सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने पण देजावू प्रकाराशी माझा 'ऐकून माहिती असणे' याच्या पलिकडे कधी संबंध आला नाही. म्हणजे अनुभव वगैरे कधीच नाही. पण परवा 'बिग नथिंग' बघताना ती देजावू वाली जाणीव मला शब्दशः झाली. हे सगळं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. तो अंधार, ती मारामारी, ती धावपळ, ते एकामागोमाग बसणारे धक्के, उलगडणारी रहस्यं, पडणारी नवीन कोडी अशी नुसती भाऊगर्दी झाली होती सगळी. हे सगळं चालू असतानाच मेंदूच्या अर्काईव्ह (ज्याला वर्डप्रेस 'आर्चिव्ह' म्हणतं तेच) मध्ये थोडी धक्काबुक्की होऊन छोटे देओल साहेब चालताना दिसले एकदम. आणि मग एकदम खट्टाक प्रकाश पडला डोक्यात. हे तर तेच एक चाळीसची शेवटची लोकल चुकल्यावर शिव्या घालत प्लॅटफॉर्मवरून हिंडणारे देओल साहेब होते. अंधारही तसाच होता. चित्रपटाच्या सुरुवातीची स्वगत म्हणायची पद्धतही तशीच. फक्त दोन्ही चित्रपटांच्या शेवटांमध्ये फरक असल्याने प्रत्यक्ष स्वगत वेगळं आहे इतकंच. पण परिणाम तोच. गुन्हेगारी चित्रपट असूनही वेळोवेळी प्रकटणारा विनोद हेही या दोघांमधलं एक प्रमुख साम्यस्थळ.
थांबा एक मिनिट. ही एवढी निरर्थक बडबड वाचल्यावर कोणाला वाटेल की मी असं म्हणतोय की 'एक चालीस की लास्ट लोकल' हा 'बिन नथिंग' वरून घेतलाय आणि त्यावरून कोणी माझ्या अकलेची मोजमापंही काढायला सरसावतील. पण थांबा. यातला कुठलाही चित्रपट दुसर्या चित्रपटावरून ढापलेला नाही आणि तसं माझं म्हणणंही नाही. पण दोन्ही चित्रपटांची हाताळणी, मांडणी, प्रसंग, घटना, फ्रेम्स, पात्रं, संवाद, प्रकाश(अंधार)योजना यात इतकं साम्य आहे की एक चित्रपट बघताना दुसर्याची आठवण आल्याशिवाय रहात नाही. दोन्ही चित्रपटांची मध्यवर्ती कल्पना (थीम) साधारण एकसारखीच असली तरीही कथा (स्टोरीलाईन) भिन्न आहे. आणि तरीही पटत नसेल तर देजावू बिजावू फक्त तोंडी लावायला होतं असं समजून सोडून द्या आणि डायरेक्ट पुढच्या ओळीपासून वाचायला सुरुवात करा.
( *** कंट्येन स्पायलर्श *** )
"आय मेड अ बिग मिस्टेक" अशा नायकाच्या एकोळी स्वगताने चित्रपटाला सुरुवात होते आणि अंधुकशा उजेडात एका कारची ट्रंक उघडली जाते आणि ........... !!!
या पहिल्या काही सेकंदांच्या प्रसंगानंतर थेट अयशस्वी लेखक चार्लीच्या घरातला त्याच्या आणि त्याच्या पोलीस अधिकारी असलेल्या बायकोमधला ब्रेकफास्ट टेबलवरचा संवाद दिसतो. पीएचडी असलेल्या चार्लीने आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि योग्यतेच्या मानाने खुपच कमी दर्जाची असलेली अशी कॉल सेंटरची नवीन नोकरी प्रचंड अनिच्छेने स्वीकारलेली असते आणि आज त्याचा पहिला दिवस असतो. पहिल्याच दिवशी काहीतरी गडबड होऊन चार्लीला नोकरीवरून कमी केलं जातं. पण तिथे त्याची ओळख होते ती गसशी. बोलता बोलता कळतं की गसला त्याच्या लहान मुलीच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी बरेच पैसे हवे असतात आणि त्यासाठीच तो ही नोकरी करत असतो. एका वर्षाच्या आत पैसे मिळाले नाहीत तर मुलीची दृष्टी जाणार असते. बोलता बोलता हेही कळतं की खून, मारामार्या वगैरे काहीही न करता झटपट पैसे मिळवण्यासाठी गसकडे एक योजना आहे. गस ती योजना चार्लीला सांगतो आणि बघता बघता थोड्याशा नाईलाजानेच का होईना चार्ली त्या योजनेत त्याचा साथीदार बनतो. त्याबरोबरच गसची मैत्रीण जोसी हीसुद्धा त्या योजनेत सहभागी होते. योजना अशी असते की कॉलसेंटरमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे गावातल्या रेव्हरंडला त्याच्या अनैतिक कृत्यांसाठी ब्लॅकमेल करून बक्कळ खंडणी उकळायची. कुठे भेटायचं, कसं पळायचं, कोणी काय करायचं, काय करायचं नाही वगैरे वगैरे सगळं चोख ठरतं. रेव्हरंडला फोन करून झाल्यावर प्लानमध्ये ठरल्याबरहुकुम गस त्या रात्री खंडणी मागायला रेव्हरंडकडे पोचतो. पण तिथे झटापटीत चुकून त्याच्या हातून रेव्हरंडचा खून होतो. काही वेळाने अजून एक मोठी गडबड झाल्याने चार्ली तिथे येऊन धडकतो आणि समोर रेव्हरंडचं प्रेत पडलेलं बघून हादरून जातो. बरीच शोधाशोध करूनही गसचा मागमूसही न आढळल्याने भांबावून जाऊन तो समोरच दिसणार्या रेव्हरंडच्या प्रेताची विल्हेवाट लावून टाकतो. तोवर गस पुन्हा प्रकट होतो आणि त्याने रेव्हरंडला ठार मारलेलं नसून चार्लीनेच मारलं आहे असं सांगतो. मेलेला माणूस रेव्हरंड नसतो हे कालांतराने कळतं. त्यातून दुसरा खून, तिसरा खून असं सत्र चालू राहतं. रेव्हरंडची बायको, तिचा बॉयफ्रेंड, लोकल पोलीस ऑफिसर, तज्ज्ञ पोलीस अधिकारी अशा नवीन नवीन पात्रांची दर्शनं होत राहतात. काही पात्र कथेला थोडंसं पुढे सरकवून तर काही जबरा धक्का देऊन चित्रपट वाहता (किंबहुना खळाळता) ठेवतात. एकेक करता करता छोट्या छोट्या घटनांमधून प्रमुख पात्रांची खरी रूपं उलगडायला लागतात. कोणीच सोवळं नसतं हे हळूहळू कळून चुकतं. एक चालीस मधल्या मधुचं खरं रूप समोर येण्याचा प्रसंग असो की यातल्या जोसीचा बुरखा फाटण्याचा प्रसंग असो किंवा 'एक चालीस..' मध्ये सुटतोय सुटतोय असं वाटत असताना निलेशचं पुन्हा नवीन संकटात अडकणं असो की यातल्या चार्लीचं सगळं सुरळीत होतंय हे बघून सुटकेचा निःश्वास टाकत असताना नवीन कटकटीत अडकणं असो अशा अनेक प्रसंगांत 'एक चालीस..'ची आठवण येऊन दोघांच्या मांडणी/हाताळणी यांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. (मला तरी आवरला नाही. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः ;-) ) .. त्यानंतर अनेक धक्के बसत बसत, चिक्कार धावपळी झाल्यावर, काही लोकांचे जीव गेल्यानंतर आणि काहींचे वाचल्यानंतर, अनेक रहस्य उलगडल्यानंतर, अनेक नवीन कोडी निर्माण होऊन ती सुटायची आपण वाट बघत असताना अचानक "आय मेड अ बिग मिस्टेक"च्या स्वगृही आपण परततो. थोडक्यात "आय मेड अ बिग मिस्टेक" हा एक व्हर्च्युअल मध्यंतर आहे. कारण त्यानंतरही धक्क्यांची तीव्रता आणि वारंवारता ही तशीच राहते किंवा कित्येकदा आधीपेक्षा अधिक असते. त्यानंतर चार्लीची बायको, पोलीस अधिकारी, लॉलीपॉप, वायोमिंग विडो, विषारी दारू, अखेरचा सिरीयल किलर (??) अशी वेगवेगळी 'पात्रं' आपापली अस्तित्व अधोरेखित करून जातात.
ज्याप्रमाणे 'एक चालीस..' अचूक आणि निर्दोष नाही त्याप्रमाणे बिंग नथिंगमध्येही सुरुवातीलाच एक मोठ्ठा गोंधळ उर्फ गुफप आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला जेव्हा चार्ली रेव्हरंडच्या घरात शिरतो त्या प्रसंगाची सुरुवात म्हणजे मोठ्ठ्या गुफपची सुरुवात आहे. पण अर्थात त्यानंतर सुमारे तासभर जो प्रचंड धावपळ, दमछाक, धक्काबाजीच्या(धक्काबुक्की नव्हे) रोलरकोस्टर राईडचा अविस्मरणीय अनुभव आपल्याला मिळतो तो पाहता या गुफपकडे डोळेझाक करायला हरकत नाही. बिग नथिंग हा एक निओन्वार आहे पण तो १००% न्वारपट नाही. त्यातले अनेक प्रसंग, संवाद, पात्रनिवड यांच्यामुळे त्याला एक विनोदी फीलही आलेला आहे. चित्रपटाच्या या प्रकाराचं यथार्थ वर्णन करायचं झाल्यास मतकरी म्हणतात त्याप्रमाणे 'न्वार कॉमेडी' हेच वर्णन अगदी चपखल लागू होतं.
ज्या पैशांसाठी एवढे सगळे गुन्हे घडत असतात ते पैसे अंतिमतः अशा व्यक्तीकडे पोचतात की जिला त्याचं काही सुखदुःख नसतं किंबहुना ते पैसे आहेत ही गोष्टही त्या व्यक्तीच्या गावी नसते. पैशांचा ढीग बाजूला पडलेला असताना तिचं त्याच्याकडे लक्षच नसतं कारण तिला त्याचं महत्व नसतं, महत्व माहित नसतं. हा जो शेवट आहे तो म्हणजे एवढ्या वेळ चाललेली पैसे मिळवण्याची शर्यत, त्यासाठी मागेपुढे न बघता पाडले गेलेले खून, केली गेलेली दुष्कृत्यं या सगळ्याला दिलेली एक सणसणीत चपराक आहे.
जाता जाता, 'बिग नथिंग' आणि 'एक चालीस..' मधला देजावू अजून ठळकपणे अधोरेखित करणारा एक मुद्दा सांगतो. 'बिग नथिंग' प्रदर्शित होण्याची तारीख आहे १ डिसेंबर २००६ आणि 'एक चालीस..' च्या प्रदर्शनाची तारीख आहे १८ मे २००७ (तपशील : आयएमडीबी च्या कृपेने). म्हणजे जेमतेम सहा महिन्यांचा फरक. एखादी घटना सहा महिन्यांनी पुन्हा दिसली तरीही तिला 'देजावू'च्या कक्षेत/व्याख्येत गृहीत धरत असावेत असा माझा आपला एक अंदाज.
आणि तरीही पटत नसेल तर देजावू बिजावू फक्त तोंडी लावायला होतं असं समजून सोडून द्या आणि लगेच 'बिग नथिंग' (आणि (अजून बघितला नसलात तर) त्यानंतर लगेच 'एक चालीस..' ही) बघून टाका. ते देजावू बिजावूचं नंतर बघू.. क्काय??
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
सेफ इनफ अर्थात (ओन)ली चाईल्ड कथासंग्रह
तो आज ७० वर्षांचा झालाय. गेली २७ वर्षं अथकपणे रहस्यमय आणि थरारक कादंबऱ्या लिहून वाचकांच्या मनावर गारुड करणारा तो बघता बघता ७० वर्षांचा झालाय...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
-
** भाग १ इथे वाचा आता उरलेल्या तीन वीरांविषयी बोलू. हे तीन वीर म्हणजे रॉस गेलर, चँडलर बिंग आणि जोई ट्रिबियानी.... रॉस गेलर (डेव्हिड श...
चित्रपटांशी माझा खूपच कमी संबंध आहे. त्यामुळे मी दोन्ही चित्रपट बघितलेले नाहीत. आता बघूया कधी योग येतो ते.
ReplyDeleteसंकेत, चित्रपटांशी कदाचित नसेल पण सुपरफास्ट प्रतिक्रिया देण्याशी तुझा फार्फार जवळचा संबंध आहे ;) ..
ReplyDeleteनक्की बघ दोन्ही चित्रपट. दोन्ही माझे प्रचंड आवडते चित्रपट आहेत.
'एक चालीस की लास्ट लोकल' तर खुप आवडला होता, हा पाहून तुला परत कमेंट देतो....
ReplyDelete'एक चालीस..' बेस्टच होता.. बिग नथिंग पण अल्टी आहे रे.. बघ नक्की आणि सांग..
ReplyDeleteek chalis.. fast forward mode madhe baghitlay,tyamule farsa athvat nahi. big nothing che naav pahilyandach aiktoy.. doghehi baghave lagtil..
ReplyDeletedeja vu avadle, ata movie avdayla have.
एक चालीस खूप आवडला होता...त्यात थोडंफार टॅरँटीनो स्टाईल इन-रेफरन्सिंग सुद्धा होतं :)
ReplyDeleteआधी मतकरींनी केलेल्या आणि आता तू केलेल्या वर्णानामुळे बिग नथिंग पाहावासा वाटतोय....बघतो आणि मग सांगतो.
एक चालीस फारसा आवडला नव्हता, पण बिग नथिंग आवडेल कदाचित, बघायला हवा.
ReplyDelete'एक चालीस की लास्ट लोकल' तर खुप आवडला होता, हा पाहून तुला परत कमेंट देतो...
ReplyDelete+1
mala english dialogs samjatr nahit. big nothingla subtitles (english chaltil) aahet ka?
ReplyDelete'एक चालीस की लास्ट लोकल' पाहिला आहे ...मस्तच आहे.'बिग नथिंग' हा अजुन पाहिला नाही पण तुझ्या वर्णनामुळे देजावु वैगेरे प्रकार इथे असु शकतो,बाकि तो सिनेमा प्रत्यक्ष पाहिल्यावर कळेलच....
ReplyDelete>>>अर्काईव्ह (ज्याला वर्डप्रेस 'आर्चिव्ह' म्हणतं तेच)
:)
दोन्ही बघितलेले नाहीत! विद्याधरच्या आणि तुझ्या सिनेमाविषयक पोस्टा वाचून 'अगं, करतेयस काय!' असं वाटायला लागतं!!! :(
ReplyDeleteArre Heramb, he ase 'deja vu' che anek anek cineme ahet. mhanje agdi frame to frame copy kelele. Eg. Andar Bahar = 48 Hours, Murder = Unfaithful and many such more..:)
ReplyDeleteसंकेत, दोन्ही बघ.. दोन्हीही आवडतील नक्कीच.. (अर्थात त्यांना रजनीदेवांच्या चित्रपटाची सर नाही हे विनम्रतेने नमूद करू इच्छितो ;) )
ReplyDeleteबाबा, एक चालीस जब्बरदस्तच होता.. टॅरँटीनो स्टाईल इन-रेफरन्सिंग हेहे..
ReplyDeleteअरे मतकरींनी सांगितल्यामुळे तर मी बिनधास्त बघितला. आणि जाम जाम आवडला. बघ नक्की..
मंदार, एक चालीस आवडला नसला तरी बिग नथिंग नक्की नक्की आवडेल. बघच.
ReplyDeleteसुहास,
ReplyDelete'एक चालीस..' बेस्टच होता.. बिग नथिंग पण अल्टी आहे रे.. बघ नक्की आणि सांग.. +१ (आमचंही एक प्लस वन ;) )
चंद्रशेखर, डीव्हीडीमध्ये सबटायटल्स असतातच.
ReplyDeleteदेवेन, मी पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे दोन्ही चित्रपटांची कथा एकसारखी नसली तरीही हाताळणी, मांडणी, प्रसंग, प्रकाशयोजना इ इ साम्यांमुळे देजावूचा भास नक्की होतो..
ReplyDeleteआर्चिव्ह हे हे .. अरे ते जरा असंच वर्डप्रेसची खेचायची लहर आली ;)
अनघा, दोन्ही बघ.. लगेच.. ताबडतोब :) ... अग आणि इतके चित्रपट बघून झाल्यावरही जाणवतं की अरे आपण हा बघितला नाहीये, तो बघितला नाहीये आणि शेवटी अजून चिकार चित्रपट बघायचे राहिले आहेत अशा निष्कर्षाला येतो मी :)
ReplyDeleteमी मागे एकदा म्हटल्याप्रमाणे हे सगळे बघायचे राहिलेले चित्रपट, वाचायची राहिलेली पुस्तकं यासाठी चांगली ५-१० वर्षाची घसघशीत सुट्टी टाकली पाहिजे ;)
साईसाक्षी, अग मी पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे 'देजावू' चा अर्थ मला फ्रेम बाय फ्रेम कॉपी असा अपेक्षित नव्हता. तर मांडणी, हाताळणी (टेकिंग, ट्रीटमेंट) यात कमालीचं साम्य आहे असं मला म्हणायचं होतं. तसे फ्रेम बाय फ्रेम कॉपी असलेले चित्रपट सांगायचे झाले तर हजार पानी पोस्ट लिहायला लागेल. विक्रम भट्टचे सगळे चित्रपट हॉलीवूडवरून फ्रेम बाय फ्रेम कॉपी केलेलेच असतात.
ReplyDelete"एक चालीस..." बेस्ट होता. सिक्वेन्सिंग खूप छान होतं. बिग नथिंग' पहायला हवा.
ReplyDeleteसिद्धार्थ, 'बिग नथिंग' ही बेस्ट आहे. नक्की बघच.. !
ReplyDeleteसध्या मी कॅसल ही सिरियल पहातोय.जुने भाग. आज लावतो हे दोन्ही सिनेमे..
ReplyDeleteहम्म कॅसलबद्दल ऐकलंय... बघितली नाहीये कधी. सध्या मी HIMYM चे पाच सिझन्स डालो केलेत. ते बघणं चाललंय. चांगलं आहे पण फ्रेंड्सची सर नाही :)
ReplyDeleteहे दोन्ही सिनेमे नक्की बघा. फंडू आहेत !
ज ब्ब र द स्त !!!!
ReplyDeleteजबराट आवडला... डेव्हिड श्विमर परत एकदा सही... खूप खूप धन्स हेरंबा...
प्रचंडच सही आहे रे आनंदा.. :)
ReplyDeleteबघ कमेंट नाही आहे माझी म्हणजे वाचलं नसणारंच मी आणि चित्रपटही पाहिला नाहीये....देजावू प्रकाराशी बरेचदा आलाय रे संबंध आणि त्यातही तू आता ओरेगावशी संबंध म्हणतोय्स...(जे पोस्टेत नाहीये पण ते ठीक आहे म्हणा) तर पाहायला हवा...कधी माहित नाही..पण सांगते घरच्या फ़िल्मडिव्हिजनला.....:D :D
ReplyDeleteand I think I might even watch the Hindi as well...as I just like this jonar...:)
अपर्णा दोन्ही बघ नक्की... जबरी आहेत एकदम.. अर्थात बिग नथिंग तू बघितलासच म्हणा आत्ताच.. एक चालीस.. ही नक्की बघ.. अल्टी आहे एकदम..
ReplyDelete