इस्लाम या विषयाची ज्यांना आवड आहे, ज्यांचा अभ्यास आहे अशा लोकांना रॉबर्ट स्पेन्सर आणि अॅडम सीकर ही दोन नावं खचितच अनोळखी नाहीत. तुलना म्हणून नाही पण या दोघांनीही इस्लाम विषयी जनजागृती करण्यासाठी आपापल्या पद्धतीने प्रचंड काम करून ठेवलं आहे आणि ते अजूनही चालूच आहे.
इस्लाम, अल्ला, जिहाद, मोहंमद पैगंबर,
कुराण, हदीस इत्यादी विषयांवर रॉबर्ट स्पेन्सर या अमेरिकन लेखकाने
जवळपास वीसेक पुस्तकांचं लेखन केलं आहे.
त्याने लिहिलेली Truth about Muhammad, Did Muhammad Exist? आणि The Critical Quran ही माझी विशेष आवडती पुस्तकं. यात अनुक्रमे मुहंमद पैगंबरांचं आयुष्य, त्यांच्या अस्तित्वाविषयीची चर्चा आणि कुराणाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न याविषयी लेखन केलं गेलं आहे.
Adam Seeker हे एक अजब
रसायन आहे. मूळची कट्टर मुस्लिम असलेली ही व्यक्ती इस्लामचा सखोल अभ्यास
केल्यानंतर इस्लामची कट्टर विरोधक बनली. त्याच्या युट्यूब चॅनलवरच्या चर्चांमध्ये
तो इस्लाम, कुराण, अल्ला, पैगंबर
यांविषयीचं सत्य हिरीरीने आणि मिश्कीलपणे मांडत असतो.
महत्वाचा मुद्दा हा की १८ नोव्हेंबरला Adam Seeker च्या चॅनलवरच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये दस्तुरखुद्द Robert Spencer यांनी हजेरी लावली. रॉबर्ट स्पेन्सर यांच्या गेल्या महिन्यात प्रकाशित झालेलं Muhammad: A Critical Biography हे नवीन पुस्तक हा या चर्चेचा विषय होता आणि या निमित्ताने या दोघांच्या गप्पा, चर्चा, विनोद आणि इस्लामचा सखोल अभ्यास अनुभवण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळाली.
याच निमित्ताने ज्यांना इस्लामचा अभ्यास करायचा आहे अशांसाठी काही* पुस्तकांची यादी देतो आहे. (* = काही यासाठी की इस्लाम, अल्ला, मुहंमद पैगंबर यांच्याविषयी हजारो ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यापैकी मी वाचलेल्या, मला आवडलेल्या काही निवडक पुस्तकांची ही यादी आहे.)
*शेषराव
मोरे*
काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?
१८५७ चा जिहाद
मुस्लिम मनाचा शोध
चार आदर्श खलिफा
काश्मीर एक शापित नंदनवन
*सेतुमाधवराव
पगडी*
एका माळेचे मणी
नियतीच्या विळख्यात औरंगजेब
इस्लामची ओळख : गजानन भास्कर मेहेंदळे
इस्लामचे अंतरंग : डॉ श्रीरंग गोडबोले
पण’ती' ला
जपताना : समीर दरेकर
फतव्यांचे जग : अरुण शौरी
हिंदू मुसलमान ऐक्य, भ्रम आणि सत्य : ब ना जोग
डॉ आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम : भरत अमदापुरे
आवरण : भैरप्पा (फिक्शन असूनही शेवटी संदर्भ ग्रंथांची भलीमोठी यादी दिली आहे)
*इंग्रजी
पुस्तके*
Among the Mosques : Ed
Husain
Story of a Reversion :
O Sruthi
The Last Girl : Nadia
Murad
Ticket to Syria :
Shirish Thorat
*Robert Spencer*
Truth about Muhammad
Did Muhammad exist?
Islam : religion of
bigots
Worldwide jihad
Critical quran
*Vashi Sharma (small
books)*
Naked Mughals
Islam means peace BUT
Hoax of Islamic
Superiority
Decoding islam
*Youtube Channels*
Exmuslim Sahil
Uncensored
Adam Seeker
आणि ही अशा पुस्तकांची यादी की जी फारच चांगली आहेत असं मी ऐकलंय पण माझी
वाचायची राहिली आहेत...
Muhammad : A Critical
Biography - Robert Spencer
Curse of God - Why I
left Islam : Harris Sultan
Why I am not a muslim
: Ibn Warraq
Islamophilia: Douglas
Murray
The strange death of
europe: immigration, identity, islam : Douglas Murray
Twenty three years: A
study of the prophetic career of mohammad : Ali Dashti
Babur: The Chessboard
king : Aabhas Maldahiyar
-- हेरंब ओक