रोशनांचा हृतिक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं?
१. 'धूम-२' मधला देखणा, रांगडा चोर आर्यन किंवा
२. 'जोधा अकबर' मधला भारदस्त, राजबिंडा अकबर किंवा
३. 'कोई मिल गया' मधला साधाभोळा रोहित किंवा
४. अगदी क्रिश, काईट्स, के३जी वाला हृतिक
अशी कितीही आणि कुठलीही कॅरेक्टर्स आठवत राहिली तरी हृतिक म्हटलं की त्या आठवण्याचा यादीत 'कहो ना प्यार है' मध्ये जबरा डान्स करून सगळ्यांच्या मनावर गारुड करणारा रोहितच सगळ्यात वर असतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. परंतु या गारुड्या (गारुडी नव्हे) हृतिकने आपल्या जीवघेण्या अदांची जादू विणून यौवनाने मुसमुसलेल्या समस्त सुस्वरूप रुपगार्वितांनाच केवळ घायाळ केले आहे असा आमचा आजवर समज होता. परंतु हृतिकबाबाची आणि त्याच्या नृत्याची जादू ही यापेक्षाही खोलवर पोचलेली आहे याचा साक्षात्कार आम्हास नुकताच जहाला.
आपण एखादं गाणं सकाळी उठल्यापासूनच का गुणगुणायला लागतो? आपण गुणगुणत असतो ते प्रत्येकच गाणं आपलं आवडतं असतं का किंवा आपल्याला आवडतात ती सगळी गाणी आपण सक्काळी सक्काळी उठून गुणगुणायला लागतो का? नाही. आपण दिवसभर काय गुणगुणतो ते आपल्या आवडीवर नाही तर आपण सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा 'पद्य आणि चाल लावलेल्या स्वरुपात' काय ऐकतो याच्यावर अवलंबून असतं. मग ते एखादं हिंदी गाणं किंवा रेडिओ जिंगल किंवा मग मराठी भावगीत असं काहीही असू शकतं. अगदी पूर्वी (म्हणजेच) माझ्या ऐन उमेदीच्या काळात कित्येक दिवसचे दिवस मी "पर्रद्येस्सी पर्रद्येस्सी ज्याना नई" किंवा "घुंघट की आर शे" किंवा अगदी गेला बाजार "आज्जा मेर्री ज्यान" असली गाणी म्हणत (वाचा गुणगुणत) काढले आहेत कारण सकाळी उठल्या उठल्या घरातला टीव्ही, रिक्षावाल्याची वरच्या 'सा' ला गवसणी घालणारी नवीन मुज्यिक शिष्टीम किंवा मग ट्रेनमधली आधुनिक चिपळ्या बडवणारी पोरं ही माझा मेंदू (माझ्याच) कानामार्गे दिवसभरासाठी भाड्याने घेऊन टाकायचे. मेंदूत घुसलेली ती गाणी संपायची ती थेट रात्री झोपल्यावरच.
कालांतराने हिंदी चित्रपटसृष्टीत रेहमान नावाच्या यक्ष/किन्नर/गंधर्व/जादुगाराने अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे आगमन करत सगळ्या जोड्याजोड्यांनी कान किटवणार्या जोड्यांच्या पार्श्वभागावर जोडे हाणून अस्सल संगीत म्हणजे काय असतं हे जगाला दाखवून दिलं. पुढची कित्येक वर्षं या जादुगाराने आमच्या हृदयावर एकहाती अंमल गाजवला तो थेट अगदी आमच्या घरी नवीन जादुगाराचं आगमन होईपर्यंत. नवीन जादूगार आल्यानंतर बाकीचे सारेच जण अर्थातच बघता बघता मोडीत निघाले. आवडी नाही तरी निवडी बदलल्या, उपलब्ध पर्याय आणि त्यांची अनिवार्यता बदलली. आणि मागे एकदा लिहिल्याप्रमाणे "हम्मा हम्मा हम्मा"च्या ऐवजी "ससा तो ससा" आलं, , "एक घर बनाउंगा तेरे घर के सामने"ची जागा "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला"ने पटकावली, "सागर किनारे"ला बाजूला सारून "एक मुलगा गेला तळ्याच्या काठी" तिथे विराजमान झालं आणि "चमचम करता है ये नशीला बदन"च्या ऐवजी "किलबिल किलबिल पक्षी बोलती" आलं. होताहोता पद्याच्या या बडबडगीतंवाल्या दुनियेतही मी तरबेज झालो आणि लेकासाठी रोज अजून अजून नवीन बालगीतं, बडबडगीतं तूनळीवर शोधायला लागलो. लेकाबरोबर त्यांची मजाही लुटायला लागलो. तर असंच शोधता शोधता मला एक नवीन साक्षात्कार झाला तो म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या दुनियेत (म्हणजे हिंदी चित्रपटांच्या आणि चित्रपटगीतांच्या दुनियेत) "तम्मा तम्मा लोगे" आणि "जुम्मा चुम्मा दे दे" अशी तंतोतंत एकाच चालीची परंतु वेगळ्या शब्दांची किंवा मग "दीदी तेरा देवर दिवाना" आणि "तुझे देखा तो ये जाना सनम" अशी किंचित चाल बदलून केलेली अशी दोन दोन व्हर्जन्स असतात तशीच दोन दोन व्हर्जन्स या बालगीतांच्या दुनियेतही असतात. फरक इतकाच असतो की एकाचं अॅनिमेशन अतिशय टुकार असतं तर दुसर्याचं जरा बरं ! तर नुकतंच "एका माकडाने काढलंय दुकान" या सलीलने संगीत दिलेल्या गाण्याचं दुसरं म्हणजे जरा बरं अॅनिमेशन असलेलं व्हर्जन हाताला लागलं. मी आणि माझ्या मांडीवर बसलेला लेक असे दोघेही त्या गाण्याचा आस्वाद घेत होतो. बघता बघता गाणं संपत आलं आणि ............ आणि अचानक मला हृतिकच्या वर सांगितलेल्या सर्वसमावेशक जादूचा साक्षात्कार झाला. त्या गाण्याचा व्हिडीओ खाली देतोय. आधी व्हिडिओ बघा आणि मगच पुढचं वाचा. अर्थात तिशी-पस्तीशीच्या आतबाहेर नसलेल्या किंवा वर्षा-दोन वर्षांच्या लेकरांना मांडीवर बसवून ही असली अॅनिमेटेड गाणी पाहायला लागत नसलेल्या आणि तस्मात् त्याची सवय नसलेल्या वाचकांचा हे पूर्ण गाणं पाहण्यामागचा कंटाळा, वैताग समजू शकतो. अशा जनतेने (खरं तर सर्वांनीच) निदान ४:०९ पासून पुढचं गाणं पहावं आणि मगच पुढे वाचावं.
४:०९ ला आपल्या समोरच्या फ्रेममध्ये एक कोल्हा (कोल्ह्यासारखं दिसणारं काहीतरी) उजवीकडे दिसतो. तो उलटा चालत चालत स्क्रीनच्या मध्यभागापर्यंत येतो. तोवर सगळं ठीक चाललेलं असतं. मात्र त्यानंतर तो कोल्हा जे काही करतो ते बघून मी एकदम नोस्टॅल्जिकच झालो. "एका माकडाने काढलंय दुकान"ला दूर सारून चक्क "इक पल का जीना, फिर तो है जाना" वाजायला लागलं माझ्या डोक्यात. टाईट स्लिव्हलेस टी आणि गॉगल घातलेला हृतिक माझ्या डोळ्यासमोर (अगदी शब्दशः) नाचायला लागला. मनोमन मी त्या अनाम अॅनिमेटरच्या सच्च्या हृतिक प्रेमाला दाद दिली. डॅन ब्राऊनच्या 'दा विंची कोड' किंवा 'द लॉस्ट सिम्बॉल' मध्ये ज्याप्रमाणे पानोपानी आपली दुर्मिळ रहस्य चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडू नयेत मात्र त्यातला योग्य तो संदेश लायक लोकांपर्यंत पोचावा यासाठी मागच्या पिढीने पुढच्या पिढ्यांसाठी मुद्दाम मागे सोडलेली चमत्कारिक क्लिष्ट कोडी, पत्रं, रहस्यमय वस्तू, खजिन्याचे नकाशे इ इ इ आढळतात त्याप्रमाणे पुढेमागे चुकूनमाकून जर कोण्या एखाद्या आधुनिक औरंगजेबाने या पिढीचं हृतिकप्रेम नष्ट करण्याचं कुटील कारस्थान रचून हृतिकच्या चित्रपटांच्या सीड्या आणि रीळं नष्ट केली तरी हृतिकचं वादातीत नृत्यकौशल्य, अप्रतिम नृत्यनैपुण्य (खरं तर दोन्ही एकच पण.. असो) येनकेनप्रकारेण पुढच्या पिढीपर्यंत पोचवावं हा त्याचा (अॅनिमेटरचा.. औरंगजेबाचा नव्हे) सुप्त हेतू आणि त्यादृष्टीने केलेली त्याची ही कृती खरोखर वाखाणण्याजोगीच. मला तर अगदी भरून आलंय हो !!!!! ;-)
थोडक्यात पुढच्या काही वर्षात "ससा तो ससा" मधला ससा जळती सिगरेट हवेत फेकून धावता धावताच ती ओठात पकडायला लागला, किंवा "किलबिल किलबिल पक्षी बोलती" मधली मुलं किलबिल म्हणायच्या ऐवजी "क क क क क क किलबिल क क क क क क किलबिल पक्षी बोलती" म्हणायला लागली किंवा मग "शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा" मधले सगळे प्राणी अंगातले कपडे काढून (शेपटीला गुंडाळलेले वगळता) येताजाता आपापली अंगप्रत्यंग दाखवायला लागले तर आश्चर्य वाटायला नको. नाही का? ;-)
तळटीप : मी हृतिकचा गरगर फिरणारा पंखा आहे !!!
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
सेफ इनफ अर्थात (ओन)ली चाईल्ड कथासंग्रह
तो आज ७० वर्षांचा झालाय. गेली २७ वर्षं अथकपणे रहस्यमय आणि थरारक कादंबऱ्या लिहून वाचकांच्या मनावर गारुड करणारा तो बघता बघता ७० वर्षांचा झालाय...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
-
** भाग १ इथे वाचा आता उरलेल्या तीन वीरांविषयी बोलू. हे तीन वीर म्हणजे रॉस गेलर, चँडलर बिंग आणि जोई ट्रिबियानी.... रॉस गेलर (डेव्हिड श...
:)
ReplyDeleteme baghitalaay to video. malaa paN jaam kautuk vaaTala hota. Dokyaat arthaat ek pal ka jeenaa ;)
तृप्ती, एक्सप्रेस प्रतिक्रियेबद्दल आभार..
ReplyDeleteहा हा.. अगदी.. मी जेव्हा पहिल्यांदा ते गाणं आणि ती कोल्ह्याची स्टेप बघितली ना तेव्हा तर हसूनहसून गडबडा लोळलो होतो !! :D
@heramb.. : aho mi pan.. agadi pankhha aahe.... tohi bina vijecha...
ReplyDeleteख्या ख्या ख्या खी खी खी......
ReplyDeleteअरे त्याच्या बाजूला नाचणाऱ्या उंदराची डान्स स्टेप पण ओळखीच्या वाटतायेत रे.
(मला वाटत ते सनी / धर्मेन्द्र ची स्टेप आहे.)
. hahha.
ReplyDeletemastch..
:)
ReplyDeleteही पोस्ट मी चोरतेय... अक्षरश: असेच असेच :)... आमच्याकडेही हल्ली (गेले २ वर्ष कमीत कमी ) माकड आणि मगर, चल रे भोपळ्या वगैरे गोष्टी आणि ही सगळी बालगीतं रोजचा रतीब घालताहेत....
ते कानांमार्गे डोक्याचा ताबा आजही सुरू आहे माझा... परवा ईशान जोरात ओरडला, "मम्मा समजलेय आम्हाला नैना ठग लेंगे.. पुरे आता.. " तेव्हा कळलं माझा ताबा सकाळपासून या गाण्याने घेतलेला होता :)
>>>>तळटीप : मी हृतिकचा गरगर फिरणारा पंखा आहे !!!
+१०० मी पण :)
:D :D :D
ReplyDeleteप्रचंड भारी रे,तुझ्या पोस्टच्या बहाण्याने का होइना तो विडियो पाहिला ,मज्जा आली.पंचवीस वर्षांनी वय कमी झाल एकदम.त्या शेवटच्या सीनला माझाही पुर्ण फ़ोकस त्या कोल्ह्यावरच होता.धम्माल पोस्ट यार...
*मला पण सध्याच्या नायकांमध्ये हृतिकच जास्त आवडतो ...
कोल्हाच्या डान्स स्टेपच प्रचंड भारी निरीक्षण :) :)
ReplyDeleteसॉलिड हसतोय..हा हा हा हा
बडबडगीत खूप दिवसांनी ऐकल रे..धन्स, एकदम लहान झाल्यासारख झाला बघ..
व्वा! जाऊन पोचलेच मी लेकीच्या त्या दिवसांत! मीही गोळा केली होती अशी खूपशी बालगीते आणि टेपवर टाकून घेतली होती! सांग सांग भोलानाथ, नाच रे मोरा.. :)
ReplyDeleteह्या अॅनिमेटरने ह्रितिकच्या स्टेप्सचा अगदी खोलवर आभास केलेला दिसतोय! :)
Sayee tya sarva Jingle Toons VCDs chi fan ahe. Tichi mostly sagli jevna tya CDs lavun karavi lagtat. Ti 7 mahinyanchi hoti tevha pasun to kolha amchyakade nachtoy!! Me kahi Hrithik cha fan nahi pan to animation wala asava hyat shanka nahi... Me maage jingle toons valyanna phone karun abhinandan kela hota karan kharach tynchya vcds ni sayee cha radna thambayla khup vela madat keliy!!
ReplyDeleteरच्याक!!!
ReplyDeleteबडबडगीते पण रॉक्स...
खूप सुंदर... आपल्याला आवडणाऱ्या विषयावरचे लिखान असेल तर ते आणखी आवडतं... खूप सुंदर.....
ReplyDeleteमी अक्षयकुमारचा गरगर फिरणारा चार मोठ्या मोठ्या पात्यांचा पंखा आहे...
ReplyDeleteपण हृतिकचं नृत्यकौशल्य वादातीतच आहे...
बाकी...
>>"ससा तो ससा" मधला ससा जळती सिगरेट हवेत फेकून धावता धावताच ती ओठात पकडायला लागला
हे प्रचंड भारी!!!!!!! (मी इमॅजिन केलं ;) )
ती कोल्ह्याची स्टेप बघितली ना तेव्हा तर हसूनहसून गडबडा लोळलेच.... :D मी पण इमॆजिन केलं... :))
ReplyDeleteतुला पिंच करू का?? सध्या घरात ब्लू रे नामक नव्या खेळण्याने धुमाकूळ घातला आहे....त्यात तुनळीतले video पाहता येतात तेव्हा बालगीत लावली आणि कालच आयच्यान कालच हा video पहिला रे.....जबर्या आहे तुझ डोक.....मी सगळ्या कलाकारांची अधून मधून पंखा असते .....मध्ये ऋतिक पण होता बरेच दिवस त्याच काही पाहिलं नाही आता मेमरया ताज्या कराव्या लागतील.....
ReplyDeleteथोडक्यात पुढच्या काही वर्षात "ससा तो ससा" मधला ससा जळती सिगरेट हवेत फेकून धावता धावताच ती ओठात पकडायला लागला, किंवा "किलबिल किलबिल पक्षी बोलती" मधली मुलं किलबिल म्हणायच्या ऐवजी "क क क क क क किलबिल क क क क क क किलबिल पक्षी बोलती" म्हणायला लागली किंवा मग "शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा" मधले सगळे प्राणी अंगातले कपडे काढून (शेपटीला गुंडाळलेले वगळता) येताजाता आपापली अंगप्रत्यंग दाखवायला लागले तर आश्चर्य वाटायला नको. नाही का? ;-)
ReplyDeleteha sagla para ekdam khataranaak jhalay...pan save karun thewla pahije.....tu aajoba hoshil towar shakya aahe asa kahi pahana.....
मी हृतिकचा गरगर फिरणारा पंखा आहे !!!
ReplyDelete+ ९९८३८३८३८३९३९२९०९
मिशन कश्मीर आणि फिजाचं नाव कुठेच नाही :(
(मला माहित्येय पोस्टचा विषय त्याच्याशी निगडीत नाहीये)
विशाल, अरे वा.. समानशीले .. !! :)
ReplyDeleteसचिन, हाहा बरोबर.. मलाही ती उंदराची स्टेप बघून सनी किंवा पाजीची आठवण झाली होती.. सगळ्याच प्राण्यांना काही ना काही स्पेशल स्टेप्स दिल्या आहेत.. :)
ReplyDeleteआभार योग :)
ReplyDeleteतन्वे, आमच्याकडेही ही गाणी नाहीतर एबीच्यीएबीच्यी (ABC) हेच हवं असतं सारखं.. बाकी काही नाहीच..
ReplyDeleteअग गेला आठवडाभर तर मी 'एक मुलगा गेला तळ्याच्या काठी' हेच गाणं सतत म्हणत होतो.. आंघोळ, दाढी करताना, ट्रेनमध्ये, रस्त्याने चालताना.. हेहे.
हृतिकच्या पंख्यांची वाढती संख्या बघून अपार आनंद जाहला..
देवेन, कोल्ह्याने जबरी स्टेप केल्यात ना? :) .. अरे आणि गेलं एक-दीड वर्षं माझं वय असंच कमी झाल्यासारखं वाटत असतं मला.. हेहे..
ReplyDeleteहृतिक बेस्टच आहे रे..
सुहास, अरे परवा या गाण्याचं नवीन व्हर्जन बघताना एकदम ती कोल्ह्याची स्टेप दिसली आणि जाम हसलो ती बघून..
ReplyDeleteअरे तुला छान वाटतंय.. पण मी गेलं दीडेक वर्षं नुसती बडबडगीतंच ऐकतोय.. जाम कंटाळा येतो कधी कधी :)
अनघा, सांग सांग भोलानाथ, नाच रे मोरा, कोणास ठाऊक कसा, छडी लागे छमछम, असावा सुंदर सगळी सगळी गाणी आहेत आमच्या प्लेलिस्ट मध्ये :)
ReplyDeleteतो अॅनिमेटरही आपल्याप्रमाणेच (तुलाही गृहीत धरतोय :) ) हृतिकचा पंखा असणार.. हेहे
वा.. चक्क राहुल साहेबांची प्रतिक्रिया !!
ReplyDeleteअरे आदितेयचं पण अगदी असंच.. ही गाणी लावली की एकदम रडायचा थांबतो, शांत होतो आणि मग गाण्यांबरोबर मस्त डोलायला लागतो :) .. सईचाही कोल्हा (उर्फ हृतिक) आवडता आहे हे बघून मस्त वाटलं.
पुन्हा कधी जिंगल टून्सवाल्यांशी बोलायचा योग आला तर त्यांना आमच्यातर्फेही धन्यवाद कळव :)
सिद्धार्थ,
ReplyDeleteबडबडगीते वुईथ हृतिक रॉक्स... ;)
सुषमेय, खूप आभार.. !
ReplyDeleteबाबा, हृतिकची मेजॉरिटी आहे रे.. ;)
ReplyDeleteबाकी तोच ससा 'हम है सीधे साधे अक्षय अक्षय' म्हणत नाचायला लागला तर कसं वाटेल? सही ना ;)
हा हा हा श्रीताई.. खरंच त्या अॅनिमेटरच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी.. ! लोल
ReplyDeleteअपर्णा, बरेच पिंच मिळतायत ग :) तुमच्याकडे पण अशा व्हिडिओज पारायणं होत असणार.. खात्री आहे मला..
ReplyDeleteआता हृतिकचा गुजारिश बघ ना.. एकदम लेटेस्ट.. बरा आहे असं ऐकलंय.
हेहे.. तो पॅरा मलाही आवडला.. :) .. असं होण्याची शक्यता आहे खरंच !
आनंदा, अजून एक पंखा वाढला.. :)
ReplyDeleteआणि मी हृतिकच्या फक्त *चांगल्या* चित्रपटांविषयीच लिहायचं ठरवलं होतं.. हेहे लोल.. मारशील मला आता तू :P
कोल्ह्याकडे पहातांना त्या बिचाऱ्या सशाकडे पुर्ण दुर्लक्ष केलंय . पुढे अजून काय काय पहायला मिळणार आहे त्याची कल्पना करतोय आणि हसू येतंय..
ReplyDeleteहाहाहा काका.. त्यांनी सशाकडे दुर्लक्ष केलं असलं तरी आपण दिलंय ना लक्ष.. वरती सचिनने तर त्याच्या डान्सस्टेप्स कोणासारख्या याचंही विवेचन केलंय :)
ReplyDeleteपुढे सश्याच्या तोंडात हवेत उडवलेली सिगरेट आणि क क क किलबिल क क क क किलबिल पक्षी असंच होणार मी म्हणालो तसं ;)
>>>आणि मी हृतिकच्या फक्त *चांगल्या* चित्रपटांविषयीच लिहायचं ठरवलं होतं.. हेहे लोल.. मारशील मला आता तू :P
ReplyDeleteत्यात तू K3G लिहीलस???... तूला करण जोहर मिठी मारेल आनंदाच्या भरतानं...
हेहेहे.. हा video रोजच बघावा लागायचा मेसमधे.. मेसवाल्या काकाची भाची बघायची आणि मग नाईलाजाने आम्ही :( पण ही स्टेप बघून आम्ही मस्त हसायचो. अरे ह्या vcd तले सगळे animation मस्त विनोदी आहेत.
ReplyDeleteअग K3G खरंच माझा आवडता पिक्चर आहे. हृतिकचा अभिनय, शाहरुख-काजोलचा टीपी आणि अमिताभ... करीना डोक्यात जाते थोडी पण चालसे..
ReplyDelete>> तूला करण जोहर मिठी मारेल आनंदाच्या भरतानं...
त्याने मिठी मारू नये यासाठी काहीही करायला तयार आहे मी. हवं तर हभी अलविदा ना केहना १०८ वेळा बघतो (अरारारा) ;)
हा हा संकेत.. अरे ही सगळी अॅनिमेशन्स खरंच जाम विनोदी आहेत. पण पोरं कसली गुंग होतात माहित्ये यात. माझा लेक तर डोलत असतो नुसता :)
ReplyDeleteनिषेध! निषेध!!
ReplyDeleteतू पहाच आता कभी अलविदा ना कहना.... तो ही १०८ वेळेस....
फोटो आणि हार मात्र तयार ठेव.. वाचशिल की नाही त्याची गॅरंटी नाही ... :D
के3जी हॅज इट्स मोमेंट्स... टुक्कार नाहीये तो चित्रपट.. आय मस्ट ऍग्री
हा हा आनंद.. खरंच फोटो आणि हार तयार ठेवायला लागणार.. कभी अलविदा ना कहना १०८ वेळा (खरं तर एकदाही) पहायच्या नुसत्या कल्पनेनेही गरगरायला लागलंय मला. कारण मी तो चित्रपट १५ मिनिटात सोडून निघून आलो होतो..
ReplyDelete>> के3जी हॅज इट्स मोमेंट्स... टुक्कार नाहीये तो चित्रपट..
मेनी मोर अँड बेटर मोमेंटस दॅन फिझा अँड मिशन कश्मीर.. व्हॉट से?
मिशन कश्मीर पेक्षा? नो वे.. माझ्यासाठी तरी.... वेगळं ज्यॉनर आहे.. असो तू काही ऐकायचा नाही...
ReplyDeleteवेगळं? मला नाही आवडलं बाबा.. अजून खूप चांगलं होऊ शकलं असतं..
ReplyDelete>> असो तू काही ऐकायचा नाही...
+ १ (इथे तू म्हणजे तू ;) )
शोल्लेट ! :D :D :D
ReplyDeleteतो कोल्हा म्हणजे हृतिकच आहे (Not vice versa). त्याची पहिली एण्ट्री पहा. त्या तीन चाकी सायकलवर बसून (की उभं राहून) येतो. डिट्टो कोई मिल गया ष्टाईल !
हा हा क्षितिज.. सही निरीक्षण... हे लक्षात आलं नव्हतं :) तुही हृतिकचा फुलटू पंखा आहेस वाटतं ;)
ReplyDeleteनिरीक्षण सही आहे, व्हिडियो रोज बघतो ,काळाप्रमाणे अशी गाणी असू शकतात चाल मूड मध्ये आपण गुणगुणू शकतो ,गाण वेगळे असू शकते,छान सुंदर मस्त,
ReplyDeleteआभार काका.. आम्हाला तर ही गाणी रोजच बघावी लागतात :)
ReplyDeleteबाप... एवढं निरीक्षण... हाहाहाहा... खतरनाक!!!
ReplyDeleteसौरभशेठ, करना पडता है.. कळेल तुलाही.. अरे २-२ तास हीच गाणी बघत राहिल्यावर आपोआप असे कायकाय शोध लागतात !! :)
ReplyDeleteतुझ्या 'बाल' पोस्ट नोंदवून ठेवतोय... पुढे मला उपयोग होईल ना... :D
ReplyDelete'लवकरात लवकर' उपयोग होवो या सदिच्छा ;) :D
ReplyDelete