कोणालाही खरं वाटणार नाही पण सामान्य माणूस आता एवढा तय्यार झालाय की भविष्य (त्याचंच नाही तर सगळ्यांचं) जाणून घ्यायला त्याला ना ज्योतिषी लागतो, ना प्रसार माध्यमं, ना वृत्तपत्रं. अशाच एका अतिसामान्य (आणि त्यामुळेच अतिदुर्लक्षित) माणसाचा पुढच्या ९६ तासांत घडणा-या घटना ओळखून, सगळे अंदाज मांडून ते आपल्यापुढे ठेवण्याचा हा (अचूक भविष्यकथनाचा) प्रयत्न. अर्थात एवढ्यावरच न थांबता यच्चयावत अतिरेकी संघटनांच्या गुप्त प्रतिनिधीचे अतिगुप्त मनोगतही तो आता सहज ओळखू शकतो. उगाच नाही म्हटलं तय्यार झालाय !! तसंच कुठल्याही प्रकारच्या घातपाताच्या, बॉम्बस्फोटाच्या वगैरे घटना घडल्यानंतर त्या घटनांमागची कारणमिमांसा किंवा पुढच्या ४-६ दिवसांत घडणा-या गोष्टींबद्दलचे सामान्य माणसाच्या डोक्यात येणारे विचार आणि अतिरेकी संघटनांची (गुप्त) मनोगतं किती समांतर पातळीवर आहेत तसंच ज्या साध्या साध्या गोष्टी सामान्य माणसांना देखील कळतात पण त्याबद्दलचा साधा पुसटसाही विचार राजकारणी, पुढारी, नेते, विरोधी पक्ष या सगळ्यांच्या मनातही कसा येत नाही (किंवा ते कसं शिताफीने असं दाखवतात) हे बघून आपण चक्रावून जाल.
तर अशा या सगळ्या राजकारणी, नेते, गृह आणि संरक्षणखाते, पोलीस यांच्यासाठी हा सामान्य माणूस भविष्यकथनाचे क्लासेसदेखील काढायला तयार आहे. आणि तेही फुकट.. कुठलाही हप्ता आपलं सॉरी फी न घेता.
भविष्यकथन क्र.१ : पुण्यात पोलीस बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात येईल : (आणि त्याचबरोबर मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर, गुजरात आणि हैद्राबाद येथेही)
अतिरेक्यांचे मनोगत क्र.१ : तुम्हाला काय अतिरेकी म्हणजे मुर्ख, बेअक्कल, वेंधळे, अक्कलशून्य, बेभरवशाचे, निरुपयोगी, आळशी, खादाड (किंवा थोडक्यात तुमच्यासारखे) वाटले की काय? अरे एकदा बॉम्बस्फोट झाला की तिथेच जाऊन पुन्हा पुन्हा बॉम्ब फोडायला आम्ही काय तुमच्याएवढे मंद आहोत का? अरे ही सगळी मेट्रो-शहरं म्हणजेच देश नाही. आम्ही कुठेही जाऊन कितीही हल्ले करू शकतो. पण बरंय नंतर बंदोबस्त वाढवता ते. आधी वाढवलात तर उगाच तेवढ्याच आम्हाला कटकटी जास्त.
भक क्र.२ : पंतप्रधान त्यांच्या पीए ला ताबडतोब (म्हणजे साधारण आठेक दिवसात) पुण्याला जाण्यासाठीच्या विमानाची तयारी करायला सांगतील. आणि गेल्या वेळच्या त्या स्पिरीटवाल्या भाषणांमधून (तेच ते जे अक्षरधाम, घाटकोपर, संसद, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद असा बदल/प्रवास करत करत मुंबईला येऊन थांबलं) मुंबईला आणि मुंबईकरांना सलाम ऐवजी तिकडे फक्त पुणे घालून भाषणाची थोडी डागडुजी करायला सांगतील. म्हणजे हेच थोडीफार मृतांची संख्या, तारीख असले फुटकळ बदल. बाकी सारं तेच.
अम क्र.२ : हा हा हा.. स्पिरीट (रॉकेल, पेट्रोल, डिझेल वगैरे वगैरे) आणि सॅल्युट (सलाम, कौतुक, दाद वगैरे वगैरे)
भक क्र.३ : मुख्यमंत्र्यांचा सगळ्या हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना निरोप जातील की पुढचे निदान दोन आठवडे तरी कोणीही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करू नयेत. आमची पोरंबाळं त्यांच्या त्यांच्या पायावर उभी असल्याने 'साईट-सीइंग' चे कुठल्याही प्रकारचे दौरे केले जाणार नाहीत.
अम क्र.३ : ओय तौबा.. मागच्या वेळचा बगळा त्यामुळे खपला होता होय? आम्हाला वाटलं आमच्यामुळेच. साला पुढचं प्लॅनींग जरा डेंजरच करतो बघा.
भक क्र.४ : मॅडम कुठल्याकुठल्या राज्यात राज्यपालपदं नजिकच्या काळात रिकामी होऊ शकतील याचा आढावा घेऊ लागतील. कशाला म्हणजे? अहो याहीवेळी गृहमंत्र्यांचं आणि अजून कुठल्याकुठल्या मंत्र्याचं पुनर्वसन करायला लागलं तर गेल्यावेळेस सारखी धांदल नको उडायला शेवटच्या क्षणी.
अम क्र.४ : मनोगत क्र.३ वरून "कापा आणि चिकटवा"
भक क्र.४ : मॅडमकडून मुख्यमंत्रीपदासाठीच्या इच्छुकांना गुप्त खलिते धाडले जातील. अर्थात यावेळी फक्त दहाच (!!) ठार आणि चाळीसच (!!!!!) जखमी असल्याने लगेच काही मुमंना उडवायला लागणार नाही म्हणा. पण कुणी सांगावं. तयार असलेलं बरं. उगाच गेल्यावेळेस सारखा एक आठवडा लागायचा आणि इतकं सतत पोसुनही हे मिडीयावाले शेवटच्या क्षणी आमच्यावरच दात काढायचे.
अम क्र.४ : ये तो सोचाही न था.
भक क्र.५ : राज्य आणि केंद्र सरकारं दोन्हीही एकाच मातेची आपलं सॉरी मातीची लेकरं असल्याने विशेष हमरीतुमरीवर आली नाहीत तरी पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा नेहमीप्रमाणे एकमेकांवर चिखलफेक करतीलच.
अम क्र.५ : माशाअल्ला..!! चला काहीतरी होतंय मनासारखं.
भक क्र.६ : मिडीयावाले मेणबत्यावाल्यांना आणि सगळ्या स्वाभिमानी, दुराभिमानी पक्षांना, सगळ्या प्रकारच्या सेनांना, सगळ्या प्रकारच्या बहुजन, मध्यमजन, अल्पजन आणि (स) माजवादी पक्षांना, सगळ्या राष्ट्रीय, गवताच्या,तृणाच्या, मुळाच्या दलांना, कोंग्रेसांना, आणि सगळ्या माक-या आणि भाक-यावादी कमीनष्टांना यावर्षीचं 'सेलिब्रेशन' एक वर्षाने न घेता एका आठवड्यात किंवा फार तर एका महिन्यात घ्यायला सांगतील. ढोलताशे बडवायला एक वर्ष थांबायचं म्हणजे फार होतं बघा.
अम क्र.६ : करा काय ते. या असल्या सगळ्या थिल्लरबाजीने आम्हाला काय फरक पडतोय.
भक क्र.७ : अशा वेळी विरोधी पक्ष आपल्या जवाबदा-या आणि तारतम्य विसरून,
१. उपोषणं, आंदोलनं, मोर्चे, धरणी असे तमाशे करत वेळ घालवून पोलिसांची कामं वाढवून ठेवतील.
२. इतर विरोधी पक्षांशी वाद घालत आरोप, प्रत्यारोपांची चिखलफेक करतील.
अम क्र.७ : विरोधी पक्ष? ये क्या है मियाँ? अच्छा अच्छा एक मिनट.. हे म्हणजे सत्तेत नसूनही सत्ताधा-यांप्रमाणेच मिजाशीत वागणारे पांढ-या कपड्यातले बगळे होय? अरे ये तो हमारे पाकिस्तान जैसाही है एकदम.
भक क्र.८ : सत्ताधारी पक्षांतली असंतुष्ट, मंत्रीपदाची इच्छुक मंडळी या हल्ल्यांमध्ये सरकारातल्या मंत्र्यांचाच, अगदी मुख्यमंत्र्यांचाही कसा हात आहे आणि आपण ते पुराव्यानिशी कसं सिद्ध करू शकतो ते तावातावाने ओरडून सांगतील आणि नंतर ३-४ दिवसांतच (दिल्लीच्या हस्तक्षेपानंतर) आपला कसा गैरसमज झाला होता आणि सरकार कसं निर्दोष आहे अशा दिलगि-या (आणि दिलजमायाही) व्यक्त करतील.
अम क्र.८ : बरं झालं झाली दिलजमाई. उगाच भांडं फुटलं असतं आणि पुढच्या प्लान्स साठी नवीन बगळे शोधावे लागले असते.
काय बसला ना तुमचाही विश्वास आता की सामान्य माणूस कसा तरबेज झालाय भक करण्यात आणि अम ओळखण्यात आणि तेही एकदम अच्चूक !!!
"पुण्याच्या बॉम्बहल्ल्यातील सर्व मृतात्म्यांना शांती लाभो आणि अशीच श्रद्धांजली या सगळ्या भ्रष्ट सत्ताधीश नेते, विरोधीपक्षनेते, भ्रष्ट पोलीस, राजकारणी, यांच्यासाठीही वाहण्याची संधी सामान्य माणसाला लवकरात लवकर मिळो ही सदिच्छा !!!"
आभार विक्रांत. तीळपापड झाला होता नुसता. त्यातूनच शेवटची लाईन (आणि अर्थातच पूर्ण पोस्ट) जन्माला आली.
ReplyDeleteसहमत आहे. पर्फेक्ट भक व अम. फार वाईट घडलयं...घडतयं.
ReplyDeleteBharri aahe post ekdam....
ReplyDeleteBaaki kaay lihinaar.... Toch to santaap, Tich ti chidchid....
Aani parinaam shoonya....Punha Ye re mazya maagalya....
आभार भाग्यश्रीताई. खरंच खूप खूप वाईट झालं.
ReplyDeleteआभार मैथिली. वांझोटा संताप आणि चिडचिड तर ठरलेलीच आहे.. करणार काय? :-(
ReplyDeleteमुमं masta shorform....aani mahtwacha...current vishayacha aakalan khup chatakan utarata tumchya lekhnitunnnnnn aani hi pratikriya aasuyetun aahe.....khara bolava manasana
ReplyDelete:) & :(
ReplyDeleteहसणारा इमोटीकॉन कारण ज्या प्रकारे लिहिलंय ते आवडलं...
आणि रडणारा अशासाठी की ज्यामुळे हे लिहिलं गेलंय ते फार वाईट होतं...
आपल्या विचारांशी पुर्ण सहमत.पण हेही तितकेच खरे कि जगातील कुठलाच देश आज तितका सुरक्षित उरला नाहिये (याचा अर्थ सुरक्षिततेची खबरदारी घेऊ नये असा मात्र नाही).
ReplyDeleteमनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल आभार, सुषमेय. असूया म्हणशील तर मलाही आहे.. तुझ्यासारख्या सुंदर लघुकथा किंवा एकूणच कथा न लिहिता येण्याबद्दल..
ReplyDeleteधन्यवाद प्रीति. खरंच फारच वाईट झालंय..
ReplyDeleteखरं आहे योगेश. पण उलट त्यामुळेच तर जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे..
ReplyDeleteहेरंब
ReplyDeleteतुमच्या लेखातून सामान्य जनतेच्या मनातील भावना योग्यरित्या मांडल्या गेल्या आहेत. अगदी समर्पक लेख लिहिलात.
- निरंजन
आभार निरंजन. जनतेच्या मनातल्या भावना राज्यकर्त्यांना कळू नयेत हेच दुर्दैव आहे आपलं.
ReplyDeletepritishi sahamat.....ani hyawelachya taltipene dolyat pani, angat angar sagala kahi aahe ani tich wyatha aapan kai karu shakato yachi.....
ReplyDeleteकाही करू शकणार नाही आपण हे जळजळीत वास्तव आहे. निम्मी तरी भविष्य खरी होतात कि नाही बघ ४-६ दिवसांत..
ReplyDeletekhupach mast!! Kaalpasun ji chid chid hotiye tyaala waat milaali!! Maza ek project mate gelaa tya blast madhe.Khup changal porag hote yaar.. dolyat paani yetay sarakhach.. Campusla recruit karun aanala hota IIt kharagpur warun... Aata watat reject kelaa asataa tar bar zaal asat..
ReplyDeleteनिशिकांत, खरंच पाणी आलं डोळ्यात.. :-(
ReplyDeleteवांझोट्या संतापाबद्दलची काही दिवसांपुर्वीची कमेंट कॉपी पेस्ट......
ReplyDeleteआता मान्य करायलाच हवं की आपण षंढ आहोत....
खरंच.. कधी थांबणार हे सगळं?
ReplyDeleteसुरुवातीपासुन शेवटपर्यंत छान लिहल आहे...हे नेते आपल्याला मुर्खच समजतात....पण खरच आपण काही करू शकणार नाही हे ही तितकच जळजळीत वास्तव आहे.
ReplyDeleteआभार देवेंद्र. या नेत्यांचं आपण काहीही करू शकत नाही. म्हणून तर म्हंटलं त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आपल्यावर लवकरात लवकर येओ.
ReplyDeleteparawa haidrabad, kaal Mumbai, aaj Pune..
ReplyDeleteAre hyana haway tari kaay?? aani haway te milal tar he thambanar aahet ka??
lapun chapun waar karanaare "A"dadand "LLa"andage he, golya ghatalya shivaay shant basanar nahit..
खरं सांगायचं तर त्यांना काय हवंय ते त्यांनाही माहित नाहीये. आणि त्यांचे म्होरके याचाच फायदा उठवतायत. उगाच आपलं जिहाद आणि इस्लाम खतरेमे म्हंटलं कि झालं..
ReplyDeleteपरवा एका मित्राशी बोलताना त्याने सांगितलेलं एक उत्तर मला आवडलं आणि पटलंही. तेच देतो इथे.. हे कधीच थांबणार नाही हे नक्की. उलट जास्तीत जास्त देशांत, जास्तीत जास्त शहरांत हे होत राहणार. कारण दहशतवाद हा आता बिझनेस बनला आहे आणि अनेक लोकांचे मल्टीबिलियन डॉलर्स अडकलेत त्यात. ते सगळे वसूल झाल्याशिवाय हे थांबणार नाही आणि ते कधीच वसूल होणार नाहीत.. दुष्टचक्र आहे हे :-(
काही बोलून होत नाही रे..साला कसाबच्या तर…%$%#%%$%%%% का जिवंत ठेवला आहे साल्याला काय माहीत? उद्या याच्या सुटकेसाठी प्रयत्न करतील आतंकवादी तर हे सरकार काय करणार? आपल्या अंतर्गत फुटीलाच तर हे दहशदवादी मोठा हत्त्यार म्हणून वापरतात..कधी कळणार…तो कसाब ग्रेट वेकेशन इन इंडिया नावच पुस्तक लिहेल बघ लवकर..
ReplyDeleteअगदी नक्की. मी तर मनाची अगदी तयारी ठेवली आहे की एक दिवस विमान अपहरणाची बातमी येणार आणि मग ते विमान सोडवण्यासाठी आपला चिदु कसाब आणि अफझल गुरूला अफगाणीस्थानात सोडून येणार..
ReplyDeleteHeramb,
ReplyDeletePlease see this video,
See how family members of terrorist suspect are
supporting,
http://www.ndtv.com/news/videos/video_player.php?id=1201554
We're lucky that elements within India do not carry out bomb blast on everyday basis, we should be thankful to all terrorist fronts and their sympthisers within India.
Yes Harsha, it's good to see such support from the suspects' families.
ReplyDeleteशेवट चांगला आहे पण त्यात 'पोलिस' हे नाव असलेले पटले नाही... :|
ReplyDeleteअगदी बरोबर आहे तुझं, रोहन. मला भ्रष्ट पोलीस असं म्हणायचं होतं. नजरचुकीने राहून गेलं. चूक दुरुस्त केली आहे. बरं झालं सांगितलंस ते.
ReplyDelete