभीर शिक्षा दिली असती तर त्या हवेलीने दारू पिण्यापूर्वी १ कोटी वेळा विचार नसता केला? 

- जर पहिल्या बलात्का-यालाच "पुरुष" नाटकात दाखवली तशी भयंकर शिक्षा दिली असती तर आपल्या मुलीच्या वयाच्या रुचिकाकडे वखवखलेल्या नजरेने पाहण्यापूर्वी एस पी राठोडने असंख्य वेळा विचार केला नसता ? 

- जर पहिली अफरातफर करणाऱ्या उद्योगपती, राजकीय नेत्याला जर अब्जावधी रुपयांचा दंड आणि १०० वर्षं कोठडी अशी शिक्षा दिली असती तर एका तरी नेत्याची छाती झाली असती का आर्थिक भानगडी करून स्वीस बँकेत पैसे लपवण्याची?

- जर पहिला खून करणाऱ्यालाच ताबडतोब फाशीची शिक्षा झाली असती तर कोणी विचार केला असता खुनाचा?

- जर पहिला हात पाय तोडणा-याला त्याचाही हात-पाय तोडण्याची शिक्षां झाली असती तर कोणी मारहाणीच्या सुपाऱ्या घेतल्या असत्या?

मला माहित्ये हे इतकं सोप्पं नाहीये. किंवा मी capital punishment (मला योग्य मराठी शब्द माहित नाहीये) चा पुरस्कर्ता नाहीये. कारण capital punishment वरून जगभर मतमतांतरं आहेत. आपण तालिबानी मार्गाने जावं असंही मी सुचवत नाहीये. पण थोड्या जरब बसवणाऱ्या शिक्षा म्हणजे तालिबानीकरण नव्हे. आणि तालिबानी हे खऱ्या गुन्हेगारांना नव्हे तर त्यांच्या शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार ठरणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा देतात त्याही अति भयानक. पण इथे मी म्हणतोय ते आपल्या राज्य घटनेतील "गुन्हा" या व्याख्येनुसार गुन्हेगार ठरणा-यांविषयी. उगाच कोणविषयीही नव्हे किंवा अर्थातच दुष्काळ, पूर, गरीबी अशा परिस्थितीने झालेल्या गुन्हेगारांविषयीही नव्हे. खान, नंदा, संजय दत्त, हवेली हे परिस्थितीने झालेले गुन्हेगार नव्हेत हे पटतंय ना? ते पैशाच्या माजाने झालेले गुन्हेगार आहेत. आणि त्यांना ठेचायलाच हवं. ती श्रीमंतीच्या माजाची नांगी चेचायलाच हवी. 

सगळे वकील, न्यायाधीश आणि त्यांची सगळी चिल्लीपिल्ली आता रडतील की हे होणार कसं. या अशा भयंकर शिक्षा देणार कशा? त्यासाठी न्यायप्रणालीत तरतूदच नाही. अगदी भयंकरातल्या भयंकर किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ गुन्ह्यालाच फाशी होऊ शकते असे न्यायव्यवस्था सांगते. पण मूर्खांनो वर दिलेल्या घटनांमधली कुठली घटना भयंकरातली भयंकर नाही? न्यायासनावर बसून कुठलीही खून, चोरी, बलात्कार, हल्ले, दंगली, मारझोड ही सामान्यच वाटते कारण त्यात तुम्ही स्वत: किंवा तुमचे कुटुंबिय, नातेवाईक, सखेसोबती हे त्या गुन्ह्यांचे पिडीत नसता (receiving end ला नसता). पण एकदा त्यांच्या जागी स्वत:ला कल्पून बघा. मग बघा कसे सगळे गुन्हे भयंकर वाटायला लागतात ते. आणि आधी कधी अशा भयानक शिक्षा दिल्या गेल्या नाहीत म्हणजे काही त्या कधीच द्यायच्या नाही का? प्रत्येक गोष्ट कधीतरी पहिल्यांदाच घडते. पण म्हणून बदलायचंच नाही? अर्थात प्रत्येक गुन्ह्याला फाशीची शिक्षा असं म्हणायला हवेली किंवा संजय दत्त एवढं काळीज मेलेलं नाही माझं. इतर ठिकाणी शिक्षा आर्थिक स्वरुपात भयंकर केली जाऊ शकते. किंवा तुरुंगवासात वाढ केली जाऊ शकते. बदलायची इच्छा असेल तर हजारो मार्ग आहेत. 

माझ्या मते इतिहासातली २ सर्वात मुर्ख विधानं कुठली तर ती म्हणजे 

"An eye for an eye makes the whole world blind"

"शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला सजा होता कामा नये"

पुन्हा दोन राष्ट्रपुरुषांचा अपमान केला मी. पण आज इलाज नाही. सांगितलं ना ओकायचा दिवस आहे आज. आज येणार सगळं भडाभडा बाहेर. असो तर या दोन वाक्यांत अडकलोय आपण. नेहमी इथेच येऊन अडकतो कुठलाही कठोर निर्णय घ्यायची वेळ आली की. 

यातल्या पहिल्या वाक्याला खूप छान उत्तर दिलंय माझ्या एका मित्राने. I'd rather prefer going blind than going dead. बोला आहे काही उत्तर? लाजवाब ना? अहो जिथे जगण्याचे वांधे आहेत तिथे आंधळं होऊन जगायला मिळतंय हे काय थोडं आहे कि सगळ्यांनीच कुत्र्याच्या मौतीने मरायचं?? थोडक्यात माझा डोळा फोडायला येणा-याला मी नेभाळटासारखं सोडणार नाही. जीव नाही घेतला तरी बोटं तरी कापेनच.

आणि दुसऱ्या वाक्याचा आधार घेऊन जर सगळ्या गुन्हेगारांना संशयाचे फायदे देऊन आपण सोडून द्यायला लागलो ना तर मग समाजात निरपराधी औषधालाच काय पण या वरच्या वाक्यात वापरायलाही शिल्लक राहणार नाहीत. दरवेळी निर्दोष सुटणा-या त्या शंभर अपराध्यांच्या अवलादी एकूण एक निरपराध्यांच्या नरड्यांचे घोट घेतील. त्यापेक्षा मी म्हणतो कि एक निरपराध मरून जर शंभर खरोखरचे अपराधी मरणार असतील तर अनेक निरपराधी (माझ्या सकट) आनंदाने तयार होतील हौतात्म्य पत्करायला.

जाउदे सालं. हे असलं काही होणार नाहीये. उद्याच्या पेपरात बातमी असेल की टायर फुटून गाडीवरचा ताबा सुटल्याने अपघात झाला त्यामुळे हवेलीला ५०० रुपयांचा दंड झाला आणि ती सुटली. परवा पुन्हा कोणाला तरी उडवेल ती. आणि पुन्हा सुटेलही. हे असंच होणार आणि असंच होत राहणार. सतत, नेहमी, वारंवार. 

आणि ज्यांच्या आतमध्ये वगैरे जळतंय ना त्यांनी इनो घ्या आणि चांगलं गार पाणी प्या ग्लासभर. फुक्कट नाटकं नको. ब्याद साली !!

36 comments:

  1. :)


    wah !

    ekadam mana tun lihale aahes mitra...

    kharokhar laachar paristhiti aahe sagali kade...

    ReplyDelete
  2. समजतीये तुझी तगमग.....सगळ्यांचीच होतेय...चिडचिडाट करायचा नुसता.....पण पुढे काय हेरंब!!!!
    का नाही आपण एक होत सगळे?????
    http://sahajach.wordpress.com/2009/09/07/good-mourning/
    माझीही चिडचिड होते अशीच...आणी मग ती वाढते कारण आपण काहिच करत नाही रे........

    ReplyDelete
  3. बेकारच एकदम सडेतोड
    ठिकऱ्या करून टाकल्या सगळ्यांच्या

    ह्या असल्या औलादिना खरच पैशाचा लय मज आलेला असतो ह्यांना जबर शिक्ष्या झाल्याशिवाय असल्या घटनांवर जरब नाही बसणार भावा

    ReplyDelete
  4. सही.. त्या बयेला तर चांगली शिक्षा व्हायला हवी. पोलिस मारल्या गेले -नाहीतर पुरु राजकुमार , नंदा आणि सलमान खान प्रमाणे ही सुटण्याचे चान्सेस कमी आहेत.

    ReplyDelete
  5. खरे आहे रे.. पण या सिस्टीमला बदलनार नाही कोणी.

    ReplyDelete
  6. हेरंभ
    लेख वाचला. खूप तळमळीनं लिहिला आहे. आपली सामाजिक, राजकीय, न्यायालयीन सर्व यंत्रणाच अशी झाली आहे की आपण फक्त आपल्या मनातील तळमळ अशी व्यक्त करु शकतो. अशी मुजोर, हृदयशून्य आणि नालायक माणसे वठणीवर येतील आणि आपल्या येथील यंत्रणा त्यांना पाठीशी घालणार नाहीत तो सुदिन.
    लेख आवडला.
    शेखर

    ReplyDelete
  7. व. पु. काळयांचं एक पुस्तक आहे "आपण सारे अर्जुन". त्यात वपुनी म्हटले आहे "पेपरात रोज भ्रष्टाचार, खून दरोडे आणि इतर मनस्ताप देणार्‍या बातम्या वाचून प्रत्येक घरात, प्रत्येक मनात एक ठिणगी पडते आणि विझून जाते. ज्या दिवशी ह्या ठिणग्या घरात न विझता बाहेर येतील तेंव्हा सगळ्या वाईट प्रवृती, राजकारणी जाळूनच पुन्हा घरात जातील." पण दुर्दैवाने ह्या ठिणग्या कधीच एकत्र आल्या नाहीत आणि येत ही नाहीत. आपणच 'रात गयी बात गयी' म्हणतो आणि पुढे होतो. सल्लू-संजयला शिव्या घालणारे पण आपण आणि त्यांचे चित्रपट हाऊस फुल्ल करणारे पण आपणच.

    तू सगळी भडास कागदावर उतरवलीस ते बरं केलंस. थोडं तरी हलकं वाटलं असेल नां?

    ReplyDelete
  8. बरोबर आहे ग तन्वी, नुसती चिडचिड करून काहीच होणार नाहीये. काहीतरी ठोस केलं पाहिजे. पण जोवर तसं काही करत नाही आपण तोवर गप्पही नाही बसू शकत. रटारटा उकळत असतं आतमध्ये आणि मग ते बाहेर पडतं असं.

    ReplyDelete
  9. बरोबर रे विक्रम. पण आपल्याला अपेक्षित असलेली ही जबर शिक्षा कधीच प्रत्यक्षात येत नाही. आणि त्यांच्या दृष्टीने जबर म्हणजे २ हजार रुपडे आणि ३ महिने कैद. काय चाटायाच्या या असल्या शिक्षा ?

    ReplyDelete
  10. काका, होईल तिला शिक्षा? मला नाही वाटतं.. आणि त्यातून झाली तर उत्तमच. पण निदान ती शिक्षा म्हणायच्या लायकीची तरी असुदेत. नाहीतर "अच्छा तू १० खून केलेस का? बरं मग काढ १० उठाबशा आणि तुला सव्वा पाच रुपडे दंड" हे असलं काहीतरी शिक्षेचा अपमान करणारं नको.

    ReplyDelete
  11. खरंय रे निओ.. आणि त्यामुळेच जाम जाम संताप होतो.

    ReplyDelete
  12. धन्यवाद शेखरजी.. सामान्य माणसाचा या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास एवढा उडाला आहे ना की असा काही स्वागतार्ह बदल कधीच घडू शकणार नाही किंबहुना काहीच बदलणार नाही आणि जे बदलेल ते अजून वाईटाच्या दिशेनं नेणारंच असेल असंच वाटतंय प्रत्येकाला.. किमान मला तरी !!

    ReplyDelete
  13. सिद्धार्थ, एकदम उत्कृष्ठ उदाहरण दिलंस "आपण सारे अर्जुन" चं. वाचलंय मी ते.
    आणि त्या सलमान संजयच्या हाउसफुल चं बरोबर बोललास. आणि एखादा कोणी बहिष्कार वगैरे घालायचं नुसतं बोलला जरी तरी सगळेजण लगेच चवताळून एकत्र होतात आणि म्हणतात म्हणे "राजकारण आणि कलेची गल्लत नको" .. अरे कसली गल्लत गधड्यांनो. खुनी आहेत ते. माणसं मारलीयेत त्यांनी.
    हलकं म्हणशील तर लिहून झाल्यावर वाटलं.. तात्पुरतं.. पण असं तात्पुरतं नकोय रे :(

    ReplyDelete
  14. तुझ्या-माझ्यासारख्या प्रत्येक सुजाण माणसाच्या मनातले आर्त मांडलेस बघ.. हां आपल्या सर्वांच्यावतीने निषेध.. खरच धिक्कार आहे ह्या सर्वांचा... 'काय..दयाचं.. बोला' मध्ये शेवटला जसा सीन आहे तितक्यात पोटतिडकीने मांडलेस तू हे सर्व.

    कधी-कधी असे वाटते की कायदयात असते ना तर मी मुंदकी छाटली असती ह्या अश्या लोकांची... आई जगदंबेची शप्पथ... हातपाय पोत्यात बांधून दया टाकून समुद्रात नाहीतर कडयावरुन फेकून दया खाली... !!!

    हे कुठे तरी थांबायला हवे असे वाटतय ... पण कधी ... कसे ???

    ReplyDelete
  15. हो रे रोहन.. त्या हात पाय छाटणे, कडेलोट, हत्तीच्या पायाखाली तुडवणे वगैरे राजांच्या वेळच्या शिक्षा पुन्हा सुरु झाल्या पाहिजेत असं वाटतं कधी कधी.

    आणि "हे सगळं" थांबणं कठीण आहे रे. कारण "हे सगळं चालू राहावं" अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या "हे सगळं थांबावं" असं वाटणा-यांपेक्षा खूप खूप जास्त आहे. आणि नुसती संख्याच नव्हे तर त्यांचा पैसा, उपद्रवमूल्य, माज, सत्ता सगळं सगळंच... !!

    ReplyDelete
  16. shiksha vhaayalaa havee, aani velevar ... 20 varshanantar sagale hi case visarale ki chotasa dand bharoon shtaayalaa nako ti :(

    ReplyDelete
  17. हो ग गौरी. शिक्षा तर व्हायलाच हवी. आणि अगदी वेळेवर पण. पण साधी सुधी नको अगदी भयंकर पाहिजे. इतकी भयंकर की दारू किंवा गाडी म्हटलं की तिच्या तोंडाला फेस आला पाहिजे.

    जाउदे. खूप झालं स्वप्न रंजन !!

    ReplyDelete
  18. हो रे राज. ती बातमी वाचून झाल्यावर त्या अफझल माकनीजाच्या ४ वर्षांच्या पोरीचा चेहरा हलेचना डोळ्यापुढून.

    ReplyDelete
  19. आपण केवळ वांझोटा संताप व्यक्त करु शकतो, अजुन काही नाही.

    ReplyDelete
  20. हो ना आनंद.. आणि नुसता वांझोटा संताप व्यक्त करणं पुरेसं नाहीये हे कळत असूनही आपण अजून काहीही करू शकत नाही या भावनेने तर अजूनच संताप होतो.

    ReplyDelete
  21. आपण केवळ वांझोटा संताप व्यक्त करु शकतो, अजुन काही नाही.(+1)

    ReplyDelete
  22. हो ग :-( पण त्याचा काहीच उपयोग नाहीये परिस्थिती बदलायला. अर्थात तेही कळतंय. तरीही आपण व्यक्त होत रहायचं. काहीच न करण्याच्या टोचणीपेक्षा तेवढंच जरा बरं.

    ReplyDelete
  23. मित्रा अगदी सडेतोड आणि वास्तववादी मत व्यक्त केलास, आता बघू किती देवाण-घेवाण होऊन मामला रफा-दफा करतात ते..लाज नाही ह्या साल्याना अजुन

    ReplyDelete
  24. खरंच सुहास. देवाण-घेवाण होऊन प्रकरण मिटवणार हे नक्की.. सगळेच दळभद्री. नावं तरी कोणाकोणाला ठेवणार !!

    ReplyDelete
  25. very expressive !!!!
    sagalyanchya manatal lihil aahes....
    Basic problem is our so called " system"...
    joparyant tyana "akala" yet nahi toparyant kahich hoi shakat nahi...

    ReplyDelete
  26. धन्यवाद श्वेता आणि ब्लॉगवर स्वागत.. हम्म्म्म.. प्रॉब्लेम तर आपल्याला सगळ्यांनाच कळतो आहे पण कितीही डोकं फोडून घ्यायचं म्हटलं तरी उपाय दिसत/सुचत नाही आणि जे दिसतात ते अशक्य किंवा अव्यवहार्य असतात. :(

    ReplyDelete
  27. काही ही होणार नाही हा गेल्या ४० वर्षातला माझा अनुभव आहे. आज मी जवळ जवल ६३ ला पोहोचतोय. हा निराशावाद नाही तर हे अनुभवाचे बोल आहेत.सर्वे गुणः कांचनं आश्रय़ंते।
    Savadhan's Blog

    ReplyDelete
  28. खूपच सात्विक संताप वाली पोस्ट आहे

    पण सर्व न्यायाधीशाना आसे एकाच कठड्यात नाही उभे करू शकत. हे कबूल आहे कि कायदे खूप जुने आणि ब्रिटीशकालीन आहेत आणि गुनेहगरावर जरब बसतील आसे खूप कमी कायदे आहेत. न्यायाधीशाचे काम फक्त युक्तिवाद इकून , पुरावे बघून , कायद्याचा अर्थ लावून निकाल देणे एवढेच आहे.( न्यायदेवतेचा पुतळा आठवून बघ) पैसे खाणारे judges आहेत, पण चंद्रशेखर धर्माधिकारी, चंद्रचूड सिंग, यांसारखेसुद्धा लोक आहेत. जे आपले काम निष्ठेने करतात. राहता राहिली कायद्याची गोष्ट ते तर बदलायलाच हवेत. खूपच कालबाह्य झाले आहेत.

    याची दुसरी बाजू म्हंजे आपली मुर्दाड झालेली मने..... जो संजय दत्त, जो सलमान खान, जो सैफ आली खान लोकांच्या , प्राण्याच्य जीवावर उठले होते त्यांनाच आपण डोक्य्वर घेऊन नाचत आहोत (Public has very short memory ). ही system पूर्णपणे चुकीची नाही तर समाज मने कलुषित झाली आहेत..................

    मृणाल

    ReplyDelete
  29. पुरुषोत्तमजी, निराशावाद नाही हे मान्य पण तरी काहीतरी बदल व्हायलाच हवा हो. नाहीतर आत्ता रस्त्यावर उडवतायत एक दिवस घरात घुसून मारायला कमी करणार नाहीत हे लोक.

    ReplyDelete
  30. चल मृणाल, क्षणभर हे मान्य करू की सगळे न्यायाधीश असे नाहीत. पण अशा चांगल्या नि:पक्षपाती असलेल्या १० न्यायाधीशांची तरी नावं आठवतात का? नक्कीच नाही.

    अरे आणि मी युक्तिवाद ऐकून शिक्षा देण्याच्या त्यांच्या पद्धतीबद्दलच तर बोलतो आहे. सगळे पुरावे, साक्षी ऐकून घेऊन हे लोक २००० रुपडे आणि १ वर्ष शिक्षा देतात. आणि मान्य आहे न्यायाधीश नाही बदलणार कायदे पण कमीत कमी ते जास्तीत जास्त भयानक शिक्षा देण्याचे पायंडे तरी पडू शकतात किंवा किमान सरकारकडे तशा शिफारशी तरी करू शकतात? जाउदे.. भयंकर चीड आहे माझ्या मनात या अशा सुस्त न्यायालयांबद्दल आणि त्या काळ्या डगलावाल्या अजगरांबद्दल. २०-२० वर्ष खटले चालू आहेत आणि हे घोडे ३-३ महिने उन्हाळी सुट्ट्या घेतात लेकाचे..
    आणि लोकांची मनं मुर्दाड झाली आहेत यात तर दुमतच नाही. पण ती अगदीच मेलेली नाहीत हे ज्या रीतीने जनतेने एक मुख्यमंत्री, एक राज्य गृहमंत्री आणि एक केंद्र गृहमंत्री यांचा बळी घेतला (सत्तेवरून पायउतार व्हायला भाग पाडलं) त्यावरून दिसतंच.

    ReplyDelete
  31. Apratim lekh......
    Kharech maharajanchya welachya shiksha punha amlaat aanayala havyat. Aruna Shanbaug prakaranatala doshi Shiksha bhogun sutala sudha...aani ti matr ajoon bhogtyey sagle. Kaay arth asha shikshana? Tichya sagalya aayushyachi raakh rangoli karanara manoos aaj mokat phirtoy aani ti na kelelya gunhynachi shiksha bhogtyey.
    ---------- sale....

    ReplyDelete
  32. आभार मैथिली. अग या असल्या फडतूस शिक्षांमुळेच तर गुन्हेगारांना कसलीही भीती वाटत नाहीये.. अरुणा शानभागची केस म्हणजे तर दुर्दैवाची परिसीमा म्हटली पाहिजे. त्या नराधमाला तर उकळत्या तेलात बुडवून, कातडी सोलून, एकेक बोट तोडत तोडत तडफडत मारलं पाहिजे.

    ReplyDelete
  33. Tuzya bhavananchya teevratebaddal aani asha lokanna shiksha vialach havi yabaddal kuthalech dumat nahi... pan he sagale aapan swataha hastindanti manoryat rahun bolato aani lihit asato yachi kalpana asavi. Sarkarchya kuthalyahi kayadyachi / nirnayachee mahiti avaghya 10 rupayaat mahitichya adhikaraantargat milavata yete aani tya madhyamatun anirbandha' sarkarvar sarvasamanya manasalahi nirbandha ghalata yetat he aaplyala changalach thauk asata pan tasa kahi karanyachi kuthalihi ichchha nasate he hi tevadhach khara.
    Tyamule system vagaire badalayala havi asa vichar karanare lakho pan tasa pratyaksha prayatna karanara ekhadach asa pratyakshaat disata.

    Vastavat kahi goshtincha moolatun vichar viala hava. PIL / sue karana - asa vichar samajache tathakathit swayabhoo budhivadi neta asanara madhyamvarga karato ka?
    Daru pinyala partyanmadhye aani baherahi social status milavoon denare aapanach na?
    Aani bahutanshvelela kayada chukavanyacha mag to income tax aso / railway tickit aso ki traffic hawaldar aso ya sagalyasathi prayatna karanarehi aapanach. Aaplya companyamadhye / companyansathi khoti bile dakhavaun adhik paise milavnarehi aapanach.
    Tya baine je kela te chukichahch yabaddal kuthalihi shanka nahi aani tila yabaddal kathortam shikshahi vialach havi pan tyach barobar hehi lakshat ghyayala have ki ek bai daru chya nashet kahi jananna chiradate yabaddal sagalya systemla kasa kay doshi dharata yeil?
    Jithe fashichi shiksha sagalyaat jasta lokanna denyat yete ( aani ti executehi karanyaat yete) asha ameriketahi asha ghatana ghadatatach na! Mag kewal execution aani shiksha yanchya aadharavar yavar uttara kasa kay shodhanar? Fact is jithe samaj aahe tithe kantak asanarach...ho na! Aapan aadarsh samajasathi prayatna karayacha pan to tasa asava asa matra gruhit nahi dharu shakat.

    Bachchhanjichya oli aahet!
    Purane aadarshopar
    naya yug hasata hai
    Jo tha kabhi mahanga,
    mana jata, lagata
    kitna nakali kitna sasta hai!

    we have to check our values for which we are living!

    Vinod deshpande

    ReplyDelete
  34. मी कुठेही म्हटलं नाहीये की मी सिस्टमला दोष देऊन मोकळा होतोय. आणि १० रुपयाचे फॉर्म्स भरून अपघात कसे थांबतील हे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. Of course I respect, like Right to Information. am not denying it.
    संग ना असे किती फॉर्म्स भरून कसाबला किंवा अफझल गुरूला फाशी होईल? मी रास लावायला तयार आहे त्या फॉर्म्सची..
    मला वाटतं तू ब-याच मुद्द्यांची सरमिसळ करतो आहेस. हे पोस्ट म्हणजे ती चिरडण्याची बातमी वाचून आलेली प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया होती. बरं फास्ट track कोर्टस, कोर्टाला असणा-या ३-४ महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या, कमीत कमी कामाचे तास यावर तुझं काय म्हणणं आहे? आणि तू जे sue करण्याचं म्हणतोयस ना त्यात पण दंड किती असणार १५०० ?? कि २०००? ह? चल अफझल गुरु आणि कसाबच्या बाबतीत न्यायालयाची चूक नाही असं धरू क्षणभर. खरं तर आहेच. इतर वेळी उठसुठ न्यायालयाचा अपमान झाला म्हणून गळा काढणा-या न्यायाधीशांचे आवाज त्यांनी दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी जेव्हा सरकार करत नाही तेव्हा सरकारला खडसावण्याऐवजी का बसतात हे मला तरी ना उलगडलेलं कोडं आहे. मला सांग ना सलमान, पुरू राजकुमार, संजीव नंदा यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली ४० वर्ष सक्तमजुरी आणि १ कोटी रुपये शिक्षा झाली असती तर नुरियाच काय तिच्या १० पिढ्यांनी तरी डेरिंग केलं असतं का दारू पिऊन गाडी चालवायचं? पण त्यांना शिक्षा किती तर २ महिने ४ महिने. सलमान, सैफ ला चिंकारा बद्दल झाली असती १० वर्षाची शिक्षा तर त्या बाबाराव अत्रामची काय ताप होती हरणं मारण्याची? मला मान्य आहे जनतेची जवाबदारी आहे पण हल्ली कोणी काही बोललं की लगेच सगळं खापर जनतेवर फोडण्याची fashion आलीच आहे म्हणा.. तू ज्या अमेरिकेचं उदाहरण देतोस त्याच अमेरिकेत फसवाफसवी आणि विनयभंगाच्या/बलात्काराच्या, hit n run च्या शिक्षा काय आहेत माहित्ये तुला? कमीत कमी २०+ वर्ष.. मला सांग ना सध्याच्या शिक्षांमुळे काय आणि किती गुन्हे कमी झाले? उलट लोकांचा (निदान माझ्यासारख्या तरी) न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिकाधिक उडण्यासच मदत झाली. आणि त्याचा परिणाम म्हणजे जास्तीत जास्त (यात सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय लोकांचाही समावेश व्हायला लागलं आता ) लोकांनी कायदा हातात घ्यायला सुरुवात केली. त्या राठोडला झालेली शिक्षा योग्य आहे असं तर म्हणायचं नाही ना तुला? आणि त्या राठोड वरच उत्तम शर्मा नावाच्या सुशिक्षित तरुणाने चाकू हल्ला केला परवा.. वाचलास ना? हे कशाचं प्रतिक आहे? कशाचा परिपाक आहे हा? महाराष्ट्रात मागे एका गुंडाला गावातल्या बायकांनी दगडांनी चेचून मारलं होतं.. आठवतंय? का? त्यांना हौस होती खून करायची? भैय्यालाल भोतमांगे प्रकरणात पुरेसे पुरावे नाहीत म्हणून आंधळेपाने संशयाचा फायदा देऊन आरोपींना सोडून देणा-या न्यायालयाला षंढ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? किती बलात्कार कमी झाले अशा लोकांना सोडून किंवा कमी शिक्षा देऊन?? BTW, मी इन्कम tax चुकवणे, चुकीच्या पावत्या देऊन ऑफिसमध्ये जस्त पैसे कमावणे वगैरे योग्य आहे असं कुठेच म्हटलं नाहीये. उलट मीच त्याच्या किती विरुद्ध आहे हे निदान मी तरी तुला सांगायला नको. तुला आठवत असेलच.
    न्यायालय, न्यायाधीश, न्यायव्यवस्था आपली जवाबदारी अशी सहज झटकू शकत नाहीत या म्हणण्यावर मी ठाम आहे. उलट तेच गुन्हे वाढवायला मदत करतायत त्यांच्या निष्क्रीय धोरणांमुळे. आणि त्यांना दोषी धरताना प्रसंगी मला सिस्टमला दोषी धरावं लागलं तर मी धरणारच. जोपर्यंत मला कोणी मी कसा चूक आहे ते समजावून सांगत नाही तोपर्यंत.

    ReplyDelete
  35. खूपच छान लिहिलं आहे. माझंही रक्त उसळलं वाचून. बाकीच्या लेखांवर मी विस्ताराने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पण इथे लिहायला शब्दच सुचत नाहीयेत. आणि अति संताप झाल्याने डोळ्यांतून पाणी येतं. त्यामुळे यापुढे लिहिणं कठीण आहे...

    ReplyDelete
  36. आभार संकेत. तेव्हा ती बातमी वाचून डोकं नुसतं फिरून गेलं होतं. त्या आवेशात जे जे मनात होतं ते सगळं लिहीत गेलो.

    ReplyDelete

पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन

श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवी...