Tuesday, March 27, 2012

लिहावे फाटके !!


ब्लॉगिंगची ताकद जगभरातल्या नेटकर्‍यांना अगदी चांगल्या प्रकारे समजूनही आता निदान दहा एक वर्षं सहज झाली असावीत. अगदी मराठीतही सशक्त, जोमदार, दर्जेदार, कसदार लिखाणाने ओतप्रोत भरलेले ब्लॉग सुरु होऊन निदान अर्धं तप तरी उलटलं असावं. होता होता हे लिखाण-- माहितीपर, कथा, कविता, ललित, सामाजिक-- इत्यादी इत्यादी सगळ्या प्रकारचं लिखाण मराठी ब्लॉग्जवर विपुल प्रमाणात आणि सातत्याने दिसायला लागलं. हळू हळू निरस, रटाळ, अशुद्ध, चुकीचं आणि कित्येकदा खोटं लिहिणाऱ्या मराठी वर्तमानपत्रांनाही (मुद्दाम वार्ताहर किंवा बातमीदार न म्हणता वर्तमानपत्र म्हणतोय. कारण वृत्तपत्र हे संपादकाचं राहिलं नसून भांडवलदाराचं झालं आहे हे केसरी/नवाकाळच्या अग्रलेखांपासून अधःपतित होऊन ते थेट अनावृत नटव्या आणि त्यांच्या आवडत्या संभोग सवयी इत्यादींवर खमंग चर्चा करण्यापर्यंत घसरणाऱ्या महामुर्ख टाईम्स सारख्यांच्या डाव्या कोपर्‍यातल्या चौकोनांनी सिद्ध केलंच आहे.) एव्हाना खडबडून जाग आली.

कारण कित्येक ब्लॉगवर आढळणारं दर्जेदार, माहितीपर लेखन हे तथाकथित, सोम्यागोम्या आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या 'नेटक्या' टिनपाट पत्रकारांच्या 'फाटक्या' शब्दांनी भरलेल्या 'थोटक्या' मराठीतल्या लिखाणा(!!!!!) पेक्षा कैक पटीने वास्तव, खरंखुरं आणि निष्पक्षपाती होतं. कित्येकदा एखाद्या नियमित लिहिल्या जाणाऱ्या ब्लॉगवरचा एखादा वाईटातला वाईट लेख हाही एखाद्या चांगल्या वर्तमानपत्रातल्या (सायटेशन नीडेड) शिकाऊ आणि तरुण स्तंभलेखकाच्या तथाकथित चांगल्यातल्या चांगल्या लेखापेक्षा खूप चांगला आणि माहितीपर असतो हे सहज ध्यानात यायला लागलं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ब्लॉगर्सना ना भांडवलदाराच्या बापाची भीती ना जाहिरातदाराच्या पक्षाबद्दलचं प्रेम. असो.

तर होता होता अशा चांगल्या, दर्जेदार, वाचनीय ब्लॉग्जची संख्या आणि वारंवारता इतकी वाढायला लागली की आपल्या समाजाचा चौथा बांबू असलेल्या... ओह सॉरी सॉरी स्तंभ म्हणायचं होतं मला... तर बांबू.. सॉरी खांब.. सॉरी स्तंभ.. सॉरी बांबू असलेल्या वर्तमानपत्रांना त्यांची दखल घेणं भागच पडलं. फेकमत सारख्या कित्येक पेप्रांनी सुरुवातीला चांगल्या ब्लॉग्जवरचे चांगले लेख मूळ ब्लॉगलेखकाला न विचारता सरळसोटपणे उचलून आपल्या रंगीबेरंगी, रंगतरंग, फनडे, एन्जोय, कलर, याहू इ इ इ एखाद्या नावाच्या पुरवणीत बिनधास्त छापूनही टाकले. त्यानंतर ब्लॉगर्सनी अचूक नसा दाबून ते चौर्यकर्म उघडं पाडून त्या पेप्रांना वाकायला लावल्याच्याही घटना घडल्या. परंतु कालांतराने वर्तमानपत्रं शहाणी झाली आणि ब्लॉगर्सही थोडे समंजस झाले.

त्यानंतर ब्लॉगवरचे निवडक लेख, लोकप्रिय ब्लॉग्जच्या ओळखींची सदरं अशा अनेक प्रकारे ब्लॉग्ज आणि ब्लॉगर्स मराठी वृत्तापत्रांत हजेरी लावायला लागले. मटा, सकाळ, सामना, पुढारी, प्रहार, कृषीवल इ. जवळपास सगळ्या वर्तमानपत्रांनी ब्लॉगर्सची दखल घ्यायला, त्यांना आपल्या वृत्तपत्रात स्थान द्यायला सुरुवात केली.

तर जवळपास सगळ्या म्हणण्याचं कारण हे की काही कारणाने लोकसत्ताचे डोळे अजून उघडले नव्हते किंवा त्यांना ब्लॉग माध्यमाच्या बळाची जाणीव तरी झाली नव्हती. कदाचित कु(सु)मार केतकरांच्या बाहेर पडण्या(काढण्या??)ने झालेल्या शुद्धीकरणानंतर त्यांना ती झाली असावी. पण तोपर्यंत वर म्हटल्याप्रमाणे ब्लॉगर्सचे लेख, ओळख, मुलाखती वगैरे सगळे प्रकार इतर वृत्तपत्रांनी करून झाले होते. त्यामुळे काय करायचं हा एक मोठा प्रश्नच होता.

अशा वेळी चिमूटभर हळदीने पिवळा झालेला/ली 'अभिनव' कल्पना 'गुप्त' रुपाने साकारणारा एक फाटक्या.. सॉरी नेटक्या मताचा एक पत्रकार संपादक साहेबांच्या केबिनात जाऊन धडकला/ली. बरं हे ला/ली यापुढे अध्याहृत आहे. दर वेळी लाली करत बसायला वेळ नाहीये मला. हो हो ब्लॉगर असलो तरी..

तर गुप्ताने संपादकसाहेबांसमोर एक एकदम सोप्पी, बिनखर्चाची, बिनअकलेची, बिनापरिश्रम करता येणारी अशी एक अभिनव योजना मांडली. तो म्हणाला "साहेब, एकदम सोप्पं काम आहे. आपल्याला डोकं लावायची गरज नाही. सगळा माल रेडीमेड मिळेल. !!!" संपादकसाहेबांनीही फुकट मिळतंय म्हंटल्यावर गुप्ताचा माल कुठून येणार आहे याची काहीही चौकशी न करता बिनधास्त होकार देऊन टाकला. झालं. लगेच गुप्ताने दुसऱ्या दिवशीच्या पेप्रात एक एकदम नवीन कोरं सदर सुरु केलं. कोरं म्हणजे एकदम साफ कोरं. तुळतुळीत एकदम. एकदम रिकामं. त्याच्याकडे त्या सदराबद्दलची, किंवा त्याच्याकडे अ(न)सणाऱ्या संबंधित डेटाबद्दलची काहीही माहिती नव्हती. पण या माहितीची आपल्या माहिती नाही हे कसं लपवावं याची मात्र त्याला चांगली माहिती होती.

लहानपणापासून विविध भारतीवर "इस गाने की मांग की है झुमरी तलय्यासे बाबुराव प्रेमजी, वत्सला प्रेमजी, गानू प्रेमजी, इशा प्रेमजी, भागलपूरसे चंद्रेश कांकेरा, भीमी कांकेरा, राजा कांकेरा और रीझी कांकेराने" हे ऐकायची सवय असलेल्या गुप्ताने तीच आयडिया तशीच्या तशी वापरायचं ठरवलं आणि दिला डकवून पहिल्या दिवशीचा मजकूर !!

================================================

हे ‘आपण सर्वानीच करून पाहण्या’ची पद्धत सोपी आहे. तुम्हाला मराठीतला वा इंग्रजीतला एखादा ब्लॉग किंवा नियतकालिकांच्या वाचनाला पर्याय ठरू शकेल, असं वारंवार अपलोड होणारं समकालीन लिखाण देणारं संकेतस्थळ पसंत असेल, तर त्यावरला ताजा लेख आम्हाला आठवडाभरात ईमेलनं कळवायचा. लगेच सोमवारी त्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न इथं केला जाइैल. अशा शिफारशी बऱ्याच येऊ शकतात आणि त्यातून निवडही करावी लागेल.. ते करण्यासाठीचे निकष असे : 
- आपण शिफारस केलेला लेख ताजाच असावा, 
- आपण शिफारस केलेलं संकेतस्थळ वा ब्लॉग नेहमीच वाचनीय आणि ‘ओरिजिनल’ किंवा स्वलिखित मजकूर देतं, असा विश्वास तुम्हाला हवा. अनेक ब्लॉग्ज मजकूरदेखील ‘कटपेस्ट’ करतात, म्हणून ही अट! 
- हे संकेतस्थळ वा हाच ब्लॉग का आवडतो, याबद्दल आपलं जे म्हणणं असेल, तेही निवडीसाठी गृहीत धरलं जाईल. 
ही पथ्यं पाळून केलेल्या शिफारशींची दखल इथं घेतली जाणार नाही, असं सहसा होणारच नाही. पण झालं तर, ईमेलनं पाठपुरावा करण्याचा हक्क आहेच तुमचा! 
उत्तमतेचा हा शोध कुणा एकटय़ाला घ्यायचा नाहिये, असं ठरवूनच हा सामूहिक प्रयत्न. 


================================================

अरेच्चा म्हणजे ब्लॉग शोधायचा, तो वाचायचा, तो आवडतो की नाही हे ठरवायचं, आवडला नाही तर अजून ब्लॉग्ज शोधायचे, ब्लॉग आवडला की का आवडला हे लिहायचं.. हे एवढं सगळं वाचकांनी करायचं आणि एवढं करूनही तुमची ही एवढी मेहनत पाण्यात जाणार नाही याची मुळीच खात्री नाही. आणि समजा गेलीच पाण्यात तरी आम्ही एवढ्या मोठ्या मनाचे गुप्तोत्तम आहोत की आम्ही तुम्हाला आमचा इमेल आयडी देतोय की. त्याच्यावर करा की पाठपुरावा. घ्या !! आहे की नाही? घरबसल्या बिनभांडवली, बिनामेहनतीने लिखाण गुप्तांच्या पदरात. त्यानंतर दोन चार क्लिक करून अर्धा/पाऊण लेख वाचून झाला की मग गुप्तेबाई/बुवा त्या ब्लॉगरवर, त्याच्या लिखाणावर, चुकून झालेल्या एखाद्या र्‍हस्व/दीर्घाच्या चुकीवर, लेखनाच्या पद्धतीवर, शब्दांच्या निवडीवर, भाषेच्या साधेपणावर, प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीवर अशा ज्या दिसेल त्या प्रत्येक गोष्टीवर शेलक्या विशेषणांचा शब्दबंबाळ मारा करणार.

च्यामायला झाला की लेख तयार. आणि ब्लॉग वाचणारे आणि ब्लॉगर्स काय पैश्याला पासरी मिळतात की. "कुठलाही ब्लॉग द्या, म्या त्याची चिरफाड करून दाखिवतो/ते की नाय ते बगाच" अशा थाटात लेख (!!!!) लिहायला कितीशी अक्कल लागते न् कितीसा अभ्यास लागतो?? आणि आपण फाडलेला प्रत्येक ब्लॉग/ब्लॉगर काही प्रतिहल्ला करणार नाही की स्वतःची बाजू मांडणार नाही की पत्र लिहून छळणार नाही. आणि लिहिलंच एखाद्याने पत्र तर ते पत्र अशा उलटे सुलटे मुद्दे मांडून अशा पद्धतीने मांडायचं की साला गिरा तो भी टांग उपरच्य... हाय काय नाय काय !!! आणि अशी पत्रं पाठवण्यापेक्षा खरं तर एखाद्या ब्लॉगरने त्याच्या ब्लॉगवरून आपल्याला (म्हंजी गुप्त्याला) उत्तर दिलं तर अजूनच बहार येईल. कारण फाटकी-थोटकी सदरं वाचणाऱ्यांपेक्षा लोकप्रिय ब्लॉग्ज नियमित वाचणाऱ्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. आणि जमलंच तर नावं ठेवताना ज्यांचे फॉलोअर्स निदान दोनशे-सव्वादोनशेच्या घरात आहेत किंवा मग ज्यांच्या ब्लॉगहिट्सची संख्या निदान पाचलाख किंवा अधिक आहे असे ब्लॉग निवडायचे. कारण असे ब्लॉगर्स स्वतःच्या ब्लॉगवरून शक्यतो उत्तर देणारच. झालं.. घरबसल्या पंचम् लक्ष हिट्स नक्की झाल्या !!

अर्थात हे गुप्ता नाव पण नुकतंच कळलं बरं आम्हाला. गेले कित्येक आठवडे नाव लपवत फिरणाऱ्या गुप्ताला एका ब्लॉगरने पत्र पाठवून झोडल्यावर काहीतरी नाव घ्यायचं म्हणून मग जे सुचलं ते नाव लावलंय पठ्ठ्याने! आता हे एवढं सगळं कळत असूनही, माहित असूनही, लक्षात आलं असूनही गुप्तांच्या सापळ्यात अलगद अडकणार्‍याला काय म्हणावं बरं !!! काही म्हणू नका कारण

लिहावे फाटके
शब्दांची थोटके
भले टीनपाटके
गुप्ता म्हणे ||

तू भी क्या याद करेगा, गुप्ता. तू भी खुश हो जा.. तुला घरबसल्या एकूण पंधरा लाख हिट्स मिळण्यासाठी वर दोन लिंका दिल्यात आणि खाली अजून एक लिंक देतोय बघ.

लिहावे फाटके


ना भीती कुणाच्या बापाची
ना चिंता कसल्या खपाची
ना गरज कुठल्या थापांची
सत्यवाना ||

-लेखनसीमा

77 comments:

  1. आपल्या समाजाचा चौथा बांबू असलेल्या..

    +111111

    त्या गुप्ताला अशाच बांबुचे फटके द्यायला हवेत.. :)

    ReplyDelete
  2. अरेरेरेरे...हळूहळू पार पोकळ स्तंभाचे.. सॉरी सॉरी खांबाचे... सॉरी बांबूचे फटके हाणलेत. अशी निनावी नाव घेऊन टीका करणाऱ्यांची, मी पेद्रट ह्या वर्गवारीत गणती करतो. मिस लिडींग इंटरनॅशनल मराठी न्यूज डेलीला शुभेच्छा. आशा आहे त्यांना साडे तीन टक्क्याच्या संस्कृतीची दखल वारंवार घ्यावी लागेल.. :D


    अवांतर - मी वपु होऊ शकेन काय रे सत्यवाना? ;-)

    ReplyDelete
  3. फार बेस्ट. मस्त लिहिलेत फाटके... आपलं फटके !

    पुन्हा अवांतर - मी वपु होऊ शकेन काय रे सत्यवाना? ;)

    ReplyDelete
  4. हाहाहाहा...
    (हे पाताळविजयम मधलं हास्य आहे! :D )

    ReplyDelete
  5. तुम्हाला अर्थ लागला होता काय? मला त्या लेखांचा अर्थ लागला नव्हता... अर्थात माझी मराठीही बरीच कच्ची आहे.. :-) तू सरळ सोप्प्या मराठीत लिहिल्याबद्दल आभार!!

    ReplyDelete
  6. हेरंबा, चांगलाच सडकवलास त्या गुप्ता ला...

    त्याच्या त्याच लेखावर, जिथे तुझा आणि महेंद्र काकांच्या ब्लॉग चा उल्लेख होता, मी एकदम तिखट प्रतिक्रिया टाकली होती..

    साल्याला लाज वाटली असेल कदाचित, म्हणून त्याने ती प्रस्सिध्च केली नाहीं.. भ्याड .. असले कसले पत्रकार...

    ReplyDelete
  7. आईशपथ हेरंबा सॉलिडच.... तूला खरं सांगते आज अजिब्ब्बात नेटवर येणार नव्हते मी, इशानूने सांगितले की हेरंबमामाची नवी पोस्ट आहे, आणि त्याने पोस्टचे नाव सांगितल्यावर तर धडपडत आलेय वाचायला :)

    प्रचंडच... आता तरी लोकसत्ता मधल्या त्या लेखकूस समज मिळेल अशी अपेक्षा आहे.

    >>मिस लिडींग इंटरनॅशनल मराठी न्यूज डेलीला शुभेच्छा. आशा आहे त्यांना साडे तीन टक्क्याच्या संस्कृतीची दखल वारंवार घ्यावी लागेल.. :D
    +१००

    बाकि ज्या लोकसत्तात माधव शिरवळकरांनी आपले सगळ्यांचे ब्लॉग्स उल्लेखनीय म्हणून टाकलेत तिथेच हे असे बिनबुडाचे लेख छापून यावेत या मुद्द्याचा जरा वृत्तपत्ताने विचार करावा!!!!

    ReplyDelete
  8. तुझ्या लेखावरून तिथे जाणार्या ५ लाखांमधील मी ही एक....कसली क्लिष्ट भाषा आहे रे 'त्या' लेखात...
    बर्याच वाक्यात लेखकाला नक्की काय म्हणायचं आहे ह्याचा अजिबात बोध होत नाही ...ब्लॉगर्सना झोडपण्याच सातत्य मात्र प्रत्येक लेखागणिक स्पष्ट दिसून येते...अश्या फाटक्या लिखाणाला चांगलेच फटके दिलेस...

    अवांतर - मी वपु होऊ शकेन काय रे सत्यवाना? ;-) +१

    ReplyDelete
  9. हेरंबा, चांगलाच सडकवलास त्या गुप्ता ला...

    त्याच्या त्याच लेखावर, जिथे तुझा आणि महेंद्र काकांच्या ब्लॉग चा उल्लेख होता, मी एकदम तिखट प्रतिक्रिया टाकली होती..

    साल्याला लाज वाटली असेल कदाचित, म्हणून त्याने ती प्रस्सिध्च केली नाहीं.. भ्याड .. असले कसले पत्रकार...

    ReplyDelete
  10. हाऽऽऽऽण तिच्याऽऽऽऽऽयला!!!!

    हेरंब, जबरदस्तच! लगे रहो!!

    ReplyDelete
  11. हेरंबा, अभनंदन, आणि चिकाटीला सलाम! त्याने ते जे काही लिहिलंय, त्याचा अर्थ लावण्यात तुला यश आलंय!
    अवांतर - मी वपु होऊ शकेन काय रे सत्यवाना? ;-) +१

    ReplyDelete
  12. 'उत्तमतेचा हा शोध कुणा एकटय़ाला घ्यायचा नाहिये, असं ठरवूनच हा सामूहिक प्रयत्न.' - काय लिहितील आणि काय नाय....
    आपली गाडी तर सुसाटच आहे...लगे रहो !

    ReplyDelete
  13. हद्द झाली आता मात्र! चांगले केलेत तुम्ही असे फटके हाणून जे कुठले ब्लोग्स त्यांना वाईट वाटतात त्यांचे असे नाव लिहिण्याची काही एक गरज नव्हती. हा सगळा प्रकार निव्वळ तुमच्या आणि महेंद्र काकांच्या blog वर जळण्यातून झालाय असे मला वाटते. अश्या सुमार लिखाणाला फारसे महत्व देवू नका. कोण कुठला उपटसुंभ येतो आणि चांगल्या ब्लोग्सवर टीका करतो? शक्य (?) असेल तर त्याने याहून दर्जेदार साहित्य लिहावे न! Just forget all this!

    ReplyDelete
  14. अरारा... त्या फाटक्याच्या आडनावाच्या पहिल्या अक्षरातच त्याचे संदर्भासह स्पष्टीकरण सामावलेले आहे रे. त्यावर आणखी काय वेगळे बोलायचे?

    "मै माधुरी दिक्षित बनना चाहती हूँ" आणि "सचिन तेंडुलकर बनना चाहता हूँ" अशा धर्तीवर अभिनव खे(थे)टर प्रस्तुत "मैं वपु बनना चाहता हूँ " अशी घोषणा लवकरच व्हायला हरकत नाही.

    ReplyDelete
  15. एक नंबर हेरंब .....बोले तो झकास :)

    पुन्हा पुन्हा अवांतर -

    सांग सांग सत्यवान...सांग सांग सत्यवान

    व.पु. मी होइन का???

    फ़ाटकं बाटकं लिहुन...प्रसिद्ध मी होईल का??


    सांग सांग सत्यवान...सांग सांग सत्यवान

    व.पु. मी होइन का???

    ReplyDelete
  16. Odhun tanun takkewareewar ghasarnaar he lok. Lok* chaa nishedh !!

    ReplyDelete
  17. हे तर "उचलली जीभ" किंवा "फाटक्यात पाय..".... आणि वर भाषा अशी नाठाळ...
    नाठाळाच्या माथी बांबू मारलास ना राव तू...!
    जय हो....

    ReplyDelete
  18. वाह ! काय फटके दिलेस बा सत्यवाना...
    म्हणजे राहुलचा स्ट्रेट ड्राईव्ह ,
    सचिनचा कव्हर ड्राईव्ह आणि विरु चे तुफानी शॉट्स..
    तू मॅन ऑफ द मॅच रे भावा...
    जियो !

    ReplyDelete
  19. हेरंब, कल मैं तुझे येईच बोल रहेली थी...सॉलिड फ़टके दिलेत...मला तर हा कन्सेप्टच कळला नव्हता आणि मग "ते" काही लेख तर पार पार डोक्याच्या वरून......अगदी व.पु.काळे इं उल्लेख झाले तरी....माहित नाही पण इतकं हाय क्लास मराठी (आणि ते पण वर्तमानपत्रात) वाचायची सवय राहिली नाही रे......आणि खरं सांगु गुप्त असो की गुप्ता ला/ली आपल्याला काय करायचंय...नाव शोधायला त्यांनी किती चार की पाच लेख घेतले आता लिंग कुठलं हे ठरवेपर्यंत सदरच बंद झालं असेल..

    अवांतर...कुठले मराठी ब्लॉग्ज वाचावे हे वाचकांना ठरवायचंच असेल तर ते आपल्या मराठी ब्लॉग्ज डॉट नेटकडे जातीलच ना...वर्तमानपत्रांमुळे कुठल्या ब्लॉगांना जास्तीचे वाचक मिळतात हे वर्तमानपत्रवालेच जाणे....ज्यांनी स्वतः त्यातले कुठले ब्लॉग्ज पूर्ण वाचले असतील???किंबहुना ब्लॉग्ज वाचताना ते पहिल्या पोस्टपासून मग वरपर्यंत वाचत आलं की मत प्रदर्शन करायचं असतं हा बेसिक नियम तरी माहित असेल का अशा खांबामागे लपणार्‍या लोकांना..असो....तू मात्र ही पोस्ट लिहून चांगलं काम केलंस...
    You already know how happy I am that you wrote about it on Blog...:)

    ReplyDelete
  20. भले शाब्बास! एकदम धोबीपछाड... चारी मुंड्या चित! आता कसं झ्याक वाटतय बघ.. :)

    इतका शेलका आहेर मिळाल्यावर तरी काहितरी रिकाम्या खोक्यात आयमीन डोक्यात शिरेल का?

    बाकी वर्तमानपत्रांची लायकी त्यांनी स्वत:च काढून घेतली आहे... घेत आहेत... घेत राहतीलच. त्यांची मेल्याची खोड आहे रे ती... :D:D

    सत्यवाना एकदम हातोडा मारके रे... मला सनी देओलच्या ढाई किलोच्या हाताची याद आली बघ... :)

    ReplyDelete
  21. ब्लॉगर्सना ना भांडवलदाराच्या बापाची भीती ना जाहिरातदाराच्या पक्षाबद्दलचं प्रेम. .....हे अगदी दोनशे टक्के खरं आहे. कसला आधारस्तंभ घेऊन बसला आहेस, यांचे खायचे दात निराळे आणि दाखवायचे निराळे असतात. सर्वात जास्त भंपकगिरी या खांबाखालीच असते. तर लोकशाहिचा स्तंभ वगैरे काही नसतं. बाकी पेप्रात लिहायचं म्हणजे काहीतरी क्लिष्टच लिहायला हवं असा यांचा समज असतो म्हणून असलं भयंकर काहीतरी न समजणारं लिहितात. असो. सगळ्यांच्याम नातल्या भावना अचूक चाबूक लिहिल्यास त्याबद्दल अभिनंदन. पोस्ट मस्त झणझणीत झालेली आहे.

    अवांतर-फ़ेसबुकसारखं इथं लाईकचं बटन का बरं नाही. सगळ्यांच्या प्रतिक्रीया मूळ पोस्टसहित लाईक करण्याचा मोह टाळता येत नाहीए

    ReplyDelete
  22. तुझ्या 'फुलपुडी' नंतर आज 'चौथा बांबू' वर खूप हसायला आलं.

    तू आणि तन्वी फेबुवर चर्चा करत होते तो हाच लेख का ? मला फारसा समजला नव्हता पण वपु एकूण लोकप्रिय लेखक असल्याने खूप कमेंट्स/व्हिझिट्स येणार्‍या तुझ्या ब्लॉगचं कौतुक केलय की काय असं वाटलेलं.

    असो, तो/ते लेख कसेही असले तरी त्यांनी (?) नोंद केलेले दोन्ही ब्लॉग्स (innercircle & asvaad) वाईट नाहीत असं मला वाटलं.

    ReplyDelete
  23. कोण म्हणतोय पोकळ बांबू?? चक्क सॉलिड दांडू आत सारलाय.. :)

    ReplyDelete
  24. हेरंब,
    काही लोकांना उगाच असं वाटत असतं की कठीण शब्द वापरून उगाच काही तरी क्रिटीक्स सारखं लिहिलं की लोकांना आपल्या लिखाणाबद्दल आदर वाटेल. अर्थात ते किती खरं - खोटं ते लेखकच जाणे.
    "इस गाने की मांग की है झुमरी तलय्यासे बाबुराव प्रेमजी, वत्सला प्रेमजी, गानू प्रेमजी, इशा प्रेमजी, भागलपूरसे चंद्रेश कांकेरा, भीमी कांकेरा, राजा कांकेरा और रीझी कांकेराने" हे ऐकायची सवय असलेल्या गुप्ताने तीच आयडिया तशीच्या तशी वापरायचं ठरवलं" हे एकदम अफलातून वाक्य..

    ReplyDelete
  25. झकास, नेटक्यांना अशाच फटक्यांची गरज हो्ती.

    ReplyDelete
  26. धन्यवाद आका. सगळ्यांच्या प्रतिक्रियांमधून त्याला चागलेच बांबू पडले आहेत. कळवळत असेल बिचारा !

    ReplyDelete
  27. खरंय सुहास.. पेद्रटच असतात हे असे लोक

    >> मिस लिडींग इंटरनॅशनल मराठी न्यूज

    अगदी अगदी..

    >> अवांतर - मी वपु होऊ शकेन काय रे सत्यवाना? ;-)

    गुप्ताने आपल्या सगळ्यांनाच वपु करून टाकलं आहे ऑलरेडी.. पण प्रतिक्रियांपुरतंच हो !! ;)

    ReplyDelete
  28. आभार्स पंक्या..

    अवांतर : होय. आपण सगळेच आहोत.. प्रतिक्रियांपुरते ;)

    ReplyDelete
  29. बाबा, पाताळविजयमचा जोक गुप्तला झेपणार नाही. आपणच हसून घेऊ :)

    ReplyDelete
  30. आनंदा, खरंय अगदी. आठ दहा मराठी शब्द एकापुढे एक आले म्हणून झालेलं वाक्य आणि अशी निर्बुद्ध वाक्य मिळून बनलेला तो लेख. अफाट कठीण प्रकार होता तो !

    ReplyDelete
  31. धन्यवाद पाटील !

    ReplyDelete
  32. यप्प.. आखिर भाचा किसका हय :)).. धन्स सिंघम.

    >>आता तरी लोकसत्ता मधल्या त्या लेखकूस समज मिळेल अशी अपेक्षा आहे.

    अजूनही मिळाली नसेल तरी हरकत नाय. त्याला कळेपर्यंत समज देण्याची तयारी आहे अप्पुनकी ;)

    आणि हो. वृत्तपत्र विचार करत नाहीत... फक्त धंदा करतात. !!!

    ReplyDelete
  33. धन्यवाद देवेन. होय .ब्लॉगर्सना झोडपण्याचं एकमेव कार्य हाच त्या मालिकेचा उद्देश आहे. पूर्वी एखाद्या ब्लॉगरकडून मार खाल्ला असेल (अर्थात ब्लॉगवरच).. त्याचा वचपा काढतोय उगाच !! असो. आता अक्कल आली असेल त्याला कदाचित !

    अवांतर : वर दिलेलंच उत्तर :)

    ReplyDelete
  34. आभार रे अमित.

    अरे त्या लेखावर कित्येक जणांनी प्रतिक्रिया टाकण्याचे प्रयत्न के;ए पण एकाचीही प्रतिक्रिया जात नव्हती. माझी प्रतिक्रिया मात्र गेली नशिबाने.

    ReplyDelete
  35. आभार निरंजन. बऱ्याच दिवसांनी तुला इथे बघून बरं वाटलं !

    ReplyDelete
  36. हाहा गौरी. खरंय. सतत दोन आठवडे वाचल्यावर थोडाफार कळला अर्थ !

    अवांतर : वरचं उत्तर + १ ;)

    ReplyDelete
  37. धन्यवाद माधुरी. माझ्या आणि महेंद्रकाकांच्या ब्लॉगला तर नावं ठेवलीतच पण काल ज्या ब्लॉगवर लिहिलंय त्या बिचाऱ्याच्या साध्या भाषेला नावं ठेवलीत. आता याला काही अर्थ आहे का? माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर मी कसं लिहायचं हे हा गुप्ता का आणि कसं ठरवणार??? असो. त्याला योग्य तो निरोप मिळाला असेल अशी आशा करुया !

    ReplyDelete
  38. >> त्या फाटक्याच्या आडनावाच्या पहिल्या अक्षरातच त्याचे संदर्भासह स्पष्टीकरण सामावलेले आहे रे.


    हा हा.. टिपिकल सिद्ध्य स्टाईल कमेंट पुन्हा एकदा... !!!

    वपुंचं 'प्लेझर बॉक्स' या गुप्ताने वाचलं तर त्याला प्रतिक्रिया आणि त्यांना दिली जाणारी उत्तरं यांचं महत्व कळेल. असो. आपण तरी कोणाकडून अपेक्षा करतोय !!!

    ReplyDelete
  39. हाहाहा यवगेश साई.. ते गाणं 'सांग सांग अभिनव' असं हवं ;)

    ReplyDelete
  40. अगदी अगदी अरविंद !!! साडे तीन टक्के वगैरे शब्द वापरण्याला इथे काहीच संबंध नव्हता. उगाच फालतूपणा !

    ReplyDelete
  41. धन्यवाद चैताली. गुप्ताचे एकूण कारनामे बघता तो बांबूच्याच लायकीचा आहे !

    ReplyDelete
  42. हाहाहा दिप्या.. धन्यवाद भावा.. सही कमेंट एकदम.. शोएब गुप्तांसाठी सचिनचा कव्हर ड्राईव्हच हवा :)

    ReplyDelete
  43. धन्स धन्स अपर्णा. शुद्ध मुर्खपणा आहे सगळा. त्या व्यक्तीने एकही ब्लॉग पूर्ण वाचलेला नाही याची तर १०१% खात्री आहे. पूर्ण काय दहा पोस्ट्सही वाचल्या नसतील आणि चुका, टोमणे तर इतके की जणु यानेच ब्लॉगिंग शिकवलं जगाला आणि वरून ब्लॉगिंगला ठोकणे हा उद्देश नाही असं साळसूदपणे सांगत मिरवतोय. च्यायला हे सांगायची वेळच का येते?????? असो.. पुन्हा एकदा आभार !!

    ReplyDelete
  44. आभार्स श्रीताई.. हाहा ढाई किलो. ब्लॉगिंग विश्वातल्या इंदरजीत चढ्ढासाठी असाच ढाई किलोचा लेख हवा.. बरोबर ना? :) बघू आता पुढच्या लेखात माझ्याबद्दल थेट गरळ ओकली जाईल. मी तर आत्तापासूनच तयारीत आहे. सोडणार नाही अजिबात !!

    ReplyDelete
  45. शिनु, आभार्स. ती व्यक्ती एवढं क्लिष्ट, निरस, विचित्र का लिहिते हे मात्र मोठं कोडं आहे खरंच !! जड भाषा म्हणजे उत्तम लेख असले काहीतरी विचार भरले असतील डोक्यात !

    >> अवांतर-फ़ेसबुकसारखं इथं लाईकचं बटन का बरं नाही. सगळ्यांच्या प्रतिक्रीया मूळ पोस्टसहित लाईक करण्याचा मोह टाळता येत नाहीए

    अगदी अगदी !

    ReplyDelete
  46. तृप्ती, वपुंशी तुलना करून घेण्याएवढी माझी योग्यताही नाही आणि याची मला पूर्ण जाणीव आहे. पण म्हणून वपुंशी प्रतिक्रियेपुरती तुलना करण्याच्या खोडसाळ टोमण्याला नजरेआड करण्याइतपत माझं हृदय विशाल नाही (गुप्ताच्या) दुर्दैवाने.

    आणि अग तिने/त्याने दिलेले सगळे ब्लॉग चांगले असतील.. नाही.. आहेतच पण त्यासाठी इतर ब्लॉग्जना नावं न् ठेवताही त्यांना चांगलं म्हणता येऊ शकतं ना. आणि नीट निरीक्षण करून आधीचे लेख वाचलेस तर कौतुक केलेल्या प्रत्येक ब्लॉगबद्दल काहीतरी खोडसाळ कमेंट आहेच. कालच्या लेखात एका ब्लॉगच्या साध्या भाषेबद्दल नाकं मुरडली आहेत !! काही अर्थ आहे का याला?

    ReplyDelete
  47. काका, अगदी अगदी.. त्याचा तर अगदी ठाम समाज आहे की जड शब्द वापरले तर आणि तरच त्याचा लेख चांगला होईल आणि तरच त्याला पत्रकार म्हणतील !!

    आणि हो.. मला स्वतःलाही ते वाक्य अति आवडलं आहे :)

    ReplyDelete
  48. आभार अपर्णा.. बघुया अजूनतरी नेटक्यांचे लटके-झटके कमी होतात का ते. नाहीतर काय पुढच्या सोमवारी अजून ठोकू.. हाकानाका !!

    ReplyDelete
  49. खरंच गुप्त्याला चांगलाच हाणलाय.... चांगल कानशेक भेटलाय....

    ReplyDelete
  50. 'नेट-के' लेख वाचून माझं मराठी वाईट आहे का काय अशी शंका आली...कळलेच नाहीत मला :(..
    चांगली शाळा घेतली..:)

    ReplyDelete
  51. चांगले हाणलास त्याला!!!
    चीप पब्लिसिटीचा प्रकार अजून काय? ... पण नवल म्हणजे स्वतःही लिहायचंच(भलेही काहीही) काम करत असतांना, दुसऱ्यांच्या लिखाणावरच टीका करायची! ... हा तर खरच प्रताप!! ... म्हणजे ह्याचं ते प्रेम आणि दुसऱ्यांच ते लफडं!!!
    कीव येते असल्यांची.

    ReplyDelete
  52. hats off to you. तुम्ही सगळ्यांच्याच भावना इतक्या प्रभावीपणे मांडल्या आहेत की खूप बरे वाटले.
    त्याला प्रत्युत्तर द्यायची इच्छा होति. ती तुम्ही पूर्ण केलीत. असल्या immature वशिल्याच्या तट्टांकडे लक्ष देण्याइतकी पण त्यांची योग्यता नाही.
    ब्ल~ऒग्चा टक्का किती ते माहीत नाही पण लोकसत्तचा टक्का मात्र घसरत चालला आहे.

    ReplyDelete
  53. asa aahe hoy ! tikaDache sagaLe lekh vaachale. kaahee blog posts "sampaadeet" karun tithe TaakaNaar aahet. hyanna kuNee adhikaar dile ?

    haa neTakaa ekaTaach naahee ase malaa (ammaL) usheeraanech kaLale. sahaj shodh ghetalaa asataa maajhyaa blog baddal tar atishay vait shabdaat lihile aahe ase disate. ardhyaahun adhik lekh tithe chhaapalaa aahe te tar vegaLach. tyanna kaayadesheer notice dyaavee asaa vichaar aahe.

    ReplyDelete
  54. आईशप्पथ ! हेरंबा, फक्त तूच हे असं प्रभावी जबरदस्त लिखाण करू शकतोस हा ! म्हणजे प्रारंभापासून शेवटापर्यंत, कुठेही न कमी पडता ! :)

    ReplyDelete
  55. लिहावे फाटके
    शब्दांची थोटके
    भले टीनपाटके
    गुप्ता म्हणे ||

    लोकांची लंगोटी
    वास घ्यावा सकाळी,
    उलटी रात्री करावी
    लोस मध्ये!

    प्रहारची वाट लावून
    लोस ची आता "पाळी"
    बंद करीन लवकर
    गुप्ता म्हणे..

    ReplyDelete
  56. 1)समिक्षा नेटके,
    लिहावे नेटके, ह्या नेटक्याची " नेटके " नावाचं फॅटीश दिसतंय.

    2) समिक्षा नेटकेची
    आणि या गुप्ताची पद्धत अगदी १०० टक्के एक सारखीच वाटते लिखाणाची..


    3)मी म्हणजे खूप हुश्शार..." ता " वरून ताकभात ओळखतो,

    तसेच नेटके वरून तो कोण आहे हे मी ओळखले आहे...

    4)बिच्चाऱ्याला क्रिटीक म्हणून स्वतःची लाल करून घेऊ दे अजून काही दिवस तरी..नंतर मग कधी तरी सांगतो तूला तो कोण आहे ते..

    ReplyDelete
  57. धन्यवाद विक्रांत मान्यवर !!

    अर्थातच.. सोडतो की काय !!! पत्रकार असेल तर त्याच्या घरी.

    ReplyDelete
  58. धन्यवाद कल्पेश..

    कानशेक... हाहाहा :)

    ReplyDelete
  59. >> 'नेट-के' लेख वाचून माझं मराठी वाईट आहे का काय अशी शंका आली.

    धन्यवाद चैतन्य. प्रत्येकाची अशीच अवस्था झालीये इथे :)

    प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवरस्वागत. अशीच भेट देत राहा !!

    ReplyDelete
  60. धन्यवाद अरुणाताई... या असल्या लोकांना कशी उत्तरं द्यायची ते आता मला चांगलं माहित झालंय.

    >> ब्ल~ऒग्चा टक्का किती ते माहीत नाही पण लोकसत्तचा टक्का मात्र घसरत चालला आहे.

    अगदी अगदी !!

    ReplyDelete
  61. खरंय वैभव. लोकसत्तासारख्या पेपरने तरी आपण कॉलम लिहायला देताना तो कोणाला देतोय आणि ती व्यक्ती काय लिहितेय याकडे बारकाईने लक्ष देणं अपेक्षित होतं. असो.. सब घोडे बारा टके !

    ReplyDelete
  62. तृप्ती,

    ओह तुझ्या ब्लॉगबद्दलही गरळ ओकलीये का येड्याने? आवरा झालाय तो माणूस !! या सोमवारी माझ्या ब्लॉगबद्दल बरंच काही वाईटसाईट वाचायच्या तयारीत आहे मी. यावेळी तर अजून जास्त फटकावणार आहे मी !!

    ReplyDelete
  63. हाहाहा अनघा.. धन्यवाद.. अशा लोकांना वेळच्या वेळीच आवर घातला पाहिजे. नाहीतर ही असली सदरं कधीच थांबत नाहीत !

    ReplyDelete
  64. चांगले फटके दिलेस रे! तो लेख म्हणजे डोक्याला शॉटच होता. जड भाषा वापरली की आपण विद्वान समजले जाऊ असा बहुधा (गैर)समज असावा त्या व्यक्तीचा. आणि ब्लॉग व ब्लॉगर्सची नावं छापताना लोकसत्ताला त्यांच्या सदराच्या लेखकाचं नाव छापण्याची हिम्मत होत नाही यातच काय ते आलं. लोकसत्ताला असल्या चीप प्रसिद्धीची गरज भासली?? कठीण आहे मग.

    ReplyDelete
  65. अगदी अगदी कांचन. पहिल्या धारेची मारून लिहिला होता तो लेख (!!!).. त्यामुळे भाषा, अर्थ कशाचा कशालाही काही ताळमेळ नव्हता. या सोमवारच्या लेखात मात्र ताळ्यावर आलाय तो. जरा बरं लिहिलंय या वेळी. आणि ते ही निनावी किंवा मग कुठलंतरी फालतू नाव वापरून लिहिल्याने लेखाची विश्वासार्हता अजूनच कमी झाली !

    ReplyDelete
  66. धन्यवाद सागर. अरे काय तोंडाला येईल ते बरळलाय तो वीर.. मुर्खपणा नुसता !! सॉरी तुझी कमेंट स्पॅममध्ये गेली होती. आत्ता बघितली.

    ReplyDelete
  67. हेरंब
    या आठवड्यात बरं लिहिलंय त्याने. पण एक सांगतो, जर त्याने पुन्हा कधी वात्रटपणा केला तो कोण आहे हे या ब्लॉग वर येऊन सांगतो...
    अती जास्त वाचनाने त्याचा वरचा मजला रिकामा झालाय .

    कुठलेही ज्ञान नसतांना एखाद्या कलेची वाट लावणे हे त्याचे खास आवडीचे काम, आणि गेली कित्येक वर्ष ते काम हा इमाने इतबारे करतोय. स्वतःला अतीशय मोठा कलेचा ज्ञाता समजतो हा( जरी कवडीचीही अक्कल किंवा ज्ञान नसली तरीही). आता त्या मधे त्याने ब्लॉगिंगची भर घालून घेतली आहे- पण ब्लॉगर्स म्हणजे काही त्याने त्यांच्याबद्दल चांगलं लिहाव म्हणून त्याच्यापुढे हाजी हाजी करणारे त्याचे नेहेमीचे कलाकार नाहीत हे त्याला समजलेले दिसत नाही .

    मराठी मधे पण त्याचा विशेष काही पदवी, किंवा अभ्यास नाही. पॉलिटिक्स हा त्याचा खास विषय. जर तो ही पोस्ट वाचत असेल तर त्याला समजेल, की मी तो कोण आहे ते ओळखलेले आहे .त्याला ही उघड वोर्निंग- या पुढे सांभाळून लिही किंवा जर कोणावर ब्लेम करायचे असेल तर ,स्वतःच्या खऱ्या नावाने लिहावे( जर *डीत दम असेल तर) नाहीतर अभि** गुप्त चा अभि** *** हे सगळ्यांना कळेल.

    महेंद्र काका पण काहीतरी लिहीतील असे वाटले होते, पण बहूतेक त्यांनी पण दुर्लक्ष केलेले दिसते.

    ReplyDelete
  68. राघव, कोण आहे ती व्यक्ती?

    ReplyDelete
  69. १ मिनिट... मी ही पोस्ट कशी मिसली.. :(
    'नडला त्याला फोडला' असे लिहिलेली टी-शर्टस मुंबईत सर्रास बघायला मिळतात.. ती तू बनवली होतीस का..??? :D

    ReplyDelete
  70. हाहाहा रोहणा.. त्या टीशर्टची विस्तृत पोस्ट ब्लॉगवर टाकली ;)

    ReplyDelete
  71. चांगलाच बाबु सार...., स्वारी लावला आहेस त्या फ़ाटक्याला. थोडा अंदाज येतोय, कळेल लवकरच ;)

    ReplyDelete
  72. धन्यवाद विशाल.. अरे एक तर फालतू सदर चालवतो आहे तो आणि वर एका नवख्या संस्थळाच्या मदतीने स्वतःच्या सदराची प्रसिद्धीही करतोय. आणि पुन्हा त्याच्या त्या संस्थळावर त्याची बाजू घेऊन अर्थहीन वितंडवाद घालणाऱ्यांची काही एक कमतरता नाहीये. स्वतः मुखवट्याआड लपून आम्हाला शिकवणार टीका कशी करायची ते !! त्यांच्या संस्थळावर त्यांना हवं ते बोलायला जशी मोकळीक आहे तशी आपल्याला आपल्या ब्लॉगवरही आहे.. नाही का? त्या फाटक्या उर्फ माहितगार उर्फ XXXX YyYY ने अजून काही नाटकं केली तर ब्लॉग आहेच त्यांना जशास तसं उत्तर द्यायला. बघू कधी मुखवटा फेकून बाहेर येतो ते !!!

    ReplyDelete
  73. या फाटक्याला चांगलेच फटके मारले तुम्ही, याच लायकीचा आहे तो !


    चार पैसे कमावण्यासाठी आणि आपला दीड शहाणपणा मिरवण्यासाठी ह्या माणसाने आपली लायकी च्या वर बोलायला सुरुवात केली, मनामध्ये प्रचंड आकस ठेवून आणि हातामध्ये प्रसिद्धी माध्यमाची ताकद असल्यामुळे हा जे वाट्टेल तो लिहित आहे. हे सदर ब्लॉग आणि ब्लॉगर्स ला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलाय कि त्यांच्या विरोधात हे आता सरळ स्पष्ट झाला आहे.

    असो अश्या फाटक्या ला चिंधी ची सुद्धा कीमत देऊ नये हेच त्याला चोख उत्तर. तुम्ही छान लिहिता, ते कायम लिहित राहा. शुभेच्छा.
    जय महाराष्ट्र ! अमोल

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अमोल. भिक्कार सदर चालवण्यासाठी त्याने एका नवख्या मराठी संस्थळाचाही आधार घेतला आहे. सगळीकडून प्रसिद्धी चालू आहे. अर्थात त्याला हवी ती प्रसिद्धी मिळालेलीच आहे. अर्थात अशा लोकांना चांगली प्रसिद्धी की वाईट प्रसिद्धी याच्याशी काहीही घेणंदेणं नसतं. त्यामुळे अशा लोकांना पुरेसं ठोकल्यावर नंतर दुर्लक्ष करणंच उत्तम. मागे त्याने तुमच्या ब्लॉगबद्दलही अतिशय वाईट भाषेत लिहिलेलं वाचलं होतं आणि त्यावर तुम्ही तिथे दिलेली प्रतिक्रियाही वाचली. उत्तम. अशा लोकांना सोडता कामा नयेच !

      प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकवार आभार.. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा !

      Delete

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...