कंटाळा या विषयावरचा माझा अपार उत्साह आणि दांडगा अनुभव पाहता मी या विषयावर पानंच्या पानं पाडली पाहिजेत खरं तर. पण तसं करणं हे कंटाळा या शब्दाशी आणि त्याच्या एकूणच अर्थाशी प्रतारणा करणारं आहे... विसंगत आहे. तेव्हा तो दोष मी माझ्या माथी घेऊ शकत नाही. तर ब्लॉगवर कधी नव्हे ते जरा थोडंफार लिहिणं होत होतं तर हे राजे आले दत्त म्हणून. (राजे काय दत्त काय, कायच्याकाय बडबडतोय मी).. म्हणून मग म्हंटलं की गद्यात पानंच्या पानं पाडण्यापेक्षा एखादी कविता पाडली तर कमीत कमी शब्दांत सुटका. तर (फक्त) आजचा विषय आहे (टेन्शन इल्ले, रोज नाही पाडणार मी) 'ब्लॉग पाडण्याचा कंटाळा'.. तर इथे ब्लॉगर मन आणि कंटाळलेलं मन यांची जुंपलीये जरा. ब्लॉगरवालं जरा दर्जेदार लिहिणारं असतं अशा अपेक्षेने (किंवा खरं तर समजुतीने) त्याच्या तोंडी यकदम छापील भाषा हाये आणि कंटाळलेल्याची कॅसेट राहून राहून तिथेच अडकते. अर्थात रसग्रहण (!!) करण्याच्या किंवा पार्श्वभूमी (!!!!) समजावून सांगण्याच्या लायकीची ही कविता नसली तरी तसला फडतूस कंटाळवाणा प्रयत्न केलाय... आणि खालील कविता आणि वरील बडबड यात साहित्यिक, वाङमयिन मुल्य शोधण्याचा प्रयत्न करताना कपाळमोक्ष झाल्यास त्याबद्दल माफी मागण्याचा आणि त्याची जवाबदारी घेण्याचाही मला तेवढाच कंटाळा आ.... हे .....
कं
चल चल ना रे लिहून काढू हिमप-यांची सुंदर गाणी
चल चल ना रे फिरून पाहू किलबिल पक्ष्यांची वाणी
हेही लिहावे न् तेही लिहावे, लागे जीवास हा चाळा
साला काय करू यार, पण येतो जाम कं टा ळा ||१||
बघ बघ बगळे भाषण देती उडवून टाकू त्यांच्या टोप्या
बघ बघ अवघड करून जाती उगाच सा-या गोष्टी सोप्या
चल ना लवकर उतरवू सारे, हल ना रे मेंदू बाळा
आईशप्पत खरं सांगतो रे, येतो ढीगभर कं .. टा ........ ळा ||२||
लिही सकाळची गडबड ती अन् आगगाडीचेही धक्के
वरिष्ठांची तर सदैव कटकट अन् सवंगडीदेखील पक्के
एकदाच चल उधळून टाकू भरल्या मनाचा हा फळा
केलं असतं रे, (पण जाम पकलोय यार) पण येतो जबरदस्त कंटा ......... .... ....... ळा ||३||
लिही बाळाच्या खट्याळ लीला रम्यच त्या गमतीजमती
अमाप धुडगुस, चावाचावी अन् किंचाळ्या धांगडमस्ती
नकोस घेऊ जरा विसावा, भरभरोन वाहो असा लळा
बघुया रे लिहीन कधीतरी, आत्ता मात्र आलाय शॉल्लीट कंटा ....... ||४||
आज कुणीसे सांगत होते, वैचारिकही कधी लिहीत जारे
किंवा कधी जमलेच जरासे तर राजकारणही पहात जारे
विषयांची कधी नसे वानवा उघडा ठेवत जा डोळा
सगळं मान्य हाय रे बाबा, आता काय सांगू कित्ती येतो कंट ...आ ..... ||५||
उपाय सारे सरून जाती नेहमीच जिंकतो कंटाळा
विषय बापुडे मरून जाती सदैव विजयी कंटाळा
हुरूप हरतो, हर्ष थरथरतो दिग्विजयी योद्धा कंटाळा
उर्जा पतते, जिव्हा ढळते रामबाण, ब्रह्मास्त्र कंटाळा ||६||
|| कंटाळाय स्वाहा ||
|| कंटाळास्तु ||
अरे वा!
ReplyDeleteया कं वर अशी सॉलिड पोस्ट.. झक्कासच!
कंटाळाय स्वाहा ||
ReplyDelete|| कंटाळास्तु ||.....baki kahi mhan pan commentayala tu kantalt nahis .....:)
baki kavita kai masatch jhaliya...ekdum shaulit...:)
बापरे, काय हसलोय मी... थोड्यावेळाने हसण्याचा सुध्दा कं...टा...ळा....... आला. :)
ReplyDeleteप्रत्येक ध्रुवपदाला मी कं...टा...ळा... वाचताना त्या टिंबाइतक्याच जांभया दिल्या.... :)
पुरे आता मलाही जाम कं..टा..ळा येतोय पुढे लिहिण्याचा......
दादा
ReplyDeleteछान जमलीय कविता...
कमेंटवल असत पण . . .आत्ता मात्र आलाय शॉल्लीट कंटा.......!!!! . . :)
ReplyDeleteमस्त जमलाय. . .मजा आली वाचताना!!!
कंटाळा आलाय प्रतिक्रीया द्यायचा.....
ReplyDeleteखरय़ं रे ब्लॉगर मन आणि कंटाळलेले मन यातले युद्ध जुंपते हे सत्य आहे!!!! कोण जिंकते हे माझ्या सध्याच्या रोडावलेल्या पोस्ट संख्येने सिद्ध केलेच आहे... :)
आताशा माझी अवस्था म्हणजे ’कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो’ अशी आहे त्यात तू या असल्या पोस्ट टाकून कंटाळा ग्लोरीफाय कर......
ह्या पोस्टवर कॉमेंट लिहिणार होतो पण हे पोस्ट वाचूनच कॉमेंट लिहायचा कंटाळा आलाय. कामाचा पण कंटाळा आलाय. घरीच निघून जातो कसा.
ReplyDeleteया पोस्टवर भलीमोठी प्रतिक्रिया द्यायची होती पण
ReplyDeleteजाम कंटाळा आलाय राव आज, जाऊ देत बघू परत कधीतरी ;)
जीवनमूल्य
khare tar pratikriya na denyacha kantala karanar hoto pan deto
ReplyDeletekantalyachahi maj aata kantala yeto....ashi sandip kharenchi kavita aahe.....kantalyavar mazyaitake prem kunihi karat nasel.....
हेरंब,सकाळी सकाळी कंटाळापुराण एक मोठी जांभई देत वाचत होते.... आणि चक्क माझा कंटाळा गायब झाला. तुझी खुसखुशीत शैली मला आवडतेच. कं...टा.......ळा ची कविता लयी भारी रे. शेवटच्या चार ओळीत बरेच काही सामावलेले.....:)
ReplyDelete:-D :-D :-D
ReplyDelete'कं' च्या एवढ्या 'किं' कवितेवर एवढ्या प्रतिक्रिया बघून खरं तर माझा कंटाळा कुठच्या कुठे पळाला होता असं मी म्हणे म्हणे पर्यंत दिग्विजयी कंटाळ्याने पुन्हा माझा ताबा घेतला आणि जे मी कधीच करत नाही ते मला करायला भाग पाडलं. ते म्हणजे प्रत्येक प्रतिक्रियेला वैयक्तिक उत्तर देण्याऐवजी या ढीगभराच्या कंटाळ्यामुळे सगळ्यांना एकत्र उत्तर देतोय.. सगळ्यांचे खूप खूप आ ... भा .... !
'कंटाळ्या' तेतुका मेळवावा, 'कंटाळा' धर्म वाढवावा !!
ब्रह्मास्त्र कंटाळा :D :D सहीच!!!
ReplyDeleteअरे तुझ्या कवितेवरून आठवलं ... आपल्याकडे एक कंटाळ्याचा अख्खा ब्लॉग होता ... त्याच्या मालकाला बहुतेक आता ब्लॉगचा कंटाळा आला असावा :)
असे चालणार नाही...आम्हाला शेपऱ्येट शेपऱ्येट उत्तरे हवीत.........
ReplyDeleteगौरी, ते महाब्रह्मास्त्र आहे खरं तर. हो यॉनिंग डॉग चा कंटाळ्याचा ब्लॉग आहे. पण ब-याच दिवसात तिथे काही हालचाल नाही. यॉडॉ आणि ब्लॉग दोघेही कंटाळले आहेत वाटतं.
ReplyDeleteतन्वी, दिली असती ग पण,
ReplyDeleteहुरूप हरतो, हर्ष थरथरतो दिग्विजयी योद्धा कंटाळा
उर्जा पतते, जिव्हा ढळते रामबाण, ब्रह्मास्त्र कंटाळा
हे कॉपे आहे हे सां न ल !!
कालच प्रतिक्रिया देणार होतो पण साला जाम कंटाळा आला होता...कविता मस्त झाली आहे आणी ...
ReplyDeleteआला परत कं...टा ळा..
जातो मी आता हा कं काय आपला पिछा सोडत नाय...
कं वरची किं क वाचून सगळ्यांनाचं अफ्फाट कं आला आहे :-) ..
ReplyDeletemhanun aaj pan kantalun comment dili aahe....yawwwwwwwwwwwwwwwwwwwwwwnnnnnnnnnn
ReplyDeleteतू yawwwwwwwwwwwwwwwwwwwwwwnnnnnnnnnn तर मी ZZZZZZZZzzzzzzzz :-)
ReplyDeleteमस्त एकदम...
ReplyDeleteमाझ्या मनातले काहीसे लिहिले आहेस...
मी पण लिहायचे असून ही बराच कंटाळा करतो टाइप करायचा...म्हणून कधी तरीच कमेंट देतो...
हा हा हा.. अरे हा कं आपल्याला असा तसा सोडणार नाही. त्यामुळे काही न बोलता त्याला शरण जावंच लागतं.
ReplyDelete'आळश्यांचा राजा' होताच आता त्यात तू अजून एक भर ... वा!!! कविता करायला कंटाळा नाही आला का??? मला कधीच कंटाळा का येत नाही रे???
ReplyDeleteहा हा हा.. अरे 'कं' ही माझी खरी ओळख आहे. मला येतो जाम कंटाळा आणि कंटाळायला आवडतं सुद्धा :)..
ReplyDeleteअरे 'कं' विषयी लिहायचं म्हणजे चिक्कार लिहावं लागलं असतं. कवितेतून पटकन उरकलं :)
का SSSS य? तुला कंटाळा येत नाही??? हाय कंबख्थ तुने पी ही नही :P