श्वास कोंडला गेलाय, जगण्यासाठी विलक्षण धडपड करावी लागतेय, जीवाची प्रचंड घालमेल होतेय, काहिली होतेय, आतून उन्मळून पडल्यासारख वाटतंय, सारं निस्तेज अर्धमेलं वाटतंय असा भीषण अनुभव सलग ४० मिनिटं घेतला आहेत कधी? घ्यावा लागला तर कसं होतं माहित्ये? सरसर कापत जाणार्या मांजात अडकल्यासारखं वाटतं.
अगदी असाच अगदी हाच अनुभव कथा पटकथा संकलक दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा 'मांजा' देतो. ४१ मिनिटांची फिल्म. शॉर्ट फिल्म. विषय बाल लैंगिक शोषण. एवढा भयंकर विषय की भांडारकरच्या पेज-३ मध्ये शेवटी नुसता उल्लेख आणि एक पाव मिनिटाचं दृश्य बघून पुढचे दहा दिवस हादरलो होतो ते आठवतं. आणि इथे तर हा संपूर्ण चित्रपट त्यावर बेतलाय. अर्थात ४१ मिनिटं. पण लचका तोडतात ही ४१ मिनिटं.
बिना आई बापाचा १०-१२ वर्षाचा रंका आणि ५-६ वर्षांची त्याची किंचित वेडसर धाकटी बहिण. रस्त्यावरचं जीवन. रंका काचा कुटून, त्या मांजाला फासून मांजा वाळवण्याच्या कामात.. रात्रपाळीचा पिसाट हवालदार... दोघांशी बोलतो. ओळख वाढवतो. पोरीला खायला देतो म्हणून घेऊन जातो. मित्राशी बोलताना रंकाला हवालदाराचं खरं स्वरूप कळतं. रंका पोचेपर्यंत उशीर झालेला असतो !!! बहिणीला घेऊन हताश आणि असहाय्यपणे परतत असताना रंका तिला धीर द्यायला म्हणून खांद्यावर हात ठेवतो. ती झिडकारते आणि पुढे निघून जाते. स्वतःच्या भावालाही स्पर्श न करू देणारी रडत रडत पुढे जाणारी तिची ती ठेंगणी मूर्ती पाहून हलतं आतमध्ये.. आधीच्याच दृश्यात आपल्याबरोबरच रस्त्यावरच्या कुत्र्याला खाऊ घालणारी ती छोटुली हीच का असा प्रश्न पडतो. तिचे आधीचे हसरे डोळे आणि आताचा भेसूर चेहरा यांचा ताळमेळ लागत नाही क्षणभर...
पुढे मग रंका, मांजा, हवालदार, पाठलाग ...खल्लास ..... !!!
अखेरच्या दृश्यात बहिणीच्या कोमेजल्या चेहर्यावर हसू आणण्याचा रंकाचा सफल प्रयत्न !!!
झालं.. संपला पिक्चर. स्क्रीनवर संपतो. पण आतमध्ये संपत नाही. ओरखडे उठवून जातो.. सुरुवातीची नावं दाखवायला सुरुवात होते तिथपासूनच या चित्रपटाची भीषणता जाणवायला लागते. काळ्याशार डोहातून प्रेतांसारखी तरंगत वर येणारी नावं पाहून आपल्याला कळतं हे प्रकरण काहीतरी विलक्षण आहे, भयंकर आहे. हे असं कधी बघितलेलंच नाही. त्यातला एकूण एक प्रकार भयानक आहे. एकूण एक फ्रेम भयंकर आहे , अंगावर काटा आणणारी आहे... आणि सेपिया ट्रीटमेंट मुळे तर पिक्चर अधिकच भीषण, अधिकच वास्तव वाटतो. या अतीव बोलक्या छायाचित्रणाबद्दल पंकजकुमारचे पाय धरावेसे वाटतात. Each frame spoke a thousand words to me.. Really !!!हा चित्रपट रस्त्यावरच्या मुलांचं एक उघडंनागडं जग समोर आणतो. आणि वास्तव वास्तव म्हणजे किती वास्तव असावं तर भांडारकरच्या 'चांदनी बार' किंवा रामूच्या 'सत्या' मधले संवाद नाटकी वाटावेत एवढे वास्तव. ते कानावर येऊन अक्षरशः आदळतात... आणि तेही एका १०-१२ वर्षाच्या मुलाच्या तोंडून...
शेवटचं एक मिनिट आशावादी शेवटाच्या दिशेने घेऊन जातं. पण आधीच्या ४० मिनीटांमधल्या ४० हजार वारांचं काय?
जाऊ दे लिहीवत नाहीये.. बास झालं थांबतो... झोप लागायची नाही आज ... आणि उद्या .. कदाचित परवा आणि तेरवाही !!!
---------------------------------------------------------------------
या चित्रपटाची माहिती करून दिल्याबद्दल तसेच त्याची टोरंट फाईल दिल्याबद्दल अभिजीतचे आभार. या भीषणतेचा कडेलोट पहायचा असल्यास इथे टिचकी मारून सुनिता कृष्णन यांचा व्हिडिओ बघा.
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
सेफ इनफ अर्थात (ओन)ली चाईल्ड कथासंग्रह
तो आज ७० वर्षांचा झालाय. गेली २७ वर्षं अथकपणे रहस्यमय आणि थरारक कादंबऱ्या लिहून वाचकांच्या मनावर गारुड करणारा तो बघता बघता ७० वर्षांचा झालाय...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
-
** भाग १ इथे वाचा आता उरलेल्या तीन वीरांविषयी बोलू. हे तीन वीर म्हणजे रॉस गेलर, चँडलर बिंग आणि जोई ट्रिबियानी.... रॉस गेलर (डेव्हिड श...
भयंकर सत्य आहे रे हे..प्लीज़ मला ती टॉरेंट फाइल ईमेल कर ना
ReplyDeleteमित्रा, टॉरंटची लिंक दे. आणखी काय बोलू? तू बरंच लिहिलंस. आता पाहिल्याशिवाय रहावणार नाही.
ReplyDeleteमी ऐकून आहे मांजा बद्दल.नक्कीच पाहावा लागेल..
ReplyDelete४० मिनिटे नाही पण तुझा पोस्ट वाचताना ४० से. तसेच झाले. आता कधी बघतोय 'मांजा' बघुया.. आलो की बघिन. विदारक असले तरी हे सत्य आहे. माझी एक मैत्रीण सोसिअल वर्कर आहे. तिच्या कडून बरेचदा बऱ्याच गोष्टी कळत असतात...
ReplyDeleteहेरंब, अभिजीतमुळेच मला हा अनुभव मिळाला. आजपर्यंत बरेचदा चाईल्ड मोलेस्टेशनवर वाचलं होतं, पण ह्याने सुन्नच केलं रे...
ReplyDeleteशर्मिला फडकेंनी यावर लिहिलेय (अभिजीत कडुन)
ReplyDeletehref=http://www.maayboli.com/node/2351
ह्म्म! मी लोकसत्तात वाचलं होतं या सिनेमाबद्दल. त्या लेखकानंही असंच लिहिलं होतं सगळं... तेव्हा वाचून सुन्न झालं होतं; आत्ता पुन्हा आत तसंच वाटलं. :(
ReplyDeleteHi Heramb,
ReplyDeleteplease give me torrent link for this short film "MANJA"..
tu lihila ahes te vachun aata ti film baghayla ch havi..
reagrds
Ravi
हेरंब
ReplyDeleteटोरंट लिंक दे .. म्हणजे पहाता येईल.मी शोधली पण सापडली नाही
तो चित्रपट पहिला नाही अजून पण वर्णन वाचूनच अंगावर काटा आला. खरच मी अशा वास्तवदर्शी चित्रपटांची चाहती आहे. आता तर हा चित्रपट बघावाच लागे.
ReplyDeleteसुहास, कांचन, सागर, रोहन, रवी, महेंद्रकाका, सगळ्यांना टोरंट फाईल पाठवली आहे आत्ताच.. सुनिता कृष्णनचा व्हिडिओ बघितलात का? नक्की बघा.. मुळापासून हादरून जाल !!!
ReplyDeleteआनंद, खरंच सुन्न करणारा अनुभव आहे हा. झोपू नाही शकलो काल. डोळ्यासमोर सारखं तेच दिसत होतं. हो.. तो शर्मिला फडक्यांचा लेख वाचलाय मी. Thanks to Abhijit again !!
ReplyDeleteप्रीति, फार विचित्र प्रकार आहे तो. सुन्न, विषण्ण करून टाकणारा अनुभव.
ReplyDeleteरोहन, खूप भयंकर आहे सगळं. सुनिता कृष्णनचा व्हिडीओ बघ.. :(
ReplyDeleteजीवनिका, ब्लॉगवर स्वागत.. नक्की बघ. खरंच काटा येतो अंगावर. तुझा इमेल आयडी दे. टोरंट फाईल पाठवतो.
ReplyDeleteकांचनचा बझ मी आत्ता बघितला. मांजा युट्यूबवर उपलब्ध आहे.. पाच भागात.. या लिंकवर
ReplyDeletehttp://www.youtube.com/watch?v=LbU0V4R-9Fc
अतियश विदारक सत्य आहे. सुन्न होतोय मन मांजा पाहताना.
ReplyDelete-सचिन
सचिन, खरंच भयंकर प्रकार आहे. विषण्ण व्हायला होतं.. :(
ReplyDeleteCan you send the Torent file to me as well? My e-mail id is: aparnalalingkar@gmail.com
ReplyDeleteI had read about it in Loksatta. That time also I felt so horrible and now while reading your post. I tried to watch it on youtube but it takes time in parts to buffer and the total effect vanishes.
I will appreciate if you could send me the torent file.
thanks
हेरंब, नेहमी हसवतोस..आज हलवून सोडलस...ती टोरंट फाईल मेल कर प्लीज!
ReplyDeleteशांतीसुधा, ब्लॉगवर स्वागत.. टोरंट फाईल पाठवली आहे.
ReplyDeleteखरंच ती ४० मिनीट अंगावर आली :-(
विद्याधर, मीही आतून हलून गेलो होतो तो प्रकार बघताना.
ReplyDeleteटोरंट फाईल मेल केली आहे तुला..
हेरंब, लिंक दे रे प्लीज.... तू लिहीलेले वाचून जीव इतका अस्वस्थ झालायं.... भयंकर आहे हे सगळे...
ReplyDeletejiv4389@gmail.com नक्की पाठवा link.
ReplyDeleteश्रीताई, खरंच भयंकर आहे... :-( तुम्हाला टोरंट फाईल पाठवली आहे आत्ताच..
ReplyDeleteजीवनिका, तुलाही पाठवली आहे टोरंट फाईल आत्ताच..
ReplyDeleteAfter reading this post I have no guts to see this film.
ReplyDeleteSonali
Yes Sonali. One needs enormous guts to watch this !! It's heart-breaking !! ..
ReplyDeleteतरीही कधीतरी जमला तर नक्की बघ एवढंच सांगतो..
हेरंब कालच तुझी पोस्ट वाचली आणि सुनिता क्रिश्ननचे स्पीच ऐकले.... भयंकर आहे हे सगळे... हे याआधि माहित नव्हते असे नाही, किंवा हे उद्योग किती विदारक आहेत याची कल्पना पेपरमधे वगैरे वाचून होतीच तरिही काल त्रास होतच होता.... कदाचित जगाच्या ज्या वास्तवाकडे आपण पाठ (सोयिस्कर) फिरवलेली आहे ते पुन्हा समोर आले...
ReplyDeleteएक समृद्ध, सुरक्षित बालपण जगलेले आपण आणि बाल्य म्हणजे काय हेच समजण्याआधिच आयुष्य संपलेले ते चिमुरडे जीव..... अस्वस्थ व्हायला होतेय....
मी ते ४० मिनिट्स सहन नाही करू शकणार मला कल्पना आहे...कारण एकतर मनाला यातना त्यांचे दु;ख पाहून होतात आणि दुसरे म्हणजे पुन्हा आपल्या यातनेतला फोलपणा जाणवला की आपल्याच त्या क्षणिक हळहळीचा संताप येतो....
थांबते आता, पुन्हा आपल्या सुरक्षित कोषातल्या सुखी आयुष्याकडे परतायला हवे!!!!!
मांजा बद्दल ऐकल होत. . त्यावेळीच खूप सुन्न झाल होत. भयानक आहे सगळ....कदाचित वास्तव याहून भयानक असु शकेल....खर सांगु का हे अस काही ऐकल किंवा पाहील की मन खूप सुन्न होऊन जात काहीच सुचत नाही. सतत ती टोचणी लागते मनाला!!!
ReplyDeleteमाझे आभार कसले मानतोस, उलट हा लेख लिहून असा संवेदनशील विषय सगळ्यांसमोर आणल्याबद्दल तुझेच आभार !
ReplyDeleteहि टोरंट फाईल डाउनलोड करणाऱ्या सगळ्यांना १ विनंती आहे, कि फाईल डाउनलोड झाल्यावर जमेल तेवढा वेळ seed करा. या फाईलला seeds नाहीत, असे व्हायला नको.
अरे वाचतेय...त्याचा या चित्रपटाचा काही संबंध नाही पण....एकावेळी एकच गंभीर विभाग सांभाळू शकते....पण नंतर कधीतरी धीर झाला तर पाहिन..तुझं लिहिणंच व्याकुळ करतंय....आणि स्वतः मुलगी असल्यामुळे असेल असे विषय जास्त टोचतात...आणि नकळत समस्त पुरुषजातीची घृणा वाटायला लागते...जाऊदे इथे जास्त लिहायला नको....
ReplyDeleteकिती भयंकर आहे हे सगळं.... हेरंब ती टोरंट फाईल मेल कर प्लीज!!!
ReplyDeleteswati.atre@gmail.com
मला नाही वाटत मी हा चित्रपट पाहु शकेन. तेवढी हिंमत नाही माझ्यात. सुरुवातीचा आशय समजल्यावर पोस्ट देखील नाही वाचली पूर्ण.
ReplyDeleteतन्वी, कळतंय तू काय म्हणते आहेस ते. भयंकर आहे हे. अनुजा तर अर्धवटच बघू शकली तो पिक्चर. सुनिता कृष्णनचा व्हिडीओ बघून फक्त रडायची बाकी होती. खरंच आपलं बाल्य किती सुखाचं, सुरक्षित कोषातलं होतं आणि आत्ताही जगतोय ते अगदी सुरक्षित. रोजचं जगणं म्हणजे एक लढाई असणा-या या चिमुरड्यांच्या दुःखाची आपल्याला कधीच कल्पना येणार नाही :(
ReplyDeleteपण तरीही एकदा बघ तो पिक्चर.. एवढंच सांगतो...
मनमौजी, अगदी खरं बोललास. वास्तव याहूनही खूपच भयानक असेल कदाचित.. खरंच एवढी हुरहूर, एवढी तगमग कधीच झाली नव्हती जीवाची !!
ReplyDeleteअभिजीत, अरे तू सांगितलंस म्हणून कळलं तरी या चित्रपटाबद्दल. म्हणून विशेष आभार. काय हादरून गेलो होतो (आणि अजूनही आहे) रे चित्रपट बघून झाल्यावर. त्या तिरीमिरीतच काहीतरी लिहिलं.
ReplyDeleteआणि तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. जास्तीत जास्त लोकांनी सीड केलं पाहिजे या फाईलला. प्लीज सगळ्यांनी जास्तीतजास्त वेळ सीड करा.
अपर्णा, खरंच घृणा वाटायला लावणारंच आहे सगळं. जाम हादरलोय.
ReplyDeleteसोनाली आणि तन्वीला सांगितलं तेच तुला सांगतो. जेव्हा जमेल तेव्हा पण धीर करून एकदा तरी बघच हा पिक्चर !!
स्वाती, आत्ताच पाठवलीये तुला फाईल. चेक कर.
ReplyDeleteखूप भयंकर प्रकार आहे !!
सिद्धार्थ, पोस्ट वाचली नाहीस तरी चालेल पण चित्रपट एकदा तरी नक्की बघ एवढंच सांगतो. चित्रपटात दाखवलंय त्यापेक्षाही वास्तव अनेक पटींनी भयंकर असण्याची शक्यता आहे. त्यांच्यासमोर पोस्ट काहीच नाही. ती दाहकता सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा एक छोटा प्रयत्न !!
ReplyDeleteपोस्ट वाचून अस्वस्थ झालो आहे
ReplyDeleteआता 'मांजा' पाहून काय होईल सांगता येत नाही रे
विक्रम, भयंकर फिलिंग येतं रे बघून झाल्यावर. प्रचंड अस्वस्थ वाटतं.
ReplyDeletemanasatala haiwaanach asale prakaar karu shakatat..pan jyala bhogawe lagate ashi lahaan mule tya nantar ekadamach mothi houn jatat, niragasatewaracha tyancha wishwas udato,,swatahacha bhau kaay aani baap kaay, konich aapal watat nahi..
ReplyDelete(can u send me the link pls, my id is shwetamark@gmail.com)
श्वेता, तुला टोरंट फाईल आणि युट्युबची लिंक पाठवली आहे आत्ताच.
ReplyDeleteखरंच ज्या लहान मुलांवर असे प्रसंग येतात त्यांचा तर चांगुलपणा, निरागसपणा याच्यावरचा विश्वासच उडून जात असेल. दुर्दैवी जीव :(
pahin...nakki..tashi mi dhirachi aahe...majhya aadhichya pratikriyemadhe Kite runner wachate he lihyacha rahila...just aata pahila mhanun lihila...baki kahi nahi...
ReplyDeleteअच्छा.. आत्ता कळलं वाचतेय म्हणजे 'काईट रनर' वाचत्येस ते. Just to let you know even in 'Kite runner' you gotta meet 'manja'.. You know what am saying right?
ReplyDeleteआपण फक्त पाहून हलतो आणि हादरतो.. ज्या अनेकींच्या वाटयाला हे येत असेल, त्यांच काय.. याची कल्पनाही करता येत नाही!
ReplyDeleteअगदी खरं आहे सविता, ज्यांच्या नशिबी हे असले प्रकार येत असतील त्यांचा माणुसकीवरचा विश्वासच उडून जात असेल !!! :(
ReplyDeletePlease do send me torrent as well,
ReplyDeleteJust watched Sunita Krishnan,
Its horrible, She has exceptional strength.
sandipsshimpi@gmail.com
संदीप, आत्ताच पाठवलीये तुम्हाला टोरंट फाईल.
ReplyDeleteखरंच. सुनिता कृष्णन यांना लाख सलाम !!
mala link deshil ka ?
ReplyDeleteमस्त ,चाबूक,सुंदर काहीच सुचत नाही कायबरे आणखी comment कराव्या अप्रतिम,आहे. महेश काका
ReplyDeleteहेरंब , तुझं पोस्ट वाचलं आणि तू दिलेल्या लिंक वरुन "मांजा" हा सिनेमा सुद्धा बघितला. फार भयंकर आहे हे सगळं !! आपण किती सुरक्षित जगात वावरतो ना......ज्यांच्या वाट्याला हे येत असेल त्यांच्याबद्दल कल्पना सुद्धा करवत नाही.
ReplyDeleteपण हे सगळं बघितल्यानंतर माझ्या डोक्यात अजून एक मोठा प्रश्न तयार झालाय. सिनेमात अतिशय वास्तव दाखवलंय वगैरे सगळं ठीक आहे. पण त्या रांकाची भूमिका करणा-या मुलाच्या तोंडी जी काही वाक्य, शब्द घातले आहेत....त्यामुळे त्याच्या बालमनावर किती भयंकर परिणाम झाला असेल !! ह्याचा विचार कोणी केला असेल का ?
पहा ह्यावर सुद्धा विचार करुन.
जयश्री
स्नेहा, टोरंट फाईल पाठवली आहे तुला.. आताच..
ReplyDeleteआभार काका..
ReplyDeleteजयश्रीताई, ब्लॉगवर स्वागत..
ReplyDeleteतुमचं म्हणणं खरं आहे. अगदी हाच विचार माझ्याही डोक्यात आला होता. मला नक्की माहित नाही पण त्यांनी डबिंग केलं असावं असा माझा अंदाज आहे. म्हणजे सीन शूट करताना काहीही संवाद नाहीत. असतील तरी असेच काहीतरी किंवा just lips movement. आणि नंतर डबिंगच्या वेळी 'ते' संवाद add केले असावेत. आणि तेही लहान मुलाचं डबिंग नसावं. मोठ्या माणसाच्या आवाजाला ट्रीटमेंट देऊन लहान मुलासारखा आवाज दिला असावा. अर्थात मला माहित्ये की मी त्यांना थोडा जास्तच benifit of doubt देतोय. पण लहान मुलांच्या समस्यांवर एवढा वास्तव चित्रपट काढणारा माणूस नक्कीच तेवढा संवेदनशील असावा अशी मला खात्री आहे.
"बालमनावर भयंकर परिणाम"
ReplyDelete:-)
nahi jhala.
ulat baryach shivya tyane mala shikavlya.
jayashri, chikhala t swachh kapade ghalun utarayache asel tar blogs war comments lihavyat.nusatich sawendanashilata gheun floor war jata yet nahi.tithe ruthlessness hi lagato.
-Rahi.
p.s.- thanks watwat satyawan.bara-bhikar kasahi aso,manjha lokan paryant fact pohachane garajeche hote.so- thanks.
OMG !!!! राही!!!! तुम्ही स्वतः प्रतिक्रिया दिलीत ??? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. ब्लॉगला भेट देऊन, पोस्ट वाचून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल सहस्त्र आभार.. !!!
ReplyDeleteपोस्ट तुम्ही वाचली आहेतच. पण पुन्हा एकदा सांगतो.. हा चित्रपट पाहून आलेली अस्वथता अजूनही कमी झालेली नाहीये. खूप भयंकर अनुभव दिलात. आणि सुरुवातीची नावं दाखवण्याची पद्धत, मधली शीर्षकं, सेपिया इफेक्ट, पार्श्वसंगीत, छायाचित्रण आणि चित्रपटाची एकूणच अगदी वेगळी ट्रीटमेंट यामुळे गडद वास्तव अजूनच अधोरेखित झालं !!!
मला टोरंट फाईल पाठव ना...
ReplyDeletepankajzarekar[AT]gmail[DOT]com
पंकज, टोरंट फाईल पाठवलीये तुला ..
ReplyDeleteha movie paahaychay, pan dheer hot nahiye. :(
ReplyDeletetumhi khup ch changle lihle ahe. ti asvasthata ithe pochali!
आभार भाग्यश्री.. जमेल तेव्हा, धीर एकवटून का होईना पण नक्की पहाच हा चित्रपट. वास्तव फारच भयंकर आहे !!
ReplyDeleteहेरंब......माझ्या अभिप्रायानंतर तुझा आणि स्वत: "राहीं"चा अभिप्राय वाचला.
ReplyDeleteतुझं मत एकदम पटॆश.
स्वत:च "राहीं"चा अभिप्राय बघून खरंच खूप छान वाटलं. हे असे प्रश्न माझ्या सारख्या अतिसामान्य वाचकाच्या मनात नक्कीच येऊ शकतात. एकतर आमची दुनिया इतकी स्वप्नाळू आणि स्वत:च्या कोषातली आहे ना..... ह्या भयंकर प्रकाराची कल्पनाही करु शकत नाही..पण या गोष्टी घडताहेत हे मात्र २०० टक्के खरं आहे.
राही.., तुमच्या कामाबद्दल अजिबात कुठलीही शंका नाही...उलट तुम्ही हे भीषण सत्य सुरक्षा कवचात राहणा-या लोकांपर्यंत पोचवलं त्याबद्दल तुमचे आभारच मानायला हवेत. कृपया राग मानू नये. मनात आलेली शंका बोलून दाखवली....इतकंच !! तुम्हाला दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता. तुमच्याबद्दल नितांत आदर आहे.
खूप sensitive लेख आहे तुमचा!.. ह्या जगाबद्दल ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
ReplyDeleteसुनिता कृष्णन चा video अंगावर आला एकदम आणि तुमची लिहण्याची शैली पण जबरदस्त!
आभार जयश्रीताई. मला पण खूप आनंद झाला स्वतः राही यांची प्रतिक्रिया बघून.
ReplyDeleteखूप आभार प्रसाद आणि ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत.
ReplyDeleteजमलं तर मांजा नक्की बघ. भयंकर अनुभव आहे तो. आणि सुनिता कृष्णन यांना तर लाख सलाम !! फार धीराची बाई असली पाहिजे ती !!!
मांजा तर नाही पाहिला अजुन पण त्याची दाहकता मनापर्यंत पोहोचली हया
ReplyDeleteपोस्टमधुन...तो सुनीता कृष्णनचा विडीयोही पाहिला...एकुणच भयानक प्रकार आहे हा...
खरंच फार भयंकर आणि विषण्ण करून टाकणारं आहे हे सारं. जमेल तेव्हा नक्की बघ मांजा.
ReplyDeleteआणि सुनिता कृष्णन तर महान व्यक्ती आहे. तिला लाखो सलाम !!
हेरंब,
ReplyDeleteकृपया टोरंट लिन्क द्या..
khupch manala bhidnar varnan kel aahe tumhi...plz send that link to me also
ReplyDeleteसोमेश, टोरंट फाईल पाठवली आहे.
ReplyDeleteखूप आभार वेदा.. वर्णनापेक्षाही भयंकर आहे ते प्रत्यक्षात.
ReplyDeleteतुझा इमेल आयडी पाठव मला. मी टोरंट पाठवतो. आणि ब्लॉगवर स्वागत !!
Hi.. tu khup manapasun lihal aahes..shabdashabdat tuza thartharata awaz janawatoy aani dolyasamor distat re niragas chehere .. pratyakshat baghatana kay hoeel .. plz link pathaw..
ReplyDeleteलीना, अगदी खरंय. मांजा बघून अक्षरशः भयंकर अवस्था झाली होती. खूप खोलवर घुसला होता. आठवडाभर अस्वथता होती. असो.
ReplyDeleteतुझा इमेल आयडी दे लिंक पाठवायला..
आणि ब्लोगवर स्वागत.. !!
hi ... tu lihil aahes te vachun... 'must see' movie ahe asa vatatay ... please link pathav ...
ReplyDeleteअपूर्वा, लिंक पाठवली आहे.
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.