Thursday, December 8, 2011

जमलंच पाहिजे !!

बाबा,
.......
.....
...

बाबा,
..
...
..
बाबा,

-हम्म..

बाबा, आज ना...... शालेत........ 

.........
......
द्फ्ग्दफ्ग्द......
...


चॉतलेत..... मी............ 
......
....क्लोपुल्य्त्य्य
....................
....


चिम्मय....... आमी....... ए, बी, शी, दी म्हणत....
.....
...र्तेहेत्रीएव्र
...
...........
.....
....
...व्व्ह्व्र्ग्स्ब
.......


बाबा, .....
.....
...
एप्त्कीएलो


-हम्म

बाआबा आआआआआआआआआआआ....................
 

-ऐकतोय रे बाबा.. पुढे बोल ना.

तल ना मी मद..........
...
.
.
...
अस्द्फेल्ल्गदफ



........
...
.......
......

उइऔइलललवी
......
............
......
.....
.
.
..

त्य्द्र्त
..
इओप्क्र
..
.
..

वेलेग्स्द


-हम्म..

मग आलोतने 
..
...
...


माजी.........
....
...
....
कुक्ग्घदेरस
..........
....
.
.......
.....

द्फ्द्गेवइईई

.......
काल...... धेतली आणि....... मद........ मला.........

-हम्म


रात्री ................ चवळीची............... उसळ.............कोशिंबीर............... करू का????????

-हम्म

द्फ्ग्स्द्फ्ह्द्फ.... लिचा.....ची......... दॉल.......तुतली...

-हम्म
 
अरे आज ऋतुजाचा फोन आला होता. ती..................... म्हणाली.............गणेश.......... टूर......................... दोघेही..................दोन आठवड्यांची............... ऑफिस...................काम.....................फिरणार................ आपण...............ही........जायचं...............तुला............विचारते ...................... नंतर ...................... सांगते...............काय?..........चालेल??..............चालेल ना???? लक्ष????????????? कुठे...................?????



मी "इंटरनेट/फेसबुक/ट्विटरच्या व्यसनाबद्दलचा आणि त्याच्या आहारी गेल्याने होणार्‍या दुष्परिणामांवरचा" लेख वाचून संपवला. तोवर घरात शांतता झाली होती. काहीतरी एकदम विचित्र असं वाटत होतं.

मग मी लॅपटॉप बंद केला..
मग मी आय-पॅड बंद केला.
मग मी आय-पॉड बंद केला.
मग मी टीव्ही बंद केला.

मग  मला जाणवलं की शांतता नव्हतीच. असलीच तरी भासमान होती. होणारे आवाज, बोलले जाणारे शब्द, चालू असलेली बोबडी बडबड माझ्या लॅपटॉपवर केंद्रित झालेल्या कान, डोळे आणि मेंदूपुढे फिकी पडत होती, असहाय होत होती, निःशब्द होत होती. पण आता..... आता जणु एक न दिसणारं आवरण दूर झालं, अदृश्य पडदे वर उचलले गेले, घरभर चैतन्य पसरलं, गलबलाट सुरु झाला.

बाबा, आद ना तो लुषिकेश आये ना शालेत... त्याता ना बद्दे होता. तल त्याने ना बलपूल चॉकलेतं आनली होती. मद तो, मी, तिम्मय, लाधा, पलाद, लिचा अचा शगल्यांनी  एबीशीदी म्हनत म्हनत ती थाल्ली. थूप मद्दा आली. तेवध्यात तो आलोक आला. त्याने माझी काल घेतली.. आनी ना लिचाची दॉल पन धेतली आनी ना थाली ताकून दिली. माझी काल नाई तुतली पन लिचाची दॉल तुतली. मनून ती थूप लल्ली. मनून मग आमी त्याला चॉकलेतं दिलीच नाई. लिचा माजी फेंद आये.


अरे आज नुसती धमाल माहिते?? ऋतुजाचा फोन आला होता. भरपूर बोललो. मस्त गप्पा एकदम. आनी नंतर बाईसाहेब म्हणतात कशा की आम्ही येतोय तिकडे. गणेशची बिझनेस टूर आहे. दोन आठवड्यांची. तेव्हा ते आपल्याकडेच येतायत. राहायला. चार दिवस तरी नक्की असतील. मी तर ऐकूनच असली खुश झाले ना. तिला म्हंटलंही की एवढी महत्वाची बातमी तू मला  अर्धा तास इकडची तिकडची बडबड करून मग सांगते आहेस !!! त्यांना नायगाराला जायचं आहे. आपणही जायचं त्यांच्याबरोबर असं म्हणाली ती. मग ? चालेल ना? जायचं ना आपणही? तुला काही काम वगैरे नाहीये ना तेव्हा? लवकर सांग मला तसं तिला कळवायला. आणि हो.... चवळीची उसळ चालेल ना आज रात्री? पटकन बोल म्हणजे मला तशी तयारी करायला. 


मग  मी ठरवलं. असाच लॅपटॉप, आय-पॅड, आय-पॉड, टीव्ही बंद करायचा... रोज.. रोजच.. आल्यावर... जमेल का? जमलं पाहिजे. जमलंच पाहिजे !!!!!

टीप : ही माझी कल्पना नाही. मागे एकदा कोणीतरी युट्यूब व्हिडीओ पाठवला होता. त्यात त्यांनी साधारण अशी कल्पना मांडली होती. ती जाहिरात मला प्रचंड प्रचंड आवडल्याने किंचित फेरफार करून ती शब्दांत उतरवायचं तेव्हाच ठरवलं होतं. त्यानुसार हे आधीच लिहून झालं होतं फक्त पोस्ट केलं नव्हतं. त्या व्हिडीओची लिंक शोधण्याचा बराच प्रयत्न केला पण काही मिळाली नाही. त्यामुळे तशीच  पोस्ट टाकतोय. जर कोणाला मी म्हणतोय तो व्हिडिओ कुठला हे लक्षात आलं असेल आणि कोणाकडे त्याची लिंक असेल तर नक्की कळवा..

टीप-२: आज इतक्या महिन्यांनी तो व्हिडीओ अखेरीस मिळाला. म्हणून लगेच इथे अपडेट करतोय.

https://www.facebook.com/photo.php?v=2869250456472

51 comments:

  1. हा हा ....अगदी मनातलं...मी पण तो वीडीओ पाहिला होता पण आता लगेच काही शोधण होणार नाहीये....:D
    नशीब तळटीप दिलीस नाही तर मी आय पॅडची पार्टी मागणार होते....(किंवा मला असंही मिळाली तर चालणार आहे...)
    बाकी हे "फेंद" प्रकरण सगळ्या जत्रेत हरवलेल्या मुलाचं फेव्लीत दिसतंय...

    ReplyDelete
  2. जमवा .. जमवाच ते सगळ बंद करण (निदान कमी करण तरी!!) .. कारण काळ आपल्याला तसा थांबवता येत नाही .. तो तंत्रज्ञानामुळे थांबल्याचा भास होतो पण तस नसत!

    ReplyDelete
  3. मस्त लिहिलंय... आवड्या!

    ReplyDelete
  4. परफेक्ट पोस्ट!
    तंत्रज्ञानाने माणसं जवळ आली की दूर गेली हा मला पडलेला ताजा ताजा प्रश्न आहे. आणि त्यात ही पोस्ट!
    बाकी नायगारा काय जमेल तितक्यांदा बघावाच... लिसाची दॉल तुतल्याचं वाईट मलापण वाटलं. आदितेयच्या दुःखात सामील!
    :)

    ReplyDelete
  5. महिनाभर माझा लॅपटॉप बंद होता तर प्रचंड रिकामा वेळ जाऊ लागला. पूर्वीसारखे रिकाम्या वेळेत चकाट्या पिटण्याचे उद्योग कमीच झालेत ना ?

    ReplyDelete
  6. हेरंब,
    खर सांगू? "ती लिंक" सोड पण मला तर आज कसलीच लिंक लागली नाही.:)

    ReplyDelete
  7. डिट्टो.. घरोघरी मातीच्या चुली ;)

    ReplyDelete
  8. हेरंब अगदी खरे आहे,छान लिहिले आहेस,...:)
    आपला महत्वाचा काळ मला वाटते ह्या सगळ्या इलेक्ट्रोनिक जगाने चोरला आहे.
    आणि सविता ताई म्हणते तसे काळ पुढे जात राहतो,घड्याळ टिकटिकत राहते....
    खरेतर सर्वांनीच हा विचार केला पाहिजे....

    ReplyDelete
  9. आवडलं रे! :)
    माझा एक व्यसन म्हणून लेख आहे माझ्या ब्लॉगवर, जमल्यास वाच. ह्याच विषयावर आहे.

    ReplyDelete
  10. हेओ, अतिशय भारी प्रचंड प्रचंड आवडले, मी सुद्धा शब्दात सांगू शकत नाही. आणि "हे खरंच आपण जगतो आहोत" हे पटतय, रोजच्या जीवनात खरोखर गुतंलेल्या या आपल्या मनाला कधीच सुधरत नाही कि आपण गर्दीत सुद्धा कधी हरवून जातो ते! "मला तर रस्त्यात चालताना फेसबुक बघतोय हे दिसत होत लेख वाचतांना."

    ReplyDelete
  11. हेरंबा माझी प्रचंड मोठी कमेंट हरवली :( ... कसलं मनापासून लिहीलेलं .... असो... अभी आठव आठव के लिहीती हूँ....

    तर पहिला मुद्दा मनातलं लिहीलं आहेस अनेकांच्या.... पण खरं सांगू जमवायलाच हवय जसं सविताताई म्हणतेय आणि दुसरा मुद्दा ते तितकसं अवघड नाहीये. होतय काय माहितीये नेटच्या बाहेर तितकसं काही रंजन उरलं नाहीये ही आपली मानसिकता होण्याची स्थिती ओळखता आली की आपण आपोआप स्वत:ला आवरू शकतो!! दुसरं म्हणजे, खरच एक दिवस आपल्या मुलांकडे जाणिवपुर्वक बराच वेळ नुसतं पाहिलं तरी त्यांच्याकडे असणारा अविरत उर्जेचा साठा कुठेच नसतो याची खात्री पटते!!

    सहज आठवलं म्हणून उदाहरण देते, आमच्याकडचं गणपती विसर्जन लांबलं होतं ते बहूतेक आता आम्ही करू तर गौरी सहज म्हणाली खरं तर ’मला गणपतीबाप्पाची काळजी वाटतेय... इतकी थंडी आणि समुद्राचं गार पाणी’... आता देवाची काळजी करणं ही कल्पना किती मस्त आहे.... :). जाम मस्त कल्पना असतात रे मुलांकडे... :)
    भारतात गेल्यावर आपल्याला नेटची गरज भासत नाही, ह्या ओळीत बराच अर्थ आहे... आपल्याला कुटूंब , मित्र मैत्रीणी किंवा थोडक्यात खरी माणसं, वास्तव जगच अजूनही आवडते....

    रहाता राहिला मुद्दा, फेसबूक वगैरेचा तर सोपा उपाय आहे आपण स्वत: खुपसं काही पोस्ट न करणं, ते साधलं तर एकूणातच पडणारा मोह खुपसा कमी होऊ शकतो असे माझे मत!! :)

    आणि शेवटी काय लॅपटॉपचे तोंड उघडणारे आपण, बंद करू शकतो हे आठवलं की झालं :)

    संपलं पुराण ... आता यात पोस्टशी संबंधित किती वगैरे विचार मी करणार नाही.... ही मोठी पोस्ट हा ब्लॉगरवरचा माझा सुड आहे असं समजूया आपण :)

    बघ आजही जात नाहीये कमेंट पण मी सेव्ह केलीये ... ब्लॉगरच्या नानाची टांग!! :)

    ReplyDelete
  12. हेरंब, सगळं बंद करणं फार सुखाचं असतं ... मध्ये बरेच महिने मी काहीही झालं तरी शनिवार - रविवार laptop, नेट, ऑफिसचा मोबाईल सगळं बंद करायचं ठरवलं होतं. स्वानुभव!

    ReplyDelete
  13. मस्त लेख... आवडला :)

    शेअर करत आहे.

    ReplyDelete
  14. "टेक्नॉलॉजी का चक्कर बाबू भैईया, टेक्नॉलॉजी का चक्कर" :-)

    घरी काहीही संवाद सुरू असला तरी बझ्झ/ब्लॉग वाचून मी जेंव्हा "विनाकारण" हसतो तेंव्हा "का हसतो आहेस?" ह्या प्रश्नाचे उत्तर देणे फार्र फार्र कठीण जाते. बझ्झवरच्या बर्‍याच लोकांवर माझ्या घरचे डूख धरून आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. आणि हो आत्ता लवकरच बझ्झ बंद होणार म्हटल्यावर बायको कुठेतरी नवस फेडायला जायचे म्हणतेय :-(

    बाकी पोस्ट लैई झाक...

    ReplyDelete
  15. जमलयं...जमलयं...घरच नेट बंद करुन टाकलय...माहित नाही किती दिवस बंद ठेवतो आहे ते..

    ReplyDelete
  16. हेहे.. धन्यवाद अपर्णा. आय पॅडचा प्लान ड्रॉप होतोय मोस्टली :)

    >> बाकी हे "फेंद" प्रकरण सगळ्या जत्रेत हरवलेल्या मुलाचं फेव्लीत दिसतंय...

    हाहा तसंच वाटतंय.

    ReplyDelete
  17. हो सविताताई. नक्कीच कमी करणार आहे.

    नेटवर बसलो की बघता बघता आयुष्य तीन तासांनी कमी झालेलं असतं !!

    ReplyDelete
  18. धन्स धन्स मनाली.

    ReplyDelete
  19. धन्यु आल्हाद.

    तंत्रज्ञानाचे फक्त तोटेच आहेत असं मला वाटत नाही. दूरदेशीच्या मित्रांशी, नातेवाईकांशी संपर्कातही राहता येतंच. फक्त तंत्रज्ञान वापरण्याची सीमारेषा आखून घेता आली पाहिजे.. असो.

    तुझं दुःख आदितेयपर्यंत पोचवल्या गेले आहे ;)

    ReplyDelete
  20. खरंय सागर.. नेट/लॅपटॉप बंद असला की "आता करायचं काय" असा मोठा प्रश्न आ वासून उभा राहतो !

    ReplyDelete
  21. सदानंद दादा,

    अरे काही खास नाही. असंच नेटची 'लिंक' बंद असली की कशा सगळ्या 'लिंका' लागायला लागतात ते मांडण्याचा प्रयत्न केलाय :)

    ReplyDelete
  22. हाहाहा आनंद.. धन्यवाद :)

    ReplyDelete
  23. श्रिया, अगदी अगदी... आणि ही काळाची चोरी इतक्या शिताफीने केली जातेय की आपल्याला कसलाच ठावठिकाणाही लागत नाही !

    ReplyDelete
  24. धन्यवाद मंदार. हो.. तुझा 'व्यसन' वाचलाय मी ब्लॉगवर..

    ReplyDelete
  25. धन्यवाद कल्पेश. अगदी आपण सगळेच रोज अनुभवतोय हे !

    ReplyDelete
  26. तन्वे, सही कमेंट.. आवडली.

    आणि मुलांकडे असलेल्या उर्जा आणि कल्पकतेच्या मुद्द्याबद्दल तर प्रचंड सहमत. बऱ्याचदा ब्लॉग्ज, फेबु, बझमधे इतकं हरवून जायला होतं की आभासी जगतातून परत जेव्हा वास्तव जगात येतो तेव्हा कळतं की आपण मधे बराच वेळ वाया घालवला आहे. कधी उगाच चिडचिड किंवा मग दुर्लक्ष किंवा मग असंच काही. आणि पोरं झोपल्यावर त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे बघितल्यावर येणारी प्रचंड अपराधीपणाची भावना ! जाउदे.. सगळंच एकदम बाहेर पडायला नको. सो थांबतो.

    ReplyDelete
  27. खरंच गौरी. मध्यंतरी मीही बरेच महिने विकांतात नेट बंद ठेवायचा पण केला होता. १००% यशस्वी कधीच झाला नाही पण प्रमाण खूप कमी झालं होतं. पण बघता बघता ते कधी वाढलं कळलंही नाही :((

    ReplyDelete
  28. धन्यवाद नागेश.. प्रतिक्रियेबद्दलही आणि शेअर केल्याबद्दलही.

    ReplyDelete
  29. सिद्धार्थ :))

    बझ बंद होणार म्हटल्यावर अनेक घरांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे असं मी ही ऐकून आहे ;)

    नवस फेडायला जाताना ब्लॅकबेरी घेऊन जा वाटेत सर्फिंगसाठी ;)

    ReplyDelete
  30. वॉव योगेशराव. अभिनंदन अभिनंदन.. फारच धाडसी निर्णय !!!

    ReplyDelete
  31. bhari!!! Try we can!

    Mi tar vichar kartoy, adhun madhun muddam internet che paise bharayche nahit. ki net band! 4-5 diwas sara kas mast! :-)
    Bore jhala ki ahech parat FB.

    no status updates, nothing!

    ReplyDelete
  32. aaNi mi Ruyaam barka re ;-)
    he dusra a/c ahe :D

    ReplyDelete
  33. जरा सुधरायला लागताच तुझ्या पोस्टवर आले. हा हा... जाल-व्यसन आणि मुक्तता... व्यसने महा लोचट असतात... :D:D

    'मायदेशी गेल्यावर नेटची फारशी आठवण होत नाही ( माणसांची मात्र वारंवार होत असते.. पण त्याचा संबंध जालाशी नसून आपल्यातल्या संवादाशी आहे )’ ही वस्तुस्थिती आहेच. :)एकटेपणा निरनिराळी व्यसने जोडतो... आणि मग आहारी जाणे अपरिहार्य! :(:(

    नुकतीच आदिला भेटून आलेय नं.... डोळ्यासमोर आला बघ...

    ReplyDelete
  34. हाहाहा ऋयाम.. पण त्यातही एक गोची आहे. नेट बंद आहे म्हटल्यावर अस्वस्थ होतं.

    च्यायला.. असून अडचण नसून खोळंबा ! ;)

    ReplyDelete
  35. वा वा श्रीताई.. मोठ्ठ्या सुट्टीनंतर ब्लॉगवर स्वागत :)

    खरंय ! नेटव्यसन म्हणजे सगळ्यात अतिमहा विशाल व्यसन आहे सध्याचं.

    ReplyDelete
  36. अगदी माझ्या मनातलं...सगळं बंद करुन खूप छान जगता येतं...अनुभवलंय मी....नेहमीसारखी पोस्ट अप्रतीम...

    ReplyDelete
  37. धन्यवाद सारिका.. प्रयत्न चालू आहे :)

    ReplyDelete
  38. मस्तच..
    खूप दिवसांनी वाचतोय.. इतकं ताजं वाटत इथे वाचल्यावर...
    thanks नवीन वर्षाकरता नवा मंत्र दिल्याबद्दल...
    happy new year

    ReplyDelete
  39. धन्यवाद धन्यवाद योगेश. तुलाही नाववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

    ReplyDelete
  40. जमलंय...
    जमलंय...
    जमलंय...

    अगदी मनापासुन जमलंय
    आवडल :)

    ReplyDelete
  41. मनःपूर्वक धन्यवाद राहुल :)

    ReplyDelete
  42. मयुरेश, मनःपूर्वक धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा !

    ReplyDelete
  43. खरंय अगदी. खुपदा वाटतंच असं...पण मोह असा असतो नां...किमान माझ्याबाबतीत तरी असं होतं की कामासाठी उघडलेल्या लॅपटॉपवर हळूच फ़ेसबुकची खिडकी उघडली जातेच. कोण काय म्हणतंय म्हणत....त्यात तुम्ही सगळ्यांनी गप्पांची वाईट सवय लावलीच होती मध्यंतरी.....अगदी हाय हॅलो करून निघायचं म्हणता म्हणता रमायला होतं...एकातून दुसरं असं करत करत वेळ निघूनच जातो भुर्रकन.....तू म्हणतोस ते खरं आहे "जमलंच पाहिजे".....

    ReplyDelete
  44. ह्म्म्म.. अगदी सेम. माझंही असंच चालू असतं सारखं !! :(

    फेबुवरच्या गप्पा तर न् संपणाऱ्या आहेत !!

    पण तरीही प्रयत्न केलाच पाहिजे.. जमलंच पाहिजे !! :)

    ReplyDelete

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...