मला बाथरूम आवडतं. दुसरीतल्या मुलाने "माझा आवडता प्राणी" या विषयावर निबंध लिहिताना "मला गाय आवडते कारण की " अशासारखी सुरुवात केली पोस्टची म्हणून कंटाळू नका. पण मला दुसरी काही सुरुवात आत्ता तरी सुचत नाहीये. पोस्ट संपेपर्यंत एखादी चांगली सुरुवात सुचली तर बदलेनही.**
असो पण खरंच सांगतो मला बाथरूम आवडतं. एकदम मस्त वाटतं तिथे. छान. मोकळं. छान मोठ्ठा आरसा. टूथपेस्ट, माउथवॉश, शेव्ह जेल, परफ्युमस, बॉडी स्प्रेज, आंघोळीचे साबण, कपड्याचे साबण, बॉडी वॉश, शांपू, कंडीशनर, लॉंड्री डीटर्जंट, सॉफ्टनर, एअर फ्रेशनर, सेंटेड कँडल्स (ही नवीन एन्ट्री आमच्या बाथरूम मधली) अशा कित्येक गोड, उग्र, प्रसन्न, ताजंतवानं करणाऱ्या सुगंधी वस्तूंचं भांडारच उघडलेलं असतं तिथे. प्रत्येक गोष्ट बघा यातली. प्रत्येकीला स्वतंत्र असा सुगंध (कृत्रिम का होईना) आहे.
दुसरी आवडती गोष्ट म्हणजे समोरच्या भिंतीला टांगलेला तो कृत्रिम वरुणदेव. आपला शॉवर हो. कितीही दमून भागून कंटाळून आलो तरी एकदाका त्या सहस्त्रधारांनी बरसणाऱ्या शॉवर खाली उभं राहिलं की कसं एकदम मोकळं वाटतं. नितळ वाटतं.
मला माहित्ये की कृत्रिम, छोट्या छोट्या गोष्टीतून उगाचंच काहीतरी आनंद बिनंद कसा मिळतो ते सांगण्यासाठी हे पोस्ट लिहिलंय असं वाटतंय. पण ते तसं नाहीये. आणि तसं वाटत असेल तर ते माझ्या शब्दनिवडीच्या मर्यादेमुळेच आहे. मी कुठेही आणि कधीही हे असं निव्वळ मुर्खासारखं आणि कर्मदरिद्री विधान करणार नाही की पावसापेक्षा शॉवर श्रेष्ठ किंवा गुलाबाच्या सुगंधापेक्षा रूम फ्रेशनरचा सुवास श्रेष्ठ. पण या धावपळीच्या, शरीरातली सगळी क्रयशक्ती आणि मेंदूतली सगळी विचारशक्ती, कल्पनाशक्ती शोषून घेणा-या अरसिक, बोजड आयुष्यात कुठलीही (कृत्रिम का होईना) हिरवळ दिसली की माणूस थबकणारच ना? तेव्हा हा सुवास, हा रंग, हा नाद हे नैसर्गिक कि कृत्रिम अशा अनाठायी विचारात अडकून हा सहज मिळणारा आनंदही नाकारणं म्हणजे आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांना आपणहून लाथाडण्यासारखंच नाही का?
असो.. उगाच भरकटलो भलतीकडेच. तर मुद्दा हा की निव्वळ हरतऱ्हेचे सुवास, रंग, जलधारा हे बाथरूमकडे आकृष्ठ होण्याचं कारण नाहीच आहे मुळी. मूळ मुद्दा वेगळाच आहे. (नमनाचं ८-१० घडे तेल संपवून लागला बाबा हा एकदाचा मार्गी.) लोकं जशी महत्वाचे निर्णय घेताना, काही ठरवताना थिंकिंग कॅप घालतात असं म्हणतात तसं हे बाथरूम म्हणजे माझी थिंकिंग रूम आहे. अर्थात थिंकिंग कॅप मधलं थिंकिंग हे जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, ठरवून केलेलं असतं. पण माझ्या थिंकिंगरूम (वाचा बाथरूम) मधलं होणारं थिंकिंग, सगळे विचार, आयडियाज हे अर्थातच न ठरवता, अपघाताने झालेले असतात. पण बाथरूम मधेच. स्थळसामर्थ्य असेल :-)
मैत्रिणीला-बायकोला (हे एकाच व्यक्तीचं अनुक्रमे भूतकाळ आणि वर्तमानकाळातलं वर्णन आहे. Some more general knowledge :) ), किंवा घरातल्या इतरांना, खूप जवळच्या मित्रांना दिलेली असंख्य सरप्रायझेस, मस्त्या, पार्ट्या, दंगा, धिंगाणा या साऱ्या साऱ्या कल्पनांचं जन्मस्थळ म्हणजे हे बाथरूम. आणि मला या एवढ्याशा "मूर्ती लहान पण कीर्ती महान" अशा जागेत असे काही एकेक भन्नाट प्लान्स सुचतात हे मलाही तसं उशिराच लक्षात आलं. म्हणजे पूर्वी पण ते प्लान्स डोक्यात यायचे पण त्याची अंमलबजावणी करायचो नाही. आळसामुळे म्हणा, भीतीमुळे म्हणा. पण एकदा जे (बाथरूम मध्ये) सुचलं ते अगदी तसंच्या तसं केलं आणि एकदम सुपरहिट झालं. सगळ्यांना आवडलं एकदम. त्याचं काय झालं कि मागे (वीसेक वर्षं होऊन गेली असतील या घटनेला) एकदा माझ्या आजीची साठी शांत करायची असं सगळ्यांनी ठरवलं. साड्या, भेटवस्तू, पुस्तकं, साखरेची तुला असं काय काय ठरवत होते आई बाबा आणि काका काकू वगैरे. आणि आम्ही (स्वयं या अर्थी) काय सगळं बघत ऐकत होतो. सकाळी आंघोळीला गेलो आणि अचानक डोक्यात विचार घुसला "अरे सगळी मोठी लोकं काय काय देतायंत आजीला. आपण नातवंडानी पण दिलं पाहिजे काहीतरी". मग सरळ जाऊन आईला सांगितलं कि मला असं असं करावसं वाटतंय. तेव्हा पॉकेटमनी वगैरेची पद्धत नसल्याने (आणि अर्थात आमच्या घरात तर ती कधीच नव्हती) सुचलेले विचार अंमलात आणण्यासाठी आईला सांगणे हा एकच पर्याय होता. तर आंघोळ करताना सुचलेल्या (हे मुख्य त्यातलं) त्या विचाराप्रमाणे आम्ही सगळ्या नातवंडानी मिळून आजीला एक साडी घेतली आणि ती साडी आजीला आणि ती कल्पना घरातल्या सगळ्यांना आवडल्याने आमचा (पुन्हा स्वयं या अर्थी) बाथरूममधल्या विचारप्रक्रियेवरील अंमलबजावणीने मिळणाऱ्या यशावर अगदी पूर्ण विश्वास बसला. त्यानंतर वर म्हटल्याप्रमाणे त्या मालिकेत सरप्रायझेसचे अनेक यशस्वी प्रसंग चढत्या भाजणीने ओवले गेले. त्या मालिकेतला लेटेस्ट एपिसोड म्हणजे गेल्या वर्षीची अचानक केलेली स्वदेस-ट्रीप. एकदम अचानक, गुप्तपणे कोणालाही न सांगता शेवटच्या क्षणी ठरवलेली. अर्थात या ग्रँड एपिसोड्सच्या मध्ये मध्ये थोडे थोडे कविता, नवीन पोस्ट सुचणे वगैरे वगैरे सारखे छोटे छोटे प्रसंगही आहेत म्हणा. अर्थातच प्रत्येक बाथरूम-ट्रीप नंतर काही मी एखादी कविता, लेख, पोस्ट किंवा एखादं नवीन सरप्राईज असलं काही पाडत ("कविता पाडली" च्या तालावर हे वाचावे) नाही आणि अर्थातच एवढ्या साधा कॉमनसेन्स वापरून कळणाऱ्या गोष्टीचा उल्लेखही इथे करणं वेडेपणाचंच आहे. तरीही..
पण सगळ्याच कल्पना या आपल्यालाच (पुन्हा एकदा स्वयं. आयला किती बोलतो हा) सुचलेल्या असल्याने त्यात मोठी/छोटी कल्पना असं काही नसतंच.
तर ही नेहमीच्या कल्पना सुचण्याच्या ठिकाणावर लिहिण्याची कल्पना नेहमीच्या कल्पना सुचण्याच्या ठिकाणी न सुचता (थोडक्यात हे पोस्ट लिहावं हे बाथरूममध्ये सुचलेलं नाही) ऑफिसमध्ये सुचली आणि तरीही मी ती (बाथरूमची माफी मागून) प्रत्यक्षात आणतोय. बाथरूम हेच अजूनही थिंकिंग रूम आहे कि मी आता बाहेर विचार करायलाही तेवढाच सक्षम आहे हे मिळणाऱ्या प्रतिसादावरून कळेलच :)
**पोस्ट संपवल्यावरही यापेक्षा चांगली सुरुवात आठवण्याचा कंटाळा आल्याने सुरुवात तशीच ठेवली आहे
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन
श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवी...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
-
** भाग १ इथे वाचा आता उरलेल्या तीन वीरांविषयी बोलू. हे तीन वीर म्हणजे रॉस गेलर, चँडलर बिंग आणि जोई ट्रिबियानी.... रॉस गेलर (डेव्हिड श...
बघ मला वाटतं कितीही लहान असली तरी बाथरुम अशी एक जागा आहे जिथे आपल्याला पूर्ण एकांत मिळतो किंवा मिळू शकतो म्हणून मग कल्पनांचे डोंगर रचता येतात..मला तर शांतपणे गाणी ऐकणंही आवडतं तिथे (मागेच म्हटलंय तसं मी) म्हणजे मन शांत होतं आणि शांत मन कल्पनांच माहेरघर काय??
ReplyDeleteहम्म्म..BTW थिंकींग रूममध्ये जाऊन बाकीच्या गोष्टी पण करतोस अशी एक माफ़क अपेक्षा...ही ही.....
हो ना. एकदम मान्य. वाचलं ते तुझ्या कालच्या पोस्ट मध्ये.
ReplyDeleteअग कोणाची सिंगिंग रूम, कोणाची थिंकिंग रूम पण अर्थात बेसिक गोष्टी झाल्यानंतरच .. ;-)
देजावु हेरंब, माझेही बहुतेक निर्णय बाथरुम मध्येच पक्के होतात.
ReplyDeleteबरंय तुझ्यामुळे मला आज त्याची जाणिव झाली...
अरे वा आनंद. "ग्रेट माइंडस थिंक अलाईक" असं म्हणून आपण आपापली पाठ थोपटून घेऊया. :-)
ReplyDeleteबाथरुम मधे भरपुर वेळ म्हणजेकमित कमी अर्धा तास.. जास्तित जास्त कितिही.. ह्याचं कॉंट्रॅक्ट आमच्या धाकट्या कन्यकेला दिलंय.. आमचा घसा कोरडा पडतो.. अगं , ऑफिसला जायचंय, लवकर बाहेर ये.. यावर शांतपणे उत्तर असतं, दुसऱ्या बाथरुम मधे जा.. तिथे उच्चासनावर बसुन शांतपणे पेपर वाचत दुसरी कार्टी असते.. म्हणजे आमची वाट!!!!
ReplyDeleteबाथरुम म्हणजे आन्हिक आवरायची जागा.. एवढंच माझ्या साठी.. :०
पोस्ट मस्त आहे :०
सध्या तरी बाथरूम वर आमचंच राज्य आहे त्यामुळे ठीके. आणि नंतर काय होईल याचं भविष्यकथन तुम्ही केलंतच :)... कालांतराने माझी पण बाथरूमची व्याख्या बदललेली असेल बहुतेक. पण तोवर यनजॉय :-)
ReplyDeletemalahi batharoom aavadata
ReplyDeleteआर्किमिडिजनंतर तूच :D
ReplyDelete@सुषमेय, अरे वा बरेचजण दिसताहेत बाथरूम लव्हर्स !!
ReplyDelete@गौरी, युरेका !! एकदम आवडला कमेंट :)
ReplyDeleteआपली तर बाबा ती सिंगीग रूम आहे.मला नवे विचार,कल्पना कधी सुचतात माहिती आहे झोपतांना..खरच..झोपायच्या आधी फ़ुल स्पीड्ने काम करतो माझा मेंदु...असो पोस्ट एकदम झक्कास...हे पोस्ट लिहाव हे तुम्हाला बाथरूम मध्ये सुचलेल नाही म्हणजे तुम्ही आता बाहेरही विचार करण्यास सक्षम झाल्याच दिसुन येते :)
ReplyDeleteहुर्रे... आज कमेंट गेली...
ReplyDeleteहो ना देवेंद्र. ब-याच जणांची ती सिंगिंग रूमच असते. पण माझी बाबा थिंकिंग रूमच :) .. झोपायच्या आधी मेंदू फुल स्पीड ने काम करतो हे अफाट नवीन आहे माझ्यासाठी.. सहीये.
ReplyDeleteआणि बरं झालं बाबा एकाने तरी उत्तर दिलं माझ्या शेवटच्या ओळीत विचारलेल्या प्रश्नाचं :)
जरा बऱ्या पोस्टची वाट बघत होती बहुतेक:)
ReplyDeleteआई शप्पथ..एकदम शेम टू शेम आहे हे... अगदी अलीकडे मला पण माझे बहुतांश क्रिएटीव (!!!) विचार हे बाथरूम मध्येच सुचतात असे जाणवले होते...यावर पण पोस्ट होऊ शकते हे पण कधी ध्यानात आले नव्हते...गुड गुड...
ReplyDeleteनिखिल, ब्लॉगवर स्वागत ! थोडक्यात आपल्या इथे बाथरूम चा सिंगिंग रूम, थिंकिंग रूम ई ई म्हणून वापर करणारे बरेच जण आहेत तर :) ..
ReplyDeleteआणि हलकंफुलकंच लिहायचं झालं तर अगदी कशावरही लिहू शकतो. थोडं सिरीयस, तात्विक, वैचारिक लिहायचं झालं तर मात्र वेळ लागतो. आत्ताच तुमच्या ब्लॉगवर डोकावून आलो. छान वाटतोय. मस्त लिहिता तुम्ही.
हेरंब, तुझे विचार एकदम पटले. बाथरूम हि आपली हक्काची जागा असते.
ReplyDeleteआणि हो, एकाद्या गोष्टीपासून आनंद मिळत असेल तर ती गोष्ट नैसर्गिक आहे का कृत्रिम याची चिंता का करायची ? ती करायला परुळेकर आहेतच की :P
अभिजीत, वेलकम तो द बाथरूम-लव्हर्स-क्लब.. हा हा हा.. आणि ते परुळेकरांचं एकदम म्हणजे एकदम पटलं.. :-)
ReplyDeleteलईच !!
ReplyDeleteमला ह्या पोस्टचे अपडेट्स आत्ता मिळाले..म्हणुन कमेंटते..
पोस्ट एज युज्वल मस्त..बाथरुम माझ्या साठीही गाण्याची जागा..निवांत सुर लावुन गायचे..:P
हाहाहा.. अग ही खूप जुनी पोस्ट आहे :)
ReplyDeleteधन्यवाद.