मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Wednesday, February 24, 2010
३३ कोटी + १
आज मला देव (इथे प्रोजेक्ट मॅनेजर, क्लायंट असलं काही दिसत असेल तर दोष तुमच्या नजरेचा आहे आणि सचिन दिसत असेल तर तुम्हीही आमच्यातलेच आहात. वेलकम टू द क्लब !!) प्रसन्न झाला आणि माझ्यापुढे प्रकट होऊन म्हणाला की "माग वत्सा, काय हवं ते माग" तर मी म्हणेन "देवा, खरंच आज काही नको. आजचा दिवस दाखवलास, भरून पावलो... सचिनच्या (तुझ्या) काळात, त्याच्या देशात, त्याच्या राज्यात, गावात, तो बोलणा-या भाषेत जन्माला घातलंस, त्याची संपूर्ण कारकीर्द, सगळ्या वादळी खेळ्या जवळून बघता आल्या आणि इतकंच नव्हे तर सचिनवर प्रेम करायची बुद्धी दिलीस (नाहीतर इथे त्याला स्वार्थी, क्षुद्र, सामान्य, gladiator ठरवणा-या कपाळकरंट्यांची संख्या काय कमी आहे?) अजून काय हवं? आणि आज तर सर्वोच्च बिंदू गाठलास !! भरून पावलो.."
या वयात, एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा, पाहिलं द्विशतक आणि तेही नाबाद करणा-या आणि साक्षात सुनील गावस्कर "मी याचे पाय धरीन" असं ज्याला म्हणतो त्या व्यक्तीला (निदान क्रिकेटमधला तरी) देव मानणं यात कोणाला अंधश्रद्धा वाटत असेल तर ती आमची अंधश्रद्धा नसून तुमचं (क्रिकेटात नव्हे तर एकूणच) अज्ञान आहे असं मी म्हणीन. उगाच नको तिथे नास्तिकपणा मिरवू नये माणसाने. जाउदेत उगाच भलता विषय नको आत्ता.
असो.. मी सचिनचं कौतुक वगैरे करण्यासाठी ही पोस्ट लिहीत नाहीये, (कोणाला आवडो वा नावडो) ते तर टीव्ही, पेपर वाले करतीलच भरपूर पण आत्ता जे भरून आल्यासारखं झालंय, 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असं जे वाटतंय ते पटकन उतरवावं म्हणून ही ट्वीटी पोस्ट!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन
श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवी...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
-
** भाग १ इथे वाचा आता उरलेल्या तीन वीरांविषयी बोलू. हे तीन वीर म्हणजे रॉस गेलर, चँडलर बिंग आणि जोई ट्रिबियानी.... रॉस गेलर (डेव्हिड श...
फक्त सचिन बस्स......!!!!!!
ReplyDeleteतो मांजरेकर बोका व परुळेकर पाल आता तरी गप्पा बसव म्हणाव....
खरच धन्य झालो आपण आज त्याची खेळी पाहून.....
मस्तच रे कलेक्शन
ReplyDeleteआवडलं
आजची खेळी ज्याने पहिली त्याला अजून दुसर काय हव रे
३३ कोटी + १ अगदी मान्य :)
सागर, आज तर त्यांना कोणाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही..
ReplyDeleteविक्रम, गुगलदादाने दिलं रे.. थोडं एडीट मारलं.. ३३ कोटी + १ आहे यात वादच नाही !!
ReplyDeleteparulekara................
ReplyDeleteaata tuxach gladiator zala re
aata lihit bas tya nilesh rane var
majhi boardachi apriksha chalu aahe
pan 11 mitrani phonevar dilelya updates match dakhavun gelya
hatsssssssssssssssssssssssssssssssssss
offfffff
३३ कोटी + १ vaah. Sheershak avadla !
ReplyDeleteराजा, विश्वचषक हवाय. तो चमत्कार दाखवेपर्यंत आम्ही नास्तिकच.
ReplyDeleteपण आजची फलंदाजी अफलातून होती हे नक्कीच. spotless perfection. Poetry in motion.
कॅन्टीन मध्ये पब्लिक बरोबर पाहिली. खूप दिवसानंतर मजा आली.
(actually 3 :). गेल्या टेस्ट नंतर पहिल्यांदा.)
विनायक, आता सगळे लपून बसणार रे. सगळ्यांची तोंड बंद केली याने.. तुला परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!!
ReplyDeleteसाधक, आणि ते शीर्षक ३३ कोटी% खरं आहे :-)
ReplyDeleteChanach . "Such" is the miracle !
ReplyDelete-Shantanu
http://maplechipaane.blogspot.com
अरे विश्वचषक पण मिळणारच पण समजा विश्वचषकातल्या प्रत्येक सामन्यात याने १००, १५०, २०० केल्या आणि बाकीच्यांनी बट्ट्याबोळ केला तर काय करणार? असो.
ReplyDeleteआजची इनिंग बेष्टेष्ट होती हे तर निर्विवादच
शंतनू, ब्लॉगवर स्वागत. नक्कीच चमत्कार. अवर्णनीय आणि अशक्य !!
ReplyDeleteकसलं सही डेडीकेशन आहे, क्रिकेटवर निर्व्याज प्रेम आहे त्याचे...
ReplyDelete३३ कोटी + १ सहीच!!
नडला तो तोडला ......
ReplyDeleteअरे तो साफ वेडा आहे रे क्रिकेटसाठी आणि आपल्याला पण वेडा करून टाकतो त्याच्या नादाने. आहेच तो ३३ कोटी + १ !!
ReplyDeleteस्वागत प्रीतेश.. आणि तोडला तो पण कसा आणि किती. उभा, आडवा, तिरपा.. पार सोलून काढून होत्याचं नव्हतं केलं !!
ReplyDeleteसचिनच्या खेळीपेक्षा पण जास्ती आवडलं मला, ३३ कोटी + १ :)
ReplyDeleteयाची देही याची डोळा बघता आलं यापेक्षा अजुन काय हवंय? देव माणुस!
-सौरभ
सचिन, सचिन आणि फक्त सचिन. हेरंब, खूप भावलं तुझं कलेक्शन आणि सचिनबद्दल काय बोलावे.... नुसते वेडेच होणे आपल्या हाती आहे तेव्हां तेवढेच करावे. अरे कोणीतरी तो एकदम वेडा ज्योतिषी काहीतरी बरळला होता ना गेल्या वर्षी... सचिनने त्याचा पुरता बॅंड वाजवला रे.आता पुन्हा म्हणून वाट्याला नाही जायचा.( स्वत:ला सेलिब्रेटी म्हणून घ्यायची फालतू हौसच फार यांना... म्हणे एप्रिल,२००९ मध्ये सचिन निवृत्ती घेणार आणि त्याआधी टोटल फ्लॉप होणार. )
ReplyDeleteजय हो....:)
ReplyDeleteसौरभ :D .. '३३ कोटी + १' हे सही आहेच.. पण सचिनच्या इनिंग पेक्षा जास्त नाही रे.. पण तुझ्या भा पो :-)
ReplyDeleteभाग्यश्री ताई, कलेक्शन साठी आभार गुगलदादाचे.. हो आठवतंय तो बेजान का फेजान दारूवाला तसलं काहीतरी बरळला होता मागे. तेव्हाच त्याची लायकी आणि परुळेकर सारखं 'बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ' टाईप atitude कळलं होतं. पण सचिन सगळ्यांना पुरून उरलाच आहे आणि वर श्रीकृष्णाने कालियामर्दन करावं तसं या सगळ्यांच्या छाताडावर नाचतोय सुद्धा.
ReplyDeleteअपर्णा, आता नुसतं 'जय हो' म्हणून थांबून चालणार नाही.. 'जयदेव जयदेव' म्हणणं सगळ्यात बेष्ट !!
ReplyDeleteजाता जाता कंसात मस्त खेचली की...खरंच.
ReplyDeleteआभार निखिल. कंस तर माझे एकदम फेव्हरिट आहेत. खेचायला, ठोकायला , लाथाडायला जाम बरे पडतात. सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्ह, पुल, हुक आणि पॅडल स्वीप सारखेच !!
ReplyDeleteबेस्ट...अप्रतिम..देव आहे रे हा क्रिकेटचा...
ReplyDeleteविक्रमांचा महामेरू | बहुत रनांसी आधारू |
अखंड खेळाचा निर्धारु | श्रीमंत सचिन ||१||
सचिनचे कैसे चालणे | सचिनचे कैसे खेळणे ||
सचिनचे प्रेरणा देणे | कैसी असे ||२||
रनपती तो जगती | करा किती उचापती |
डाळ न शिजे पुरती | कोणाचीही ||३||
सचिनचे आठवावे शॉट | पहावा BATTING चा थाट |
पळे BALL पटापट | ग्राउंड बाहेरी ||४||
स्वप्नी जे देखिले रात्री | ते ते तैसेची होतसे |
बदले CHANNEL मी जैसे | येथ आलो पहा कसा ||५||
सामना चालीला कैसा | शॉट अखंड चालती |
खेळला देव देवांचा | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||६||
आनेक BALL ते येती | मात्रा पै नच चालली |
सचिन कर्ता सचिन भोक्ता | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||७||
बुडाली आफ्रिका पापी(?!) | चेंडू संहार जाहला |
उदंड जाहल्या धावा | रमा रेकॉर्डसंगमे||८||
योर्करू तो जरी आला | सीमा ती पार केलीसे\
कळेना काय रे होते | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||९||
चौके चौके किती छक्के | गणना करवे नच |
ऑफ ऑन चहूलोकी | चेंडू तो भिरकाविला ||१०||
येकला लढला योद्धा | अन्ये गम्मत पाहती|
रनांचा डोंगरु झाला | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||११||
हे धरा अकरा श्लोकी | लाभली शोभली बरी|
दृढ bat निसंदेहो | सचिन तो सर्व काळीचा ||
. - निखिल बेल्लारीकर
हो देवच.. आणि तेही त्या ३३ कोटींच्या यादीत टॉपला..
ReplyDeleteनिखिलच्या ब्लॉगवर जाऊन पण मी कमेंटलो मगाशीच !!
शब्दातित आहे.. निःशःब्द!!अभिनंदन!!!
ReplyDeleteयावर पुर्वी एक दुसरी बाजू लिहिली होती :) इथे आहे..
http://tinyurl.com/yav66k3
खरंच अवर्णनीय आहे. महान माणूस(!!) आहे तो..
ReplyDeleteहो तुमचा लेख वाचलाय मी पूर्वीच. मस्त लिहिला आहेत.. पण तेव्हा मी ब्लॉग-सॅव्ही नव्हतो (आताच्या सारखा??) म्हणून कमेंटलो नव्हतो.. :)
३३ कोटी+ १. . . अगदी बरोबर!!! मस्त लिहलय रे!!! शालजोडीतला तर १ नंबर मारलाय रे!!!!
ReplyDeleteहो ना मनमौजी.. आहेच तो ३३ कोटी+ १ आणि तेही लिस्टच्या टॉपला :) .. बाकी शालजोडीतले मारणे (हाणणे) हा तर छंद, आवड, स्वभावच आहे आपला. सो ते तर चालू राहणारच :-)
ReplyDeleteशीर्षक तुफ़ान आवडलं.
ReplyDeleteहा मनुष्य निवृत्त होण्यापूर्वी भारताने जर पुन्हा एकदा विश्वचषक मिळवला नाही तर त्यासारखं दुसरं दुर्दैव नाही - इतर १० खेळाडूंचं!
आणि ही प्रतिक्रियाही तुफान आवडली... थोडा बदल करायचा झाल्यास 'इतर १ अब्ज १० कोटी लोकांचं'
ReplyDeleteखरं आहे. काय काय आणि किती बोलावं काहीच कळत नाही. अगदी तृप्त तृप्त वाटतय. आणि Collection लयं भारी आहे. आवडलं!!!
ReplyDeleteअगदी अगदी मनातलं बोललास. छान तृप्त असं वाटतंय आज. आणि कलेक्शन तर गुगलबाबाची कृपा.. बस थोडं एडीट केलं पिकासामध्ये
ReplyDeleteZakaaaas!
ReplyDeletekal sachin 199 dhavanvar hota aani dhoni chakke choke thokat hota...dhonicha itka rag yapurvi kadhi aala navhatach.......aaushyat jitykya shivya dyayachya rahun gelelya tya sagalya....dhonila milalya....bichchara.....to kay sachinla khelayala denarach hota pan man aani budhdhi kadhi kadhi ekmekanshich bhandatat.....baki....sachin sachin sachin aani sachin.....ha jap jari kela tari bharatiy sanghat sthan milel yat shanka nahi....
ReplyDeleteआशिष, सचिन आणि झक्कास,तुफान,जबरदस्त हे सगळे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. :-)
ReplyDeleteखरंच सुषमेय.. काल असं जाम वाटत होतं की एवढ्या जवळ येऊन याचे २०० होतायत की नाही. किंवा ९९ ला आउट होण्याचाही रेकॉर्ड आहे याचा त्याप्रमाणे १९९ आउट किंवा मग १९९ नाबादचाही करतोकी काय. पण नाही काल देवाच्या (म्हणजे त्याच्या स्वत:च्याच) मनात काहीतरी वेगळंच होतं. :-)
ReplyDeleteलय भारी...
ReplyDeleteमाझ्या ही मनात सचिन विषयी खरडायला बरेच काही आहे...
लवकरच ब्लॉग वर येईल...
लिहिता लिहिता काय लिहु नि काय नको असे झाले होते...
GR8, Altimate...Aflatoon
ReplyDeleteSachin aani tuzi post donhi......
Kharech mahan aahe to
exm mule mala 196 pasoonach baghayala milale....
Bt its ok..... Tyala ase vishw vikram karataana yaachi dehi yaachi dola paahane kaay kami aahe...
( Aaj Maths 1 zala mhanaje kharetar pariksha sampali mazi :) aatta I m totally tension free....) So, pahilyanda net lavale aani tuzya blog warach aale.....
Ur posts helps me to relax...... Thanx...:)
हो ना सागर. सचिन बद्दल लिहायला लागलो कि कितीही आणि कितीही वेळ लिहू शकतो. पण ही पोस्ट मी ऑफिस मध्ये बसून लिहिली आणि तेही जाम काम असताना अगदी घाईघाईत. कारण प्रचंड जाम जबरी शॉल्लीट आनंद झाला होता.. म्हणून तर म्हटलं 'ट्वीटी पोस्ट' :-)
ReplyDeleteमला वाटतं लोक आता महान, ग्रेट अशा विशेषणांऐवजी सचिन असं विशेषण वापरतील. म्हणजे 'तू तर सचिनच आहेस' असं :-)
ReplyDeleteअग विक्रम होताना बघायला मिळाला हे महत्भाग्य.. and good to know की तुला पेपर चांगला गेला.. ग्रेट. कीप इट अप ..
And thanks for the kind words. बरं आता उतरू का हरभ-याच्या झाडावरून खाली? :-P
Nakko...... pariksha sampeparyant basavunach thevanaar aahe mi tula tithe... :)
ReplyDeleteCoz mala lawakar lawkar navin posts vachayala milalya havyat naa....... :)
अरे बापरे.. कधी संपत्ये परीक्षा? तोवर खाण्यापिण्याचे वांधे.. हरभरे खाऊनच जगायला लागणार ;-)
ReplyDeleteत्यादिवशी मलाही असच झाल होत.शीर्षकही एक्दम भारी....
ReplyDeleteमराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
खरंच देवेंद्र. तो दिवस, ती खेळी प्लॅटिनमाक्षरात कोरून ठेवण्यासारखी आहे. आभार. आणि तुलाही मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!
ReplyDeleteसचिनच्या काळात, त्याच्या देशात, त्याच्या राज्यात, गावात, तो बोलणा-या भाषेत जन्माला घातलंस, त्याची संपूर्ण कारकीर्द, सगळ्या वादळी खेळ्या जवळून बघता आल्या आणि इतकंच नव्हे तर सचिनवर प्रेम करायची बुद्धी दिलीस. अजून काय हवं? आणि आज तर सर्वोच्च बिंदू गाठलास !! भरून पावलो.."
ReplyDeleteसर्वांच्या भावना थोडक्यात मांडल्यास... आता एकदा भेटायची इच्छा आहे रे!!! हुकलाय चान्स एकदा.
हो रे. पण अजूनही त्याला नावं ठेवणारे त्याच्या खेळावर, निष्ठेवर शंका घेणारे भेटतातच. आणि मग असला संताप होतो ना.
ReplyDeleteखरंच रे.. एकदा भेटायचंय त्याला.
३३ कोटी + १ :)
ReplyDeleteसुहास:)
ReplyDelete