मी त्याला कडेवर घेऊन फिरतोय. तो झोपावा म्हणून देवाचा (आणि त्याचाही) धावा करतोय. थोड्या वेळाने तो झोपतो. नाक फुरफुरत असतं. सर्दीने वहात असतं. मी त्याला खाली ठेवतो. त्याचं नाक पुसतो. त्याच्या अंगावर शाल घालून झोपणार एवढ्यात तो रडत रडत उठून बसतो. पुन्हा कडेवर घेऊन फिरणं, खाली ठेवणं आणि त्याचं रडणं असं चक्र दोन-तीन वेळा झाल्यानंतर मी त्याला घेऊन उठतो आणि (नाईलाजाने) सुवर्णमध्य म्हणून बीनबॅगवर जाऊन रेलतो. त्याला डुलवत डुलवत झोपवण्याचा प्रयत्न चालूच. तो मधेच झोपतो.. थोडा वेळच. पुन्हा रडत उठतो. त्याच्या नाकातल्या आणि डोळ्यातल्या पाण्याने माझा खांदा भिजत असतो. जागा असेन तेव्हा तेव्हा मी अंधारातच त्याचं नाक/डोळे पुसत असतो. असं अर्धवट जागत अर्धवट झोपत चरफडत चरफडत आणि दुस-या दिवशीच्या ऑफिसमधल्या कामाचा विचार करत मी रात्र काढतो. पहाटे कधीतरी झोप लागते.
सकाळी गजराच्या लाथेने मी उठतो. त्याला जरा शांत झोप लागलेली असते. त्याला खाली ठेवण्यापूर्वी एकदा त्याच्या चेह-याकडे बघतो. वाहतं नाक कधीच थांबलेलं असतं. चोंदलेलं असतं. सुकलेलं असतं. म्हणजे रात्री खांदा भिजवणारं पाणी फक्त डोळ्यातलं असतं. नाकातलं नाही. कारण एक नाकपुडी कधीच बंद झालेली असते. मी चरकतो. रात्रभर एका नाकपुडीने आणि तोंडाने श्वास घेण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो आणि त्यातून ती रडरड, अस्वस्थता आलेली असते. माझ्या अंगावर काटा. हजार पातकांचं ओझं खांद्यावर पडल्याप्रमाणे भासतं. मी अजूनच गुदमरतो.
प्रसंग दुसरा : (काही आठवड्यांनंतर)
रात्री दोन-अडीचचा सुमार.. शेजारी चुळबुळ होते. ती वाढते, रडण्याचा आवाज. स्वर चढत चढत जात टिपेला लागतो. त्याला प्रेमाने, दामटवून झोपवण्याचे सगळे प्रयत्न फसल्यावर कडेवर घेऊन फिरण्याचा एकमेव रामबाण उपाय शिल्लक असतो. मी त्याला उचलतो, कडेवर घेतो, फे-या मारायला लागतो. साधारण ४० सेकंदात तो एकदम गाढ ... मला पुन्हा झोप लागायला १५-२० मिनिटं लागतात.
दुसरी रात्र. घड्याळ अंदाजे ३ वाजवत असावं. शेजारी चुळबुळ, रडं आणि टिपेचा आवाज ठरल्या क्रमाने घडतं. मी पुन्हा रामबाण मारतो. ५० सेकंदात लक्ष्यवेध. मला झोप लागेपर्यंत अर्धा तास उलटून जातो.
तिसरी रात्र. मी प्रचंड दमलेला. सलग ३-४ रात्रींची अनियमित आणि अर्धवट झोप. त्यामुळे गाढ गाढ गाढ झोपेत. इतका की मला थेट 'टिपेचा आवाज' वाली शेवटची पायरी ऐकू येते. शक्तिपात झाल्यासारखा मी उठत नाही. उठू शकत नाही. पण रडं सहन न होऊन अखेर उठावं लागतंच. "च्यायला, काय वैताग आहे" असं उधळत.. पण क्षणभरच. पण अचानक मला एवढ्या झोपेत असूनही काहीतरी चुकीचं बोलल्याचं जाणवतं. मी जीभ चावतो. चुकीच्या जाणीवेने की चुकीचं बोलल्याला शिक्षा देण्याच्या जाणीवेने? दुसरं असावं बहुतेक.
प्रसंग तिसरा : (काही दिवसांनंतर)
नुकताच ऑफिसमधून घरी आलेलो. जेमतेम कॉफी पिऊन होते ना होते तोवर पिल्लू उठतं. रडायला लागतं. त्याला कडेवर घेतो. फे-या मारतो. तरीही हळू आवाजात रडरड चालूच. मी जरा ओरडल्याच्या स्वरात बोलून जातो "अरे कडेवरच आहेस की... आता काय डोक्यावर घेऊन नाचू?" अर्धवट झोपेत आपली मान माझ्या खांद्यावर विसावणा-या त्याला प्रश्न पडला असावा की हा एवढा का बिथरला? एवढं ओरडायला झालं काय? त्याचं उत्तर माझ्याजवळ नसतं. यावेळी मी नजर चुकवत नाही की जीभ चावत नाही. सरळ माफी मागतो त्याची. "सॉरी राजा सॉरी" असं म्हणत. होप त्याला कळलं असेल मला काय म्हणायचंय, काय सांगायचंय. "सॉरी राजा सॉरी" मागे मोठ्ठाच्या मोठ्ठा माफीनामा दडलेला असतो !!!
-----------------------
* या सगळ्या प्रसंगांत उल्लेख फक्त 'तो' आणि 'मी' चेच असले तरी 'यत्र, तत्र, सर्वत्र' किंवा फरहान अख्तरने सोप्या भाषेत '"सन्नाटा सुनाई नही देता और हवाए दिखाई नही देती" म्हटल्याप्रमाणे 'ती' सगळीकडे आहेच. त्याच्याबरोबर, माझ्याबरोबर आणि आम्हा दोघांबरोबरही. आणि कधीही सॉरी म्हणायची पाळी येऊ न देता !!!
दादा
ReplyDeleteखुपच छान लिहिलयस रे....खुपच छान...
पहिलाच प्रसंग एवढा छान लिहिला आहेस कि बस्स....
अन शेवटची ओळी सुद्धा...
आमच्या घरीही अगदी असंच चालत, शेम टू शेम. फक्त थोडा बदल करुन तो आणि मी (आणि तोही)
ReplyDeleteहेरंब, मस्त यार. अतिशय जबरी. सगळे प्रसंग मनाला भावले. एका पित्याच्या भूमिकेला तू समर्थपणे न्याय देतोयस. खूप मस्त वाटत जेव्हा तू आदितेय बद्दल असा भरभरून लिहतोस...
ReplyDeleteGod Bless you..
हेरंब, जास्त काही बोलत नाही ’ती’ आणि आदितेय नशिबवान आहेत....
ReplyDeleteतुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा!!!!!!!!!
खूपच भावस्पर्शी!
ReplyDeleteआभार सागर. पहिल्या प्रसंगाने ओरखडा उठला होता. तो जसाच्या तसा लिहिण्याचा प्रयत्न केलाय. आणि शेवटच्या ओळीचं म्हणशील तर 'ती'च्या मुळेच तर चाललंय सगळं !!
ReplyDeleteतन्वीशी सहमत. हेरंब, असाच राहा. तो आणि ती दोघेही भरून पावत आहेत.( ती कदाचित बोलून दाखवत नसेल आणि पिल्लू तर अजून लहानच आहे. पण स्पर्श बोलतात ना... )
ReplyDeleteसोनाली, घरोघरी आदितेय आणि आर्यनच्या चुली (किस्से) !! :-)
ReplyDeleteआभार सुहास. पहिल्या किंवा इतरही अशाच प्रसंगांनंतर वाटतं की खरंच न्याय देता येतोय का :(
ReplyDeleteखूप आभार तन्वी. अग माझं हे ब्लॉग बडवण्यापासून ते चीडचीड करण्यापर्यंतचं सगळं सांभाळून घेते ती 'ती'. त्यामुळे नशीबवान तर मीच . जाउदे उगाच (कौटुंबिक) आभारप्रदर्शनाचा सोहळा व्हायच्या आत थांबतो आता :)
ReplyDeleteआभार क्रांति !! आणि ब्लॉगवर स्वागतही..
ReplyDeleteश्रीताई, अहो भरून पावतोय, नशीबवान आहे तो मी. ती न बोलता सगळं करत्ये म्हणून तर माझी ब्लॉग-वटवट (आणि एकूणच सगळं)चालू आहे. जाउदे आता मात्र अगदी थांबतो. पुन्हा सोहळ्यासारखं वाटायला लागलंय.
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteलेख वाचताना आमची मुलं लहान असतानाचे दिवस डोळ्यासमोर आले. आता मागे वळून पाहताना मात्र वाटतं, कसं निभावून नेलं आपण? बाकी मुलांचं निरागस हास्य ह्या सगळ्या खस्ता विसरायला पुरून उरतं.
-निरंजन
निरंजन, आम्हालाही सारखं असंच वाटत असतं की ही तर सुरुवात आहे पुढे काय होणार. "मुलांचं निरागस हास्य ह्या सगळ्या खस्ता विसरायला पुरून उरतं" हे तर अगदी अगदी सत्य. त्या निरागस हास्यामुळेच तर पूर्वी कमीत कमी ८ तास झोपणारा मी आता ४-५ तासांच्या झोपेनेही ताजातवाना होतो.
ReplyDeleteheramb.. its amazing.really.! the first incident struck me right to the core. beautiful!!
ReplyDeleteखुपच भावस्पर्शी आहे लेख.
ReplyDeleteतुम्ही तिघही भाग्यवान आहात दुसर काय बोलु...
दिप्ती आभार. Yeah the first one was the worst one. Even i was shocked then and again now while drafting it down.
ReplyDeleteदेवेंद्र, खूप आभार. तिघात भाग्यवान मीच रे !!
ReplyDeleteम्हणून शिनुने तिच्या एका पोस्टमध्ये लिहिलंय बघ नापास बाबा म्हणून....हे हे...पणतरी तुझी बरीच तपश्चर्या आहे रात्रीची त्याबद्दल अभिनंदन..आत्ताच अजून एक असा सर्दीचा आठवडा गेलाय आमचाही त्यामुळे पोस्ट ताजी वाटते....:)
ReplyDeleteबाय द वे...तुम्ही ह्युमिडिफ़ायर वापरता का?? कुलमिस्टवाला बाळांच्या दृष्टीने चांगला...काही नाही थोडी सिनियरकीचा सल्ला...चकटफ़ू....बाकी नेटवर सगळं वाचत असशीलच म्हणा तू...
आणि तुझा कौटुंबिक आभाराचा सोहळा सुरू होऊ नये म्हणून सांगते तुला आमच्या घरी कंपनी आहे...मी पण तशी थोडीफ़ार नशीबवान आहे...आजच नवर्याने केलेल्या चिली चिकनची शप्पथ...:)
बापरे कॉमेन्ट आहे की पोस्ट???
ओह मला त्या पोस्टची लिंक पाठव ना. अग त्या तपश्चर्येपायी झोपेचं खोबरं झालंय. पण आता सवयही झाली :) आता कळलं मी रात्री अपरात्रीही OL कसा असतो ते.
ReplyDeleteह्युमिडिफ़ायर वापरला थोडा फार. नेझल ड्रॉप्स झाले. पण सुरुवातीला फार त्रास झाला त्याला. आता सरावलाय..
बापरे खुपच नशीबवान आहेस... नव-याच्या हातचं चिली चिकन?? क्या बात.. !!
माझं आणि किचनचं १८० अंशात वाकडं आहे. काही करून खाण्याचा इतका कंटाळा आहे की एकटा असताना मी नुसतं पाणी पिऊनही झोपलोय कधी कधी :)
मस्त लिहलय. . ..तिसरा प्रसंग अन् शेवटच्या ओळी छान आहेत!!!
ReplyDeleteआभार मनमौजी. अजिबात विचार न करता जे आठवत होतं, सुचत होतं तसं लिहीत गेलो. :)
ReplyDeleteमस्त लेख आहे. लेख वाचून मला व. पुं चे एक वाक्य आठवले - As you become more and more personal, you become more and more Universal
ReplyDeleteआभार अभिजीत. अगदी बरोबर बोललास. पार्टनर मधलं वाक्य अगदी लागू होतंय इकडे. As you write more and more personal it becomes more and more universal. :) आणि गम्मत म्हणजे आज मी आणि बायको बोलत असताना अगदी हेच म्हणालो की फारच पर्सनल गोष्टी येतायत का ब्लॉगवर. :)
ReplyDeleteखूप छान लिहलं आहेस. माझ्या मावसभावाची आठवण झाली. बाबा दिवसभर नसतो ना, मग मुलगा त्याला अगदी चिकटून असतो. ’तीला’ ८ मार्च च्या या चांगल्या शुभेच्छा आहेत.
ReplyDeleteKeep Writing..
आभार मीनल आणि ब्लॉगवर स्वागत.. !!
ReplyDeleteअरे हो. हे महिला दिनाचं लक्षातच आलं नव्हतं. चल. आता जरा भाव मारून येतो :)
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर लेख...
ReplyDeleteयावेळेस वहिनींचे खास आभार, त्यांच्यामुळेच तु ब्लॉगला सुद्दा वेळ देउ शकतोस ना....
आभार आनंद.. अगदी खरं आहे. तुझे आभार पोचवतो मी तिच्यापर्यंत :-)
ReplyDeleteपोस्ट छान लिहिली आहेस रे नेहमीप्रमाणेच
ReplyDeleteअशा प्रसंगाचा जास्त अनुभव नाही आम्हाला अजून
बाकी छोटा साहेबांचा फोटो पाहण्याचा योग काढे येणार ?
आभार विक्रम. येईल.. येईल अनुभव हळूहळू :) .. अरे या पोस्ट मधेच टाकणार होतो फोटोज. पण ही पोस्ट थोडी सिरीयस वाटल्याने नाही टाकले. पुढच्या एखाद्या हलक्या फुलक्या पोस्ट मध्ये नक्की टाकतो.
ReplyDeleteखुपच सुंदर आहे पोस्ट. आज तिसऱ्यांदा वाचतोय. काय कॉमेंट लिहावी तेच समजल नाही . जुने दिवस आठवले.. :)
ReplyDeleteखरं म्हणजे बरंच काही लिहायचं होतं मनात पण सोडून दिलं.. जाउ दे.. फारच पर्सनल गोष्टी येताहेत ना... म्हणून..
ReplyDeleteआभार काका.. कमेंट दिली नाहीत तरी मला माहित आहे की तुम्ही माझ्या पोस्ट्स नेहमी वाचता. That's enough for me..
ReplyDeleteहो. मला पण पोस्ट टाकण्यापूर्वी क्षणभर वाटून गेलं की आपल्या नसलेल्या पेरेंटिंग स्किल्सचं आपणच प्रदर्शन मांडतोय की काय. पण हे प्रसंग नकळत घडलेले असतात. त्यामुळे दोष देण्या/घेण्याची गरज नाही असं मला वाटतं. आणि वरची अभिजीतची कमेंट वाचलीत ना? वपु म्हणाले ते १००% सत्य आहे. सगळ्यांच्या पर्सनल गोष्टी सारख्याच असतात.
जे "बरंच काही लिहायचं होतं" त्यावर टाका ना एक पोस्ट... !
ReplyDeleteKhoop chhaaan aahe post.
ReplyDeleteI think, Tu ek khoop changalaa baba aahes........
Aaani tu Aaditey che photos takanaar hotas na???
Mi wat baghatyey....
wow....I guess I am very late to read this "touchy" nicely written blog...Good job...!!! Anu is very lucky to have a hubby who values her doings :) And lucky Aaditey too....And u too :)
ReplyDeleteआभार मैथिली. :) Hope Aaditey will think in line with you once he grows up :) .. अग आदितेयचे snaps याच पोस्ट मध्ये टाकणार होतो खरं तर पण जरा सिरीयस झाली पोस्ट. म्हणून नाही टाकले. पुढच्या एखाद्या हलक्या फुलक्या पोस्ट मध्ये नक्की टाकेन. बाकी? पेपर कसे गेले?
ReplyDeleteआभार रश्मी.. Let me ask if Anu agrees with you.. ha ha .. kiddingo.. BTW am the Lucky No 1 in the lot :)
ReplyDeletePapers changale gele.........Now I m the only one who is totally free...... :)
ReplyDeleteसही.. व्हेरी गुड !! :D
ReplyDeleteरात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग.. अशीच गत असते ना रे!!! लिही..लिही.. लवकरच कामाला येइल मला.. हेहे... ;)
ReplyDeleteअरे आणि हे म्हणजे असं युद्ध ज्यात आपण हरणार हे आधीच माहित असतं :) .. match fixing... !! :D
ReplyDeleteआभार अनामिक..
ReplyDeleteअजुन एक रच्याक् ...
ReplyDeleteधन्यु सिद्धार्थ..
ReplyDeleteheramb.... kay bhari lihitos re... keep it up...
ReplyDeleteअरे वा निलेश... तुला इथे बघून बरं वाटलं.. प्रतिक्रियेबद्दल आभार..
ReplyDelete