Thursday, January 7, 2010

अँड ही इज ...................

गेल्या आठवड्यात असंच आदितेयशी खेळत बसलो होतो (म्हणजे तो त्याचा त्याचा खेळत होता आणि मी लॅपटॉपशी खेळत होतो) तर अचानक तो नेहमी प्रमाणे गुरगुरायला लागला. हो. त्याचं काही मनाविरुद्ध झालं, कंटाळा आला, "मला उचलून घे, कडेवर घे" अशा अर्थाचं सांगायचं असेल, किंवा आपण त्याला कडेवर घेऊन बसलो असू पण त्याला वाटतंय कि आपण त्याला कडेवर घेऊन फिरवावं या आणि अशा इतर अनेक (काही समजलेल्या, काही न समजलेल्या) कारणांनी साहेब गुरगुरायला लागतात. तर त्यादिवशी मी आपलं अंदाजाने त्याला कडेवर घेतलं (अंदाजाने म्हणजे गुरगुरण्याच्या कारणाच्या अंदाजाने म्हणतोय. कडेवर मी त्याला अंदाजाने नाही अगदी व्यवस्थितच घेतलं) आणि फिरवायला लागलो. "अगदी गोड दिसतो", "गोबरे गाल आहेत", "डोळे आई सारखे आहेत", "चेहरा आईसारखा आहे" अशा अनेक विशेषणांच्या कौतुकाचं कोंदण लाभलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे मी बघत होतो. अचानक साहेब पुन्हा गुरगुरले. अचानक माझी तंद्री भंग झाली आणि मला पटकन लक्षात आलं. यस. युरेका. म्हणजे... तो कशासाठी गुरगुरतोय ते नाही पण दुसऱ्या एका विचाराची ट्यूबलाईट लागली. म्हटलं हा असा गुरगुरतो कसा काय. आय मीन ही इज सो ओरिजनल. तो ते तसं कोणाचं बघून शिकला असण्याची शक्यताच नाही. जस्ट ९ महिन्याचा आहे तो. ही इज जस्ट टू यंग फॉर दॅट. म्हणजे ही त्याची स्वतःची सवय आहे. स्वतःची प्रतिक्रिया, प्रतिक्षिप्त क्रिया आहे. त्या ओरीजनॅलिटी साठी युरेका म्हटलं मी. मग मला आपल्यावर सहज, नकळतपणे झालेल्या होणाऱ्या इतरांच्या सवयी, लकबी, आवडी-निवडी, हसण्या-बोलण्याच्या, हातवारे करण्याच्या पद्धतींचा प्रभाव आठवून गेला. किंवा आपण पूर्वी अनेकदा जाणून बुजून उचलण्याचा प्रयत्न केलेल्या क्रिकेटप्लेयर्स/मुव्ही स्टार्स यांच्या हेअर स्टाईल्स्, कपडे, पिक्चरमधले डायलॉग्स हे सगळं आठवत गेलं आणि त्यामुळे तर मला त्याची ती ओरीजनॅलिटी अजूनच भावली. मग मी हळू हळू त्याच्या एकेका सवयीची मी यादी केली.  अर्थात मनातल्या मनातच. कागद-पेन, नोटपॅड (notepad.exe वाला) वगैरे घेऊन नाही. मग माझ्या लक्षात आलं की अरे याच्या तर सगळ्याच सवयी ओरिजनल. सगळंच स्वयंभू, सारंच स्वतःच. कारण त्याच्या राज्यात अजून कॉपी, इतरांच्या सवयी, त्यांचे प्रभाव या सगळ्याला जागाच नाही, कोणाशी स्पर्धा नाही, कसली घाई नाही. जाम आवडलं ते.
अर्थात हे सगळं मनात येणारा मी पहिलाच नाही किंवा मी काही हे नवीन शोधलंय मुलांबद्दल असं मी म्हणत नाहीये. पण माझ्यासाठी तरी ते एकदम नवीनच आहे. म्हणजे आपल्या कोलंबससारखं. कोलंबसने शोधायच्या आधीही अमेरिका तिथे होतीच. फक्त ती त्याला बाकीच्यांच्या आधी सापडली. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाचा असा एकेकदा किंवा अनेकदा कोलंबस झालेला असणारच आहे. मी फक्त त्या कोलंबसचा एक काऊंट वाढवला इतकंच.

त्यामुळे आता कोणी त्याची डोळे, गाल, चेहरा इ इ मस्त आहे म्हंटलं की मी त्या यादीत अजून एक गोष्ट अॅड करतो. ती म्हणजे "And he is original" :-)

20 comments:

  1. हा..हा.. :)
    अँड ही इज ओरिजिनल..

    ReplyDelete
  2. यस आनंद. ही इज ओरिजिनल.. :D :D :D

    ReplyDelete
  3. अपर्णा, छान नाही लेट आहे.. ९ महिने लागले हे सुचायला :)

    ReplyDelete
  4. ही इज ओरिजिनल..
    जमतंय रे मराठी टायपिंग आता.. :)

    ReplyDelete
  5. यस काका.
    काय माहित काल काय प्रोब्लेम झाला होता ते.

    ReplyDelete
  6. ही इज ओरिजिनल...
    ’कोलंबस’ चांगला शोध आहे हा.

    ReplyDelete
  7. अवलोकन सहीच आहे रे.:)

    ReplyDelete
  8. Yes, we train children to loose originality and make them 'normal'(!!) human beings! :(

    ReplyDelete
  9. देवेंद्र, सध्या कोलंबसला असे बरेच शोध (अपघातानेच) लागताहेत. :) .. त्याबद्दल पुन्हा कधीतरी लिहीनच

    ReplyDelete
  10. आभार भाग्यश्री ताई..

    ReplyDelete
  11. एकदम बरोबर बोललात aativas (म्हणजे सविता का?). याची ओरीजनिलिटी अशीच राहावी अशी इच्छा आहे. प्रत्येकाचीच असते म्हणा. बघुया कसं जमतंय ...

    ReplyDelete
  12. मस्त आहे रे......खरय तुझं
    ही इज ओरिजीनल.....पोरगं खुश होणार आहे मोठेपणी तुझे लेख वाचून....

    ReplyDelete
  13. ह्म्म्म. शेवटी बापावारच जाणार ना ;-) .. On serious note, मला अक्च्युअली असं म्हणायचं होतं की प्रत्येक मुल हे ओरिजिनलच असतं. कारण त्याच्या प्रत्येक सवयी, लकबी या त्याच्या स्वतःच्या असतात. त्याला स्वतःला सुचलेल्या. कोणाच्याही न उचललेल्या. त्याचं स्वतःच ईंस्टींक्ट.. !!

    ReplyDelete
  14. मस्त साहेबा, किती सुरेख वर्णन केलस.

    पण नाराज आहे सॉलिड, तू अजूनही एकही फोटो टाकला नाहीस आदितेयचा. :(:(:(

    ReplyDelete
  15. आभार सुहास. अरे ही पोस्ट मी ब-याच आधी टाकली होती. बझबाबाने ती आज का दाखवली काय माहित. मला अजून पण १-२ जणांचे रिप्लाय आले. अरे आणि फोटो नक्की टाकणार आहे पण नुसते टाकण्यापेक्षा काहीतरी लिहून टाकायचा प्लान आहे.

    ReplyDelete
  16. तुझा पोस्ट सुद्धा ओरिजिनल आहे रे...!!! ब्लॉग वाचायला घेतला आहे आता... :) कमेंट की बारिश होऊ शकते ... हेहे...

    ReplyDelete
  17. धन्यु रोहन. येऊदे कमेंट्स की बारिश. हम तय्यार हय... :)

    ReplyDelete
  18. अजुन एक रच्याक्...
    तुला सूचायला ९ महिने लागले आणि तू हे लिहल्यावर मला वाचायला १ वर्ष लागले... ;-)

    ReplyDelete
  19. हेहे सिद्धार्थ.. आभार्स.. एक वर्षाने का होईना पण वाचलंस आणि आवर्जून कमेंट दिलीस यातच सगळं आलं.. आभार्स रे..

    ReplyDelete

पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन

श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवी...