अआ आणि आशु लोकांसाठी ब्लॉगिंगचे तीन विशेष नियम आहेत.
१. अशा लोकांनी ब्लॉग सुरु करू नये
२. सुरु केलाच तर तो जेमतेम एक वर्षच चालेल अशी पूर्वसूचना ब्लॉगवर ठळकपणे द्यावी. (आणि ब्लॉगवर दिली नाही तरी स्वतःच्या मनाशी तरी पक्की खुणगाठ बांधावी.)
३. वरचे दोन्ही नियम मोडले तर परिणामांना तयार राहावं !!!
ओह सॉरी... सगळ्यात पाहिलं वाक्य "अत्यंत आळशी आणि आरंभशूर लोकांसाठी.... " असं वाचा. नेहमीप्रमाणे जरा आळशीपणा केल्याने ते बाराखडीसदृश लिहिलं गेलं. असो. तर माझ्यासारख्या अति अआ आणि अति आशु माणसाने पहिले दोन्ही नियम मोडले आणि त्यामुळे आपोआपच परिणामांसाठी तयार राहायची पाळी आली. (न राहून सांगतोय कोणाला ! ).. व्हायचं तेच झालं. पहिल्या वर्षी तब्बल ११० पोस्ट्स पाडणाऱ्या ब्लॉगवर दुसऱ्या वर्षी जेमतेम ४२ पोस्ट्स आल्या. (अर्थात पाठीराखेही १३८ वरुन २१६ वर गेले म्हणा.) ... खरं तर ब्लॉग (रडतखडत का होईना) दोन वर्षं चालू ठेवला म्हणजे आपण (म्हणजे मी) कदाचित वाटतो तेवढे काही आरंभशूर नाही असं जाणवलं.
त्यानंतर हे मधेच आठवलं.
===============================================
आरंभशूर नाही म्हणजे काय आहोत? आरंभशूरचा विरुद्धार्थी शब्द काय बरं ??
आरंभ X अखेर
शूर X भित्रा
अभि.... !!! अखेरभित्रा....... अखेरभित्रा.......!! अखेरभित्रा?? म्हणजे अखेरीस भित्रा असणारा?? म्हणजे आरंभी शूर असणारा?? च्यायला थोडक्यात आशु आणि अभि एकमेकांचे विरुद्धार्थी नाही तर समानार्थी शब्द झाले..
ओके.. इनफ विषयांतर आणि पांचटपणा.. ब्याक टू कन्फेशन !!
===============================================
अर्थात दुसऱ्या वर्षात वेग मंदावण्याची अन्यही काही कारणं होतीच म्हणा. आपल्या सिनेमास्कोपमुळे पूर्वी जेमतेम तोंडओळख असणाऱ्या हॉलीवूड आणि जागतिक सिनेमाशी अधिक चांगली ओळख झाली. नवीननवीन चित्रपटांची माहिती कळली. चित्रपट कसे बघायचे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजलं. त्यामुळे पूर्वी ब्लॉग लिहिण्यासाठी वापरला जाणारा फावला वेळ पूर्णतः हे सिनेमे गिळंकृत करायला लागले. (ऑफ कोर्स नो कम्प्लेंट्स). त्यामुळे आपोआप ब्लॉगपोस्ट्सशी संख्या रोडावली. अनेक वेगवेगळया प्रकारचे, निरनिराळ्या भाषांतले, अनेक देशांतले चित्रपट बघितले. प्रत्येक चांगल्या चित्रपटाबद्दल ब्लॉगवर लिहावंसं वाटायचं. परंतु तोवर वेटिंग लिस्टमधला पुढचा चित्रपट/सिरीज खुणावत असायचा. हे एक कारण आणि दुसरं एक कारण म्हणजे सतत चित्रपटांवर लिहायला आपला ब्लॉग काही चित्रपटविषयक लिखाणाला वाहिलेला ब्लॉग नाही असंही वाटायचं.
आणि मग तेवढ्यात ट्यूब पेटली. जर ब्लॉग चित्रपटविषयक नाही हे एकमेव कारण चित्रपटांविषयीच्या नवीन पोस्ट्स टाकायच्या आड येत असेल तर ते कारणच दूर करून टाकू. एक नवीन ब्लॉग फक्त चित्रपट/टीव्हीसाठीच सुरु करून टाकू. "प्रत्येक अडथळ्याचं रुपांतर संधीत करू" किंवा "टर्न एव्हरी ऑब्स्टॅकल इन्टू अपॉर्च्यूनिटी.. मला मान्य आहे की हे जरा अतिच होतंय. पण हे आत्ता जस्ट सुचलं.. म्हणजे ब्लॉग काढायचं नव्हे.. हे वाक्य.. सुचलं म्हणजे वाक्य सुचलं नाही. ते कोणालातरी आधीच सुचलेलं होतं. ते वाक्य इथे टाकायचं सुचला, असो. तर पहिल्या ब्लॉगच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या आणि दिवाळीच्या निमित्ताने वटवट सत्यवान सादर करतोय चित्रपटांचा नवीन ब्लॉग..... चित्र-पट(पट) सत्यवान !!
अर्थात वटवट सत्यवान उर्फ harkatnay.com वर पूर्वीप्रमाणे भेटूच. पण 'चित्र-पट(पट) सत्यवान !!' उर्फ http://harkatkay.blogspot.com/ वरही नियमित पोस्ट्स टाकायचा मानस आहे. अर्थात हा अति अवि आहे याची मला कल्पना आहे पण वटवटीचा ब्लॉग दोन वर्षं चालल्याने मी आता आशु राहिलो नसल्याने शक्यतो या अवि ला आणि वाचकांच्या सत्यवानावरच्या वि ला तडा जाणार नाही असा प्रयत्न राहील. प्रयत्न कसा वाटला ते नक्की कळवा...
सर्वांना दिवाळीच्या चित्रपटीय आणि ब्लॉगवाचीय शुभेच्छा !!

लैच भारी... चला वटवटीला सुरुवात झाली ह्या कारणाने ;-) नक्की वाचेन हा ब्लॉग.. :) :)
ReplyDeleteदिवाळीच्या सिनेमॅटिक शुभेच्छा !!
तू लिहितोयेस म्हणून आनंद मानावा की तू लिहीत नसताना तूला बदडणे आम्हा कोणाला शक्य होत नाही याची खंत या संभ्रमात आहे मी सध्या :)
ReplyDeleteअसो... वेलकम बॅक !!
रक्तपुरूष वाचतेय आता... आणि स्वत:चे कोट्याधिश नाव सार्थ करणारी पोस्ट लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि आभार :)
आज आधी तुझा नवीन ब्लॉग बघितला, आणि दचकले. या सत्यवानाची वटवट बरेच दिवस शांत आहे, पण लिहील पुन्हा असं वाटत होतं ... आणि तिथे एकच पोस्ट - म्हटलं जुन्या पोष्टी उडवून टाकल्या का काय याने. मग लक्षात आलं - हा नवा ब्लॉग आहे. मग जीव भांड्यात पडला. :)
ReplyDeleteनशीब बाई..
ReplyDeleteसत्यवान वाट विसरलेला..आला पुन्हा रुळावर..वेल अम बॅक..
अभि + नंदन
ReplyDeleteजाम मजा येणार आता दुसर्या ब्लॉगवर :-)
eagerly waiting...filmomania zindabad...
ReplyDeleteउत्तम... :)
ReplyDeleteही पोस्ट नव्या ब्लॉगच्या घोषणेपेक्षाही अति पांचटपणामुळेच आवडली!
पु.ले.शु.
या टिव्ही सिरियल्स मुळे लिखाण कमी होतं+१
ReplyDeleteमाझा पण तोच अनुभव आहे. हल्ली जास्त वेळ टिव्ही पहाण्यात जातो.
अभ्या कुठे होतास कुठे? ऑक्टोबरचा ना तू?? ब्लॉगच्या तिसऱ्या पदार्पणात नवा ब्लॉग सुरु करतोयस म्हणून अभिनंदन करू की या ब्लॉगवर काही लिहित नाही म्हणून BB देऊ कळत नाही...अकु (अति कंफुजन हाय...)
ReplyDeleteक्या बात है ! अभिनंदन.. इंग्रजी चित्रपटाबद्दल मी एकदम 'ढ' आहे. आता नवे ब्लॉग पट पट येऊ दे. म्हणजे माझे नॉलेज वाढायला मदत होईल. नव्या ब्लॉगची वाट पाहतोय.
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteनवीन ब्लॉगला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
अभिनंदन. आता वटवट आणि पटपट दोन्ही जोरात चालू दे.
ReplyDeleteआशू म्हणजे फक्त आरंभ करण्यातच शूर.( हुषार) बाकी वेळी आआ!म्हणजे मी! पण तुमच्या लोकांचे ब्लॉग्ज वाचतावाचताच वेळ कुठे निघून जातॊ कळत नाही. आणि आपण यापेक्षा जास्त, आणि चांगले लिहू शकणार नाही ही जाणीव पण असते.
तेव्हा तुम्ही लिहिते रहा.
दिवाळीच्या शुभेच्छा.
काम बराबर हो जाना चाहिये वटवट!!!
ReplyDelete(चित्रपटांचा ब्लॉग असल्याने "वटवट"चा उच्चार आपल्या जुन्या इस्टाईल "रॉबर्ट" प्रमाणे करावा.)
पंचब्लॉगधारक सेनापतीनंतर एकापेक्षा जास्त ब्लॉगचे मालकी हक्क मिळवल्याबद्दल अभिनंदन उर्फ 'भावा पार्टी' आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. फराळासाठी सहकुटुंब सहपरिवार कोकणात यावे.
हेरंबा ... कितीतरी लोक अगदी आतुरतेने तुझ्या वटवटीची वाट बघत होते आणि तू इथे आलास ते ही गोड बातमी घेऊन...आनंद द्विगुणीत झाला ... खूप खूप शुभेच्छा चित्रपटपटीसाठी...
ReplyDeleteतुला आणि तुझ्या कुटुंबियाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
धन्यवाद सुहास. एक ब्लॉग सांभाळताना नाकी नऊ येत असताना दुसरा ब्लॉग काढणं हे जरा अवघडच काम होतं. तरी केलंय. बघू कसं जमतं ते. तुला आणि तुझ्या कुटुंबियांनाही दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
ReplyDeleteहाहाहा तन्वे.. पहिला ऑप्शन चांगला वाटतोय मला :)
ReplyDelete>> रक्तपुरूष वाचतेय आता...
लवकरच बघही.. :)
शुभेच्छांबद्दल आभार मानणार नाही. कारण तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांमुळेच तर हे शक्य होतंय.
हाहा गौरी. बाप रे खरंच पोस्टी उडालेला ब्लॉग डोळ्यासमोर आला माझ्या.. ..
ReplyDelete.
.
.
आणि मी लगेच जाऊन बॅकअप घेतला.. दोन्ही ब्लॉग्जचा :)
हाहाहा माऊबाई.. झुकझुक झुकझुक.. आलो आलो रुळावर .. आवरा !!! ;)
ReplyDeleteहाहाहा.. धन्स आनंदा.. कॅनव्हास वरच्या मजेचीही आम्ही वाट बघतोय राजे :)
ReplyDeletepanpan,
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा !
हाहाहा आल्हाद.. आभार रे.
ReplyDeleteअगदी अगदी काका. सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम झालाय. चित्रपट/सिरीज आणि ब्लॉग या दोन्ही गोष्टींना वेळ देणं म्हणजे तारेवरची कसरत आहे अगदी !
ReplyDeleteतन्वीप्रमाणेच तुझंही कंफुजन दूर करण्यासाठी पहिला पर्याय निवड असंच सांगेन :P .. आभार्स ग.कंफुजन
ReplyDeleteजरूर ओंकार.. शक्य तेवढं नियमितपणे लिहायचा प्रयत्न करेनच. दरम्यान या ब्लॉगवरही बऱ्याच चित्रपटांबद्दल लिहिलंय तेही वाच जमलं तर. 'पडदा' या लेबलखाली मिळेल ते लिखाण.
ReplyDeleteमनःपूर्वक आभार सदानंद दादा.
ReplyDeleteशुभेच्छांबद्दल आभार्स, अरुणाताई. दोन्ही ब्लॉग्जवर नियमित लिहिण्याचा प्रयत्न करेनच..
ReplyDelete>> (चित्रपटांचा ब्लॉग असल्याने "वटवट"चा उच्चार आपल्या जुन्या इस्टाईल "रॉबर्ट" प्रमाणे करावा.)
ReplyDeleteलोल...
हाहा.. खरंच.. बघता बघत किती ब्लॉग्ज झालेत. नियमितपणा राखणं कठीणच जाणार आहे. तरी नक्की प्रयत्न करेन. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच ! भारतात आल्या आल्या कोकणात येतो पार्टीसाठी :)
हेहे देवेन.. आभार्स आभार्स :)
ReplyDeleteतुला आणि तुझ्या कुटुंबियांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
That was quite cool post.I am quite confused about myself,which term is quite close to me first one or second.HELP ME!!
ReplyDeleteचला वटवटीला सुरुवात झाली............. अभिनंदन
ReplyDeletehahaha Anee.. Thanks. You better categorize yourself ;)
ReplyDeleteआभार आभार सुषमेय :)
ReplyDelete